SBI पर्सनल लोन माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, लोनचे प्रकार | SBI Personal Loan

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक सरकारी असल्यामुळे तुम्ही जर पर्सनल लोन या बँकेवर काढले तर तुम्हाला कमी व्याज दर मिळेल तसेच लोनच्या प्रोसेससाठी लागणारे चार्जेस पण कमी लागतील. SBI पर्सनल लोनसाठी व्याज दर (Interest Rate), कागदपत्रे (Documents), पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात ते सविस्तर या लेखामध्ये बघुयात.

SBI BANK Personal Loan

सर्वात प्रथम आपण बघू SBI बँकेत वैयक्तिक कर्ज (Personal Loan) काढल्यावर तुम्हाला कोणते फायदे मिळतील. आणि SBI पर्सनल लोनची वैशिष्ट्ये काय आहेत.SBI पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये

पर्सनल लोनला असुरक्षित लोन (unsecured loans) म्हणतात, कारण हे लोन मिळविण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तारण किंवा सुरक्षेची (collateral or security) आवश्यक नसते. SBI पर्सनल लोनची महत्वाची वैशिष्ट्ये खाली दिलेली आहेत.

 • आकर्षक व्याजदर: SBI पर्सनल लोन वर सर्वात कमी व्याज दर (10.30% – 15.10% दरसाल) आहे.
 • वेळोवेळी पर्सनल लोनवर ऑफर: SBI ही काही मोजक्या बँकांपैकी एक आहे जी वेळोवेळी पर्सनल लोनवर ऑफर देते – जसे दिवाळी ऑफर आणि सरकारी कर्मचारी, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी देखील वेगवेगळ्या ऑफर मिळतात.
 • कोणतेही छुपे चार्जेस नाही: SBI पर्सनल लोन वर कोणतेही छुपे चार्जेस किंवा दंड बँक आकारात नाही.
 • त्वरित कर्ज मंजूरी: SBI बँकेकडून पर्सनल लोन घेण्यासाठी कोणतेही तारण आवश्यक नसल्यामुळे, कर्ज मंजूरी जलद आणि सुलभ होते.
 • प्री पेमेंट दंड नाही: SBI पर्सनल लोनसाठी कोणतेही प्री पेमेंट किंवा फोरक्लोजर चार्जेस आकारत नाही. फक्त, कर्ज मंजूर तारखेच्या सहा महिन्यांपूर्वी कर्जाची परतफेड केली जात असल्यास, बँक थकित कर्जाच्या रकमेच्या 1% आकारते.

SBI बँक पर्सनल लोन ठळक बाबी

SBI Bank Personal Loan Details

व्याज दर (Interest Rate)10.30% – 15.10% दरसाल
लोन रक्कम मर्यादा20 लाख पर्यंत
कार्यकाळ6 महिने – 6 वर्षे
लोनचा उद्देश/कारणप्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च

SBI पर्सनल लोनचे प्रकार

Types of SBI Personal LoanSBI आपल्या ग्राहकांना काही वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनल लोन देते –

 1. SBI एक्सप्रेस क्रेडिट (SBI Xpress Credit)
 2. SBI क्विक पर्सनल लोन (SBI Quick Personal Loan)
 3. SBI पेन्शन कर्ज (SBI Pension Loans)
 4. YONO वर पूर्व-मंजूर पर्सनल लोन (Pre – Approved Personal Loans on YONO)

1) SBI एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन (SBI Xpress Credit)

SBI Xpress क्रेडिट ही SBI मधील पगार खातेधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली पर्सनल लोन योजना आहे.

 • कर्जाची रक्कम: 20 लाखांपर्यंत
 • कार्यकाळ: 6 महिने – 6 वर्षे

2) SBI क्विक पर्सनल लोन (SBI Quick Personal Loan)

SBI Xpress क्रेडिट ही SBI सोडून दुसऱ्या बँकेतील पगार खातेधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली पर्सनल लोन योजना आहे.

 • कर्जाची रक्कम: 20 लाखांपर्यंत
 • कार्यकाळ: 6 महिने – 6 वर्षे
 • प्रोसेस चार्जेस: कर्जाच्या रकमेच्या 1.50% (1,000 – 15,000 रु.) + GST

3) SBI पेन्शन कर्ज (SBI Pension Loans)

SBI पेन्शन कर्ज योजना, केंद्र/राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना SBI मार्फत पेन्शन मिळवून दिली जाते. असे निवृत्ती वेतनधारक त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची रक्कम वापरू शकतात.

कर्जाची रक्कम आणि कार्यकाळ:

 • केंद्र/राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी – 14 लाखांपर्यंत (5 वर्षांपर्यंत)
 • संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी – 14 लाखांपर्यंत (7 वर्षांपर्यंत)
 • कौटुंबिक पेन्शन धारकांसाठी – 5 लाखांपर्यंत (5 वर्षांपर्यंत)

4) YONO वर पूर्व-मंजूर पर्सनल लोन (Pre – Approved Personal Loans on YONO)

ही पूर्व-मंजूर पर्सनल लोन सुविधा, SBI च्या बचत खातेधारकांना SBI YONO अँपद्वारे दिली जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे SBI YONO अँप पाहिजे. अँप लॉगिन करून, ऑफर्स ऑपशन जाऊन तुम्हाला भेटलेल्या ऑफर्स तुम्ही तेथे बघू शकता. जर ऑफर नसेल तर SBI पर्सनल लोनचे दुसरे पर्याय निवडा.

 • कर्जाची रक्कम: 8 लाखांपर्यंत
 • कार्यकाळ: 6 महिने – 6 वर्षे

SBI बँक पर्सनल लोन पात्रता निकष

Eligibility Criteria for SBI Personal loan

1) SBI एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन (पगारदार अर्जदार)

 • कर्जदार हा: केंद्र/राज्य/अर्ध-सरकार, केंद्र/राज्य PSU, राष्ट्रीय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था आणि बँकेशी संबंध नसलेल्या/विना निवडक कॉर्पोरेट्समध्ये नोकरी करणारा असावा
 • कर्जदार SBI मधील पगार खातेधार असावा
 • किमान मासिक उत्पन्न15,000 रु. असावे
 • EMI/NMI हा मासिक पेमेंटच्या 50% पेक्षा कमी असावा

2) SBI क्विक पर्सनल लोन (SBI Quick Personal Loan)

 • कर्जदार हा: केंद्र/राज्य/अर्ध-सरकार, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम, कॉर्पोरेट्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये किमान 1 वर्ष काम करणारा कर्मचारी असावा
 • कर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षे असावे
 • कर्जदार SBI मध्ये पगार खाते नसणारा असावा
 • किमान मासिक उत्पन्न15,000 रु. असावे
 • EMI/NMI हा मासिक पेमेंटच्या 50% पेक्षा कमी असावा

3) SBI पेन्शन कर्ज (SBI Pension Loans)

केंद्र/राज्य सरकारी पेन्शनधार

For Central/ State Government Pensioners

 • वय – 76 वर्षांपेक्षा कमी
 • SBI द्वारे पेन्शन काढलेला
 • निवृत्ती वेतनधारकाने कर्जाच्या कालावधीत कोषागाराला (Treasury) आदेशात बदल न करण्याचे अपरिवर्तनीय वचन दिले पाहिजे
 • कोषागाराने (Treasury ) लिखित स्वरूपात नमूद केले पाहिजे की NOC शिवाय पेन्शन पेमेंट इतर कोणत्याही बँकेकडे हस्तांतरित करू नये
 • तृतीय पक्षाद्वारे किंवा जोडीदाराच्या हमीसह सर्व अटी आणि शर्ती लागू होतील

संरक्षण निवृत्ती वेतनधारक

For Defense Pensioners

 • कमाल वय – 76 वर्षांपर्यंत
 • किमान वय नाही
 • पेन्शनधारक हा: नौदल, लष्कर, हवाई दल, निमलष्करी दल (BSF, CISF, CRPF, ITBP), तटरक्षक दल, आसाम रायफल्स, राष्ट्रीय रायफल्स यांसारख्या सशस्त्र दलातील असावा
 • पेन्शन खाते SBI कडे ठेवले पाहिजे

कौटुंबिक निवृत्ती वेतनधारक

For Family Pensioners

 • वय – 76 वर्षांपर्यंत
 • मृत पेन्शनधारकाच्या जागी कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळणारे अधिकृत कागदपत्र

4) YONO वर पूर्व-मंजूर पर्सनल लोन (Pre – Approved Personal Loans on YONO)

YONO अँप वर पूर्व-मंजूर पर्सनल लोन चेक करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज पाठवावा लागेल किंवा अँप मध्ये ऑफर्स ऑपशन मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता

SMS करा – “PAPL<स्पेस>< SBI बचत खात्याचे शेवटचे 4 अंक >” पाठवा 567676 नंबर वर

SBI पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

Documents Required for SBI Loan

ओळखीचा पुरावा:आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवासी (Address) पुरावा:आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र
इतर कागदपत्रे नोकरदारसाठी:मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट (मागील सहा महिन्यांचे पासबुक)
दोन नवीनतम सॅलरी स्लिप किंवा चालू महिन्याचे सॅलरी सर्टिफिकेट, फॉर्म 16 सह
इतर कागदपत्रे स्वयंरोजगार/व्यवसायिक:बँक स्टेटमेंट, टॅक्स रिटर्न किंवा तुमच्या व्यवसायाचा भाडेपट्टी करार

FAQ

SBI बँकेत पर्सनल लोन मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर किती असावा ?

SBI बँकेने ने पर्सनल लोनसाठी किती क्रेडिट स्कोअर असावा हे स्पष्टपणे सांगितलेले नाही, पण साधारणपणे तुमचा क्रेडिट स्कोअर हा 750 आणि त्यापेक्षा जास्त असावा.

मी SBI कडून 2 पर्सनल लोन घेऊ शकतो का?

हो, तुम्ही SBI कडून दोन पर्सनल लोन घेऊ शकता. परंतु SBI कडून दुसरे लोन घेण्यासाठी तुमचे उत्पन्न जास्त लागते आणि सिबिल स्कोअर पण चांगला लागतो. (साधारण 750 पेक्षा जास्त)

सरकारी कर्मचारी SBI कडून पर्सनल लोन कसे घेऊ शकतात ?

सरकारी कर्मचाऱ्याला फक्त SBI कडे ऑनलाइन किंवा ऑफलाईन वैयक्तिक कर्ज अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर बँक अर्जदाराकडून उत्पन्नाचा पुरावा, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा यासारखी आवश्यक कागदपत्रे मागवेल. पडताळणी नंतर सरकारी कर्मचारी वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात.

पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी मला SBI बँकेचा ग्राहक असणे आवश्यक आहे का?

नाही, तुम्ही त्यांच्या पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी बँकेचे विद्यमान ग्राहक असण्याची गरज नाही. SBI तुमचा सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाचा पुरावा तपासून तुम्हाला लोन देऊ शकते.

Tags: sbi personal loan marathi, sbi personal loan in marathi, sbi personal loan mahiti, sbi personal loan info in marathi, sbi personal loan information in marathi, SBI पर्सनल लोन, SBI पर्सनल लोन व्याज दर, SBI पर्सनल लोन पात्रता, SBI पर्सनल लोन चार्जेस, sbi personal loan eligibility in marathi, sbi personal loan fee, sbi personal loan charges, sbi personal loan details in marathi, sbi personal loan document marathi