SBI बँक खाते बॅलन्स कसा चेक करायचा | Check SBI Bank Account Balance in Marathi

तुम्हाला तुमच्या एसबीआय बँक अकाउंट चा बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही पाच प्रकारे तुमचा बॅलन्स चेक करू शकता.

  1. SBI बॅलन्स चौकशी (इन्क्वायरी) नंबर
  2. SBI बॅलन्स चेक बाय SMS
  3. SBI एटीएम मशीन मधून
  4. SBI YONO ॲप मधून
  5. SBI नेट बँकिंग मधून

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून म्हणजे जो मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल त्या मोबाईल वरून तुम्हाला एक मेसेज टाईप करून सेंड करायचा आहे तो मेसेज पुढील प्रमाणे:-



कॅपिटल लेटर मध्ये REG असे टाईप करून तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर पुढे टाईप करायचा आहे. उदा. REG 79894××××× आणि 09223488888 या नंबर वर सेंड करायचा आहे. तुम्ही मेसेज सेंड केल्यानंतर तुमची SBI Quick सर्विस ॲक्टिव होईल व तुम्हाला मेसेज रिप्लाय पण येईल की तुमची सर्विस ऍक्टिव्हेट झाली आहे.

Register SBI Quick Service

1) SBI बॅलन्स इन्क्वायरी नंबर

तुम्हाला 09223766666 या नंबर वर फोन करायचा आहे आणि तुम्ही कॉल केल्यानंतर तुमचा फोन ऑटोमॅटिक कट होईल तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे तुमचा अकाउंट मधील बॅलन्स हा दाखवला जाईल.

Check SBI Bank Account Balance by Call in Marathi

2) SBI बॅलन्स चेक बाय SMS

09223766666 या नंबर वर एक मेसेज करायचा आहे. BAL असे टाईप करून तुम्हाला सेंड ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आणि पुन्हा तुम्हाला मेसेज द्वारे तुमचा अकाउंट बॅलन्स हा दाखवला जाईल.



Check SBI Account Balance by SMS in Marathi

3) SBI एटीएम मशीन मधून

तुम्हाला तुमच्या जवळच्या एटीएम मशीन मध्ये जायचं आहे. आणि तुमच एटीएम कार्ड हे मशीन मध्ये एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमची भाषा सिलेक्ट करून कोणतेही दोन नंबर तेथे एंटर करायचे आहे व YES ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

जसे तुम्ही YES ऑप्शनवर क्लिक करणार नंतर तुम्हाला तुमचा पिन एंटर करायचा आहे. आता तुम्हाला BALANCE INQUIRY या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. व सेविंग अकाउंट वर क्लिक करायचे आहे.

4) SBI YONO ॲप मधून

सर्वात पहिले तुम्हाला योनो एसबीआय एप्लीकेशन ऑन करायच आहे. नंतर तुम्हाला लॉगिन करून तुमचा MPIN एंटर करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर समोर तुम्हाला View Balance या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट बॅलन्स दिसेल.

Check SBI Bank Account Balance by YONO app in Marathi

5) SBI नेट बँकिंग मधून

सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर मध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला sbionline.com सर्च करायचे आहे. नंतर तुम्हाला लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर CONTINUE TO LOGIN यावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचं Username आणि Paasword एंटर करून कॅपचा एंटर करायचा आहे. नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी देण्यात येईल तो ओटीपी एंटर करून संबिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

सबमिट केल्यानंतर तुमच इंटरनेट बँकिंग हे चालू होईल. समोर तुम्हाला Click her for balance या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट बॅलन्स दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधील बॅलन्स चेक करू शकता.