GST सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे | How to download GST certificate online
मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला GST चे सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
GST भरणे ही आता एक सोपी प्रक्रिया झाली आहे. एकदा का नोंदणी झाली की तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळतो. हा क्रमांक वापरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा जीएसटी भरू शकता. अजून एक महत्त्वाचे म्हणजे तुमचा व्यवसाय GST कडे रजिस्टर आहे याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे ही महत्वाचे आहे. जेणेकरून सरकार ने किंवा ग्राहकाने विचारणा केल्यास तुम्हाला ते दाखवता येईल. जर तुम्ही आधीपासून GST साठी रजिस्टर केले असेल तर तुम्ही ऑनलाईन पध्दतीने जीएसटी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.
मित्रांनो जीएसटी सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल वरून जीएसटी (GST) ची वेबसाईट gst.gov.in ओपन करायची आहे.
स्टेप 2: त्यानंतर तुमच्या समोर जीएसटी ची वेबसाईट ओपन होईल. त्यात वरच्या बाजूला तुम्हाला लॉग इन (Login) चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 3: लॉग इन करताना तुम्हाला तुमचे Username व Password टाकायचा आहे. नंतर दिलेला Captcha टाकायचा आहे. व त्यानंतर login या बटन वर क्लीक करायचे आहे.
तुम्हाला जर तुमचे Username माहित नसेल तर तुम्ही तुमच्या CA कडून तो मागून घेऊ शकता, किंवा ज्या व्यक्तीने तुमचा GST नंबर काढून दिला व जो व्यक्ती तुमचा GST रिटर्न भरतो, त्या कडून तुमच्या लॉगिनची माहिती घेऊ शकता.
स्टेप 4: लॉग इन होताच तुमच्या समोर जीएसटी चे पोर्टल ओपन होईल. त्यात तुम्हाला My profile किंवा View profile या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: तुमचे प्रोफाईल ओपन झाल्यावर इथे तुम्हाला GST संदर्भात सगळी माहित बघायला मिळेल. याच पेज वर साइड ला तुम्हाला My Registration Certificate असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लीक करायचे आहे.
क्लीक केल्यावर लगेच तुमचे जीएसटी चे सर्टिफिकेट डाउनलोड व्हायला सुरुवात होते. हे सर्टिफिकेट PDF स्वरूपात तुम्हाला बघायला मिळते. सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करायचे आहे. मित्रांनो, जीएसटी सर्टिफिकेट हे तीन पेज चे असते. तसेच या सर्टिफिकेट वर तुमच्या सगळ्या डिटेल्स लिहिलेल्या असतात. जसे की तुमचे नाव, जीएसटी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, ट्रेड नाव, तुमचा अड्रेस, तुमचा फोटो, वगैरे अशी सर्व माहिती बघायला मिळते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आपण जीएसटी (GST) सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे या बद्दल जाणून घेतले. तुम्ही अजून ही जीएसटी सर्टिफिकेट डाउनलोड केले नसेल तर आत्ताच करून घ्या. त्यासाठी हा लेख तुम्हाला नक्की मदत करेल ,अशी आशा करतो. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.धन्यवाद।