आपला TDS (टीडीएस) ऑनलाईन कसा चेक करायचा | How to Check Online TDS 2022

नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टीडीएस (TDS) बद्दल माहिती बघणार आहोत, तसेच तुमचा स्वतःचा टीडीएस (TDS) ऑनलाइन कसा पहायचा या बद्दल ही जाणून घेणार आहोत.

सर्वात पहिले टीडीएस (TDS) म्हणजे काय

मित्रांनो, टीडीएस (TDS) म्हणजे Tax Deducted at Source. म्हणजे तुमच्या उत्पन्नातून होणारी कर कपात. तुम्हाला जिथून उत्पन्न मिळत असते तिथेच हा कर म्हणजे tax उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो आणि उरलेली रक्कम तुम्हाला दिली जाते. तुमच्या उत्पन्नातून कापलेला हा टॅक्स सरकारी तिजोरीत जमा होतो. यालाच टीडीएस (TDS) असे म्हणतात. आयकर विभागाच्या नियम नुसार एका निश्चित रकमेची मर्यादा ओलांडल्या वर टीडीएस कापून घेतला जातो. मग तुमचे मिळणारे उत्पन्न हे कमिशन बेस्ड असो, वेतन असो किंवा इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न असो त्यावर टॅक्स आकारला जातो. आणि हा कापलेला टॅक्स म्हणजेच टीडीएस पॅन मध्ये जमा होतो.



परंतु, आपला किती टीडीएस कापला जातो, किती रिफंड होऊ शकतो, ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाईन पध्दतीने जाणून घेऊ शकता. तुमच्या पॅन नंबरच्या सहाय्याने तुमचा टीडीएस कापला गेला आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. ते कसे चला तर जाणून घेऊ या…

टीडीएस (TDS) ऑनलाईन कसा पहायचा

टीडीएस (TDS) ऑनलाईन कसा पहायचा आणि TDS रिपोर्ट डाउनलोड कसा करायचा

मित्रांनो, तुमचा टीडीएस कापला गेला आहे की नाही, आणि जर कापला असेल तर तो किती कापला गेला आहे, तसेच तुमच्या टीडीएसचा रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.



स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा PC वरील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सची (income tax) वेबसाईट सर्च करायची आहे.

Income Tax Website – incometax.gov.in

How to Check Online TDS Step 1

स्टेप 2: वेबसाईट वर सर्वात आधी तुम्हाला तुमचे स्वतःचे अकाउंट तयार नसेल तर ते आधी तयार करायचे आहे व रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाइट वर मेनू मध्ये Register बटन आहे. नंतर नवीन पेज वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.

नोट – जर याआधी तुम्ही income tax पोर्टल वरून तुम्ही इनकम टॅक्स भरला असेल (तुमच्या CA ला विचारू शकता) तर तुमचे अकाउंट आधी पासून बनले असेल. अशा वेळी तुम्ही डायरेक्ट स्टेप 3 वाचा आणि अकाउंट लॉगिन करा जर पासवर्ड माहित नसेल तर forgot password वर क्लिक करून नवीन पासवर्ड सेट करा.

How to Check Online TDS Step 2

जसे कि तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल, पत्ता इत्यादी. नंतर तुमच्या मोबाइल नंबर आणि ई-मेल वर OTP येईल तो खालच्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. नंतर पुढच्या पेज वर तुम्ही दिलेली माहिती तपासायची आहे. नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 2 sub step 1

आता तुम्हाला तुमच्या अकाउंट चा पासवर्ड सेट करायचा आहे. आणि खाली पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी मेसेज टाईप करायचा आहे. आणि Register बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 2 sub step 2

आता तुमचे अकाउंट तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला दिसेल आता Proceed Login बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटन वर क्लिक करून लॉगिन करायचे आहे. लॉग इन करताना तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा पॅन नंबर किंवा युजरनेम टाकायचा आहे व Continue या बटन वर क्लीक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 3

त्यानंतर तुमच्या समोर आणखीन एक पेज ओपन होईल त्यातील Please confirm your secure access message या वर टिक करायचे आहे. व खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि Continue या बटन वर क्लीक करायचे आहे. आता तुमचे अकाउंट लॉग इन होऊन जाईल.

How to Check Online TDS Step 3 sub step 1

स्टेप 4: मित्रांनो, अकाउंट ओपन झाल्यावर तुम्हाला वरती मेनू मध्ये अनेक ऑप्शन दिसतील, त्यातील e-file या ऑप्शन मधून, Income Tax Returns या ऑप्शन मधील, View Form 26AS या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 4

त्यानंतर तुमच्या समोर एक Disclaimer ओपन होईल व तुम्हाला ते Confirm करायचे आहे. आणि लगेचच तुमच्या समोर TDS ची वेबसाईट ओपन होऊन जाईल. त्यात आलेल्या बॉक्स वर टिक करून Proceed या बटन वर क्लीक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 4 sub step 1

स्टेप 5: आता तुमचा जो काही टीडीएस डिडक्ट झालेला आहे त्याचा रिपोर्ट पाहण्यासाठी खालील View Tax Credit (Form 26AS) या वर क्लीक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 5

स्टेप 6: त्यानंतर तुमच्या समोर एक access ओपन होईल त्यात तुम्हाला Assessment Year (ज्या वर्षाचा TDS पाहायचा आहे ते वर्ष निवडा) टाकायचा आहे. व तो रिपोर्ट तुम्हाला HTML मध्ये पहायचा आहे की Text मध्ये पहायचा आहे ते view as या ऑप्शन मधून सिलेक्ट करायचे आहे. आणि खाली view/Download या वर क्लीक करायचे आहे.

How to Check Online TDS Step 6

स्टेप 7: त्या नंतर तुमच्या समोर काही इन्फॉर्मेशन येईल आणि खाली Part 1 मध्ये ज्या कंपनी ने तुमचा टीडीएस कापला आहे त्याची लिस्ट येईल तसेच किती टीडीएस कापला आहे, कधी म्हणजे कोणत्या तारखेला कापला आहे, अशी सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळेल.

How to Check Online TDS Step 7

स्टेप 8: मित्रांनो, तुम्हाला जर हा पूर्ण रिपोर्ट डाउनलोड करायचा असेल किंवा pdf मध्ये हवा असेल तर, त्याच पेज च्या वरती Export as pdf या ऑप्शन दिला आहे त्या वर क्लीक करायचे आहे व तुमचा टीडीएस रिपोर्ट pdf मध्ये डाउनलोड होऊन जाईल.

How to Check Online TDS Step 8

टीडीएस (TDS) कधी कापला जातो?

मित्रांनो, टीडीएस कधी कापला जातो याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. शक्यतो पगार देताना त्यातून टीडीएस कापला जातो. तसेच जर तुम्हाला आगाऊ पगार मिळत असेल किंवा कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळत असेल तरी देखील टीडीएस कापला जातो. परंतु जर तुमचा पगार निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसेल तर मात्र टीडीएस कापला जात नाही.

  • सरकार कडून काही व्यक्तींना टीडीएस कपातीतून सूट देण्यात आली आहे. जसे की
  • जर तुम्ही भारतीय रहिवासी असाल आणि तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि जर तुमचे किमान उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असेल तर तुमच्या उत्पन्नातून कर म्हणजेच टीडीएस कापला जात नाही.
  • जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय 60 वर्षे ते 80 वर्षे असेल आणि जर तुमचे किमान उत्पन्न 3 लाख पेक्षा कमी असेल तर तुम्हला कर म्हणजे टीडीएस कपात मधून सूट मिळते.
  • आणि जर तुमचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि जर तुमचे किमान उत्पन्न 5 लाख पेक्षा कमी असेल तरी देखील तुम्हाला टीडीएस (TDS) मधून सूट मिळते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयकर स्लॅब आणि ज्या आर्थिक वर्षासाठी तुम्हाला वेतन दिले जात आहे त्या नुसार म्हणजेच तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्ना नुसार लागू होणाऱ्या दराने तुमचा टीडीएस कापला जातो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण टीडीएस (TDS) बद्दल बरीच शी माहिती जाणून घेतली. आशा करतो की तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला आज चा हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.