फ्लिपकार्ट ओपन बॉक्स डिलिवरी – म्हणजे काय, कसे वापरायचे, चार्जेस, फायदे, तोटे | Flipkart Open Box Delivery

नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्लिपकार्टच्या ओपन बॉक्स डिलिव्हरी या फिचर बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, सणासुदीचे दिवस असो किंवा इतर दिवस असो ऑनलाईन शॉपिंग करण्यावर सगळ्यांचाच भर असतो. त्यातल्या त्यात फ्लिपकार्ट सारखे शॉपिंग प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी वस्तूंवर डिस्काउंट, ऑनलाईन सेल किंवा ऑफरची घोषणा करत असतात. या ऑनलाईन सेल मधून अनेक जण शॉपिंग करतात. पण बऱ्याच वेळा ऑनलाईन सेल मध्ये फसवणूक झाल्याचे प्रकार दिसून आले आहेत. या फसवणुकी मध्ये जी वस्तू मागवली आहे त्या वस्तू ऐवजी दुसरीच वस्तू डिलिव्हर होते. मग अश्या परिस्थितीत ग्राहक आणि कंपनी मध्ये वाद सुरू होतात. आणि या वादात अनेक वेळा ग्राहकाला न्याय मिळत नाही.पण आता या वर उपाय म्हणून फ्लिपकार्ट ने ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय आपल्याला दिला आहे. हा पर्याय निवडल्यास वस्तू डिलिव्हरी च्या वेळेस तुमची फसवणूक होणार नाही. तर काय आहे हे फ्लिपकार्ट चे ओपन बॉक्स डिलिव्हरी फिचर? ते कसे वापरायचे व त्याला किती खर्च करावा लागेल, त्यासाठी एक्सट्रा चार्जेस द्यावे लागतील का, अश्या सर्व गोष्टीं बद्दल आपण सविस्तर पणे जाणून घेऊ या. त्यासाठी आमचा आज चा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Flipkart Open Box Delivery in Marathi

ओपन बॉक्स डिलिव्हरी (Open Box Delivery) म्हणजे नेमकं काय?

What is flipkart Open Box Delivery

मित्रांनो, ओपन बॉक्स डिलिव्हरी हा ऑप्शन, फ्लिपकार्ट वर वस्तू ऑर्डर करताना दिला जातो. तुम्ही जर या ओपन बॉक्स डिलिव्हरी सर्विसचा ऑप्शन निवडला तर डिलिव्हरी बॉय तुम्हाला तुमच्या समोर प्रोडक्ट ओपन करून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या समोरच बॉक्स ओपन झाल्यामुळे तुम्ही मागवलेली वस्तू त्यात आहे की नाही हे तुम्हाला समजते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही. पण सध्या ही सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. तुमच्या पिन कोड वर ही सुविधा उपलब्ध आहे की नाही हे जाणून घ्यायचे आले तर प्रोडक्ट ऑर्डर करताना तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरी हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर कळेल.जर तुमच्या पिन कोड वर ओपन बॉक्स डिलिव्हरी सर्व्हीस उपलब्ध असेल तर प्रोडक्ट ऑर्डर करताना हा ऑप्शन निवडा. डिलिव्हरी बॉय तुमच्या समोर बॉक्स ओपन करून देईल व तुम्हाला तेच प्रोडक्ट आहे की नाही ते दाखवेल.

मित्रांनो, ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट करून जर तुम्ही कॅश व डिलिव्हरी करणार असाल तर मात्र तुम्हाला आधी पेमेंट करावे लागेल, मग नंतर डिलिव्हरी बॉय बॉक्स ओपन करून दाखवेल. तसेच जर तुम्ही मागवलेली वस्तू डॅमेज किंवा चुकीची असेल तर तुम्हाला त्याच क्षणी रिटर्न आणि रिफंड ची सुविधा मिळेल. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले असेल तर तुम्हाला सेलर च्या रिफंड पॉलिसी नुसार तुमचे पैसे परत मिळतील.

ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन कसा वापरायचा?

How to Activate Flipkart Open Box Delivery Option

आता ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन ऍक्टिव्हेट कसा करायचा त्या बद्दल जाणून घेऊ या

मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला फ्लिपकार्ट अँप मधून ऑर्डर सिलेक्ट केल्या नंतर Buy Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमचे अड्रेस व पेमेंट वगैरे सिलेक्ट करून झाल्या वर तुम्हाला Open Box Delivery चा ऑप्शन दिसेल. व त्या खाली तुम्हाला Agree and continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. व त्या नंतर ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन ऍक्टिव्हेट होऊल व तुमची Order Placed होऊन जाईल.

How to Use Flipkart Open Box Delivery in Marathi

फ्लिपकार्ट ओपन बॉक्स डिलिव्हरी चार्जेस

Flipkart Open Box Delivery Charges

कोणत्या प्रोडक्ट्स वर तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरीचा ऑप्शन मिळणार आहे व त्याचे चार्जेस किती असणार आहेत?

मित्रांनो, ओपन बॉक्स डिलिव्हरी हा ऑप्शन तुम्हाला खास करून मोठ्या व महाग वस्तूं वर मिळणार आहे. जसे की मोबाईल, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणचे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, इत्यादी…

तसेच मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ओपन बॉक्स डिलिव्हरी या ऑप्शन ची सर्व्हीस पूर्ण पणे फ्री आहे. म्हणजेच ही सर्व्हिस घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्सट्रा चार्जेस द्यावे लागणारे नाहीत. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही फ्लिपकार्ट वरून मोठी किंवा महाग वस्तू घेणार असाल तेव्हा ओपन बॉक्स डिलिव्हरी चा ऑप्शन नक्की निवडा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण फ्लिपकार्ट च्या ओपन बॉक्स डिलिव्हरी या ऑप्शन बद्दल सविस्तर पणे जाणून घेतले. तरीही तुम्हाला जर या ओपन बॉक्स डिलिव्हरी ऑप्शन बद्दल आणखीन जाणून घ्यायचे असेल तर फ्लिपकार्ट च्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अँप वर बघू शकता. मित्रांनो, आशा करतो या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. तसेच हा लेख आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद