ड्राइविंग लायसन्स ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे ? | How to Download Driving License Online

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने ड्राइविंग लायसन्स डाउनलोड कसे करायचे याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

How to Download Driving License Online in Marathi

मित्रांनो, आजकाल 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती कडे स्वतःची अशी एकतरी गाडी असतेच. आणि गाडी चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे ड्राइविंग लायसन्स बद्दल तर तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही पण ते वापरत असाल. पण जर कधी ड्राइविंग लायसन्स खराब झाले किंवा हरवले तर मात्र आपण ते परत मिळवण्यासाठी एजंट कडे जातो व पैसे देऊन लायसन्स मिळवतो. पण आता ड्राइविंग लायसन्स मिळवणे ही एक सोपी प्रक्रिया झाली आहे. कारण आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचे ड्राइविंग लायसन्स डाउनलोड करून ठेवू शकता. आणि गरज पडल्यास हे डिजिटल ड्राइविंग लायसन्स RTO ऑफिसर/ ट्रॅफिक पोलीस ला दाखवू पण शकता. तुम्हालाही जर ड्राइविंग लायसन्स ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसे करायचे ते जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…ड्राइविंग लायसन्स ऑनलाईन डाउनलोड प्रोसेस

ड्राइविंग लायसन्स ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला Play Store मधून DigiLocker हे अँप इन्स्टॉल करायचे आहे. व ओपन करायचे आहे.

How to Download Driving License Online Step 1

स्टेप 2: यानंतर अँप मध्ये तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. व नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे. व त्यानंतर नेक्स्ट पेज वर डाव्या बाजूला स्कीप (Skip) ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.How to Download Driving License Online Step 2

स्टेप 3: त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. तिथे खाली तुम्हाला Get Started या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to Download Driving License Online Step 3

स्टेप 4: आता पुढच्या पेज वर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. Sign in आणि Create Account. मित्रांनो, तुमचे जर डिजीलॉकर वर आधीच अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट Sign in करायचे आहे. आणि जर तुमचे अकाउंट नसेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन म्हणजेच Create Account चा ऑप्शन निवडायचा आहे. इथे आम्ही Create Account ऑप्शन निवडत आहोत.

How to Download Driving License Online Step 4

स्टेप 5: त्यानंतर तुमच्या आधार कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. नंतर तुमची जन्म तारीख टाकायची आहे, त्या नंतर लिंग (Gender) सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकून सहा डिजिट चा पिन तयार करून टाकायचा आहे. आणि शेवटी आधार कार्ड नंबर टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. व या प्रकारे तुमचे अकाउंट उघडून जाईल.

How to Download Driving License Online Step 5

स्टेप 6: मित्रांनो, आता तुम्हाला Sign in करायचे आहे. त्यासाठी Sign in ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकायचा आहे व नंतर आधी तयार केलेला सहा डिजिट चा पिन टाकायचा आहे. आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो दिलेल्या जागी टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Download Driving License Online Step 6

स्टेप 7: आता तुमचे डिजिलॉकर अँप ओपन होईल. यानंतर तुम्हाला सर्च बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला Most Popular Documents असा ऑप्शन दिसेल, त्यात पहिले आधार कार्ड मग कोविड वॅक्सीनेशन सर्टिफिकेट आणि नंतर ड्राइविंग लायसन्सचा ऑप्शन दिसेल. यापैकी ड्राइविंग लायसन्सच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

हा ऑप्शन सापडत नसेल तर सर्च मध्ये जाऊन Driving License सर्च करा.

How to Download Driving License Online Step 7

स्टेप 8: या नंतर तुमच्या समोर काही ऑप्शन ओपन होतील त्यापैकी Motor Vehicle Department Maharashtra या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How to Download Driving License Online Step 8

स्टेप 9: या नंतर तुमचे नाव व जन्म तारीख ऑटोमॅटिकली लिहिलेल दिसेल. व इथे तुम्हाला फक्त तुमचा ड्राइविंग लायसन्स नंबर टाकायचा आहे. व नंतर Get Documents वर क्लिक करायचे आहे. व नंतर Issued Document मध्ये तुमचे ड्राइविंग लायसन्स आलेलं तुम्हाला दिसेल. जर ड्राइविंग लायसन्स समोर pending असे लिहून येत असेल तर थोडा वेळ थांबा.

How to Download Driving License Online Step 9

स्टेप 10: आता तीन डॉट वर क्लिक करून Get PDF ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमचे ड्राइविंग लायसन्स पीडीएफ फाइल मध्ये डाउनलोड करू शकता.

How to Download Driving License Online Step 10

मित्रांनो, असे हे डिजिटल ड्राइविंग लायसन्स तुम्ही कुठेही पकडला गेलात तर RTO ऑफिसर/ट्रॅफिक पोलीस ला दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे ड्राइविंग लायसन्स लीगल आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तसे काही पोलिसांनी काही आक्षेप घेतला तर तुम्ही डिजिलॉकर अँप उघडून दाखवू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन पद्धतीने ड्राइविंग लायसन्स डाउनलोड कसे करायचे या बद्दल सविस्तर पणे जाणून घेतले. मित्रांनो, आशा करतो या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद