जिओ कॉलर ट्यून कशी सेट करायची | How to set Jio Caller Tune

नमस्कार मित्रांनो, आज काल प्रत्येकाला वाटत की आपल्या फोन मध्ये सुद्धा कॉलर ट्यून असावी. आणि अनेक जणांना कॉलर ट्यून ठेवायला आवडते ही. कारण जेव्हा तुम्हाला जर कोणी कॉल केला तर समोरच्या व्यक्तीला अनावश्यक रिंग ऐकावी लागणार नाही तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीला पण कॉलर ट्यून ऐकताना चांगले वाटते. तसेच आज काल कॉलर ट्यून ठेवणे हा एक ट्रेंड च झाला आहे. तर मग तुम्हाला ही तुमच्या जिओ फोन वर कॉलर ट्यून सेट करायची आहे? तर मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला जिओ फोन वर कॉलर ट्यून कशी सेट करायची हे सांगणार आहोत. तर मग हा लेख पूर्ण वाचा…

जिओ फोन वर कॉलर ट्यून सेट करण्याच्या स्टेप्स:



मित्रांनो, तुम्ही जिओ सिम धारक आहेत आणि तरी तुमच्या फोन मध्ये जिओ कॉलर ट्यून नाही, असे असेल तर कॉलर ट्यून सेट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…

स्टेप 1: मित्रांनो, जर तुम्ही जिओ फोन किंवा जिओ चे सिम वापरत असाल तर त्यात My Jio App असते. हे जिओ चे सर्वात जास्त लोकप्रिय व वापरले जाणारे अँप आहे. यात तुम्ही जिओ शी संबंधित सगळी कामे करू शकता. त्यामुळे जिओ वर कॉलर ट्यून ठेवताना My Jio App असणे आवश्यक आहे. जर तुमच्या फोन मध्ये हे अँप नसेल तर Play Store वरून My Jio App इंस्टॉल करून घ्या.

How to set Jio Caller Tune Step 1

स्टेप 2: My Jio App इंस्टॉल झाल्यावर ते ओपन करा व आता त्याच्या होम स्क्रीन वर तुम्हाला Menu चा ऑपशन दिसेल म्हणजे तीन आडव्या लाइन्स दिसतील त्यावर क्लिक करा.



How to set Jio Caller Tune Step 2

स्टेप 3: आता त्या Menu मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीझ दिसतील त्यातून Jio Tunes या ऑपशन वर क्लिक करा.

How to set Jio Caller Tune Step 3

स्टेप 4: आता गाण्यांचे पेज ओपन झाल्यावर वर उजव्या बाजूला सर्च चे बटण दिसेल त्यावर क्लिक केल्या वर तुम्हाला खाली खूप सारे कॉलर ट्युन्स दिसतील. त्यातून तुम्हाला आवडेल ती ट्यून तुम्ही सेट करू शकता. किंवा सर्च मध्ये जाऊन तुम्ही दुसरे कोणतेही गाणे टाका

How to set Jio Caller Tune Step 4

स्टेप 5: गाण्याला सिलेक्ट करून Set as Jio Tune वर क्लिक करा.

How to set Jio Caller Tune Step 5

त्यांनतर अँप मध्ये तुम्हाला कॉलर ट्यून सेट झाल्याचा मेसेज दिसेल आणि तुमच्या मोबाइल नंबर वर एक (SMS) मेसेज येईल, याचा अर्थ तुमची आवडती जिओ ट्यून सेट झाली आहे.

How to set Jio Caller Tune Step 6

अश्या प्रकारे My Jio वरून तुम्ही विनामूल्य म्हणजे फ्री मध्ये कोणतेही गाणे कॉलर ट्यून म्हणून सेट करू शकता.

कॉलर ट्यून कशी बदलायची

How to change caller tune in Jio

मित्रांनो, कॉलर ट्यून संबंधित आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की, जर तुमच्या फोन मध्ये आधीच एखादी कॉलर ट्यून असेल आणि जर तुम्हाला नवीन कॉलर ट्यून सेट करायची असेल किंवा बदलायची असेल तर तुम्हाला मागील कॉलर ट्यून Deactivate करण्याची गरज नाही, अश्या वेळेस तुम्हाला फक्त नवीन कॉलर ट्यून सिलेक्ट करून सेट करायची आहे. त्यानंतर जुनी कॉलर ट्यून तुमच्या फोन मधून आपोआप निघून जाईल.

दुसऱ्या व्यक्तीच्या फोन मधील कॉलर ट्यून कॉपी कशी करायची

How can I copy my friend’s Jio caller tune?

मित्रांनो, जर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची कॉलर ट्यून कॉपी करून तुमच्या स्वतःच्या फोन मध्ये सेट करायची असेल तर अश्या वेळेस तुम्हाला ज्या व्यक्तीची जिओ कॉलर ट्यून कॉपी करायची आहे त्या व्यक्तीला फोन करा व तो व्यक्ती फोन उचलायच्या आत कॉलर ट्यून वाजली की लगेच तुमच्या फोन मधील * हे बटण दाबा. व लगेच त्या व्यक्तीच्या जिओ कॉलर ट्यून तुमच्या फोन मध्ये सेट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या फोन मधील कॉलर ट्यून कॉपी करून तुमच्या फोन मध्ये सेट करू शकता.

जिओ फोन मधील कॉलर ट्यून काढून कशी टाकायची

How to remove Jio Caller Tune

मित्रांनो, तुम्हाला जर काही कारणांमुळे कोणतीही कॉलर ट्यून काढून टाकायची असेल तर तुम्हाला STOP असे लिहून 56789 वर एसएमएस ( SMS ) पाठवायचा आहे. थोड्याच वेळात तुम्हाला कंपनी कडून Conformation Message येईल व नंतर तुम्हाला Confirm करायचे आहे. व नंतर तुम्हाला कॉलर ट्यून काढून टाकल्याचा मेसेज येईल. या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फोन मधून कॉलर ट्यून काढून टाकू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे My Jio वरून तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे जिओ ट्यून म्हणून सेट करू शकता. असे हे एक विश्वसनीय कार्य आहे जे चांगली व फ्री मध्ये कोणतेही गाणे डाउनलोड करून देतो किंवा सेट करून देतो.

तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तसेच तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!