Credit Score कसा वाढवावा? काही खास टिप्स | How to Improve Credit Score

नमस्कार मित्रांनो, आज आपण चांगला क्रेडिट स्कोर कसा तयार करता येऊ शकतो, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. तसेच चांगला क्रेडिट स्कोर तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स पण बघणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

How to Improve Credit Score in Marathi

मित्रांनो, तुम्हाला क्रेडिट स्कोरचे महत्व तर माहीत आहेच. क्रेडिट स्कोर तुमची क्रेडिट योग्यता सिद्ध करतो. होम लोन, कार लोन, किंवा एखादी मालमत्ता खरेदीसाठी लोन करणे यांसारख्या अनेक गोष्टींसाठी तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासली जाते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांचा क्रेडिट स्कोर नाहीये किंवा खूप खराब आहे. अश्या परिस्थितीत तुम्हाला कोणतेही कर्ज घेण्यासाठी खूप धडपड करावी लागते आणि कर्ज मिळाले तर जास्त व्याजदर द्यावे लागते.



त्यामुळे विध्यार्थी, स्वयंरोजगार असणारे लोक, बिझनेस पर्सन तसेच ज्या लोकांना सॅलरी नाही अशी लोक सुद्धा खाली दिलेल्या या पद्धतींचा वापर करून त्यांचा उत्तम क्रेडिट स्कोर तयार करू शकणार आहेत. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स किंवा पद्धती सांगणार आहोत. त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम प्रकारे तयार करू शकता. त्याआधी आपण क्रेडिट स्कोर बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या…

क्रेडिट स्कोर काय आहे?

तुमचा क्रेडिट स्कोर हा शक्यतो तुमच्या आर्थिक व्यवहारांवर अवलंबून असतो. म्हणजे समजा तुम्ही बँके कडून एखाद्या कारणासाठी कर्ज घेतले आणि जर तुम्ही त्याची परतफेड वेळेत केली तर तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो. पण जर तुम्ही कर्ज परतफेड वेळेत नाही केली किंवा कर्जाचे हफ्ते थकवले तर मात्र तुमचा स्कोर कमी होत राहतो, तसेच तुम्ही याआधी कर्ज/लोन संबंधीत कधीच कोणता व्यवहार केला नसेल तर मात्र तुमचा क्रेडिट स्कोर कमी असतो. मग अश्या वेळी तुम्हाला परत कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवण्यास अडचण निर्माण होते. खराब क्रेडिट स्कोर असल्यास कोणतीही बँक तुम्हाला लोन देण्यास नकार देते आणि जर लोन दिलेच तर व्याज दर जास्त द्यावे लागते. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेतल्यावर त्याचे हफ्ते वेळेत भरणे, कर्जाची रक्कम वेळेत परतफेड करणे या गोष्टी केल्यास तुमचा क्रेडिट स्कोर चांगला तयार होऊ शकतो.

मित्रांनो, क्रेडिट स्कोर हा तीन अंकांचा असतो. 300 ते 900 पर्यंत क्रेडिट स्कोर किंवा सिबील स्कोर गणला जातो. 300 च्या आसपासचा स्कोर हा खूपच खराब क्रेडिट स्कोर मानला जातो तर 750 च्या आसपास चांगला क्रेडिट स्कोर मानला जातो. आणि 900 क्रेडिट स्कोर हा अतिशय उत्तम क्रेडिट स्कोर मानला जातो. आणि या स्कोर वर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज अगदी सहज उपलब्ध करून दिले जाते. म्हणूनच तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर चांगला कसा राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.



क्रेडिट स्कोर वाढवण्याच्या पद्धती

6 guaranteed ways to improve your CIBIL score

क्रेडिट स्कोर कसा वाढवायचा किंवा कसा तयार करायचा याच्या काही पद्धती किंवा टिप्स खाली पाहू

म्युच्युअल फंडवर कर्ज मिळवणे

मित्रांनो, म्युच्युअल फंडावर कर्ज मिळवून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता. असे अनेक लोक आहेत ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, पण त्यांच्या कडे क्रेडिट स्कोर नाही. अश्या लोकांसाठी क्रेडिट स्कोर सुधारण्याची ही तिसरी पद्धत एक चांगला पर्याय आहे.

मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या गुंतवणूकीवर तुम्ही कर्ज मिळवू शकता परंतु फक्त म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या अर्ध्या रकमेवर तुम्हाला कर्ज मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जर म्युच्युअल फंड विरुद्ध कर्ज घेत असाल तर त्याची परतफेड नियमित वेळेवर केली पाहिजे. तसेच कर्जाचा एकही पेमेंट चुकवता काम नये. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड विरुद्ध घेतलेल्या कर्जाचा पेमेंट नियमित न चुकता कराल तर तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये लवकरच सुधारणा झालेली दिसून येईल. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या पण क्रेडिट स्कोर नसलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

OLA पोस्टपेड सर्व्हिसचा वापर करून

मित्रांनो, OLA पोस्टपेड सर्व्हीसला OLA कॅब ने लाँच केले आहे. तुमचा क्रेडिट स्कोर तयार करण्याची दुसरी पद्धत म्हणजे OLA पोस्टपेड सेवेचा वापर करणे होय. या पद्धतीचा वापर करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट कार्डची गरज भासत नाही. खरतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ओला पोस्टपेड सर्व्हिस तुमचा क्रेडिट स्कोर कसा वाढवू शकते? तर मित्रांनो, मला सांगायला आवडेल की, आता तुम्ही OLA पोस्टपेड सर्व्हीसचा वापर करून तुमचा क्रेडिट स्कोर वाढवू शकता.

मित्रांनो, ओला पोस्टपेड सर्व्हीस हे एक लोन सारखेच आहे. तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये ओला पोस्टपेड एक कर्ज म्हणून दाखवले जाते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरवर त्याचा मोठा प्रभाव पडतो. कारण जेव्हा तुम्ही ओला पोस्टपेड सर्व्हीस वापरता तेव्हा Ola तुमचा डेटा ऍनालाईझ करते की जेव्हा तुम्ही ओला कॅब राइड घेता किंवा इतर सर्व्हीस घेता तेव्हा तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर करता की नाही. आणि जर तुम्ही पेमेंट चुकवले किंवा जाणूनबुजून नाही दिले तर Ola तुमचे अकाउंट रद्द करते. त्यामुळे तुम्ही जर Ola पोस्टपेड सर्व्हीसचा वापर करत असाल तर वेळेवर पेमेंट करा. कारण Ola तुमच्या या सर्व गोष्टींना ऍनालाईझ करून तुमचा डेटा SMS, Mail द्वारे गोळा करून त्यानुसार कंपनी तुम्हाला डेटा पॉईंट्स देते व तुमचा प्रोफाइल तयार करते. व त्यानुसार तुमची मर्यादा सेट केली जाते.

मित्रांनो, या पद्धती मध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्यांचा सिबील स्कोर नाही त्यांनाही ही सर्व्हीस दिली जाते. त्यामुळे OLA पोस्टपेड सर्व्हीस मध्ये जेव्हा तुम्ही न चुकता पेमेंट करता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर पाच ते सहा महिन्यात तुम्हाला वाढलेला दिसेल. पण मित्रांनो, इथे तुम्हाला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही कोणतेही पेमेंट चुकवला तर तुमच्या कडून दंड म्हणून मोठी रक्कम आकारली जाते. आणि या गोष्टीचा तुमच्या क्रेडिट स्कोर वर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे पेमेंट वेळेत भरा. व Ola पोस्टपेड सर्व्हीसच्या मदतीने तुमचा क्रेडिट स्कोर वाढवा.

गोल्ड लोन मिळवून

मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी व वाढविण्यासाठी गोल्ड लोन हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. यामध्ये कमी कागदपत्रांवर तुम्हाला लोन मिळते. जेव्हा तुम्ही सोने कर्ज घेता तेव्हा बँक किंवा NBFC तुमचे सोने तारण म्हणून वापरते. हे कर्ज सुरक्षित कर्ज म्हणून ओळखले जात असल्याने त्याचा व्याजदर कमी असू शकतो. तसेच जर तुम्ही कर्ज परतफेड करण्यास अयशस्वी झालात ते बँक तुमचे सोने विकू शकते. याशिवाय घेतलेल्या सोने कर्जाची परतफेड तुम्ही वेळेवर व समान मासिक हप्त्यामध्ये करू शकता. आणि जेव्हा तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न चुकता करता तेव्हा तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये हळूहळू सुधारणा झाल्याचे दिसून येईल.

मित्रांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर सोने कर्ज घेताना आपल्या कडे पुरेसा उत्पन्नचा स्रोत आहे का ? हा विचार करून मगच सोने कर्ज घ्यावे. याचे कारण म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाची रक्कम उशिरा भरणे किंवा डिफॉल्ट करणे यामुळे क्रेडिट स्कोर खराब किंवा कमी होउ नये. त्यामुळे तुमच्याकडे तुमचे कर्ज वेळेवर आणि लवकर परतफेड करण्याची क्षमता आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे.

कार लोन मिळवून

मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्याची व वाढविण्याची चौथी पद्धत म्हणजे कार लोन घेणे. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर वाचले आहे, तुमच्या कार लोनच्या मदतीने तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर नक्कीच सुधारू शकता.

मित्रांनो, कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. बरेचसे लोक आहेत जे कार खरेदी करताना रोखीने पेमेंट करतात. परंतु जरी तुमची रोख रक्कम भरण्याची क्षमता असली तरीही, तुम्ही किमान कार कर्जासाठी जाऊ शकता. यामुळे तुम्हाला हे सिद्ध करता येईल की तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर व चुकता करू शकता. त्यामुळे जर तुम्ही कार लोन घेत असाल तर तुम्ही कर्जाची वेळेवर व न चुकता परतफेड करत आहात याची खात्री करा. ही पद्धत तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यास व सुधारण्यास मदत करते आणि तुमची क्रेडिट योग्यता ही सिद्ध करते.

पर्सनल लोन मिळवून

मित्रांनो, इन्स्टंट पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज ही तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारण्याची व वाढवण्याची तिसरी पद्धत आहे. अनेक लोकांना असे वाटते की वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोरची आवश्यकता असते. पण असे काही नाही. तुमच्याकडे क्रेडिट स्कोर नसताना देखील तुम्ही त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. ही कर्जे इतरांच्या तुलनेत तशी थोडी महाग असतात. पण जर तुम्ही हे कर्ज घेतले आणि जर त्याची परतफेड वेळेवर व न चुकता केली तर तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये नक्कीच सुधारणा होते. तुमचा पगार ज्या बँकेत जमा होतो ती बँक तुम्हाला पर्सनल लोन लोन लवकर देऊ शकते.

P2P कर्ज घेऊन

मित्रांनो, तुमच्या कोणतेही कर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेत तुमचा क्रेडिट स्कोर हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो. तुम्हाला जर कर्ज हवे आहे आणि जर तुमचा क्रेडिट स्कोर नसेल तर मात्र तुम्हाला खूप सारे कागदपत्रे आणि फॉर्मलिटीझ ला सामोरे जावे लागते. पण या समस्येवर एक उपाय आहे तो म्हणजे पी 2 पी (P2P) कर्ज मिळवणे.

मित्रांनो, आपल्या देशात अनेक P2P प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी काही प्लॅटफॉर्म तुमचे क्रेडिट स्कोर नसताना ही तुम्हाला कर्ज मंजूर करून देतात. पण अश्या प्लॅटफॉर्म वर कर्ज देताना व्याजदर मात्र खूप जास्त आकारले जाते. शिवाय अश्या प्रकारचे कर्ज हे अल्प मुदतीचे कर्ज असतात जी बहूतेक तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जातात. त्यामुळे तुम्ही जर कधी P2P कर्ज घेतले असेल किंवा घेणार असाल तर त्याची परतफेड वेळेवर करा. असे केल्यास तुमच्या क्रेडिट स्कोर मध्ये नक्कीच वाढ होईल. अश्या प्रकारे P2P कर्ज मिळवून व त्याची योग्य वेळेत परतफेड करून तुम्ही तुमचे क्रेडिट स्कोर वाढवू शकता.

तर मित्रांनो, अश्या या काही पद्धती आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वाढवू व सुधारू शकता ते ही क्रेडिट कार्ड नसताना. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा फायदा घेऊ शकता. मित्रांनो, चांगला क्रेडिट स्कोर हा 750 व त्याच्या वर असतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर 750 कसा होईल यासाठी नेहमी प्रयत्न शील रहा. हा स्कोर तुम्ही कायम ठेवला की तुम्हाला कोणतेही कर्ज अगदी सहज मिळू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की क्रेडिट स्कोर हा काही एका दिवसात वाढत नाही. तुम्हाला तूमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर तुमच्याकडे प्रयत्न आणि थोडा संयम असणे आवश्यक आहे. आणि वेळेवर न चुकता व पूर्ण कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण क्रेडिट कार्ड नसताना देखील क्रेडिट स्कोर कसा सुधारायचा या बद्दल काही टिप्स व पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा लेख महत्व पुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवं-नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला नेहमी भेट देत रहा.
धन्यवाद.

FAQ