ICICI बँक पर्सनल लोन: फायदे, व्याजदर, पात्रता, डॉक्युमेंट लिस्ट, EMI | ICICI Personal Loan

नमस्कार मित्रांनो, आज आपण ICICI बँकेच्या वैयक्तिक कर्जाबद्दल (Personal Loan) सविस्तर माहिती बघणार आहोत या मध्ये, ICICI पर्सनल लोनचा व्याज दर (Interest Rate) आणि कार्यकाळ (Tenure) किती असतो ? ICICI पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्रे (Documents) लागतात त्याच बरोबर लोनसाठी पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात ? तुमच्या सिबिल स्कोअर (Cibil Score) नुसार तुम्हाला किती लोन मिळू शकते ? यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे असणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

ICICI BANK Personal Loan

सर्वात आधी आपण माहिती करून घेऊ कि, ICICI पर्सनल लोनची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत.ICICI पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये

 • ऑनलाईन सुविधा: ICICI बँक ऑनलाईन पर्सनल लोनची सुविधा देते, या मध्ये तुम्ही फक्त 3 सेकंद मध्ये लोन मिळवू शकता.
 • कमी EMI रक्कम: तुमचा EMI हा 1878 रु. पासून सुरू होऊ शकतो, 1 लाखचे पर्सनल लोन 6 वर्षांच्या कालावधीसाठी
 • पूर्व मंजूर (Pre Approved) ऑफर: ICICI बँकेच्या निवडक ग्राहकांना केवळ 3 सेकंदात त्वरित पेपरलेस लोन मिळू शकते.
 • लोनची रेन्ज: तुम्ही अगदी 50,000 रु. पासून ते 50 लाखांपर्यंत पर्सनल लोन निवडू शकता.
 • तारण: ICICI पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तारण किंवा सुरक्षेची (collateral or security) आवश्यक नाही.
 • कमी कागदपत्रे: तुमच्याकडे कमी कागदपत्रांची मागणी केली जाते.

ICICI पर्सनल लोनच्या ठळक बाबी

ICICI Bank Personal Loan Highlights

व्याज दर (Interest Rate)10.75% – 19.00% दरसाल
लोन रक्कम मर्यादा50,000/- ते 50 लाख
लोनचा उद्देश/कारणप्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च

ICICI बँक पर्सनल लोन चार्जेस/ शुल्क

HDFC Bank Personal Loan Fees & Charges

लोन प्रोसेस चार्जेस
(Loan processing fee)
लोन रकमेच्या कमाल 2.50% पर्यंत आणि टॅक्स
प्री-पेमेंट/पार्ट-पेमेंट चार्जेस
(Pre-payment/Part-payment charges)
पगारदार ग्राहकांसाठी, पहिल्या EMI भरल्यानंतर मूळ थकबाकीवर 3% आणि टॅक्स,
12 किंवा अधिक EMI भरल्यास शून्य
MSE वर्गीकृत ग्राहकांसाठी, 50 लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 1ला EMI भरल्यानंतर शुल्क शून्य आहे
थकीत EMI व्याज
(Overdue EMI interest)
2% दरमहा EMI/थकीत मुद्दल (24% दरसाल)
परतफेड मोड मध्ये बदल
(Repayment mode change charges)
500/- रु. + टॅक्स
परतफेड वेळापत्रक चार्जेस
(Repayment Schedule Charges)
शून्य
कर्ज रद्द करण्याचे चार्जेस
(Loan Cancellation Charges)
3000/- रु. + टॅक्स
EMI बाऊन्स चार्जेस
(EMI bounce charges)
500/- रु. + टॅक्स

ICICI बँक पर्सनल लोन पात्रता निकष

Eligibility Criteria for HDFC Personal loanICICI बँक दोन प्रकारच्या व्यक्तींना पर्सनल लोन देते. 1) पगारदार व्यक्ती 2) स्वयंरोजगार व्यक्ती / व्यवसाय करणारे व्यक्ती (यामध्ये डॉक्टर, क्लास चालवणारे शिक्षक, फ्रीलान्सर इत्यादी व्यक्तींचा समावेश असू शकतो)

पगारदार व्यक्तींसाठी पर्सनल लोन पात्रता निकष

Personal Loan Eligibility Criteria for Salaried Individuals

 • वय: 23 ते 58 वर्षे असावे
 • पगार: मासिक उत्पन्न कमीत कमी 30,000 रु. असावे
 • नोकरी/व्यवसायात एकूण: 2 वर्षे करत असला पाहिजे
 • सध्याच्या निवासस्थानी: 1 वर्ष राहत असला पाहिजे

तुमचा पगार कमी असेल तरी तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते, हे पूर्णपणे बँकेवर अवलंबून आहे आणि तुमचे बँकेशी असलेल्या संबंधावर.

स्वयंरोजगार व्यक्तींसाठी पर्सनल लोन पात्रता निकष

Personal Loan Eligibility Criteria for Self Employed

 • वय: 28 वर्षे (स्वयंरोजगार व्यक्तीसाठी) आणि 25 वर्षे (डॉक्टरांसाठी), कमाल वय – 65 वर्षे
 • किमान उलाढाल: 15 लाख व्यावसायिकांसाठी आणि गैर-व्यावसायिकांसाठी 40 लाख, तुमचे फाइनैन्शल ऑडिट करून बँक उलाढाल ठरवेल
 • करा भरल्यानंतर किमान नफा: 2 लाख स्वयंरोजगार / प्रप्राइअटर्शिप फर्म आणि गैर-व्यावसायिकांसाठी 1 लाख, तुमचे फाइनैन्शल ऑडिट करून बँक नफा ठरवेल
 • व्यवसायाची स्थिरता: सध्याच्या व्यवसायात किमान 5 वर्षे आणि डॉक्टरांसाठी किमान 3 वर्षे

FAQ

मला व्यावसायिक कारणासाठी ICICI बँकेचे पर्सनल लोन मिळू शकेल का?

होय, ICICI बँक स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना, व्यावसायिक हेतूसाठी पर्सनल लोन देते. व्यवसाय कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्या वैध कागदपत्रासह तुमच्या जवळच्या ICICI बँकेच्या शाखेला भेट द्या.

ICICI बँकेत पर्सनल लोनची प्रक्रिया होण्यासाठी किती वेळ लागतो?

एकदा तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे आणि लोनचा अर्ज सबमिट केल्यानंतर ICICI बँक, तुमच्या पर्सनल लोनची प्रक्रिया 2 ते 7 दिवसांत पूर्ण करते.

पूर्व-मंजूर (pre-approved) पर्सनल लोन मिळविण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

ICICI बँक पर्सनल लोन अर्जदारांचा: आधीच्या लोनचा परतफेड रेकॉर्डचा इतिहास तपासून आणि बँक अकाउंटच्या स्टेटमेंटचचा अभ्यास करून, पूर्व-मंजूर (pre-approved) ऑफर देते.

मी किमान किती क्रेडिट स्कोअर वर ICICI बँकेचे पर्सनल लोन घेऊ शकतो ?

ICICI बँकेने त्यांच्या पर्सनल लोन अर्जदारांसाठी क्रेडिट स्कोअर संबंधित माहिती प्रसिद्ध केलेली नाही. पण 750 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअरवर सहसा कमी व्याजदरात पर्सनल लोन मिळण्याची शक्यता असते.

मी ICICI बँकेच्या पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करू शकतो?

ICICI बँकेकडून पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि नेटबँकिंग मध्ये लॉगिन करून पर्सनल लोन विभागात जावे लागेल किंवा बँकेच्या कस्टमर केअरला 1800 1080 नंबर वर ऑफिसच्या वेळेत कॉल करा लागेल किंवा जवळच्या बँकेच्या शाखेत भेट द्यावी लागेल.

संदर्भ – icicibank.com

Tags: ICICI personal loan marathi, ICICI personal loan in marathi, ICICI personal loan mahiti, ICICI personal loan info in marathi, ICICI personal loan information in marathi, ICICI पर्सनल लोन, ICICI पर्सनल लोन व्याज दर, ICICI पर्सनल लोन पात्रता, ICICI पर्सनल लोन चार्जेस, ICICI personal loan eligibility in marathi, ICICI personal loan fee, ICICI personal loan charges, ICICI personal loan details in marathi, ICICI personal loan document marathi