मास्क आधार कार्ड (Masked Aadhar Card) बद्दल सर्व माहिती – डाउनलोड, फायदे, कुठे वापरावे

नमस्कार मित्रांनो, आज आपण मास्क आधार कार्ड बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्रांनो, UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया ने भारतातील प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक डेटा गोपनीय राहावा यासाठी एक नवीन आधार प्रणाली आणली आहे. ज्याला मास्क आधार (Masked Aadhar) असे म्हटले जाते. हे मास्क आधार म्हणजे काय आहे, ते का व कुठे वापरायचे , त्याचे फायदे काय आहेत , ते कसे डाउनलोड करायचे, अश्या सर्व गोष्टीं वर आज आपण एक नजर टाकू या. मित्रांनो हा लेख तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा व आवश्यक आहे, त्यामुळे शेवट पर्यंत नक्की वाचा.

How to Download Masked Aadhar Card Online

मास्क आधार कार्ड म्हणजे काय ?

Masked Aadhar Card Meaning



प्रिय मित्रांनो, UIDAI ने काही दिवसांपूर्वी एक ऍडवायजरी जाहीर केली होती, त्यात आधार कार्ड चा दुरुपयोग होऊ नये यासाठी आधारचे नवीन व्हर्जन आणले आहे. ते म्हणजे मास्क आधार. हे मास्क आधार तुमच्या आधीच्या आधार कार्ड सारखेच आहे. फक्त यात तुमचा 12 अंकी आधार नंबर मास्क केला गेला आहे. म्हणजे 12 अंकांपैकीं सुरवातीचे 8 अंक हे लपवले गेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी चुकीच्या खुल्या (×××× ××××) दिसतात व फक्त शेवट 4 अंक च दिसतात. म्हणजे मास्क आधार कार्ड मध्ये तुमचा आधार नंबर अश्या प्रकारे ×××× ×××× 5678 दिसतो. या मुळे तुमच्या आधार कार्ड चा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. थोडक्यात काय तर सुरक्षेच्या दृष्टीने हा मास्क आधार वापरणे खूप फायद्याचे आहे. शिवाय या मास्क आधार कार्ड वर UIDAI ची स्वाक्षरी असल्याने हे अधिकृत म्हणजे सर्व ठिकाणी मान्य आहे. त्यामुळे तुम्हाला याची सुवाच्यता आणि स्वीकृती याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावा लागेल तेव्हा तुम्ही मास्क आधार ची प्रत वापरू शकता.

मास्क आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे

स्टेप 1: मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये UIDAI.gov.in ची वेबसाइट उघडायची आहे. नंतर Get Aadhaar > या ऑप्शनच्या खाली असलेल्या Download Aadhaar या लिंक वर क्लिक करा.

UIDAI वेबसाइट – UIDAI.gov.in



How to Download Masked Aadhar Card Online Step 1

स्टेप 2: पुढच्या पेज वर तुम्हाला लॉगिन Login बटन दिसेल त्यावर वर क्लिक करा.

How to Download Masked Aadhar Card Online Step 2

स्टेप 3: आत्ता Enter Aadhaar खाली तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाका. मित्रांनो, ज्या आधार कार्डचे मास्क आधार तुम्हाला डाउनलोड करायचे आहे त्याच आधार कार्डचा नंबर इथे टाका. नंतर कॅपचा टाईप करा व खाली Send OTP बटन वर क्लीक करा.

थोड्याच वेळात आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो Enter OTP मध्ये टाका, आणि Login बटन वर क्लीक करा.

How to Download Masked Aadhar Card Online Step 3

स्टेप 4: आता नवीन उघडलेल्या पेज वर Download Aadhar या ऑपशन वर क्लीक करा.

How to Download Masked Aadhar Card Online Step 4

स्टेप 5: आत्ता नवीन पेज वर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर असलेली माहिती दिसेल, ती एकदा चेक करा आणि नंतर Do you want a masked Aadhaar या ऑपशन वर टिक करा आणि Download बटन वर क्लिक करा.

How to Download Masked Aadhar Card Online Step 5

स्टेप 6: आता तुमचे मास्क आधार डाउनलोड होण्यास सुरु होईल, आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला Congratulation !!! असा मेसेज दिसेल. तुम्ही तुमच्या डाउनलोड मध्ये जाऊन तुमच्या मास्क आधार कार्डची PDF बघू शकता.

How to Download Masked Aadhar Card Online Step 6

आता तुमच्या मोबाइल मधल्या मास्क आधारची PDF उघडताना तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. UIDAI ने आधार कार्डच्या सुरक्षेसाठी तुमच्या मास्क आधारकार्ड PDF ला 8 अक्षरी-अंकी पासवर्ड सेट केलेला आहे. तो काय आहे ते बघू

उदाहरण – तुमचे नाव Virat आहे आणि जन्म वर्ष 1988 आहे तर तुमचा पासवर्ड इंग्लिश कॅपिटल लेटरमध्ये तुमच्या नावाचे पहिले चार अक्षरे (VIRA) आणि जन्म वर्ष (1988) दोन्ही मिळून आठ अक्षरी पासवर्ड VIRA1988 असा तयार होईल.

How to Download Masked Aadhar Card Online Step 7

पासवर्ड टाकल्या नंतर तुमचे मास्क आधार कार्ड तुम्हाला दिसेल. या मास्क आधार कार्डची पुढची आणि मागची अशी दोन्ही बाजू दिसतील. तुम्हाला जर याची प्रिंट हवी असेल तर प्रिंट काढू शकता किंवा PDF च्या स्वरूपात सेव्ह करून ठेवू शकता.

मास्क आधार कार्ड कसे वापरायचे

मित्रांनो, मास्क आधार तुम्ही बस ने किंवा ट्रेन ने किंवा विमानाने प्रवास करताना, जॉबच्या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून वापरू शकता. तसेच हॉटेल बुकिंग करताना ही तुम्हाला आधार दाखवावे लागतो, अश्या वेळेस तुम्ही मास्क आधारचा वापर करू शकता. तसेच तुम्ही eKYC साठी सुद्धा मास्क आधार शेअर करू शकता. पण जर तुम्हाला काही सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर अश्या ठिकाणी हे कार्ड वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की साध्या आधार कार्ड पेक्षा मास्क आधार कार्ड चे विविध फायदे आहेत. आणि साध्या आधार कार्ड च्या तुलनेत मास्क आधार कार्ड तुमची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे उघड करत नाही. म्हणून हे मास्क आधार कार्ड वापरणे फायद्याचे ठरते. मित्रांनो, या सोबतच तुमचे आधार कार्ड शेअर करताना काही काळजी ही घ्यायला हवी. गरज असेल तिथे मास्क आधारच वापरा. तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाण वरून तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू नका. जर तशी गरज पडलीच तर डाउनलोड केल्या नंतर सगळी हिस्ट्री डिलीट केल्याची खात्री करून घ्या.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मास्क आधार बद्दल बरीचशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण जर अजून मास्क आधार कार्ड डाउनलोड केले नसेल तर लवकर करून घ्या. कारण ते तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजचा हा मास्क आधार वरचा लेख नक्की आवडला असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद