गाडीची PUC ऑनलाइन डाऊनलोड कशी करायची | How to Download PUC Certificate in Marathi
तुमचे PUC प्रमाणपत्र हरवले किंवा फाटले असेल तर काळजी करू नका. या लेखामध्ये आपण आपल्या गाडीचे डुप्लीकेट PUC प्रमाणपत्र ऑनलाइन कसे डाऊनलोड करायचे ते बघणार आहोत.
पण त्याआधी PUC म्हणजे काय ते जाणून घेऊया. PUC म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र (Vehicle Pollution Certificate) होय. आपल्याला गाडी चालवताना जसा विमा काढावा लागतो त्याचप्रमाणे वाहन चालवण्यासाठी प्रदूषण प्रमाण पत्र तयार करावे लागते. त्यामध्ये वाहन जास्तीचे प्रदूषण करत आहे का याची वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. प्रदूषण प्रमाणपत्राचा मुख्य उद्देश वाहन तपासणे आणि वातावरण बरोबर ठेवणे हा आहे. वाहनांकडून उत्सर्जित होणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन विभाग यांच्याकडून प्रत्येक वाहनांना प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आले आहे.
गाडीची PUC प्रमाणपत्राची मुदत ही साधारण एक वर्षाची असते. प्रत्येक गाडीला शासनमान्य PUC सेंटर मार्फत तपासणी करून प्रमाणपत्र काढून, ते सोबत ठेवणे आवश्यक आहे. PUC प्रमाणपत्र हे कोणत्याही पेट्रोल पंपा जवळ PUC सेंटर असते तिथे काढून दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गाडीचे प्रदूषण प्रमाणपत्र अगदी सहज डाऊनलोड करू शकता. तुमचे प्रमाणपत्र हरवले किंवा फाटले असेल तर तुम्ही ते खाली दिलेल्या लिंक वरून मिळवू शकता.
How to Download PUC Certificate in Marathi
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायच आहे.
स्टेप 2: आता तुम्हाला गुगल क्रोम वर PUC Certificate सर्च करायचं आहे.
स्टेप 3: PUC Certificate- Parivahan Sewa या वर क्लिक करायचे आहे, किंवा थेट या लिंक वर क्लिक करा -> vahan.parivahan.gov
स्टेप 4: पुढचा पेजवर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे.
स्टेप 5: नंतर तुम्हाला तुमच्या गाडीचे शेवटचे पाच अंक हे चेसी नंबर चे टाकायचे आहे. चेसी नंबर तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वर असतो.
स्टेप 6: आता तुम्हाला कॅप्चा इंटर करायचा आहे
स्टेप 7: नंतर तुम्हाला PUC Details बटन वर क्लिक करायचे आहे. क्लिक केलं तर लगेच तुम्हाला गाडीच्या PUC सर्टिफिकेट चे डिटेल्स तुमच्यासमोर येतील.
स्टेप 8: सर्वात शेवटी तुम्हाला Print बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. ते क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला Print ऑप्शन दिल जाईल परत त्यावर क्लिक करून आपले PUC प्रमाणपत्र हे डाउनलोड करायचे आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीचे PUC प्रमाणपत्र हे ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.
Tags – PUC Download in Marathi, PUC Online Download in Marathi, PUC डाऊनलोड मराठी, PUC ऑनलाइन डाऊनलोड मराठी, पीयूसी डाऊनलोड मराठी, पीयूसी ऑनलाइन डाऊनलोड मराठी, पीयूसी सर्टिफिकेट डाऊनलोड मराठी, पीयूसी सर्टिफिकेट मराठी