तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का? चेक करा मोबाईल मध्ये | PAN Card Active or Not How to Check?



नमस्कार मित्रानो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण आपले पॅन कार्ड चालू आहे की बंद आहे ते मोबाईल द्वारे कसे चेक करायचे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara

पॅन कार्ड (PAN card) म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर हे एक खूप महत्त्वाचं आयडेंटी प्रूफ आहे. आणि ते प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट मानले जाते. या पॅन कार्ड चा उपयोग कोणत्याही खाजगी किंवा सरकारी कामाकरता केला जातो. अगदी बँकेत अमाउंट डेबिट किंवा क्रेडिट करायची असेल, ट्रान्सफर करायची असेल तरी देखील पॅन कार्ड लागते. पण ही सर्व कामकाज व्यवस्थित कोणत्याही अडचणी शिवाय व्हायच्या असतील तर तुमचं पॅन कार्ड चालू असणं आवश्यक असते.



पण जर तुमचं पॅन कार्ड बंद झाले असेल तर ? तर काय करावे, याच उत्तर सगळ्यांनाच माहीत नसते. मित्रांनो, तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड ला लिंक न केल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे पॅन कार्ड बंद होऊ शकते. त्यासाठी आपल्याला आधी पॅन कार्ड चालू आहे का ते बघणे आवश्यक असते. मग ते मोबाईल द्वारे कसे बघायचे हे सांगण्यासाठीच आम्ही आजचा हा लेख आणला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण पॅन कार्ड चालू आहे का बंद आहे ? बंद असेल तर काय करावे, या बद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

पॅन कार्ड चालू आहे की बंद चेक करा

पॅन कार्ड चालू आहे की बंद आहे ते मोबाईल वरून कसे पहायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:-

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला इन्कम टॅक्स च्या ऑफिशियल वेबसाईट www.incometax.gov.in वर जायचे आहे.



स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्या नंतर थोडे खाली स्क्रोल करायचं आहे. तर तुम्हाला इथे Quick link असा ऑप्शन दिसेल. त्यात Verify your PAN या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 2

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल. ज्यात सर्वात पहिले तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्या नंतर तुमचे पूर्ण नाव, नंतर जन्म तारीख, व नंतर मोबाईल नंबर टाकून continue ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 3

स्टेप 4: या नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी/ OTP येईल तो दिलेल्या जागी टाकून मग Validate बटन वर क्लिक करायचे आहे.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 4

स्टेप 5: त्या नंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड चालू आहे की नाही ते दाखवले जाईल. म्हणजे तिथे तुम्हाला मेसेज येईल की your PAN is active… आणि तुमचे डिटेल्स सुद्धा पॅन कार्ड प्रमाणेच आहेत. मित्रांनो असा मेसेज आल्यावर घाबरायची काही गरज नाही. कारण तुमचे पॅन कार्ड चालू आहे.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 5

पण मित्रांनो, जर तुम्हाला your pan card is inactive म्हणजेच तुमचे पॅन कार्ड बंद पडले आहे, असा रेड कलर मध्ये मेसेज येत असेल तर मात्र तुम्हाला तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह करावे लागेल. इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे तरच तुमचे पॅन कार्ड चालू होईल. त्यासाठी

स्टेप 6: तुम्हाला वेबसाईट च्या होम पेज वर येऊन आधी लिंक आधार (Link Aadhaar) या ऑप्शन मध्ये जाऊन आधार आणि पॅन लिंक करून घ्या. त्यासाठी तुम्हाला 1000 रू चा दंड भरावा लागेल. मग लिंक करावे लागेल.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 8

स्टेप 7: तुमचे आधार व पॅन कार्ड लिंक झाले की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला परत Link aadhar status या ऑप्शन जाऊन तुमचा पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही ते चेक करू शकता.
मित्रांनो, या प्रकारे तुमचे पॅन कार्ड बंद असेल तर तुम्हाला ते आधार कार्डशी लिंक करावा लागेल.

PAN Card Chalu Ahe Ki Band Check Kara Step 7

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण तुमचे पॅन कार्ड चालू आहे की बंद आहे ते मोबाईल वरून कसे पहायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.