आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सोप्या सरळ भाषेत माहिती | Ayushman Bharat Health Cardनमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card ) कसे बनवायचे, त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तसेच या कार्ड चा वापर कसा करायचा, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपले भारत सरकार देशातील प्रत्येक गरीब वर्गातील व्यक्तीसाठी विविध योजना राबवत असते. बहूतेक योजना या महिला, लहान मुले, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या साठीही राबविल्या जातात. या सर्व योजनांमध्ये सर्वात महत्वाचे असते ती आरोग्य योजना. आजही भारतातील बऱ्याच लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. म्हणूनच देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी भारत सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) असे आहे किंवा ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे ही म्हटले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एक हेल्थ कार्ड (Health Card) दिले जाते.Ayushman-Bharat-Health-Card-information in marathi

मित्रांनो, याच हेल्थ कार्डला आयुष्मान गोल्डन कार्ड असेही म्हटले जाते. या योजने अंतर्गत देशांतल्या जवळपास 50 कोटी लोकांना एका वर्षात 5 लाख पर्यंतची मोफत ट्रीटमेंट दिली जाते. या गोल्डन कार्डच्या मदतीने तुम्ही देशातल्या सुचिबद्ध केलेल्या कोणत्याही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊ शकता. यात डॉक्टरची फी, औषधांचा खर्च, ऑपरेशनचा खर्च या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, या आयुष्मान भारत योजना बद्दल आपण पुढे आणखी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. सर्वात पहिले आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:

आयुष्मान भारत योजना बद्दल थोडी माहिती

मित्रांनो, आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच PMJAY असेही म्हणतो. ही एक आरोग्य विमा योजना आहे जी भारत सरकारने आयुष्मान गोल्डन कार्ड द्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे. ही योजना सप्टेंबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आणि महत्वाचे म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील 50 कोटी नागरिकांना कव्हर करण्याचे आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक रूपये 5 लाखांचे कव्हरेज मिळते. ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यावर 15 दिवसांपर्यंत येणारा सर्व खर्च या योजने मार्फत करता येतो. फक्त या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटल मध्ये आयुष्मान गोल्डन कार्ड दाखवावे लागेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्ड चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तास हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागेल. आता आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे ते जाणून घेऊ या:

आयुष्मान हेल्थ कार्ड तयार कसे करायचे

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला PMJAY च्या ऑफिशियल वेबसाईट ला pmjay.gov.in भेट द्यायची आहे.स्टेप 2: त्या नंतर पोर्टल च्या होम पेज वर Am I Eligible? असा ऑप्शन दिसेल. त्यात जाऊन तुम्ही या गोल्डन कार्ड साठी पात्र आहात की नाही ते चेक करू शकता. पण बहुतेक वेळा या पोर्टलचे सर्व्हर बिझी असल्याने चेक करता येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसऱ्या पर्यायाची माहिती देतो.

स्टेप 3: वेबसाइट उघडल्यावर डाव्या बाजूला वरती Menu चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर पोर्टल (Portal) या ऑप्शन मध्ये जायचे आहे. आता यात तुम्हाला Village level SECC data असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

Ayushman-Bharat-Card-Tayar-Kase-Karayche-Step-1

स्टेप 4: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व Get OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Log In बटन वर क्लिक करायचे आहे.

Ayushman-Bharat-Card-Tayar-Kase-Karayche-Step-3

स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला एक इंटरफेस आलेला दिसेल. त्यात विचारलेली माहिती टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते चेक करू शकता.

स्टेप 6: या माहितीत तुम्हाला खाली दिलेली सर्व माहिती टाकायची आहे.

 • राज्य नाव / State Name
 • जिल्हा नाव /District Name
 • ब्लॉक प्रक्रर / Block Type (जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर Block ऑपशन निवडा आणि जर शहरी भागातून असला तर ULB ऑपशन निवडा)
 • तालुका किंवा जवळचे मोठे गाव / Block Name
 • गावाचे नाव / Village Name

शेवटी Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Ayushman-Bharat-Card-Tayar-Kase-Karayche-Step-4

स्टेप 7: मित्रांनो, आता तुमच्या गावातून जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या नावाची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यासाठी थोडे खाली स्क्रोल करून pdf आयकॉन ऑपशन वर क्लिक करा.

Ayushman-Bharat-Card-Tayar-Kase-Karayche-Step-5

स्टेप 8: आता ती pdf उघडा आणि लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचे आहे. जर तुमचे नाव असेल तर तुमच्या नावासमोर एक FamilyID दिलेला असेल तो कॉपी करून सेव्ह करा किंवा स्क्रीनशॉट काढा.

Ayushman-Bharat-Card-Tayar-Kase-Karayche-Step-6

स्टेप 9: मित्रांनो, तुम्हाला आता केवायसी करायची आहे. ही केवायसी तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सुचिबद्ध केलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये तुम्हाला केवायसी फॅसिलिटी मिळून होईल. तसेच कोणत्याही जन सुविधा केंद्र किंवा CSC सेन्टर मध्ये तुम्हाला ही सुविधा मिळून जाईल. तिथे तुम्ही 30 रुपये फी भरून केवायसी पूर्ण करू शकता.

मित्रांनो, केवायसी झाल्यानंतर 10 दिवसानंतर तुमचे कार्ड इश्यू केले जाते. व तसे तुम्हाला SMS वर नोटिफिकेशन ही मिळते. व नंतर तुम्ही पोर्टल वरून तुमचे कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा CSC सेन्टर भेट देऊ शकता.

(मित्रांनो, वर सांगितल्या प्रमाणे, हे कार्ड बनवण्यासाठी 30 रुपये मोजावे लागत होते. परंतु, आयुष्मान गोल्डन कार्ड आता मोफत बनवले जात आहेत. यामुळे ही गरीब लोकांसाठी खूप दिलासा देणारी बाब आहे. )

आयुष्मान गोल्डन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?

मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला ओळखपत्र, आधार कार्ड, शिधा पत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो व रेजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतील.

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे?

मित्रांनो, आरोग्य यादीत जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला गोल्डन कार्ड दिले जाते. म्हणजे तुम्ही पात्र आहात. तसेच अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कार्डधारक (पिवळे राशन कार्ड) असणे आवश्यक आहे. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे. यासोबतच अर्जदाराचे नाव जनगणना डेटा मध्ये समाविष्ट असले पाहिजे.

आयुष्मान भारत कार्डचे फायदे

मित्रांनो, PMJAY अंतर्गत गोल्डन कार्ड चे फायदे पुढील प्रमाणे आहेत…

 • या योजनेट संपूर्ण कुटुंब समाविष्ट होऊ शकते.
 • हे गोल्डन कार्ड समाजातील गरीब वर्गातील लोकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते.
 • लाभार्थी या योजनेचा लाभ संपूर्ण देशभरात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत घेऊ शकतात.
 • कोविड पेशन्ट देखील हे कार्ड वापरू शकतात.
 • सुचिबद्ध हॉस्पिटल मध्ये लोक कॅशलेस उपचारांचा लाभ घेऊ शकतात.
 • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना रुपये 5 लाख पर्यंतचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतील.
 • तसेच तुम्हाला तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड 15 दिवसात मिळते.

आयुष्मान भारत योजने अंतर्गत कोण कोणत्या आजारांवर उपचार केले जातील?

मित्रांनो, या योजने अंतर्गत सुमारे 1300 आजारांवर उपचार करण्यात येतात. त्यात किडनीरोग, कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

आयुष्मान गोल्डन कार्ड बनवल्यानंतर किती रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात?

मित्रांनो, गोल्डन कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.

आयुष्मान गोल्डन कार्ड हरवले असेल तर काय करावे?

मित्रांनो, तुमचे गोल्डन कार्ड जर कुठे हरवले असेल आणि तुम्हाला त्याचे डुप्लिकेट कार्ड बनवायचे असेल किंवा त्याची प्रिंट काढायची असेल, तर फक्त 15 रुपये देऊन तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेट करावे लागेल. व त्या नंतरच तुम्हाला नवीन कार्ड दिले जाईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण आयुष्मान भारत गोल्डन कार्ड कसे बनवायचे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।