HDFC बँक पर्सनल लोन: इंटरेस्ट रेट, पात्रता, डॉक्युमेंट लिस्ट, व्याज दर | HDFC Personal Loan

नमस्कार मित्रांनो, आज आपण HDFC बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज कसा करायचा ? HDFC पर्सनल लोनचा इंटरेस्ट रेट (Interest Rate) किती असतो ? HDFC पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्रे (Documents) लागतात त्याच बरोबर लोनसाठी पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात ? तुमच्या सिबिल स्कोअर (Cibil score) नुसार तुम्हाला किती लोन मिळू शकते ? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ह्या लेखात पाहणार आहोत.

HDFC BANK Personal Loan

सर्वात प्रथम आपण बघू HDFC बँकेत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) का घ्यावे, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे काय आहेत.



HDFC पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये

HDFC हि जुनी आणि लोकप्रिय बँक आहे. 21 वर्षांपासून बँक आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचे पर्सनल लोन या बँकेत काढले तर तुम्ही निश्चिन्त राहून तुमचे हप्ते भरू शकता. तसेच दुसऱ्या बँकेचे लोन तुम्ही कमी खर्चामध्ये HDFC बँकेत ट्रान्सफर करू शकता. आत्ता बघुयात HDFC पर्सनल लोनची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे काय आहेत.

  • HDFC पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तारण किंवा सुरक्षेची (collateral or security) आवश्यक नाही.
  • तुमचे जर HDFC बँकेत खाते असेल आणि तुम्हाला पूर्व-मंजूर (pre-approved) ऑफर असेल तर 10 सेकंदामध्ये तुमच्या पर्सनल लोनचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात.
  • तसेच इतर ग्राहकांना पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यानंतर चार दिवसात कर्ज मंजूर होऊन अकाउंट मध्ये पैसे जमा होतात.
  • HDFC पर्सनल लोनचा व्याज दर 10.50% ते 21.00% दरसाल आहे.
  • वैयक्तिक अपघात कव्हर (Personal Accident Cover): यामध्ये तुम्ही 8 लाखांपर्यंतचे वैयक्तिक अपघात संरक्षण आणि 1 लाखांपर्यंतचे गंभीर आजार संरक्षण मिळवू शकता.
  • वैयक्तिक कर्ज सुरक्षा (Personal Loan Security): ‘सर्व सुरक्षा प्रो’ (Sarv Suraksha Pro) इन्शुरन्स पॉलिसीची अंतर्गत तुम्हाला –
    • क्रेडिट शील्ड कव्हर हा थकित कर्जाच्या रकमेइतके मिळतो
    • तसेच 8 लाखांपर्यंतचे अपघाती हॉस्पिटलायझेशन कव्हर मिळतो
    • अपघाती मृत्यू/कायमचे अपंगत्व संरक्षणमध्ये 1 लाख पर्यंत कव्हर मिळतो

वरच्या कव्हर मध्ये इन्शुरन्स कंपनीच्या अटी व शर्ती लागू होतील. लोन घेताना बँकेमध्ये चौकशी करा.

HDFC Bank Personal Loan Details



HDFC बँक पर्सनल लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)10.50% – 21.00% दरसाल
लोन रक्कम मर्यादा50,000/- ते 40 लाख
लोनचा उद्देश/कारणप्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च

HDFC Bank Personal Loan Fees & Charges

HDFC बँक पर्सनल लोन चार्जेस/ शुल्क

लोन प्रोसेस चार्जेस
(Loan processing fee)
लोन रकमेच्या कमाल 2.5% पर्यंत, 4,999/- रु. पर्यंत
प्री-पेमेंट/पार्ट-पेमेंट चार्जेस
(Pre-payment/Part-payment charges)
4% थकबाकी मुद्दल (कर्जाचा कालावधीच्या 13 – 24 महिन्यांच्या दरम्यान )
3% थकबाकी मुद्दल (कर्जाचा कालावधीच्या 25 – 36 महिन्यांच्या दरम्यान)
2% थकबाकी मुद्दल (कर्ज कालावधीच्या 36 महिन्यांपेक्षा जास्त असल्यास)
थकीत EMI व्याज
(Overdue EMI interest)
2% दरमहा EMI/थकीत मुद्दल (24% दरसाल)
परतफेड मोड मध्ये बदल
(Repayment mode change charges)
500/- रु.
परतफेड वेळापत्रक चार्जेस
(Repayment Schedule Charges)
50/- रु. प्रत्येक वेळी
चेक बाऊन्स चार्जेस
(Cheque bounce charges)
450/- रु. + टॅक्स

Eligibility Criteria for HDFC Personal loan

HDFC बँक पर्सनल लोन पात्रता निकष

  • तुम्ही एखाद्या खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत किंवा राज्य, केंद्र किंवा स्थानिक सरकारी संस्थेत नोकरीला असले पाहिजे.
  • तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. वय 60 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
  • तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 25,000/- रु असले पाहिजे.
  • तुमच्याकडे कमीत कमी 2 वर्ष कामाचा अनुभव असावा.
  • तुम्ही सध्याच्या कंपनीत/संस्थेत कमीत कमी 1 वर्षासाठी नोकरी केली असावी.
  • आतली माहिती: जर तुमची सॅलरी HDFC बँकेत जमा होत असेल आणि तुमची कंपनी नावाजलेली असेल तर तुम्हाला खूप साऱ्या लोन ऑफर्स मिळतील.

Documents Required for HDFC Loan

HDFC पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा:आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवासी (Address) पुरावा:आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र
इतर कागदपत्रे नोकरदारसाठी:मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट (मागील सहा महिन्यांचे पासबुक)
दोन नवीनतम सॅलरी स्लिप किंवा चालू महिन्याचे सॅलरी सर्टिफिकेट, फॉर्म 16 सह
इतर कागदपत्रे स्वयंरोजगार / व्यवसायिक:बँक स्टेटमेंट, टॅक्स रिटर्न किंवा तुमच्या व्यवसायाचा भाडेपट्टी करार

FAQ

HDFC बँक पर्सनल लोनचा व्याज दर कसा ठरवते?

HDFC बँक पर्सनल लोनचा व्याज दर ठरवण्यासाठी तीन प्रमुख घटकांचा विचार करते: 1) CIBIL स्कोअर 2) तुम्ही आधी भरलेल्या EMI च्या आधारावर 3) लोनची मूळ रक्कम किती आहे

1 लाखाच्या पर्सनल लोनवर किती व्याज भरावे लागेल?

समाज तुम्ही 12 महिन्यांसाठी 12% व्याजदराने 1 लाखाचे लोन घेतले असेल, तर पहिल्या महिन्याचे व्याज हे असे मोजले जाते: 1,00,000 (पूर्ण लोन रक्कम) x (0.12 /12) = 1000/- रु.

HDFC पर्सनल लोनसाठी किती पगार असणे आवश्यक आहे?

HDFC पर्सनल लोनसाठी तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 25,000/- रु असले पाहिजे.

HDFC पर्सनल लोन परतफेड करण्याची मुदत किती आहे?

तुम्ही HDFC बँकेकडून पर्सनल लोन घेतल्यास, तुम्हाला 1 वर्ष ते 5 वर्षांच्या आत (म्हणजेच 12 ते 60 महिने) रक्कम परत करावी लागेल.

HDFC पर्सनल लोनसाठी किती CIBIL स्कोअर चांगला मानला जातो ?

तुमचा CIBIL स्कोअर हा 720 वर असेल तर तुम्हाला HDFC बँकेचे पर्सनल लोन आरामात मिळू शकते.

स्वयंरोजगार/व्यवसायिक व्यक्तीला HDFC चे पर्सनल लोन मिळू शकते का?

हो, स्वयंरोजगार/व्यवसायिक व्यक्तीला पर्सनल लोन मिळू शकते. फक्त त्याचा CIBIL स्कोअर 720 च्या वर असावा आणि त्याने टॅक्स रिटर्न भरलेला असावा.

Tags: HDFC personal loan marathi, HDFC personal loan in marathi, HDFC personal loan mahiti, HDFC personal loan info in marathi, HDFC personal loan information in marathi, HDFC पर्सनल लोन, HDFC पर्सनल लोन व्याज दर, HDFC पर्सनल लोन पात्रता, HDFC पर्सनल लोन चार्जेस, HDFC personal loan eligibility in marathi, HDFC personal loan fee, HDFC personal loan charges, HDFC personal loan details in marathi, HDFC personal loan document marathi, HDFC बँके वैयक्तिक कर्जा, HDFC vayaktik karj