FD पेक्षा जास्त व्याज देणारी ऑटो स्वीप (Auto Sweep) फॅसिलिटी बद्दल माहिती

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण बँकेत दिल्या जाणाऱ्या एक खास फॅसिलिटी बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला ऑटो स्वीप (Auto Sweep) बद्दल माहिती सांगणार आहोत.

मित्रांनो, आपण आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी आपण सर्व जण बँकेत एखादे अकाउंट उघडतो. यासाठी बँक आपल्याला वेग-वेगळ्या प्रकारचे अकाउंट उघडण्याची सुविधा देते. जसे की करंट अकाउंट, सेविंग अकाउंट वगैरे… यापैकी सेविंग अकाउंट जास्त प्रमाणात उघडले जाते. कारण या अकाउंटमध्ये असणाऱ्या पैश्यांवर तुम्हाला व्याज मिळते. प्रत्येक बँकेत सेविंग अकाउंट वर वेग-वेगळे व्याज देते. जास्त करून या व्याजाचा दर हा 3 ते 5 टक्के असतो. पण जर हेच पैसे तुम्ही FD मध्ये टाकले तर तुम्हाला जास्त व्याज मिळते म्हणजे जवळजवळ 8 टक्के पर्यंत व्याज मिळते. एफडी (FD) मध्ये जास्त व्याज तर मिळते पण एफडी मध्ये एक मर्यादा असते, ज्यात तुम्हाला एक ठराविक वेळेसाठी पैसे गुंतवावे लागतात आणि वेळे आधी तुम्ही ते पैसे काढुही शकत नाही, आणि काढले तर व्याज मिळत नाही.



पण जर तुम्हाला सेविंग अकाउंट मध्येच एफडी इतके व्याज दर मिळत असेल तर? हो मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये ऑटो स्वीप (Auto Sweep) फॅसिलिटी चालू केली तर तुम्हाला FD इतकेच व्याज दर मिळतील. आणि जर तुम्हाला कधी पैसे काढावे लागले तर तुम्ही कोणत्याही झंझट शिवाय कधीही पैसे काढू शकता. चला तर मग या ऑटो स्वीप फॅसिलिटी बद्दल सविस्तर पणे जाणून घेऊ या..

Auto Sweep

ऑटो स्वीप फॅसिलिटी म्हणजे काय?

What Is Auto Sweep?

मित्रांनो, ऑटो स्वीप सुविधा म्हणजे एक प्रकारे सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते आणि मुदत ठेव खाते म्हणजेच FD या दोघांचे संयोजन (combination) आहे. तुम्ही जर तुमच्या खात्याला ऑटो स्वीप सुविधा चालू केली तर तुम्हाला दोन्ही गोष्टींचा फायदा किंवा लाभ मिळतो. इथे तुमच्या खात्यात एक मर्यादा निश्चित करावी लागते. जेव्हा जेव्हा तुमच्या बचत खात्यातील रक्कम एक निश्चित मर्यादा ओलांडते तेव्हा जास्तीची रक्कम किंवा पैसे आपोआप मुदत ठेव खात्यात ट्रान्सफर होतात.



म्हणजे समजा तुम्ही जर ऑटो स्वीप फॅसिलिटी घेतली आणि जर तुमच्या बचत खात्यात 10,000 रुपये इतकी निश्चित रक्कम सेट केली आहे, त्यानंतर जर या खात्यात 20,000 रुपये जमा झाले तर जास्तीचे 10,000 रुपये एफडी मध्ये हस्तांतरित केले जातात आणि त्यावर तुम्हाला एफडीच्या व्याज दर प्रमाणे व्याज मिळते. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दोन्ही खात्यांवर (बचत खाते आणि एफडी खाते) त्यांचे संबंधित व्याजदर मिळतील. म्हणजे इथे तुमचा जास्त फायदा होतो.

ऑटो स्वीप खाते कसे काम करते ?

How does Auto Sweep work?

ऑटो स्वीप खाते कसे काम करते ते एकदा नीट समजून घेऊ या

मित्रांनो, समजा तुम्ही तुमची बचत म्हणजेच काही पैसे बँकेत ठेवले. आणि त्या रकमेवर तुम्ही एक लिमिट म्हणजे मर्यादा सेट केली. याला ‘थ्रेशोल्ड लिमिट’ असे म्हणतात. जेव्हा तुमची रक्कम सेट केलेली मर्यादा ओलांडते तेव्हा जास्तीची रक्कम ही FD खात्यात हस्तांतरित केली जाते. म्हणजेच जास्तीच्या रक्कमेची FD केली जाते. आणि FD प्रमाणेच त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते. या प्रक्रियेला ‘स्वीप इन’ असे म्हटले जाते.

मित्रांनो, तुमच्या खात्यातील जास्तीचे पैसे एफडी मध्ये हस्तांतरीत केले गेले याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते पैसे परत काढू शकत नाही. तर ऑटो स्वीप सुविधेचा तुम्हला इथे फायदा होतो. तो असा, समजा जर तुमच्या बचत खात्यात थ्रेशोल्ड लिमिट कमी झाली तर एफडी खात्यातून आवश्यक ती रक्कम परत बचत खात्यात हस्तांतरित केली जाते. याला ‘रिव्हर्स स्वीप’ असे म्हटले जाते. मात्र रिव्हर्स स्वीप मध्ये हस्तांतरित केलेल्या पैश्यां वर FD चे व्याज दर मिळत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑटो स्वीप सुविधा घेतात तेव्हा बँक तुम्हाला सल्ला देते की ऑटो स्वीप सुविधा घेतल्या वर खात्यात वारंवार व्यवहार करू नये.

ऑटो स्वीप फॅसिलिटी चालू कशी करायची ?

ऑटो स्वीप फॅसिलिटी चालू करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंगचा वापर करू शकता. पण तुम्ही नेट बँकिंग वापरत नसाल तर तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर ला कॉल करून तुम्ही ऑटो स्वीप सुविधा चालू करू शकता. तसेच तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही तुम्ही हि सुविधा चालू करण्यासाठी अर्ज करू शकता.

ऑटो स्वीप सुविधेचे फायदे काय आहेत ?

  • मित्रांनो, ऑटो स्वीप फॅसिलिटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे तुमच्या बचत बँक खात्यात एक लवचिकता (Flexibility) येते तसेच तुम्हाला FD चे व्याज दर ही मिळते.
  • ज्या लोकांना FD मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची नाही ते लोक ही सुविधा वापरू शकता.
  • तसेच ही सुविधा सुरू करताना म्हणजे फक्त एकदाच तुम्हाला परवानगी द्यावी लागते त्यानंतर तुमचे बँक खाते ही संपूर्ण प्रक्रिया सांभाळून घेते.
  • ऑटो स्वीप फॅसिलिटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात तुम्हाला जास्त व्याज मिळते.
  • या सुविधे अंतर्गत बँक तुम्हाला खूप लवचिकता देते. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयी नुसार रक्कम मर्यादा ठरवू शकता.
  • तसेच स्वीप इन व स्वीप आऊट या सुविधांमुळे तुमच्या खात्यात गरज पडेल तेव्हा पैसे येऊ शकतात.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑटो स्वीप फॅसिलिटी बद्दल बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे ही बँकेत बचत खाते असेल तर आज पासूनच या सुविधेचा लाभ घ्या. व जास्त व्याज दर मिळवा. तसेच हा लेख तुम्हाला आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।