Ladki Bahin

लाडकी बहीण KYC सोपी पद्धत (मोबाईल मध्ये) | Ladki Bahin eKYC

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या योजनांपैकी एक म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’. या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी थांबवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी आपली e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi

आणि याबाबतचा जीआर (GR) देखील महिला व बाल विकास विभागाने जारी केला असून, पुढील दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पात्र लाभार्थी महिलांना पूर्ण करावी लागणार आहे. असे केल्यासच महिलांचा पुढील हफ्ता चालू राहील अन्यथा योजनेचा हफ्ता मिळणे बंद केले जाईल. मित्रांनो, ही ई केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही कुठूनही फॉर्म भरला असला तरी देखील तुमची ई केवायसी एकाच पोर्टल वर करण्यात येणार आहे.



अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई केवायसी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही, तर त्या कोणत्याही संगणक केंद्रा द्वारे किंवा तुमच्या मोबाईल फोन द्वारे घरी बसून सहजपणे ई केवायसी पूर्ण करू शकता. चला तर मग लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची? हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…

लाडकी बहीण eKYC स्टेप्स

स्टेप 1:- मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत असलेल्या https://ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. नंतर लाभार्थी आधार क्रमांक मध्ये तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे व त्या नंतर दिलेला कॅपचा टाकायचा आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 1


नंतर ‘आधार प्रमाणीकरासाठी संमती’ मधील ‘मी सहमत आहे’ या बटन वर टिक करून खाली दिलेल्या ‘ओटीपी पाठवा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.



फॉर्म भरताना एरर/error येत असेल तर ला लेख वाचा => लाडकी बहीण eKYC प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन

स्टेप 2:- या नंतर लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल. तो दिलेल्या जागी टाकून ‘सबमिट करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

फॉर्म भरताना एरर/error येत असेल तर ला लेख वाचा => लाडकी बहीण eKYC प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 2

स्टेप 3:- आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला ‘EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची/ पतीची माहिती द्या’ असा warning मेसेज येईल. इथे बाहेरच्या बाजुला क्लिक करून

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 3

नंतर दिलेल्या बॉक्स मध्ये लाभार्थी महिलेच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व दिलेला कॅपचा टाकून खाली ‘मी सहमत आहे’ या पर्यायावर टिक करून ‘ओटीपी पाठवा’ या बटन वर क्लिक करायचे आहे. (जर लाभार्थी महिलेला वडील व पती दोघेही नसल्यास काय करायचे, या बद्दल ची अपडेट अजून पोर्टल वर आलेली नाही. आल्यास तुम्हाला कळवले जाईल.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 4

स्टेप 4:- आता या नंतर वडिलांच्या किंवा पतीच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल, तो टाकून ‘सबमिट करा’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 5

स्टेप 5:- मित्रांनो, ओटीपी सबमिट केल्यावर पुन्हा एकदा Warning चा मेसेज येईल, “EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या”. आता इथे बाहेरच्या बाजूला क्लिक करून तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे. ज्यात पहिले तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे, म्हणजे आधी तुम्ही ज्याचा आधार कार्ड नंबर टाकला होता, त्या व्यक्तीचं नाव इथे ऑटोमॅटिक आलेले दिसेल, ते चेक करून घ्यायचे आहे. त्या नंतर पहिला ऑप्शन मध्ये “होय” करायचं आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 6

स्टेप 6:- आता पुढे तुम्हाला ‘जात प्रवर्ग’ मध्ये तुमची कास्ट निवडायची आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये देखील तुम्हाला “होय” पर्याय निवडायचा आहे. आता पुढे डिक्लरेशन द्यायचं आहे, ज्यात तुम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करायचं आहे. व नंतर ‘सबमिट करा’ ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 7

स्टेप 7:- मित्रांनो, या नंतर तुमची ई केवायसी पूर्ण होऊन जाईल. व “तुमची ई- केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा मेसेज देखील दाखवला जाईल.

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi Step 8

तर अश्या प्रकारे तुम्ही लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.

फॉर्म भरताना एरर/error येत असेल तर ला लेख वाचा => लाडकी बहीण eKYC प्रॉब्लेम आणि त्यांचे सोल्युशन

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कशी करायची, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत व लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Tags: ladki bahin kyc kaise kare, ladki bahin yojana ekyc kaise kare, ladki bahin kyc process, ladki bahin kyc kashi karychi, ladki bahin ekyc kashi karavi, ladki bahin yojana kyc kaise kare, ladki bahin yojana maharashtra ekyc, mazi ladki bahin yojana kyc kaise kare, ladki bahin yojana ekyc error problem, ladki bahin ekyc process, ladki bahin ekyc mobile se, ladki bahin ekyc portal, ladkibahin.aharashtra.gov.in ekyc, majhi ladki