घरबसल्या मोबाईल मधून मतदान कार्ड ला आधार लिंक करा (2 मिनिटात) | Link Aadhaar Card To Voter Card

नमस्कार मंडळी, आज आपण घरबसल्या ऑनलाइन भारत निवडणूक आयोगाच्या Voter Helpline अँपच्या मदतीने मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

How To Link Aadhaar Card To Voter Card

भारत सरकारच्या नवीन नियमानुसार वोटर कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून हि मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमे मुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीमधील एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी असेलेले नावे काढून टाकणे आणि बोगस मतदान कार्ड ओळखून ते काढून टाकण्यास मदत होणार आहे. आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन तुम्ही हि लिंकची प्रक्रिया पूर्ण करू शकता, पण ज्यांना हीच प्रक्रिया घरी बसून करायची आहे त्यांच्यासाठी सरकारने ऑनलाइन पद्धत सुरु केली आहे.आधार-मतदान ओळखपत्र ऑनलाईन लिंक करण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन Voter Helpline अँपच्या मदतीने हि प्रोसेस पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

How To Link Aadhaar with Voter Card

अँपच्या माध्यमातून मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे

चला तर मंडळी मतदान कार्ड ला आधार कार्ड Voter Helpline मोबाईल अँपच्या मदतीने कसे लिंक करायचे ते बघूयात. त्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप नीट वाचून त्या फॉलो करा.स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर किंवा ॲपल स्टोर मध्ये जाऊन Voter Helpline अँप इन्स्टॉल करायचे आहे.

Voter Helpline प्ले स्टोरे लिंक -> Voter Helpline App Android

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 1

स्टेप 2: अँप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडायचे आहे. तुमच्या पहिल्या पेज वर Disclaimer ची माहिती दिलेली असेल, तुम्हीला खाली दिलेल्या I Agree ऑपशन वर टिक करायची आहे आणि Next बटन वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 2

स्टेप 3: नवीन पेज वर तुम्हाला वोटर हेल्पलाईन अँप कोणत्या भाषेत वापरायचे आहे ते निवडायचे आहे. आम्ही English भाषा निवडत आहोत.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 3

स्टेप 4: पुढच्या पेज वर तुम्हाला बॉक्समध्ये वेगवेगळे ऑपशन दिसतील, त्यातील Voter Registration बॉक्स वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 4

स्टेप 5: आत्ता तुमच्या समोर मतदान कार्ड संभंदीत पाच ते सहा फॉर्मची यादी दिसेल, त्यातील तुम्हाला Electoral Authentication Form (Form B) वर क्लिक करायचे आहे.

अधिक माहिती – Form B फॉर्म मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही ऑफलाईन मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करायला जाताल तेव्हा हा फॉर्म तुमच्याकडून भरून घेतला जातो.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 5

स्टेप 6: आत्ता तुम्हाला पुढच्या पेज वर असलेल्या Let’s Start बटन वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 6

स्टेप 7: आत्ता पासून महत्वाची गोष्टी चालू होतील, तुम्हाला नवीन पेज वर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तुम्ही तो बॉक्स मध्ये टाकायचा आहे, आणि नंतर Send OTP बटन वर क्लिक करायचे आहे. थोड्याच वेळात OTP येईल तो बॉक्स मध्ये टाकून Verify OTP बटन वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 7

स्टेप 8: आत्ता पुढचे पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन पर्याय दिले जातील

  1. Yes, I have Voter ID number (अर्थ तुमच्याकडे तुमचा मतदान कार्ड नंबर आहे)
  2. No, I don’t have Voter ID number (अर्थ तुमच्याकडे तुमचा मतदान कार्ड नंबर नाही)

या दोघांपैकी तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे. व खाली असलेल्या Next बटन क्लिक करायचे आहे.

अधिक माहिती – तुमच्या मतदान कार्ड वर तुमचा मतदान कार्ड नंबर असतो.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 8

स्टेप 9: पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे, आणि खाली बॉक्स मध्ये महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे. नंतर Fetch details या बटन वर क्लिक करायचे आहे. तुम्ही टाकलेला तुमचा मतदान नंबर बरोबर असेल तर खाली एक मेसेज येईल. ( We have Found this record for your enter Voter ID. Please click on Proceed button ) असा मेसेज दिसल्यानंतर खाली असलेल्या Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.

अधिक माहिती – वरचा मेसेज दिसला नाही तर समजून घ्या कि तुम्ही टाकलेला मतदान कार्ड नंबर चुकीचा आहे किंवा तुमचे कार्ड रद्द झाले आहे. तुम्ही तुमच्या भागाची मतदान यादी बघून तुमचा मतदान कार्ड नंबर बरोबर आहे का ते चेक करू शकता.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 9

स्टेप 10: पुढच्या पेज वर तुम्हाला तुमची मतदान आयोगाकडे असलेली वैयक्तिक माहिती दिसेल. ती माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्या. आणि नंतर तुम्हाला Next बटन वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 10

स्टेप 11: आत्ता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आणि त्याखाली Place या ऑपशन मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचे आहे. आणि शेवटी Done या बटन वर क्लिक करायचे आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 11

स्टेप 12: तुमचा फॉर्म यशस्वी पणे सबमिट झाल्यावर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून तो ID जपून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच तुमचे मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करायचे काम कुठेपर्यंत आले आहे ते तपासण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

How To Link Aadhaar Card To Voter Card Step 12

How To Check Voter Aadhaar Link Status

मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक स्टेटस चेक करणे

आत्ता बघूयात तुम्ही लिंकसाठी अर्ज केलेल्या फॉर्मचा स्टेटस कसा चेक करायचा ते.

तुम्ही तुमच्या मोबाइल मध्ये असेलेले Voter Helpline अँप उघडायचे आहे. नंतर तुम्हाला खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या Explore बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर VOTER SERVICES या ऑपशन वर क्लिक करायचे या मध्ये Status Of Application ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How To Check Voter Aadhaar Link Status Step 1

आता तुम्हाला तुमचा बॉक्स मध्ये Reference ID टाकायचा आहे आणि Track Status बटन वर क्लिक करायचे आहे. आत्ता तुम्हाला खाली तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल.

How To Check Voter Aadhaar Link Status Step 2

सध्या जास्त प्रमाणात मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक चे काम चालू आहे, त्यामुळे लिंक चे कामाला वेळ लागू शकतो.

अशा प्रकारे आजच्या लेखात आपण मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती करून घेतली. तुम्हाला जर हा लेख लेख वाचून फायदा झाला असेल आणि तुम्हाला लेख माहितीपूर्ण वाटत असेल तर तुमच्या जवळच्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. आभारी आहोत.