टेलिग्राम अँप कसे वापरायचे | How to use Telegram in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण टेलिग्राम अँप बद्दल जाणून घेणार आहोत. त्यात टेलिग्राम म्हणजे काय ? ते कसे वापरायचे ? टेलिग्राम मधील वेगवेगळे फीचर्स या बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही अजून ही टेलिग्राम वापरत नसाल किंवा तुम्हाला वापरता येत नसेल, तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे, व याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शेवट पर्यंत हा लेख नक्की वाचा.

मित्रांनो, आज काल प्रत्येक जण सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतो. सोशल मिडिया म्हणजे यात आपले व्हाट्सअप्प, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे अँप येतात. आणि याच अँप्स मुळे सोशल मिडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. बरेच काम हे यांच्या माध्यमातून केले जातात. तसेच नात्यां मधील दुरावा सुद्धा या व्हाट्सअप्प, फेसबुक वगैरे अँप मुळे बराच कमी झाला आहे.



सोशल मिडिया वर बरेच अँप्स आहेत त्या पैकीच एक टेलिग्राम (Telegram) अँप सुद्धा आहे. जे वापरण्यास अगदी सोपे व खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या या टेलिग्राम अँप बद्दल…

What is Telegram ?

टेलिग्राम नक्की आहे तरी काय?

मित्रांनो, टेलिग्राम हे एक असे अँप आहे ज्या द्वारे तुम्ही इतरांशी बोलू शकता किंवा चॅटिंग करू शकता, थोडक्यात जसे आपले व्हाट्सअँप आहे तसेच टेलिग्राम अँप आहे. फक्त टेलिग्राम मध्ये व्हाट्सअँप पेक्षा जास्त फीचर्स आहेत. म्हणून टेलिग्राम हे सुरक्षित व फायदेशीर असे अँप आहे.



मित्रांनो, टेलिग्राम हे 2013 साली तयार केले गेले आहे. त्यात भरपूर चॅनेल्स व ग्रुप्स असतात. तुम्ही ते ग्रुप्स किंवा चॅनेल्स तुमच्या आवडी नुसार निवडू शकता व कधीही जॉइन करू शकता. यात अनेक प्रकारचे चॅनेल्स आहेत जसे की, मूवी चॅनेल्स, एज्युकेशनल चॅनेल्स, स्पोर्ट्स चॅनेल्स, गेमिंग चॅनेल्स, शॉपिंग चॅनेल्स वगैरे… यांचे ग्रुप्स सुद्धा असतात, त्यात जॉईन झाल्या वर तुम्हाला त्यातील अपडेट्स मिळत राहतात.

How to Create a Telegram Account ?

टेलिग्राम वर अकाउंट कसे उघडायचे ?

मित्रांनो, टेलिग्राम वापरण्याआधी तुम्हाला ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड किंवा इंस्टॉल करावे लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स वाचा.

स्टेप 1: सर्वात पहिले प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला टेलिग्राम अँप इंस्टॉल करायचे आहे.

How to Create a Telegram Account Step 1

स्टेप 2: इंस्टॉल झाल्यानंतर ते अँप ओपन करायचे आहे. व Start Messaging या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.

How to Create a Telegram Account Step 2

स्टेप 3: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व टेलिग्राम तर्फे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कॉल येईल व तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होऊन जाईल.

How to Create a Telegram Account Step 3

स्टेप 4: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करायचा आहे. त्यासाठी तुमचे नाव दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचे व एक फोटो (Profile फोटो) सुद्धा टाकायचा आहे.

How to Create a Telegram Account Step 4

स्टेप 5: टेलिग्राम तर्फे तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्या allow करायच्या आहेत. आता तुमचे टेलिग्राम अकाउंट तयार झाले आहे.

How to Create a Telegram Account Step 5

मित्रांनो, टेलिग्राम चे खूप चांगले फीचर्स आहेत. तुम्ही व्हाट्सअँप वापरले असेल, त्यामध्ये आपण मोठ्या फाइल्स किंवा जास्त MB चे फाइल्स, मूवी, किंवा एखादी GB मधली फाइल डाउनलोड करू शकत नाही. किंवा कोणाला सेंड करू शकत नाही म्हणजे पाठवू शकत नाही. अशा वेळेस टेलिग्राम खूप फायदेशीर आहे. यामध्ये तुम्ही कितीही मोठी फाइल जसे की मूवी असो किंवा एखादी मोठी फाइल असो ती तुम्ही लवकर डाउनलोड करू शकता किंवा इतर कोणालाही सेंड करू शकता.

टेलिग्राम चे अजून एक फिचर म्हणजे तुम्ही टेलिग्राम मध्ये कोणतीही फाइल डाउनलोड न करता सेंड करू शकता.

Telegram Channels information

टेलिग्राम चॅनेल्स माहिती

मित्रांनो, टेलिग्राम मध्ये अनेक फीचर्स पैकी एक टेलिग्राम चॅनल्स आहे. तुम्ही स्वतःचे टेलिग्राम चॅनेल काढू शकता किंवा इतर कोणत्याही चॅनेल्सला जॉईन होऊ शकता. या चॅनेलमध्ये तुम्ही अनेक लोकांना जोडू करू शकता.

या अँप मध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चॅनल्स बघायला मिळतात ज्यांना तुम्ही डाउनलोड करू शकता.

या चॅनेल्स वर अश्या गोष्टी भेटतात ज्या इंटरनेट वर सुद्धा भेटत नाही. जसे की, एखादी मूवी तुम्ही इंटरनेट वर शोधताय पण ती सापडत नाहीये, तर अश्या परिस्थितीत ती मूवी तुम्हाला टेलिग्राम वर नक्कीच सापडेल.

टेलिग्राम वर प्रत्येक फील्डशी निगडित चॅनेल्स उपलब्ध आहेत जसे की फॅशन चॅनल, मूवी चॅनेल, स्पर्धा परीक्षांचे चॅनेल्स, पुस्तकांचे चॅनेल्स, गेमिंग चॅनेल्स, न्युज चॅनेल्स, स्पोर्ट्स चॅनेल्स, म्युझिक चे चॅनेल्स, ट्रॅव्हल चॅनेल्स, व्यावसायिक चॅनेल्स वगैरे…असे अनेक प्रकारचे चॅनेल्स टेलिग्राम वर असतात.

या चॅनेल्स चे पण दोन प्रकार असतात

  1. Private Channel (प्रायव्हेट चॅनल)
  2. Public Channel (पब्लिक चॅनल)

Private Channel हे शक्यतो पब्लिकसाठी नसतात. हे चॅनेल कोणीही जॉईन करू शकत नाही. Private चॅनेल्स मध्ये एक तर लिंक द्वारे ऍड होता येत किंवा अडमिन ऍड करू शकतो.

Public channel मध्ये कोणीही चॅनेल सर्च करून ऍड होऊ शकतं.

Telegram Groups feature Information

टेलिग्राम ग्रुप्स माहिती

मित्रांनो, टेलिग्राम ग्रुप्स हे टेलिग्राम या अँप मधले एक उत्तम फिचर आहे. कारण यात तुम्ही जास्तीत जास्त दोन लाखपर्यंत मेम्बर्स ऍड करू शकतात. तसेच ग्रुप अडमिन ग्रुप चे नियम वगैरे बदलू शकतो. तसेच इतर लोकांना सुद्धा अडमिन करू शकतो.

मित्रांनो, टेलिग्राम वर अनेक प्रकारचे ग्रुप आहेत. त्यातल्या त्यात जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ग्रुप्स चा खूप फायदा होईल. कारण जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम चे सोल्युशन इंटरनेट वर शोधायला जाल तर तुम्हाला बराच वेळ लागू शकतो, आणि जरी सोल्युशन मिळाले तर ते व्यवस्थित समजत नाही, तोच प्रॉब्लेम जर तुम्ही टेलिग्राम ग्रुप वर टाकला तर बरच मेंबर्स ऑनलाईन असल्याने तुम्हाला त्या प्रॉब्लेम चे सोल्युशन लवकरात लवकर भेटते. तसेच त्या बद्दल योग्य ते मार्गदर्शन भेटते.

त्या सोबतच एखाद्या प्रॉडक्ट चे प्रोमोशन किंवा बिझनेस प्रोमोशन सुद्धा या टेलिग्राम ग्रुप्सच्या माध्यमातून करता येते. कोणत्याही टॉपिक वर ग्रुप मध्ये डिस्कशन करून योग्य ती इन्फॉर्मेशन व नॉलेज एक्सपर्टस (experts) द्वारे दिले जाते.

Telegram Secret Chat Feature Information

टेलिग्राम सिक्रेट चॅट माहिती

मित्रांनो, सिक्रेट चॅट हे टेलिग्राम मधले एकदम बेस्ट फिचर आहे. नावा प्रमाणेच यात तुमची चॅटिंग सीक्रेट ठेवले जाते. म्हणजे तुमच्या आणि समोरच्या व्यक्ती मधील संभाषण हे फक्त तुमच्या दोघं मध्येच राहते. तसेच समोरच्या व्यक्तीशी आपला नंबर न दिसता तुम्ही चॅटिंग करू शकता. म्हणजे ज्याच्याशी तुम्ही चॅट करत आहात त्याला तुमचा नंबर दिसणार नाही व त्याचा नंबर तुम्हाला दिसणार नाही.

या फिचर ची आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे यात आपण किंवा समोरचा व्यक्ती केलेल्या चॅट चे स्क्रीन शॉट घेऊ शकत नाही. तसेच हे चॅटिंग फॉरवर्ड (forward) सुद्धा करता येत नाही कारण हे चॅट end to end encryption मध्ये होते.

या शिवाय आपण जर सीक्रेट चॅट कॅन्सल केले तर समोरचा व्यक्ती आपल्याशी चॅटिंग करू शकत नाही. कारण आपण ते चॅट संपवलेले असते. चॅट कॅन्सल हे समोरचा व्यक्ती ही करू शकतो.

Telegram Stickers Feature

टेलिग्राम स्टिकर्स

मित्रांनो, चॅटिंग करताना फक्त टेक्स्ट मेसेज करून आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे कमी शब्दात फिलिंग्स (मत मांडण्यासाठी) सांगण्यासाठी अनेक वेळा आपण इमोजी किंवा स्टिकर्स वापरतो. टेलिग्राम मध्ये सुद्धा खूप छान अशे स्टिकर्स बघायला मिळतात. कारण या स्टिकर्स चे अनेक प्रकार आहेत तसेच ते हलणारे असल्यामुळे ते खरे वाटतात व चॅटिंग करताना एक प्रकारचे मनोरंजन सुद्धा होते.

या स्टिकर्स मध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे, फुलांचे, माणसांचे, सेलेब्रिटी चे, कार्टून्स तसेच नवीन मेम्स सुद्धा असतात. आपण आपल्या आवडी प्रमाणे त्याचा योग्य त्या ठिकाणी उपयोग करू शकतो.

टेलिग्रामचे महत्त्वाचे फीचर्स

मित्रांनो, टेलिग्राम चे आणखी काही महत्त्वाचे फीचर्स आहेत त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ या.

Telegram Other Feature
  1. Contacts: मित्रांनो, कॉन्टॅक्ट मध्ये गेल्या वर तुमच्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट असतील तेवढ्यांची लिस्ट बघायला मिळेल.
  2. Calls: मित्रांनो, टेलिग्राम मध्ये तुम्हाला voice call करण्याची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे. त्या द्वारे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मधून कोणालाही कॉल करू शकता. हा कॉल इंटरनेटच्या माध्यमातून होतो.
  3. People Nearby: या ऑपशन चा उपयोग करून तुमच्या आसपास कोण लोक आहे हे तुम्हाला समजू शकते. व तुम्ही त्यांच्याशी लोकल चॅट करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचे लोकेशन ऑन करावे लागेल.
  4. Save Message: या ऑपशन मध्ये तुम्हाला तुमच्या चॅट मधले, ग्रुप मधले सेव्ह केलेले महत्त्वाचे मेसेज दिसतील. यात फक्त तुमचे मॅसेजेस नाही तर फोटो व व्हिडिओ सुद्धा दिसतात.
  5. Setting: या ऑपशन मध्ये तुम्ही तुमचे टेलिग्राम अकाउंट पूर्ण सेट करू शकतात. तसेच यात chat setting, notifications, privacy अँड security असे बरेच ऑपशन्स मिळतात.

Privacy आणि security मध्ये तुम्हाला block users चा ऑपशन मिळतो त्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करू शकता. तसेच तुमचे प्रोफाइल फोटो, लास्ट सीन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर या सगळ्यांची privacy सेटिंग करू शकता. तसेच इथे तुम्हाला passcode lock करण्याचा ऑपशन सुद्धा मिळतो. ज्या द्वारे तुम्ही privacy च्या दृष्टीने हे अँप लॉक करू शकता. त्यासाठी तुम्हाला चार अंकी code सेट करावा लागेल. आणि जर तुम्ही हा code विसरलात तर तुम्हाला हे अँप परत reinstall करावे लागेल.
मित्रांनो, या सोबतच तुम्हाला pinned messages चा ऑपशन मिळतो. या द्वारे तुम्ही एखाद्या मेसेज ला किंवा कॉन्टॅक्ट ला pinned केले तर तो मेसेज तुम्हाला स्क्रीन वर सगळ्यात टॉप ला बघायला मिळेल.

टेलिग्राम अँप वापरण्याचे फायदे

मित्रांनो, टेलिग्राम वापरण्याचे अनेक फायदे आहेत जसे की, टेलिग्राम हे एक सुरक्षित असे अँप आहे.
यात तुम्ही तुमचे संभाषण secretly ठेऊ शकता.
अन्य अँपच्या तुलनेत टेलिग्राम मध्ये मोठं मोठ्या फाइल्स म्हणजे 2 GB पर्यंतच्या फाइल्स डाउनलोड किंवा शेअर केल्या जाऊ शकतात.
या अँप मध्ये कोणत्याही प्रकारच्या adds दाखवल्या जात नाही.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज मी तुम्हाला एक फायदेशीर आणि सुरक्षित अश्या टेलिग्राम अँप बद्दल शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल. आणि हा लेख तुमच्या मित्रां सोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!