HDFC गोल्ड लोन संपूर्ण माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, विविध योजना | HDFC Gold Loan

नमस्कार मित्रांनो, आज आपण HDFC बँकेच्या गोल्ड लोन (Gold लोन) म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण एचडीएफसी (HDFC) गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते, त्याचे फायदे काय आहेत, त्याची पात्रता, व्याजदर अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

HDFC Gold Loan in Marathi

मित्रांनो, अडीअडचणीच्या वेळी आपल्याला जेव्हा पैश्यांची गरज पडते तेव्हा आपण इकडून तिकडून उधारीवर पैसे घेतो. पण असे करण्यापेक्षा तुम्ही तुमचे सोने बँकेकडे तारण ठेवून ठराविक कालावधीसाठी कर्ज म्हणून काही रक्कम घेऊ शकता व तुमची अडचण किंवा गरज भागवू शकता. मित्रांनो, गोल्ड लोन वर अगदी सोप्या व जलद पद्धतीने पैसे उधार देणारी अशीच एक बँक म्हणजे HDFC बँक. एचडीएफसी गोल्ड लोन मध्ये अगदी काही मिनिटांत तुम्ही गोल्ड लोन मिळवू शकता. जर तुम्ही HDFC चे ग्राहक नसाल तरीही तुम्ही एचडीएफसी मधून गोल्ड लोन घेऊ शकता. चला तर मग एचडीएफसी बँक गोल्ड लोन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.



HDFC बँक गोल्ड लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)8.50% पासून पुढे
लोन रक्कम मर्यादा25,000 ते 50 लाख पर्यंत
कार्यकाळ3 महिने – 24 महिने
प्रोसेस चार्जेस1% कर्ज रक्कमेच्या + GST

HDFC गोल्ड लोनसाठी पात्रता निकष

Eligibility Criteria for HDFC Bank Gold loan

आता HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी पात्रता निकष कोणते आहेत ते जाणून घेऊ या:-

  • मित्रांनो HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • तसेच HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी अर्जदारकडे उत्पन्नाचा निश्चित असा पुरेसा स्रोत असणे आवश्यक आहे.

HDFC गोल्ड लोनच्या विविध योजना

HDFC Bank Gold Loan Schemes



मित्रांनो, तुम्ही जर HDFC मधून गोल्ड लोन घेणार असाल तर HDFC बँकेने तुमच्यासाठी काही खास योजना आणल्या आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त लाभ मिळवू शकता. त्या कोणत्या योजना आहेत ते जाणून घेऊ या.

ओव्हरड्राफ्ट स्कीम / Overdraft Scheme

मित्रांनो, HDFC बँकेची गोल्ड लोनसाठी ही एक उत्तम योजना आहे. या योजने अंतर्गत तुम्ही कर्जाची अतिरिक्त रक्कम जमा करू शकता व जेवढी रक्कम वापराल तेवढ्याच रकमेवर तुम्हाला व्याजदर द्यावे लागते.

बुलेट रिपेमेंट / Bullet Repayment

मित्रांनो, एचडीएफसी च्या बुलेट रिपेमेंट या योजने द्वारे तुम्ही मासिक ईमआय म्हणून व्याजदर भरून कर्जाच्या शेवटी मुद्दल परतफेड करू शकता. आणि यासाठी तुम्हाला सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो.

ईमआय पर्याय / EMI

या योजने अंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जाची मासिक हफत्यांमध्ये परतफेड करू शकता. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एक विशिष्ट तारखेला बँके कडून ईमआय आकारला जातो. आणि या ईमआय मध्ये तुमची मुद्दल आणि व्याज अश्या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात.

शेतकऱ्यांसाठी सुवर्ण कर्ज योजना / Agriculture Gold Loan

मित्रांनो, HDFC बँकेच्या या योजने द्वारे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी गोल्ड लोन दिले जाते. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी काही विशेष ऑफर्स देखील दिल्या जातात. जेणे करून त्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुरावा म्हणून जमिनीचे कागदपत्रे सादर करावी लागतात.

HDFC गोल्ड लोनची वैशिष्ट्ये

सर्वात पहिले HDFC गोल्ड लोनची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊ या:-

  • मित्रांनो, HDFC गोल्ड लोन हे एक सुरक्षित गोल्ड लोन आहे जिथे तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याबदल्यात कर्जावर पैसे घेऊ शकता.
  • HDFC गोल्ड लोन चे व्याजदर हे दरसाल 7.60% पासून सुरू होते.
  • तसेच सोने तारण कर्जाची रक्कम ही तुमच्या सोन्याच्या बाजार मूल्यानुसार कमीत कमी रू 25,000 ते जास्तीत जास्त 80% कर्ज म्हणून घेऊ शकता.
  • याशिवाय HDFC बँक जवळ जवळ 500 ग्रॅम चे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यास परवानगी देते.
  • एचडीएफसी बँकेत सोन्याचे दागिने गहाण ठेवताना त्या दागिन्यांची शुद्धता 18 कॅरेट पासून ते 22 कॅरेट पर्यंत असणे गरजेचे असते.
  • एचडीएफसी बँक गोल्ड लोन परतफेडचा कालावधी हा 3 महिने – 2 वर्षांचा असतो.
  • आणि HDFC बँके कडून गोल्ड लोन ची प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% इतकी आकारली जाते.

HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात

Documents Required for HDFC Gold Loan

  • मित्रांनो, HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी तुमच्या कडे काही ठराविक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यात सर्वात पहिले तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे. ज्यात पुरावा म्हणून तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड देऊ शकतात.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. इथे तुम्ही लाइट बिल, रेशन कार्ड वगैरे देऊ शकतात.
  • HDFC गोल्ड लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट साईझ चा एक फोटो , आणि योग्य प्रकारे भरलेला व तुमची सही असलेला अर्ज.
  • तुम्ही कृषी संबंधित कार्यासाठी गोल्ड लोन घेत असाल तर तुम्हाला बँकेकडे जमिनीची कागदपत्रे पुरावा म्हणून दाखवावी लागतील.

HDFC बँक गोल्ड लोन व्याजदर

HDFC Gold Loan Interest Rate

मित्रांनो, HDFC गोल्ड लोन चे व्याजदर हे कर्जाची रक्कम, कालावधी व अर्जदाराच्या प्रोफाइल नुसार बदलत असतात. तरीही HDFC गोल्ड लोन चे व्याजदर हे दरसाल 7.60% ते 16.81% पर्यंत आकारले जाऊ शकते. खरंतर व्याजदर ठरवताना तुमच्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता म्हणजेच गुणवत्ता किती आहे याचा ही विचार केला जातो. याशिवाय HDFC बँक महिलांसाठी विशेष व्याजदर देते. थोडक्यात सांगायचे झाले तर, HDFC बँके द्वारे आकारले जाणारे व्याज हे सरासरी 10.60% इतके आहे.

HDFC बँक गोल्ड लोन चार्जेस/ शुल्क

HDFC Bank Gold Loan Fees & Charges

लोन प्रोसेस चार्जेस
(Loan processing fee)
1% + GST
फोरक्लोजर/पार्ट पेमेंट चार्जेस
(Foreclosure/Part payment Charges)
2% (+ GST) – 3 महिन्यांत बंद केले
0% – 3 महिन्या नंतर बंद केल्यास
मूल्यांकन शुल्क
(Assessment charges)
रू 1.5 लाख पर्यंतच्या कर्जासाठी 250 रुपये
रू 1.5 लाख पेक्षा जास्त कर्जासाठी 500 रुपये
उशिरा पेमेंट चार्जेस
(Late payment charges)
लागू व्याजदर पेक्षा दरसाल प्रमाणे 2% जास्त
नुतनीकरण प्रक्रिया शुल्क
(Renewal processing fee)
रू 350 + GST

HDFC गोल्ड लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

मित्रांनो, HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोन्ही प्रक्रियांचा वापर करू शकता.

  • ऑनलाईन प्रक्रिया:- HDFC गोल्ड लोनसाठी ऑनलाईन आवेदन करण्यासाठी तुम्हला HDFC च्या अधिकृत वेबसाईट www.hdfcbank.com वर जावे लागेल. तिथे दिलेला अर्ज योग्य रित्या भरून द्यावा लागेल व अर्ज भरून दिल्या नंतर बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क करून आवश्यक ते कागदपत्रे तपासून सोन्याच्या दागिन्यांची पडताळणी करेल. व नंतरच बँक तुम्हाला गोल्ड लोन मंजूर करेल.
  • ऑफलाईन प्रक्रिया:- मित्रांनो, HDFC गोल्ड लोनच्या ऑफलाईन प्रक्रियेत तुम्हाला जवळच्या HDFC शाखेत जाऊन गोल्ड लोन संदर्भात अर्ज घेऊ तो योग्य रित्या भरून द्यावा लागेल. व आवश्यक ती कागदपत्रे जोडून तुमचे सोन्याचे दागिने पडताळणीसाठी बँकेला द्यावे लागतील. दागिने व इतर गोष्टी पडताळून झाल्यानंतरच बँक तुम्हाला लोन मंजूर करेल.

HDFC गोल्ड लोन चे फायदे

  • मित्रांनो, HDFC बँकेची गोल्ड लोन सुविधा ही एक सोपी व जलद प्रक्रिया आहे. म्हणजे अगदी काहीं मिनिटांतच तुम्हाला लोन मिळून जाते.
  • HDFC गोल्ड लोनसाठी कमीत कमी कागदपत्रांची गरज पडते.
  • HDFC बँकेची लोन देण्याची प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आहे. ज्यात कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही.
  • तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने HDFC बँक एक उत्तम पर्याय आहे.
  • तसेच कृषी कामांसाठी बँक काही खास ऑफर देते ज्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळतो.

HDFC गोल्ड लोन ची परतफेड कशी करावी

मित्रांनो, HDFC गोल्ड लोन परतफेड करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI अँप जसे पेटीएम, जी-पे द्वारे करू शकता किंवा ऑफलाईन मोड ही वापरू शकता.

HDFC गोल्ड लोन ईमआय कॅल्क्युलेटर

मित्रांनो, जर तुम्ही HDFC बँकेतून गोल्ड लोन घेतले तर बँक तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देते. या द्वारे तुम्ही ऑनलाईन कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या कर्जाचा पूर्ण तपशील पाहू शकता. यात तुम्हाला तुमच्या कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कर्जाचा कालावधी टाकून तुम्ही तुमचा ईमआय अगदी सोप्या पद्धतीने व सहज काढू शकता. ही प्रोसेस तुम्ही घर बसल्या HDFC च्या अधिकृत वेबसाईट वरून ही करू शकता.

FAQ

10 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर किती लोन मिळू शकेल?

मित्रांनो, 10 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर , जर दागिने 24 कॅरेट चे असतील तर 3421 प्रति ग्रॅम नुसार लोन मिळेल. मित्रांनो, इथे तुमचे सोन्याचे दागिने किती कॅरेट चे आहेत व सोन्याचा बाजार भाव किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मग कर्जाची रक्कम दिली जाते.

HDFC गोल्ड लोन घेण्यासाठी किती वेळ लागतो?

मित्रांनो, HDFC गोल्ड लोन ची पूर्ण प्रक्रिया एक तासाच्या आत होते.

HDFC गोल्ड लोन परतफेड कालावधी किती असतो?

मित्रांनो, HDFC गोल्ड लोन परतफेड करण्याचा कालावधी हा 3 ते 24 महिन्या पर्यंत असू शकतो.

HDFC बँकेतून गोल्ड लोन साठी जास्तीत जास्त किती रक्कम मिळू शकते?

मित्रांनो, HDFC बँकेतून गोल्ड लोन साठी तुम्हाला जास्तीत जास्त 1 करोड रुपये इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण HDFC गोल्ड लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरील दिलेली सर्व माहिती वेळेनुसार बदलू शकते. त्यामुळे लोन घेण्याआधी बँकेत चौकशी करून खात्री करून घेणे फायद्याचे ठरेल. तसेच आमचा हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद