Tata Neu App मध्ये UPI रजिस्ट्रेशन कसे करायचे व कसे वापरायचे
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला Tata neu अँप च्या UPI सर्विस बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीत आहे की टाटा चे नवीन सुपर अँप Tata Neu आले आहे. त्या मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा किंवा सर्विसेस ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत, त्यापैकीच एक UPI सर्विस देखील आहे. चला तर मग या UPI सर्विस बद्दल अजून जाणून घेऊ या.
Tata Neu UPI म्हणजे नेमकं काय आहे
मित्रांनो, जर तुम्ही UPI पेमेंट साठी एखादे अँप शोधत असाल किंवा शॉपिंगसाठी एखादे अँप शोधत आहात तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही कारण ही सगळी कामे तुम्ही फक्त Tata Neu या एकाच अँप मधून करू शकता व Tata Neu Rewarding ने करू शकतात.
मित्रांनो, टाटा ने नवीन Tata Neu Rewarding UPI Payment अँप लाँच केले आहे. या द्वारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने UPI पेमेंट करू शकता. शिवाय या UPI पेमेंट मेथड ने तुम्ही कोणतेही ट्रांझ्याक्शन करू शकता.
How to register or create Tata neu UPI
Tata Neu App मध्ये UPI ID कसा तयार करायचा
मित्रांनो, UPI ID Create करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1: सर्वात पहिले Tata Neu च्या होम पेज वर तुम्हाला सगळ्यात खाली Tata Pay चा ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 2: क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्या वर UPI सर्विस मध्ये Register Now या बटन वर क्लिक करा.
स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे जो बँक अकाउंट शी कनेक्ट असेल. त्या नंतर Send SMS या बटन वर क्लिक करायचे आहे. व ज्या परमिशन विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत.
स्टेप 4: त्या नंतर SMS Sent होईल, व नंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होईल. व ICICI बँकेचा एक मेसेज येईल व त्या नंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होऊन जाईल.
स्टेप 5: त्या नंतर तुमचा UPI ID तयार होऊन जाईल. आता खाली Setup My UPI या बटन वर क्लिक करा. व नंतर बँक सिलेक्ट करायची आहे ज्याच्याशी तुम्हाला लिंक करायचे आहे.
स्टेप 6: आता तुम्हाला UPI पिन सेट करून मिळेल, सोबतच बँकेचा IFSC कोड व अकाउंटचा प्रकार पण सांगितले जाईल. व इथे अकाउंट चे पाहिले दोन व शेवट चे दोन अंक दाखवले जातात.
त्या नंतर तुम्हाला नेक्स्ट पेज वर क्लिक करायचे आहे. व थोड्याच वेळात प्रोसेसिंग पूर्ण होईल व Tata Pay UPI सेट होईल व तसा तुम्हांला मेसेज पण येईल. व तुमच अकाउंट UPI शी लिंक होऊन जाईल.
Tata neu UPI Features
Tata Neu UPI ची वैशिष्ट्ये
- मित्रांनो UPI सर्विसेसच्या खाली तुम्हाला स्कॅन अँड पे (Scan and Pay) चा ऑपशन मिळतो त्या द्वारे तुम्ही कोणताही QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता.
- तसेच Request money या ऑपशन द्वारे तुम्ही कोणाला पैश्यांसाठी Request पाठवू शकता.
- Send money या ऑपशन द्वारे तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता. पैसे पाठवण्यासाठी दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर किंवा UPI टाकायचा आहे. व त्यानंतर तुम्हाला UPI व्हेरिफाय करावा लागेल. जर Already व्हेरिफाय असेल तर त्या वर क्लिक करा.
त्यानंतर जेवढी अमाउंट तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे तेवढी दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायची आहे. व Pay ऑपशन वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला 4 अंकी पिन टाकायचा आहे व Ok करायचे आहे. तुमचे ट्रांझ्याक्शन सक्सेसफुल होऊन जाईल. तसा तुम्हाला SMS पण पाठवला जाईल.
यानंतर तुम्हाला Approved Request या ऑपशन द्वारे जर तुम्हाला कोणी Money साठी Request पाठवली असेल तर इथून ती Request तुम्ही Approved करू शकता.
Check Balance ऑपशन मधून तुम्ही तुमचा बँक बॅलन्स तपासू शकता.
Account Transfer या ऑपशन द्वारे तुम्ही दुसऱ्याच्या अकाउंट वर पैसे ट्रान्सफर करू शकता, त्यासाठी तुम्हाला त्याव्यक्तीचा अकाउंट नंबर, IFSC कोड आणि बँकेचे नाव माहित पाहिजे.
Self Transfer या ऑपशन मधून तुम्ही जर तुमचे दोन अकाउंट लिंक केले असतील तर तुम्ही एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता.
याशिवाय तुम्हाला कार्ड ऍड करण्याचा ऑपशन सुद्धा मिळतो. ज्या मध्ये तुम्ही कार्ड डिटेल ऍड करू शकता. व तुमचे Transaction करू शकता. तसेच कार्ड ऍड करायचे नसेल तर तुम्ही तुमचा कार्ड स्कॅन पण करू शकता.
हे सगळे फीचर्स तुम्हाला UPI सर्विस मध्ये मिळतात.
What to do if tata upi pin forgotten
यूपीआई पिन विसरल्या वर काय करायचे
मित्रांनो, टाटा Neu UPI पिन विसरल्या वर खालील प्रक्रिया करा. Tata Neu च्या होम पेज वर गेल्यावर तुम्हाला Tata Pay या ऑपशन मध्ये जायचं आहे. त्यात गेल्या वर UPI सर्विसेस मध्ये तुम्हाला तुमचे UPI डिटेल्स दिसतील. नंतर बॉक्स खाली ३ टिंम्ब दिसतील त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला खाली दोन ऑपशन्स दिसतील Change UPI pin व Reset UPI pin.
या पैकी तुम्हाला Reset pin या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
त्या नंतर तुमच्या समोर एक इंटरफेस येईल. त्यात तुमच्या ATM मधला शेवटचे सहा अंक टाकायचे आहे, त्या सोबतच कार्डची Expiry date टाकायची आहे.
आता खाली नेक्स्ट या बटन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर एक OTP डिटेक्ट होईल व खाली दिलेल्या Correct चिन्हावर क्लिक करा. व आता तुम्ही तुमचा नवीन UPI पिन बनवू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण Tata Neu app मध्ये UPI कसा क्रिएट करायचा व यूपी पिन विसरल्या वर काय करायचं ते बघितलं. आशा आहे की तुम्हाला आजचा लेख नक्कीच आवडेल.
धन्यवाद!