गोल्ड लोन: नियम, कागदपत्रे, प्रक्रिया आणि बँकांचे व्याजदर माहिती | Gold Loan Detail Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही नवीन व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण गोल्ड लोन (Gold Loan) म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण गोल्ड लोन म्हणजे काय, लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते, त्याचे फायदे काय आहेत, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Gold Loan Information in Marathi

मित्रांनो, जगात सर्वात जास्त जर कुठे सोन्याचे ग्राहक असतील तर ते फक्त आपल्या देशात म्हणजेच भारतात. त्याचे कारण म्हणजे आपल्या देशात सोन्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच की काय दिवसेंदिवस सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. आपल्याकडे सोन्याच्या दागिन्यांना सांस्कृतिक व आर्थिक असा दोन्ही प्रकारच्या वारसा लाभलेला आहे. म्हणजेच सोन्याच्या दागिन्यांना स्त्रीधन म्हणून मानले जाते. तर दुसरी कडे हेच सोन्याचे दागिने आर्थिक गुंतवणूक म्हणून ही वापरले जाते. कारण आर्थिक अडचणीच्या वेळी हेच सोने आपल्याला पैश्यांच्या रुपात मदत करते.पूर्वी कधी पैश्यांची अडचण सोडवायची असली की सोने विकत असत. पण आताच्या काळात सोने न विकता त्या सोन्यावर कर्ज ही मिळू शकते. खरंतर तुम्ही पण कधी तरी सोने तारण कर्ज बद्दल ऐकलेच असेल. पण अनेक जणांना हे गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्ज कसे घ्यायचे, हे कर्ज कुठे मिळते, त्याची प्रक्रिया काय आहे, याबद्दल माहिती नसते. त्यासाठीच आम्ही आज हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जरी तुम्हाला सोने तारण कर्ज घ्यायचे नसेल तरीही त्याबद्दल माहिती असणे कधीही चांगलेच. जेणे करून तुम्हाला व इतरांना ही त्याचा फायदा होईल. चला तर मग सोने तारण कर्ज / गोल्ड लोन बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ या…

गोल्ड लोन म्हणजे काय ?

सर्वात पहिले गोल्ड लोन (Gold Loan ) म्हणजे सोने तारण कर्ज म्हणजे (What is Gold Loan) नेमकं काय ते जाणून घेऊ या.

मित्रांनो, गोल्ड लोन म्हणजे तुमचं सोनं तारण म्हणून ठेवून त्याच्या बदल्यात एक ठराविक रक्कम कर्ज म्हणून घेणे. आणि गरज संपल्यावर ती मूळ रक्कम आणि व्याज ठरवलेल्या कालावधीत परतफेड करून आपले सोने परत घेणे. मित्रांनो, सोने तारण कर्ज खूप सोप्या पध्दतीने व कमी वेळात मिळत असल्याने लोकांमध्ये गोल्ड लोन घेणे लोकप्रिय झाले आहे. तसेच सोने तारण कर्ज हे एक सुरक्षित कर्ज मानले जाते.गोल्ड लोन मध्ये तुमचे सोने हे बँके कडे गहाण ठेवले जाते व बँक सोन्याच्या एकूण रकमेपैकी 70 ते 75% रक्कम कर्ज म्हणून तुम्ही घेऊ शकता. तसेच ठराविक कालावधीत या कर्जाची परतफेड करून तुम्ही तुमचे सोने बँकेतुन सोडवून आणू शकता. महत्वाचे म्हणजे सोने तारण कर्ज घेताना तुम्हाला त्याचे कारण विचारले जात नाही. म्हणजेच हे कर्ज वापरण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. तुम्ही हे कर्ज कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. जसे की शिक्षणासाठी, लग्नासाठी, किंवा इतर काही कारणांसाठी.

मित्रांनो, सोन्यावर कर्ज घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. की जर तुम्ही ठराविक कालावधीत कर्जाची परतफेड केली नाही तर बँक तुमचे सोने परस्पर विकू शकते. या परिस्थितीत तुम्हाला तुमचे सोने परत कधीच मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही कधी सोने तारण कर्ज घेणार असाल तर ते वेळीच फेडा. किंवा तुम्ही हे कर्ज दिलेल्या वेळेत फेडू शकणार असाल तरच सोने तारण कर्ज घ्या.

सोने तारण प्रक्रिया सविस्तर मध्ये

सोने तारण कर्ज घेण्याची प्रक्रिया (Gold Loan Process) काय आहे , ते जाणून घेऊ या

मित्रांनो, गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया ही इतर लोन पेक्षा अगदी सोपी आणि सोयीस्कर आहे. यात तुम्ही तुमचे सोने व कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन बँकेला कर्जासाठी मागणी करू शकता. त्यानंतर बँक तुमच्या सोन्याचे मूल्यांकन करेल. यात बँकेद्वारे तुम्ही दिलेले सोने खरे आहे की नाही ते आधी तपासून बघितले जाते, म्हणजेच दागिन्यांची शुद्धता तपासली जाते, त्या दागिन्यांचे वजन केले जाते.

वजन करताना दागिन्यांतील खडे, लाख यांना सोडून फक्त प्युअर सोने किती आहे तेच मोजले जाते व त्याचेच वजन करून त्यानंतर त्याची मार्केट नुसार किंमत काढली जाते. जर तुमचे दागिने हॉलमार्क असलेले असतील तर नेहमी पेक्षा थोडा जास्त पैसा मिळतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तपासली जातात. व त्यानंतरच बँक तुमचे गोल्ड लोन मंजूर करते.

उदाहरणार्थ – समजा तुम्ही दिलेल्या सोन्याची मार्केट नुसार 1,00,000 किंमत होत असेल तर बँक तुम्हाला त्याच्या 75% टक्के म्हणजे 75,000 रुपये पर्यंत लोन देते. यानंतर बँक तुमच्या सोबत एक करार करते, ज्यात कर्जाची रक्कम, कर्ज परतफेड करण्याचा कालावधी, व्याजदर या गोष्टींबद्दल लिहिलेले असते. यानंतर बँके द्वारे कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय पूर्ण प्रोसेस झाल्यावर बँक तुम्हाला एक स्लिप देते. ही स्लिप तुम्हाला सांभाळून ठेवावी लागते. कारण जेव्हा तुम्ही घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड करता तेव्हा ही स्लिप तुम्हाला बँकेत दाखवावी लागते. काही कारणांस्तव जर ही स्लिप तुमच्या कडून हरवली तर मात्र बँक पेनल्टी म्हणून 500 तुमच्या कडून घेईल. व त्यानंतरच बँक तुम्हाला तुमचे सोने परत करेल. इथे तुम्हाला फक्त प्रोसेसिंग फी द्यावी लागते ती पण फक्त 0.20 ते 2% पर्यंत असू शकते.

गोल्ड लोनचे प्रकार

मित्रांनो, या शिवाय गोल्ड लोनचे दोन कॅटेगरिझ पडतात.

  1. Direct Agri Gold Loan (शेतकरी)
  2. Non Direct Agri Gold Loan (शेतकरी सोडून सगळे)

डायरेक्ट अ‍ॅग्री या कॅटेगरी मध्ये सर्व शेतकरी बांधव येतात. तर नॉन डायरेक्ट अ‍ॅग्री मध्ये इतर सर्व लोक येतात. आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला डायरेक्ट अ‍ॅग्री कॅटेगरीतून गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला जे व्याज दर लावले जातील ते नॉर्मल गोल्ड लोन इंटरेस्ट पेक्षा कमी लावण्यात येतील. फक्त इथे तुम्हाला तुमच्या जमिनीचे कागदपत्रे बँकेला दाखवावे लागतील. डायरेक्ट अ‍ॅग्रीमध्ये जर तुम्ही दिलेल्या कालावधीत बँकेचे कर्ज परतफेड करू नाही शकलात तर बँक तुम्हाला 180 दिवसांची मुदत वाढवून देते. तो पर्यंत बँक तुमचे सोने विकू शकत नाही. थोडक्यात काय तर डायरेक्ट अ‍ॅग्री कॅटेगरीतून गोल्ड लोन घेतले तर ते स्वस्तात पडते.

नोट – वरती दिलेला कालावधी प्रत्येक बँकेचा वेग-वेगळा असू शकतो, तुमच्या बँकेत चौकशी करून घ्या.

तसेच जर तुम्ही Non Direct Agri कॅटेगरीतून गोल्ड लोन घेत असाल आणि जर तुम्ही दिलेल्या कालावधीत कर्जाची परतफेड केली नाही किंवा तेवढे पैसे तुमच्याकडे नसतील तर अश्या वेळी बँक तुम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी अजून देते. आणि जर या कालावधीत ही तुम्ही कर्ज परतफेड करू शकला नाहीत तर मात्र बँक तुम्हाला नोटीस पाठवते. त्याला LRN ( Legal Recall Notice ) असे म्हणतात. नोटीस पाठविल्या नंतर बँक अजून 15 दिवस मुदत वाढवून देते. पण तरीही तुम्ही कर्ज परतफेड केली नाही तर मात्र बँक परस्पर तुमचे सोने विकून टाकते. त्यामुळे जर तुम्ही बँकेचे पूर्ण पैसे दिलेल्या कालावधीत परत करू शकत नसाल तर कमीत कमी लोन वरचे इंटरेस्ट तरी देणे आवश्यक आहे. व बाकीची रक्कम नंतर दिली तरी चालते. तसेच बँकेशी बोलून तुम्ही कर्जवरचे व्याज भरून चालू कर्जाचा कालावधी वाढवून घेऊ शकता. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही व्याज आणि काही चार्जेस भरून गोल्ड लोन रिन्यू (नूतनीकरण) करू शकता.

सोने तारण घेण्यासाठी पात्रता

सोने तारण कर्ज घेण्यासाठी पात्रता (Gold loan Eligibility criteria) काय आहे? तसेच सोने तारण कर्ज घेताना कोण कोणत्या कागदपत्रांची (Gold Loan required documents) गरज असते?

मित्रांनो, गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असणे गरजेचे असते. आणि तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही भारतात कुठेही सोने तारण कर्ज घेऊ शकता. याशिवाय कर्ज घेताना तुमच्याकडे ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, वगैरे, तुमचा रहिवासी पुरावा, पत्त्याचा पुरावा, आणि तुमचा फोटो असे महत्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या बँकेकडून तुम्हाला सोने तारण कर्ज हवे आहे त्या बँकेत तुमचे सेविंग अकाउंट असणे आवश्यक आहे.

Gold Loan Interest Rates Comparison

गोल्ड लोनचे व्याजदर (सरकारी/खाजगी बँक)

गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्जाचे व्याजदर (Gold Loan Interest Rates) काय असतो?

मित्रांनो, सोने तारण कर्ज हे अतिशय सुरक्षित कर्ज आहे. त्यामुळे त्याचे व्याजदर ही जास्त नसतो. सोने तारण कर्जाचे व्याजदर हे प्रत्येक बँकेत वेग-वेगळे असू शकते. शिवाय हे व्याजदर विविध घटकांवर अवलंबून असते. तसेच तुम्ही कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेचा परतफेड कालावधी किती आहे यावर सुद्धा व्याजदर ठरवले जाते.

मित्रांनो, बँके शिवाय अनेक नॉन बँकिंग फायनांशील कंपन्या सुद्धा आहेत ज्या तुम्हाला सोने तारण कर्ज ऑफर करतात. पण अश्या कंपन्या जास्त व्याजदर आकारतात. त्यामुळे तुम्ही नेहमी मोठ्या आणि लोकप्रिय बँकेतून गोल्ड लोन घ्यावे. जेणेकरून कुठलीही फसवणूक होत नाही. खाली आम्ही तुम्हाला काही ठराविक बँकेचे व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्याचे व्याजदर देत आहोत:-

बँकव्याजदररक्कम
SBI7% हुन पुढे20,000 ते 50 लाख
HDFC
(एचडीएफसी)
11 ते 16%10,000 पासून पुढे
Canara
(कॅनरा)
7.35% पासून पुढे5,000 ते 35 लाख
Axis
(ऍक्सिस)
13 ते 17%25,000 ते 25 लाख
Kotak Mahindra
(कोटक)
10 ते 17%20,000 ते 1.5 कोटी
IndusInd
(इंडसइंड)
11.50 ते 16%10 लाख पर्यंत
Bank of Maharashtra
(बँक ऑफ महाराष्ट्र)
7.10 % पासून पुढे20 लाख पर्यंत
Muthoot
(मुथूट)
12 ते 26%1,500 पासून पुढे
Punjab National Bank
(पंजाब नॅशनल)
7.70 ते 8.75%25,000 ते 10 लाख पर्यंत
Bank of Baroda
(बडोदा बँक)
9 ते 9.15%25 लाख पर्यंत
IDBI
7.20%10,000 ते 20 लाख पर्यंत

FAQ

सोने तारण कर्ज परतफेड करण्याचा कालावधी किती असतो?

मित्रांनो, गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा ज्या त्या बँके वर अवलंबून असतो. पण साधारणपणे तीन, सहा, किंवा बारा महिन्याचा कालावधी आपण निवडू शकतो. पण जर कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्हाला 12 महिन्या पेक्षा जास्त कालावधी लागणार असेल तर तुम्हाला तुमच्या कर्जाचे पुन्हा नूतनीकरण करावे लागेल. परंतु जर ठरवलेल्या कालावधीत तुम्हाला मुद्दल आणि इंटरेस्ट दोन्ही द्यायला जमणार नसेल तर बँक कमीत कमी व्याज भरायला सांगते व नंतर कर्ज नूतनीकरण करून देते.

कोणत्या बँका सोने तारण कर्जावर कमी व्याजदर आकारतात?

मित्रांनो, काही खाजगी बँक आहेत ज्या तुम्हाला सोने तारण कर्जावर कमी व्याजदर आकारतात. जसे की साऊथ इंडियन बँक 7 टक्के दराने व्याज देते. बँक ऑफ महाराष्ट्र 7.20 टक्के दराने गोल्ड लोन देते. इंडियन बँक 7.35 टक्के व्याज दराने गोल्ड लोन देते. तर पंजाब नॅशनल बँक 7.40 टक्के व्याज दराने गोल्ड लोन देते. तर बँक ऑफ इंडिया 7.50 टक्के दराने गोल्ड लोन वर व्याज आकारते. या पाच बँका सोनं तारण वर कमी व्याज आकारतात. तर इतर बँका जास्त व्याज दर आकारतात. तसेच जर तुम्ही हफ्ता चुकवला किंवा उशीर झाला तर कधी कधी जास्तीचे अतिरिक्त व्याज आणि लेट चार्जेस द्यावे लागते.

सोने तारण कर्जाचे फायदे काय आहेत?

सोने तारण कर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे कर्ज खूप लवकर म्हणजे अगदी काही मिनिटात मिळते.
हे कर्ज घेण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नसते.
तसेच इतर वैयक्तिक कर्ज पेक्षा सोने तारण कर्ज चे व्याजदर कमी असते.
इतर कर्ज घेताना तुमचा सिबील स्कोर चेक केला जातो. पण सोने तारण कर्ज घेताना तुमचा सिबील स्कोर खराब असला तरी तुम्हाला गोल्ड लोन मिळू शकते.
सोने तारण कर्ज मार्फत घेतलेले पैसे तुम्ही कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी वापरू शकता.
गोल्ड लोन घेण्यासाठी इन्कम प्रूफ देण्याची गरज पडत नाही.

कोणत्या बँका सोने तारण कर्जावर कमी व्याजदर आकारतात?

काही महत्त्वाचे

मित्रांनो, आत्ता पर्यंत आपण गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आजकाल फसवणूक आणि भ्रष्टाचार खूप पसरला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही गोल्ड लोन घेण्याचा विचार कराल तेव्हा ज्या बँकेतून किंवा कंपनी तुन तुम्ही लोन घेणार असाल ती बँक किंवा कंपनी विश्वासू आहे की नाही ते तपासून बघा. मगच लोन घ्या. तसेच गोल्ड लोन घेताना बँकेने किंवा लोन कंपनीने जे नियम व अटी सांगितल्या आहेत त्या नीट वाचून व समजून घ्याव्या. जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गोल्ड लोन म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोल्ड लोन वरील व्याज दर सरकारच्या आदेशा नुसार बदलत राहते. त्यामुळे ही सर्व माहिती वेळेनुसार बदलु शकते. तसेच गोल्ड लोन घेण्याआधी बँकेत चौकशी करून खात्री करून घ्यावी, ही विनंती. तसेच आमचा आजचा हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

Tags – Gold Loan information in Marathi, Gold loan process information in Marathi, Gold loan eligibility criteria in Marathi, Gold Loan required document information in Marathi, Gold loan interest rate information, Gold loan charges info in Marathi, Gold Loan Mahiti, Gold Loan Kase Gyayche, Sone Taran Mahiti, Sone Taran Information, Sone Taran Mhanje Kay, Sone Taran Kase Thevayche, Sone Taran Vyaj Dar