मुथुट फायनान्स गोल्ड लोन माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, विविध योजना | Muthoot Finance Gold Loan

नमस्कार मित्रांनो, आज आपण मुथुट फायनान्सच्या गोल्ड लोन (Gold Loan) म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण मुथुट फायनान्स (Muthoot Finance) गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते, त्याचे फायदे काय आहेत, त्याची पात्रता, व्याजदर या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

Muthoot Finance Gold Loan in Marathi

मित्रांनो, आजच्या काळात आर्थिक समस्या सोडवण्यासाठी लोकं सोने कर्जाची मदत घेताना दिसतात. तसे पहायला गेले तर आजकाल बाजारात गोल्ड लोन देणाऱ्या अनेक सरकारी व गैर सरकारी बँका उपलब्ध आहेत, ज्यांच्या द्वारे आपण गोल्ड लोन घेऊ शकतो. पण त्यातल्या त्यात सर्वोत्तम गोल्ड लोन देणारी बँक म्हणजे muthoot फायनान्स गोल्ड लोन. तुम्ही जर मुथूट फायनान्स मधून गोल्ड लोन घेणार असाल तर तो तुमच्यासाठी नक्कीच एक चांगला निर्णय ठरू शकतो. चला तर मग muthoot गोल्ड लोन बद्दल माहिती जाणून घेऊ या, त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



मुथुट फायनान्स कंपनी माहिती

मित्रांनो, मुथुट गोल्ड लोन ही एक अतिशय लोकप्रिय व भारतातील नंबर एक विश्वसनीय अशी गैर सरकारी कंपनी आहे ज्याद्वारे तुम्ही आकर्षक व्याजदरात गोल्ड लोन घेऊ शकता. Muthoot गोल्ड लोन या कंपनी चे मुख्यालय केरळ मध्ये कोची शहरात असून त्यांच्या भारतभर विविध शाखा उपलब्ध आहेत. फक्त भारतातच नाही तर परदेशात ही मुथुट गोल्ड लोनच्या शाखा आहेत.

मित्रांनो, मुथुट गोल्ड लोनच्या अनेक गोल्ड लोन योजना आहेत ज्या तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. Muthoot फायनान्स कंपनी तुम्हाला तुमच्या दागिन्यां संबंधित सुरक्षितता आणि पारदर्शकता प्रदान करते. त्यामुळे मुथुट फायनान्स मध्ये तुमच्या सोने तारण ठेवताना सोन्याच्या दागिन्यांची सुरक्षेची चिंता करावी लागत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गोल्ड लोन घ्यायचे असेल तर मुथुट गोल्ड लोनचा विचार नक्कीच केला पाहिजे.

Muthoot फायनान्स गोल्ड लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)12% पासून पुढे
लोन रक्कम मर्यादा1500 ते 5 कोटी पर्यंत
कार्यकाळ7 दिवस ते 36 महिने
विमातारण दागिन्यांवर मोफत

मुथुट फायनान्स गोल्ड लोनसाठी पात्रता निकष

Eligibility Criteria for Muthoot Finance Bank Gold loan



  • मुथुट फायनान्स गोल्ड लोन मिळवण्यासाठी सर्वात पहिले भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • मुथुट गोल्ड लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • कोणीही व्यक्ती मग ती पगारदार असो, स्वयंरोजगार करणारा असो, व्यावसायिक असो, पेन्शनधारक, किंवा गृहिणी असो कोणालाही मुथुट गोल्ड लोन मिळू शकते.
  • मुथुट फायनान्स गोल्ड लोन मध्ये तारण ठेवताना सोन्याची गुणवत्ता 18 कॅरेट ते 22 कॅरेट पर्यंत असणे आवश्यक आहे.

मुथुट फायनान्स गोल्ड लोनच्या विविध योजना (स्कीम)

Muthoot Finance Gold Loan Schemes

मित्रांनो, मुथुट फायनान्स आपल्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विविध स्कीम म्हणजेच योजना ऑफर करते. या योजनांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तर त्या कोण-कोणत्या योजना आहेत ते जाणून घेऊ या:

1. Muthoot वन परसेंट लोन

Muthoot OnePercent Loan (MOL)

मित्रांनो, ज्या व्यक्तींना किंवा ग्राहकांना कमी व्याजदरात लहान कर्ज हवे आहे अशी लोक मुथुट एक टक्के व्याजसाठी अप्लाय करू शकता. या योजनेत 12% पासून व्याजदर आकारले जाते. आणि या योजनेत तुम्ही कमीत रू 1500 ते जास्तीत जास्त रू 50 हजार पर्यंत कर्ज रक्कम पर्यंत लोन घेऊ शकता. आणि कर्ज परतफेड कालावधी हा 12 महिन्यांचा असतो. तसेच तुम्ही तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी मोफत विमा मिळतो.

2. Muthoot ग्रामीण गोल्ड लोन

Muthoot Rural Gold Loan (RGL)

मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि तुम्हाला कमी व्याजदरात लहान कर्ज हवे असेल तर तुम्ही ग्रामीण (रुलर) गोल्ड लोनसाठी अप्लाय करू शकता. या योजनेत 12% पासून व्याजदर आकारले जाते. आणि या योजनेत तुम्ही कमीत रू 1500 ते जास्तीत जास्त रू 5 कोटी पर्यंत कर्ज रक्कम पर्यंत लोन घेऊ शकता. आणि कर्ज परतफेड कालावधी हा 12 महिन्यांचा असतो.

3. Muthoot अल्टीमेट लोन (MUL)

Muthoot Ultimate Loan (MUL)

मित्रांनो, ज्या ग्राहकांना कर्जाची रक्कम जास्त हवी आहे, आणि वेळेवर व्याज भरण्यावर सूट हवी आहे, असे लोक मुथूट अल्टीमेट (Altimate) लोन घेऊ शकता. या लोन वर 22% प्रति महिना इतका व्याजदर आकारला जातो. तसेच या लोनसाठी किमान कर्जाची रक्कम 1500 रुपये असून कर्जाच्या कमाल रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही. आणि कर्ज परतफेड कालावधी हा 12 महिन्यांचा असतो. त्याचप्रमाणे या योजनेत तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर मोफत विमा सुद्धा उपलब्ध आहे.

4. Muthoot डिलाइट योजना

Muthoot Delight Loan (MDL)

ज्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात जास्त रक्कम हवी आहे असे लोक आकर्षक व्याजदरात या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला कर्जाची रक्कम कमीत कमी 50 हजार व जास्तीत जास्त 5 करोड पर्यंत मिळत असून कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 12 महिन्यांचा कालावधी दिला जातो. तसेच या योजनेमध्ये हि तारण दागिन्यांवर मोफत विमा मिळतो.

5. Muthoot हाय व्हॅल्यू लोन प्लस (MHP)

Muthoot Highvalue Plus Loan (MHP)

मित्रांनो, ज्या लोकांना कमी दराने गोल्ड लोन हवे आहे जसे की, व्यापारी, प्रॉपर्टी डीलर्स, बिल्डर्स, दुकानदार अशी लोक मुथूट हाय व्हॅल्यू लोन प्लस घेऊ शकतात. या योजनेत व्याजदर 14% प्रति महिना पासून आकारला जातो. तसेच या योजने अंतर्गत तुम्ही कमीत कमी 2 लाख तर जास्तीत जास्त 5 करोड पर्यंत लोन घेऊ शकता. आणि कर्ज परतफेड कालावधी हा 12 महिन्यांचा असतो. या हि योजनेमध्ये तारण दागिन्यांवर मोफत विमा मिळतो.

6. मुथूट बिग बिझनेस गोल्ड लोन

Muthoot Big Business Loan

तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर पैशाची अडचण भासत असेल तर तुम्ही मुथूट फायनान्सचे बिझनेस गोल्ड लोन घेऊ शकता. मुथूट बिझनेस लोनच्या विविध योजना खाली दिलेले आहेत.

  • मुथूट बिग बिझनेस गोल्ड लोन डायमंड (MBD) – मित्रांनो, ता योजने द्वारे मोठया व्यवसायासाठी तुम्ही लोन घेऊ शकता. यात कमीत कमी 25 लाख ते जास्तीत जास्त 50 लाख कर्ज रक्कम मिळू शकते. यात बेस रेट (Base rate) हा 24% असतो.
  • मुथूट बिग बिझनेस गोल्ड लोन सिल्वर (MBS) – मित्रांनो, या स्कीम मध्ये ही तुम्हाला base rate 24 % आकारला जातो तसेच यात कर्जाची किमान रक्कम ही रू 5 लाख असून कमाल रक्कम ही रू 9,99,990 पर्यंत असू शकते.
  • मुथूट बिग बिझनेस गोल्ड लोन प्लॅटिनम (MBP) – मित्रांनो, यात ही बेस रेट 24%असतो व कर्जाची किमान रक्कम 10 लाख असून कमाल रक्कम 24,99,990 इतकी असू शकते.
  • मुथूट बिग बिझनेस गोल्ड लोन एलिट (MBE) – मित्रांनो, यात तुम्हाला 24% बेस रेट मिळू शकतो व कर्जाची कमीत कमी रू 50 लाख रक्कम मिळू शकते तर जास्तीत जास्त रू 5 करोड पर्यंत कर्ज रक्कम मिळू शकते.

विविध गोल्ड लोन योजनांची व्याजदर रचना

तुम्ही खाली दिलेल्या टेबल मध्ये विविध गोल्ड लोन योजनांची व्याजदर रचना पाहू शकता. (Muthoot Finance Interest rate structure of various gold loan schemes)

Muthoot Finance Interest rate structure of various gold loan schemes

Muthoot गोल्ड लोनची वैशिष्ट्ये काय आहेत

  • मित्रांनो, मुथुट फायनान्स खूप कमी व्याजदरात गोल्ड लोन देते.
  • जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर मुथूट फायनान्स मध्ये तुम्हाला एक तासाच्या आत गोल्ड लोन मिळू शकते.
  • मुथुट फायनान्सकडे लॉकरची सुविधा चांगली असल्याने तुमचे सोन्याचे दागिने संपूर्ण सुरक्षित राहते.
  • Muthoot फायनान्स गोल्ड लोनची रक्कम तुम्ही कोणत्याही कारणांसाठी वापरू शकता.
  • Muthoot फायनान्स गोल्ड लोन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची गरज असते.
  • शिवाय muthoot फायनान्स गोल्ड लोन ची प्रोसेसिंग फी सुद्धा खूप कमी म्हणजे नगण्य आहे.

मुथुट फायनान्स गोल्ड लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती

Documents Required for Muthoot Finance Gold Loan

मित्रांनो, मुथुट गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागतो. तसेच पत्त्याचा पुरावा ही द्यावा लागतो, त्यासाठी तुम्ही लाइट बिल (तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नसलेले) , आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे काहीही बँकेसमोर सादर करू शकता. इथे तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा देण्याची आवश्यकता नसते.

मुथुट फायनान्स गोल्ड लोन चार्जेस/शुल्क

Muthoot Finance Gold Loan Fees & Charges

कर्जाच्या रकमेवर सेवा शुल्क
(Service charges on loan amount)
0.25% ते 1%
(योजनेच्या प्रकार वर अवलंबून)
सुरक्षा चार्जेस
(Security charges)
कर्जाच्या रकमेच्या 0.15%
कमीत कमी 50 रू जास्तीत जास्त 600 रु
दस्तऐवजीकरण शुल्क
(Documentation fee)
1 कोटी पेक्षा कमी कर्ज रकमेवर 2500 रू
1 कोटी आणि त्यावरील कर्ज रकमेसाठी 5000 रु
मुद्रांक शुल्क
(Stamp Duty)
राज्याच्या लागू दरानुसार
नोटीस चार्जेस
(Notice charges)
तीन नोटीस पर्यंत रू 30 प्रति सामान्य सूचना
आणि तीन सुचनेपेक्षा जास्त 100 रु
आणि लिलाव सूचना शुल्क 120 रु

मुथुट फायनान्स गोल्ड लोन चे व्याजदर

Muthoot Finance Gold Loan Interest Rate

मित्रांनो, मुथुट फायनान्स गोल्ड लोन चे व्याजदर हे 12% पासून सुरू होते. तसेच मुथुट गोल्ड लोनची कमीत कमी रक्कम 1500 रुपये असून जास्तीत जास्त तुम्ही 1 करोड रक्कम लोन वर घेऊ शकता. कर्जाचा कालावधी:- मित्रांनो, मुथुट फायनान्स गोल्ड लोन परतफेडचा कालावधी हा 7 दिवस ते 36 महिने इतका दिला जातो.

Muthoot फायनान्स गोल्ड लोन चे फायदे

  • जर तुमचा सिबील स्कोर कमी किंवा खराब असेल तरीही तुम्हाला मुथुट गोल्ड लोन मिळू शकते.
  • मुथुट फायनान्स गोल्ड लोन मध्ये तुम्हाला प्री पेमेंट ची सुविधा पण मिळते.
  • मुथुट गोल्ड लोनसाठी जास्त कागदपत्रे लागत नाहीत.
  • मुथुट फायनान्स गोल्ड लोन आपल्या ग्राहकांना त्यांच्या सोन्याच्या वस्तूंबद्दल सुरक्षितता आणि पारदर्शकता देते.
  • मुथुट फायनान्स गोल्ड लोनसाठी तुम्हाला कमीत कमी रू 1500 ते रू 1 करोड पर्यंत कर्ज रक्कम मिळू शकते.

FAQ

मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घेण्यासाठी बाह्य हमीदाराची गरज असते का?

नाही. मित्रांनो, मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बाह्य हमीदाराची गरज पडत नाही.

मुथूट फायनान्स गोल्ड लोन मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचे सोन्याचे दागिने तारण म्हणून ठेवू शकतो?

मित्रांनो, मुथूट फायनान्स गोल्ड लोन मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे सोन्याचे दागिने गहाण ठेवू शकता. जसे की अंगठी, नेकलेस, कानातले, पोलकी सेट, बांगड्या, हार, घड्याळे, सोन्याची नाणी इत्यादी.

गोल्ड लोनची आंशिक स्वरूपात परतफेड करू शकतो का?

होय. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कर्जाची आंशिक रुपात मुद्दल व व्याज सह परतफेड करू शकता, तसेच तुम्ही मुथूट फायनान्सच्या ऑफिशियल वेबसाईट वरून ही ऑनलाईन पेमेंट करू शकता.

मुथूट फायनान्सचा प्रति ग्रॅम गोल्ड लोन दर काय आहे?

मित्रांनो, प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर, जर दागिने 22 कॅरेट चे असतील तर 5149 नुसार लोन मिळेल. प्रति ग्रॅम किती गोल्ड लोन मिळेल हे तुमच्या सोन्याच्या दागिन्याची गुणवत्ता, सोन्याचा बाजार भाव किती आहे या गोष्टींवर अवलंबून असते.

मुथूट फायनान्स कडून कोण गोल्ड लोन घेऊ शकते?

मित्रांनो, मुथूट फायनान्स कडून 18 वर्षे पूर्ण असलेले कोणीही भारताचे नागरिक गोल्ड लोन घेऊ शकतात. त्यासाठी सोबत सोन्याचे दागिने व केवायसी पूर्ण असलेली कागदपत्रे प्रदान करून गोल्ड लोन घेऊ शकता.

मुथूट फायनान्स गोल्ड लोनसाठी अर्ज कसा करावा?

मित्रांनो, मुथूट गोल्ड लोनसाठी अर्ज करताना तुम्ही जवळच्या मुथूट फायनान्सच्या शाखेत जाऊन गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. किंवा ऑनलाईन ही अप्लाय करू शकता. व मुथूट फायनान्सच्या अधिकाऱ्यांना तुमच्या घरी भेट देण्याची विनंती देखील करू शकता.

मुथूट गोल्ड लोनची परतफेड कशी करता येईल?

मित्रांनो, मुथूट गोल्ड लोन रक्कम परतफेड करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट तुमच्या जवळच्या मुथूट फायनान्स शाखेत जाऊन चेक किंवा कॅश ने पेमेंट करू शकता किंवा कोणतेही ऑनलाईन पेमेंट किंवा अँपद्वारे पेमेंट चा ऑप्शन वापरू शकता.

मुथूट फायनान्स गोल्ड लोन ईमआय कॅल्क्युलेटर वापर कसा करायचा?

मित्रांनो, ईमआय कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही तुमच्या गोल्ड लोनची ईमआय गणना करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या लोनची रक्कम, व्याजदर व कर्ज कालावधी टाकावा लागेल व थोड्याच वेळात ईमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला ईमआय कॅल्क्युलेट करून देईल. फक्त यासाठी तुम्हाला मुथूट फायनान्सच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचे आहे व ईमआय कॅल्क्युलेटरचा वापर करायचा आहे

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मुथूट फायनान्स गोल्ड लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरील दिलेली सर्व माहिती वेळेनुसार बदलू शकते. त्यामुळे लोन घेण्याआधी बँकेत चौकशी करून खात्री करून घेणे फायद्याचे ठरेल. तसेच आमचा हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद