Jio Fiber Vs Airtel Xstream: कोण चांगले आहे, प्लॅन्स, इंस्टॉलेशन चार्जेस, फरक, प्रीपेड की पोस्टपेड

नमस्कार मित्रांनो, इंटरनेटचा आपल्या जीवनातील वापर इतका वाढला आहे की मोबाईलवर मिळणारा रोजचा 1 GB डेटा आपल्याला पुरेनासा झालाय. शिवाय इंटरनेटचा वापर कामाशिवाय मनोरंजनासाठी ही केला जातोय. इतकं सगळं करण्यासाठी डेटा पॅक ही तसाच मोठा हवा. यासाठी आपल्या घरामध्ये WiFi किंवा ब्रॉडबँड लावले तर ही समस्या कमी होते. पण कोणत्या कंपनीचे WiFi किंवा ब्रॉडबँड घ्यावे त्यांचे फायदे, तोटे काय आहेत, हे करण्यासाठी किती खर्च येतो. अशा प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही आजचा लेख घेऊन आलो आहे, यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या दोन WiFi/ब्रॉडबँड सुविधा देणाऱ्या कंपन्या म्हणजेच Airtel Xtreme Fibre आणि Jio Fibre यांची तुलनात्मक माहिती घेणार आहोत.

Jio Fiber Vs Airtel Xstream

कनेक्शन कसे घ्यायचे

Jio Fibre चे कनेक्शन घेण्यासाठी आधी Jio च्या वेबसाइटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये तुमचे नाव, काँटॅक्ट नंबर आणि पत्ता भरावा लागेल. मग दिलेल्या पत्त्यावर Jio Fibre ची सुविधा उपलब्ध आहे की नाही ते तपासले जाते. जर उपलब्ध असेल तर पुढील आठवडा भरात Jio तर्फे तुमच्याशी संपर्क साधला जातो.



Airtel Xtreme Fibre चे कनेक्शन घेण्यासाठी एअरटेलच्या वेबसाईटला भेट द्या. वेबसाइटवर ब्रॉडबँड हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर उघडणारा फॉर्म भरा. त्यातही तुमच्या पत्त्यावर Xtreme fibre उपलब्ध आहे काय ते तपासले जाते. जर असेल तर असेल तर Airtel तर्फे संपर्क साधून पुढील प्रक्रिया केली जाते.

इंस्टॉलेशन चार्जेस

Jio fibre बद्दल सांगायचे झाले तर सेक्युरिटी डिपाॅझिट म्हणून 1500 रुपये भरावे लागतात. जर तुम्हाला Jio Fibre चा सेट टॉप बॉक्स हवा असेल तर त्यासाठी 2500 रुपये जास्त मोजावे लागतील. हे 2500 रुपये रिफंडेबल असतात. जर कनेक्शन घेतल्यानंतर तीस दिवसात जर तुम्ही ते कॅन्सल केलं तर रिफंड मिळतो. Jio Fibre ची ट्रायल ऑफर आहे जिच्यामध्ये ग्राहकाला एक महिना 30 Mbps प्रमाणे मोफत डेटा मिळतो.

Airtel Xtreme Fibre चे इंस्टॉलेशन चार्जेस 1000 रुपये इतके आहेत. पण जर तुम्ही 3, 6 किंवा 12 महिन्यांचा प्लॅन घेतला तर इंस्टॉलेशन मोफत मिळते. शिवाय अशा मोठ्या प्लॅन्स वर 7.5 ते 15 टक्क्यांपर्यंत सवलत ही मिळते. Airtel Xtreme Fibre च्या सेट टॉप बॉक्ससाठी 2500 रुपये जास्त शुल्क आकारले जाते.



प्रीपेड की पोस्टपेड

Jio Fibre प्रीपेड आणि पोस्टपेड सुविधा देऊ करते. Airtel Xtreme Fibre ची फक्त पोस्टपेड सेवाच उपलब्ध आहे.

Jio fibre Vs Airtel Xtreme Fibre प्लॅन्स

Jio Fibre प्लॅन्स

Jio fibre चे विविध प्लॅन्स खालील प्रकारे आहेत.

399 Jio Fibre प्लॅन

हा jio चा एकदम बेसिक प्लॅन आहे. याची किंमत 399 + 18% GST अशी आहे. हा प्लॅन घेतला तर 30 Mbps च्या वेगाने डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मचा मोफत ॲक्सेस दिला जात नाही.

699 Jio Fibre प्लॅन

या प्लॅनची किंमत 699 रुपये + 18% GST इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 100 Mbps च्या वेगाने डेटा मिळतो आणि कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मचा मोफत ॲक्सेस मिळत नाही.

999 Jio Fibre प्लॅन

या प्लॅनमधे 150 Mbps च्या वेगाने डेटा उपलब्ध करून दिला जातो. तसेच Disney Hotstar, Amazon Prime, ZEE 5 यासारख्या 16 OTT प्लॅटफॉर्मचा मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

1500 Jio Fibre प्लॅन

हा प्लॅन इंटरनेटचा जास्त वापर असलेल्या लोकांसाठी हा एक छान प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये इतर OTT प्लॅटफॉर्मसोबतच Netflix चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये 300 Mbps च्या वेगाने डेटा मिळतो.

2500 Jio Fibre प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकाला 500 Mbps या वेगाने डेटा मिळतो. तसेच Netflix चे प्रीमियम सबस्क्रिप्शन सुद्धा मिळते.

या रेग्युलर प्लॅन व्यतिरिक्त 3999 आणि 8999 हे प्रीमियम प्लॅनसुद्धा Jio ग्राहकांना देऊ करते. या प्लॅनमध्ये 1 GBps च्या प्रचंड वेगाने डेटा दिला जातो.

एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक प्लॅनच्या मूळ किमतीवर 18% GST लागू होतो.

Airtel Xtreme Fibre प्लॅन्स

Airtel Xtreme Fibre चे प्लॅन खालील प्रमाणे आहेत.

499 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

हा Airtel Xtreme fibre चा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 499 रुपये प्रति महिना अशी आहे. यात 40Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. त्याचबरोबर Wynk म्युझिक, अनलिमिटेड कॉलिंग, Airtel Xtreme Premium ॲप चे सबस्क्रिप्शन मिळते ज्यावर अनेक वेबसिरीज आणि चित्रपट विनामूल्य पाहता येतात.

699 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

या प्लॅनची किंमत 699 रुपये प्रति महिना आहे. यात 40Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील मिळतात. याशिवाय, तुम्हाला Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन, Airtel Xstream Premium ॲप चे सबस्क्रिप्शन मिळते, Wynk म्युझिक आणि बरेच काही मिळते.

799 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

या प्लॅनची किंमत 799 रुपये प्रति महिना आहे. यात 100Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, Wynk आणि Airtel Xstream Premium चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. तसेच Shaw Academy ॲपचाही फ्री access मिळतो.

999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

जवळपास हजार रुपये प्रति माह शुल्क असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 100Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा पुरवला जातो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा access मिळतो. त्याच बरोबर अनेक लोकप्रिय चित्रपट, सिरीजही पाहता येतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हा प्लॅन अनलिमिटेड मनोरंजनासाठी बनवला गेला आहे असं आपण म्हणू शकतो.

1099 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

हा प्लॅन 999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन सारखाच आहे फक्त फरक असा आहे कि यामध्ये तुम्हाला DTH set-top बॉक्स सोबत एकत्र असा बंडल (bundled) मिळेल. या बंडल मध्ये 350+ टीव्ही चॅनेल मिळतात. तसेच यात 200Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा access मिळतो.

1498 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

हा Airtel Xtreme चा VIP प्लॅन समजला जातो.1499Mbps मासिक शुल्क असलेल्या या प्लॅनमध्ये डेटा स्पीड अजून चांगला मिळतो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Netflix Basic, Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा आनंद तुम्ही घेवू शकता. तुमचा इंटरनेट वापर खूप जास्त असेल तर हा प्लॅन घेण्याचा जरूर विचार करा.

3999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

भल्या मोठ्या किमतीचा हा प्लॅन सुद्धा VIP प्लॅन मानला जातो. या प्लॅनमध्ये सुध्दा 1Gbps इतक्या वेगाने डेटा मिळतो. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना वर दिलेल्या सर्व सुविधा तर प्राप्त होतातच. शिवाय त्यांना Airtel 4K Xstream TV Box मोफत दिला जातो. Airtel 4K Xstream TV Box हा सेट टॉप बॉक्स आहे. ज्यावर तुम्ही HD टीव्ही चॅनल्सचा आनंद घेवू शकता. या प्लॅन मध्ये Netflix Premium सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळते.

मित्रहो, इथे एक गोष्ट विशेष नमूद केली पाहिजे ती म्हणजे वर दिलेल्या प्लॅन व्यतिरिक्त खास तुमच्या शहरासाठी एखादा विशेष प्लॅन एअरटेलतर्फे जाहीर केलेला असू शकतो. त्याची माहिती तुम्हाला airtel Thanks ॲपमध्ये मिळू शकते.

मित्रांनो, तुम्ही जर Jio Fibre आणि Airtel Xtreme Fibre च्या प्लॅन्सची तुलना केलीत तर असे लक्षात येईल की Jio Fibre चे प्लॅन Airtel पेक्षा १०० रुपयांनी स्वस्त आहेत. पण मिळणार डेटा स्पीडही कमी आहे.

उदाहरणार्थ जिओच्या बेसिक प्लॅन 399 मध्ये तुम्हाला 30 Mbps च्या वेगाने डेटा मिळतो. तर Airtel Xtreme Fibre मध्ये बेसिक प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतो ज्याचा स्पीडही 40 Mbps इतका आहे.

आता सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण Jio Fibre आणि Airtel Xtreme Fibre यातील नेमकं काय निवडावे. तर लोकहो आम्ही तुम्हाला एकच सल्ला देऊ. तो म्हणजे आधी आपल्या भागात दोन्हीपैकी कोणत्या ब्रॉडबँडचे नेटवर्क चांगले आहे ते तपासा आणि मगच निर्णय घ्या. कारण जर नेटवर्क चांगले नसेल तर कितीही चांगला प्लॅन घेतला तरी त्याचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही.

या लेखात Jio Fibre आणि Airtel Xtreme Fibre च्या ब्रॉडबँड बद्दलची तुलनात्मक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.