तुमच्या नावावर किती SIM Card रजिस्टर आहेत चेक करा ? | Check all SIM Cards registered on your Aadharनमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्या आधार कार्डशी किती सिम रजिस्टर आहेत हे कसे जाणून घ्यायचे या बद्दल जाणून घेणार आहोत.

Check How Many Sim Registered On My Aadhar Card

मित्रांनो, सिम कार्ड म्हणजे आपल्या मोबाईल मधील सर्वात महत्वाची वस्तू. सिम कार्ड नसेल तर मोबाईल ही काही कामाचा नसतो. या सिम कार्ड मध्ये आपले अनेक कॉन्टॅक्टस, वैयक्तिक माहिती ही सेव्ह असते. तसेच जेव्हा आपण हे सिम कार्ड खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला आधार कार्डची गरज पडते. पण तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापरही होऊ शकतो, याची तुम्हाला कल्पना असेलच.तसेच या आधार कार्ड वर तुमचे इतरही मोबाईल नंबर रजिस्टर असू शकतात. आणि हॅकर्स याचा चुकीचा वापर करू शकता. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड वर किती नंबर्स रजिस्टर आहेत याची माहिती आता तुम्ही मिळवू शकता, तसेच कधी कधी आपला मोबाईल ही हरवतो. अशा वेळेस मोबाईल सोबत सिम कार्ड ही जाते. या सिम कार्डचा काही लोक गैरवापर करू शकतात. त्यासाठी तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर किंवा किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही वापरत नसलेले सिम कार्ड किंवा हरवलेली सिम कार्ड त्वरित बंद करणे सुद्धा खूप आवश्यक आहे.

यासाठी telecom regulatory authority of india म्हणजेच TRAI ने एक नवीन पोर्टल आणले आहे ज्याचे नाव TAF COP असे आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालू आहेत. ते चेक करू शकता. तसेच जर तुमच्या नावावर वर दुसरे कोणते सिम चालू असेल तर अश्या सिम कार्डचा तुम्ही रिपोर्ट करून ते बंद करू शकता. तर या लेखात आज आपण या पोर्टल वर कोण कोणत्या सर्विसेस आहेत, तसेच कोण कोणती सिम कार्ड्स तुमच्या नावावर चालू आहेत, तसेच एखादा सिम कार्ड किंवा नंबर बंद करायचा असेल तर कसे करावे या सर्व प्रकारची माहिती आपण आत्ता जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, हि माहिती खूप महत्त्वाची असल्याने शेवट पर्यंत नक्की वाचा.तुमच्या नावावर किती SIM Card आहेत चेक करा

पोर्टल वरून तुमच्या नावावर किती सिम चालू आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मित्रांनो सर्वात पहिले तुमच्या ब्राउझर मधून taf cop ची वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in ओपन करायची आहे.

स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हला तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल. तर दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून Request OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाकून व्हेरिफाय करायचा आहे व नंतर Validate बटन वर क्लिक करायचे आहे.

Check How Many Sim Registered On My Aadhar Card Step 2

स्टेप 3: या नंतर नेक्स्ट पेज वर तुमच्या नावावर म्हणजेच आधार कार्ड वर जितके सिम कार्ड चालू आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. जर इथे दाखवलेले नंबर्स तुम्ही वापरत असाल तर काहीही ऍक्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे इथे काहीच करायचे नाहीये. पण जर तुम्हाला तुम्ही वापरत नसलेला एखादा नंबर इथे असेल तर अश्या नंबरला तुम्ही रिपोर्ट करू शकता. खाली तुम्हाला रिपोर्ट करायचा ऑप्शन दिला आहे.

Check How Many Sim Registered On My Aadhar Card Step 3

स्टेप 4: मित्रांनो, समजा दिलेल्या लिस्ट मधील एखादा नंबर तुमचा नसेल आणि तुम्हाला त्याला रिपोर्ट करायचे असेल तर सर्वात आधी तर त्या नंबरला सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर त्या नंबरच्या खाली तीन ऑप्शन दिलेले आहेत.

  1. This is not my number (म्हणजे हा माझा नंबर नाही. जर तुम्हाला हा नंबर माहीत नसेल तर रिपोर्ट करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे)
  2. Not required (जर तुम्ही या आधी कधी हा नंबर वापरला असेल आणि जर आत्ता वर्तमान मध्ये तुम्ही हा नंबर वापरत नसाल आणि जर तुम्हला तुमच्या आधार वरून हा नंबर हटवायचा असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.)
  3. Required

तर मित्रांनो, असे नंबर जे तुम्ही कधी वापरले नाही, तुम्हाला ते माहीत ही नाहीत, त्यांना बंद करताना आधी वरील तीन पैकी एक कारण म्हणजेच ऑप्शन सिलेक्ट करायचा व नंतर Report या बटन वर क्लिक करायचे आहे.

Report बटन वर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट (रिपोर्ट) स्वीकारली जाते. तसा तुम्हाला वरती मेसेज येइल. या मधेच तुम्हाला रिपोर्ट नंबर किंवा Complaint Number किंवा Referense Number पण जनरेट होऊन दाखवला जातो. हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे.

Check How Many Sim Registered On My Aadhar Card Step 4

आता या नंतर तुम्हला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही ओळखत नसलेला किंवा नको असलेला नंबरचा रिपोर्ट TRAI ला केला आहे. आता तुमचा रिपोर्ट हा ज्या कंपनी चे सिम आहे त्या कंपनीला फॉरवर्ड केला जाईल व तो नंबर बंद केला जाईल.

स्टेप 5: मित्रांनो, या रेफेरेन्स नंबरद्वारे तुम्ही तुमच्या रिपोर्ट चा Status चेक किंवा Track करू शकता. त्यासाठी होम पेज वर जाऊन Track या ऑप्शन वर क्लीक करून इथे तुमचा रेफेरेन्स नंबर टाकायचा आहे आणि Track बटन वर क्लिक करायचे आहे. व नंतर तुम्हला तुमचे ट्रॅकिंग स्टेटस दाखवले जाईल.

Check How Many Sim Registered On My Aadhar Card Step 5

TAFCOP पोर्टलच्या सुविधा

TAFCOP या पोर्टल वर तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊ या

मित्रांनो, Fraud मॅनेजमेंट आणि Consumer प्रोटेक्शनसाठी TRAI ने हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टल वर तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. जसे की या पोर्टल वरून तुमच्या आधार वर किती सिम कार्ड चालू आहेत ते तुम्ही चेक करू शकता तसेच जर एका आयडी वर नऊ पेक्षा जास्त सिम कार्ड चालू असतील तर हे पोर्टल तुम्हाला नोटिफिकेशन देत असते. व त्यानंतर तुम्ही पोर्टल वर येऊन नको असलेला किंवा माहीत नसलेला नंबर/ सिम कार्ड तुम्ही रिपोर्ट करून बंद करू शकता. याशिवाय तुम्ही केलेल्या रिपोर्ट चे ट्रॅकिंग स्टेटस पण इथे दिलेल्या रेफेरेन्स नंबर वरून तुम्ही चेक करू शकता. अश्या बऱ्याच फॅसिलिटी या पोर्टल वर तुम्हाला उपलब्ध आहेत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण खूप महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला पण तुमच्या आयडी वर किती सिम चालू आहेत हे जर चेक करायचे असेल व न वापरलेले, न घेतलेले सिम कार्ड्स तुम्ही या पोर्टलच्या मदतीने बंद करू शकता. तसेच हा महत्वाचा लेख व महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद