SIP संपूर्ण माहिती: SIP म्हणजे काय, फायदे, नुकसान, SIP किती वर्ष करावी?



मित्रांनो, आताच्या आधुनिक काळात फक्त लाईफस्टाईल च नाही तर नोकरी व पगाराचे स्वरूप देखील बदलले आहे. पूर्वी एकदा का नोकरी लागली की निवृत्त होईपर्यंत इमानदार पणे नोकरी केली जात होती. शिवाय निवृत्ती नंतर पेन्शन मिळत होती म्हणून साठ वयानंतर लोकं थोडे निश्चिन्त राहू शकत होते. पण आता तसं नाहीये. आत्ताच्या काळात ठराविक वयानंतर पेन्शन वगैरे मिळत नाही. त्यात नोकरीच्या अनिश्चिततेमुळे स्वतःचा आर्थिक स्तर कसा उंचवायचा याचा सामान्य माणूस विचार करत असतो.

SIP Mhanje Kay

आणि आजकाल तर बरेच जण नोकरीतून लवकर निवृत्त होण्याचा विचार करतात. पण खरचं ते एवढं सोपं आहे का? मित्रांनो, नोकरीच्या कचाट्यातून लवकर सुटका करून घेण्याआधी पहिले आपल्याकडे निवृत्तीचे चोख नियोजन असणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने पुरेसा निधी हाताशी असणे, सर्वंत महत्त्वाचे आहे. अन्यथा लवकर रिटायरमेंट घेऊन स्वत:चे हाल करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वत:कडे किमान निधी असणे आवश्यक आहे. मग त्यासाठी सामान्य नोकरदार माणूस नोकरी चालू असतानाच बँकेत किंवा एफडी (FD) मध्ये नाहीच काही तर कमीत कमी आरडी (RD) मध्ये गुंतवणूक करतो.



पण एवढंच पुरेस नाहीये! या पलीकडे जाऊन विचार करायला हवा की याव्यतिरिक्त आपण कशात गुंतवणूक केल्यास आपल्याला जास्त फायदा होईल? खरंतर आपण सामान्य माणस पैसे गुंतवायचे म्हटलं की घाबरतो. आणि त्यात ही जर म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवायचे म्हटलं तर आपले पहिले उत्तर ‘नाही’ हेच येत असत. मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत जे म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यात सर्वात योग्य व रिस्क फ्री पर्याय म्हणजे SIP करणे.

मित्रांनो, एसआयपी म्हणजे एकदाच मोठी रक्कम गुंतवायचे असे नाही. असे केलं तर नक्कीच तोटा होणार. एसआयपी मध्ये तुम्ही दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने एक ठराविक रक्कम गुंतवणूक करता त्यामुळे इथे तुम्हाला तोटा होत नाही. त्यामुळे टप्याटप्याने तुम्ही स्वतःचा फायदा करून घेऊ शकता. आता तुम्ही विचाराल की एसआयपी मध्ये गुंतवणूक किती व कशी करायची, किंवा त्याचा काय काय फायदा होतो. किती वर्षसाठी एसआयपी करावी, वगैरे वगैरे… तर मित्रांनो, थोडं थांबा, कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एसआयपी बद्दल ही सर्व माहिती सांगणार आहोत. त्यामुळे एसआयपी बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

SIP म्हणजे काय ?

What is SIP?

सर्वात पहिले एसआयपी (SIP ) म्हणजे काय ते जाणून घेऊ या



मित्रांनो, SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan ). म्हणजेच एक ठराविक रक्कम एक ठराविक कालावधी नंतर शिस्तबद्ध पद्धतीने केलेली गुंतवणूक म्हणजे एसआयपी. आता हा कालावधी दर आठवड्याला असू शकतो, किंवा दर पंधरादिवसानी असू शकतो किंवा एक महिना किंवा त्रैमासिक सुद्धा असू शकतो.

उदाहरणार्थ, समजा तुमच्या बँक खात्यातून एक ठराविक रक्कम दर आठवड्याला वजा होऊन तुम्ही निवडलेल्या एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये मग ती कुठलीही फंड असो, hdfc, icici, किंवा इतर फंड मध्ये गुंतवली जाते. आता यात तुमची रक्कम ठरलेली असते.

What is SIP

आणि कालावधी सुद्धा ठरलेला असतो जो तुम्हीच बँकेला सांगतात, की दर आठवड्याला किंवा महिन्याला तुमच्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मधून 500 किंवा 1000 रूपये वजा होऊन तुमच्या ठरलेल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले गेले पाहिजे. यालाच आपण standard instructions असे म्हणतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर, एसआयपी ची रक्कम ही दरमहा आपोआप कट होते व तुमच्या बँक अकाउंट मधून म्युच्युअल फंड अकाउंटला ट्रान्सफर होते. यामध्ये गुंतवणूकदार आपल्या सोयीच्या तारखेनुसार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. दीर्घ कालावधीमध्ये एसआयपी द्वारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीतील जोखीम कमी होते आणि नफा करता येतो.

तसेच एसआयपी ही योजना लवचिक असते, कारण यात गुंतवणूकदार कधीही गुंतवणूक करणे थांबवू शकतात फक्त त्यासाठी एक महिण्याआधी नोटीस द्यावी लागते. तसेच गुंतवणूक दार गुंतवणुकीची रक्कम कमी किंवा अधिक करू शकतात. या व्यतिरिक्त, शेअर बाजारात चढ- उतार असेल तरीही एसआयपी म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक करत राहते.

SIP चे फायदे

SIP Benefits

(SIP) एसआयपीचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या:-

  1. किमान रकमेद्वारे गुंतवणूक (Investment by minimum amount):- मित्रांनो, एसआयपी द्वारे कमीत कमी रकमेत आपण गुंतवणूक करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी सातत्याने लहान लहान रक्कम गुंतवून तुम्ही मोठी गुंतवणूक उभी करू शकता. SIP मध्ये 500 रूपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. काही म्युच्युअल फड कंपनी मध्ये 100 रुपये पासून सुद्धा गुंतवणूक सुरू करन्याची परवानगी असते.
  2. गुंतवणुकीची सुलभता (Ease of investment):- जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 रूपये गुंतवायचे असतील तर प्रत्येक महिन्याला बॅंक खात्यातून 1 हजार रूपये वजा करून ते एसआयपीच्या खात्यात गुंतवले जातात. या पैशांमधून तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड कंपनीचे युनीट खरेदी केले जातात. ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात मिळतो.
  3. जोखीम कमी करणे (Low risk):- मित्रांनो, तुम्ही जर इक्विटी फंड मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक केली तर तिथे एकाच दिवशी म्हणजे lumpsum मध्ये पैसे गुंतवले जात नाहीत. त्यामुळे तुमची जोखीम म्हणजेच risk कमी होते. तसेच SIP द्वारे केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळ साठी होत असल्याने तुम्हाला वेगवेगळ्या किमतीने युनीट्स खरेदी करून मिळतात. परिणामी अनेक वर्षांनंतर बाजाराचा कोणताच नकारात्मक प्रभाव तुमच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही.
  1. टॅक्स सवलत (Tax Benefit):- मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना किंवा केलेली गुंतवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. तथापि काही फंड हे फक्त टॅक्स गुंतवणुकीसाठी असतात. पण त्याचा लॉक- इन कालावधी किमान 3 वर्षांचा असतो.
  2. पद्धतशीर आणि शिस्तबद्ध गुंतवणूक (Systematic and disciplined investment):- मित्रांनो, तुमच्या बॅंक खात्यातून तुमच्या सोयीनुसार थोडी थोडी रक्कम नियमितपणे गुंतवली जाते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीत शिस्त आणि पद्धतशीपणा राहतो. परिणामी बचतीची चांगली सवय लागते.
  3. चक्रवाढ व्याजाचा लाभ (Compounding interest benefits):- मित्रांनो, एसआयपी द्वारे गुंतवणूक केल्यास तुम्हाला व्याजावर व्याज मिळते. म्हणजे एसआयपीच्या गुंतवणूक रकमेवर जो काही परतावा मिळतो, तो पुन्हा त्याच ठिकाणी गुंतवला जातो. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या परताव्यात वाढ होते.
  1. कधीही पैसे काढण्याची सुविधा (Anytime withdrawal facility):- मित्रांनो, काही ठराविक फंड वगळता एसआयपी मध्ये लॉक-इन पिरियड नसतो. त्यामुळे तुम्ही आधी नोटीस देऊन कधीही पैसे त्यातून काढू शकता.

तसेच SIP ही काही EMI सारखी नाही. कधी जर तुमच्या कडे पैसे नसतील तर एसआयपी काही काळ थांबवली तरी चालते, जे पैसे गुंतवलेले आहेत त्यावर तुमची गुंतवणूक चालूच असते, ते पैसे कुठेही जात नाही, व जेव्हा तुम्हाला काढावेसे वाटतात तेव्हा तुम्ही ते काढू शकता.

मित्रांनो, शेवटी फक्त एवढंच सांगेल की, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेला अर्थात एसआयपीला (SIP ) खूप महत्त्व आहे. पण प्रत्येक एसआयपी 100 टक्के नफ्याची हमी देत नाही. हा पण दीर्घ काळ गुंतवणुकीत तोट्यापासून किमान संरक्षण मिळवणे शक्य होऊ शकते.

SIP चे नुकसान काय आहेत?

SIP Disadvantages

मित्रांनो, ज्याप्रकारे प्रत्येक गोष्टीला चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात, तशाच एसआयपी मध्ये पण आहेत आणि जर त्या जाणून घेतल्या तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

  1. मित्रांनो, काही फंड मध्ये एक वर्ष आधी पैसे काढले तर चार्जेस लागतात. किंवा कर लागतो.
  2. तसेच काही फंडस् चा expense ratio खूप असतो.
  3. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसआयपी मध्ये चांगले रिटर्न्स हे दीर्घकाळातच मिळतात, शॉर्ट टर्म मध्ये लॉस ही होऊ शकतो.
What Is The Right Duration For a SIP

SIP किती वर्ष करावी?

What Is The Right Duration For a SIP?

मित्रांनो, तुम्ही जर एसआयपी Equity mutual fund केली असेल तर कमीत कमी ५ वर्षांसाठी करावी. तसेच एसआयपी किती वर्ष करावी हे तुमचा कोणत्या टाइप चा mutual fund आहे ह्यावर देखील अवलंबून असते. लार्ज कॅप म्यूचुअल फंड मध्ये एसआयपी 5 ते 7 वर्षांसाठी करावी. तर फ्लेक्सि कॅप म्यूचुअल फंड मध्ये एसआयपी 7 ते 10 वर्षांसाठी करावी. आणि स्मॉल कॅप किंवा मिड कॅप म्यूचुअल फंड मध्ये एसआयपी 10 वर्षा पेक्षा जास्त कालावधी साठी करावी.

SIP मधून पैसे कधी व कसे काढावे?

How Do You Withdraw Money From SIP

मित्रांनो, कोणतीही गुंतणूक ही आर्थिक ध्येयाप्रमाणे केली पाहिजे, त्यामुळे ती किती काळ केली पाहिजे आणि कधी पैसे काढले पाहिजे हे कळते. त्यासाठी सर्वात पहिले आपण एसआयपी का करतो आहे हे आपल्याला माहीत असं खूप गरजेच आहे. तसेच शेअर मार्केट हे नेहमी वर खाली होत असत, म्हणून शेअर मार्केट मधून पैसे कधीही एकदम काढू नये, ते टप्या टप्याने काढावे. म्हणजे ज्या वर्षी तुमचे आर्थिक ध्येय पूर्ण होणार असेल, त्याच्या ३ वर्षा आधीपासून तुम्ही पैसे काढायला सुरवात केली पाहिजे.

कारण, शेयर मार्केट कितीही खाली पडल तरी ३ वर्षामध्ये ते वर येतच असे शेयर मार्केटच्या इतिहासमुळे जाणून येते. त्यामुळे सर्वप्रथम आर्थिक ध्येय तयार करा, जेणेकरून तुम्हाला किती काळ पैसे गुंतवून ठेवायचे आहे हे कळेल. आणि तुमचे आर्थिक ध्येय ज्या वर्षी पूर्ण होणार असेल, त्याचा ३ वर्षा आधीपासूनच दरमहिन्याला पैसे काढणे सुरू करा. तेच जर तुम्ही एकदम काढायला गेलात आणि मार्केट खाली असेल तर तुम्हाला कमी रिटर्न्स मिळतील आणि ध्येयही पूर्ण होणार नाही.

तर मित्रांनो, आर्थिक शिस्त राखत हळूहळू संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी एसआयपी (SIP) हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: sip in marathi, sip investment in marathi, sip information in marathi, information about sip in marathi, monthly sip meaning in marathi, mutual fund sip meaning in marathi, sip benefits in marathi, sip details in marathi, sip full information in marathi, sip information marathi, sip investment information in marathi, sip investment marathi, sip kashi karavi, sip mahiti marathi, sip marathi, sip marathi mahiti, sip meaning marathi, sip mutual fund in marathi, sip mutual fund information in marathi, sip plans in marathi, sip plans information in marathi