VI सिमचा PUK कोड ऑनलाइन कसा काढावा ?

जर तुम्ही Vodafone/Idea सिम कार्ड वापरत असाल आणि चुकून तुमच्याकडून PUK कोड लॉक झाला असेल आणि तुम्हाला तो अनलॉक करायचा असेल तर PUK कोड अनलॉक कसा करायचा ते बघुया. सिम कार्ड PUK कोड हा दोन प्रकारे माहिती करू शकतो. कस्टमर केअर द्वारे PUK कोड काढण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअर ला कॉल करून त्यांनी विचारलेली सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला PUK कोड हा भेटू शकतो.

दुसरा पर्याय आहे मेसेज द्वारे सुद्धा तुम्हाला PUK कोड हा भेटू शकतो. मेसेज द्वारे PUK कोड काढायचा असल्यास तुम्हाला ज्या मोबाईल मध्ये VI सिम असेल तोच मोबाईल पाहिजे.



How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi

स्टेप 1: तुम्हाला मोबाइल कीपॅड वर *199# असे टाईप करून डायल करायचं आहे.

How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi Step 1

स्टेप 2: त्यानंतर 3 नंबर वर Manage Account असे ऑप्शन असेल त्यासाठी तुम्हाला 3 नंबर टाईप करून सेंड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.



How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi Step 2

स्टेप 3: नंतर तुम्हाला 6 नंबर वर PUK Number असा ऑप्शन असेल आणि तुम्हाला 6 टाईप करून सेंड ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi step 3

स्टेप 4: आता तुम्हाला ज्या मोबाईलचा PUK कोड पाहिजे आहे तो नंबर तुम्हाला एंटर करून सेंड या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi step 4

स्टेप 5: नंतर तुम्हाला जन्मतारखेचे वर्ष एंटर करायची आहे. पण त्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड रजिस्टर आहे त्याच व्यक्तीचे जन्मतारखेचे वर्ष हे तिथे एंटर करायचं आहे. आणि सेंड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi step 5

स्टेप 6: आता तुम्हाला तुमच्या सिमचा PUK कोड तुला जाईल तो PUK कोड तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला 1234 असा नवीन पासवर्ड तयार करायचा आहे.

How To Unlock VI SIM PUK Code information in Marathi step 6

अशा प्रकारे तुम्ही PUK कोड हा मेसेज द्वारे काढून तुमचा मोबाईल अनलॉक करू शकता.

हे तुमच पर्मनंट सोल्युशन नाहीये. PUK कोड कायमचा बंद करायचा असेल तर पुढीलप्रमाणे करू शकता:-

  • स्टेप 1: पहिले तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जायचं आहे.
  • स्टेप 2: नंतर तुम्हाला Security ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 3: आता तुम्हाला SIM card Lock ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 4: तुमच्या फोनमध्ये SIM card Lock हे ऑप्शन जर इनेबल असेल तर ते बंद करण्यासाठी तुम्हाला त्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला Vodafone/Idea या सिम कार्डचा डिफॉल्ट पीन 1234 हा एंटर करून OK या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

अश्या प्रकारे तुम्ही तुमचा PUK कोड हा कायमचा बंद करू शकता.