सॉवरेन गोल्ड बॉण्ड माहिती – म्हणजे काय, गुंतवणूक कशी करायची, फायदे आणि तोटे, | Sovereign Gold Bond
नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम म्हणजे काय ? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत. तसेच या बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे? याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, सोन ही आपल्या देशात सर्वात लोकप्रिय अशी गोष्ट आहे. काही लोक सोन्याला दागिन्यांच्या रुपात खरेदी करणे पसंत करतात. आत्ता सोनं स्वस्त आहे तर घेऊन ठेवावे, असा अनेक लोक विचार करतात. तर काही लोक सोन्यात एक इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक करतात जेणेकरून त्याचे रिटर्न्स मिळतील. असे जरी असले तरी आपल्याकडे सोने दागिन्यांच्या रुपात खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही सोने दागिन्यांच्या रुपात खरेदी करतात तेव्हा त्याला काही रिस्क ही असतात. जसे की जेव्हा आपण गोल्ड ज्वेलरी खरेदी करतो तेव्हा जास्त अमाउंट ही आपल्याला त्याच्या मेकिंग चार्जेस वर खर्च करावी लागते. तसेच असे सोन्याचे दागिने घरात ठेवणे म्हणजे थोडी रिस्कच असते. शिवाय बँकेत लॉकर मध्ये ठेवायचे म्हटले तरी त्याचे वेगळे पैसे द्यावे लागते.
तसेच सोन्याचे दागिने घेताना त्याची GST पण भरावा लागतो, याशिवाय आपण जे दागिने घेतो त्यात पण प्युअर सोने नसते. मग अश्या परिस्थितीत सोने दागिन्यांच्या रुपात खरेदी करणे थोडे रिस्की काम असते. पण आता तुम्ही सोन्याच्या बाबतीतील हे सर्व प्रॉब्लेम अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. त्यासाठी तुम्हाला सॉवरेन गोल्ड बॉण्ड Sovereign Gold Bond स्कीम बद्दल माहिती असायला हवी. या सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता. तसेच इथे कुठल्याही प्रकारची रिस्क ही नसते, कारण ही स्कीम RBI द्वारे इश्यू केली जाते व याला भारत सरकार द्वारे ग्यारंटी पण दिली जाते. त्यामुळे सोन्यात इन्व्हेस्ट करण्याचा हा एक बेस्ट मार्ग ठरू शकतो. तुम्हाला ही या सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम बद्दल जाणून घ्यायचे आहे का? हो? तर मग आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या लेखात आम्ही तुम्हाला सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम म्हणजे काय, त्यात इन्व्हेस्ट कशी करायची, त्याचे फायदे काय आहेत अश्या सर्व बाबींबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग सॉवरेन गोल्ड बॉण्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय ते आधी जाणून घेऊ या.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम ( Sovereign Gold Bond ) म्हणजे काय?
मित्रांनो, सॉवरेन गोल्ड बॉण्ड म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणे. ही योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार द्वारे नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. यात सरकार द्वारे सेक्युरिटी मिळते. या सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट युनिट ही 1 ग्रॅम गोल्ड इतकी आहे म्हणजेच तुम्ही कमीत कमी 1 ग्रॅम सोन्यापासून तुमची इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. इथे हे सोने 24 कॅरेट चे असते. आणि त्याची किंमत ही मार्केट प्रमाणेच असते. समजा तुम्ही आजच्या किंमतीत एक युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोने घेतले तर काही वर्षांनी वर्षांनी त्याची किंमत ही वाढलेली दिसेल, म्हणजेच इथे तुमचा नफा नक्कीच होईल. या शिवाय तुमच्या इन्व्हेस्टमेंट वर तुम्हाला 2.5% वार्षिक इंटरेस्ट ही मिळतो.
मित्रांनो, गोल्ड बॉण्ड जारी करण्याची घोषणा सरकार कडून दर वर्षी 2 किंवा 3 महिन्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली जाते. तेव्हा गुंतवणूकदार या योजनांचे सदस्यत्व घेऊ शकतात. या सॉवरेन गोल्ड बॉण्ड चा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असतो, पण गुंतवणूकदार 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकतो.
नोट: जसे शेअर मार्केट मध्ये तुम्ही घेलेले शेअर तुम्हाला डिजिटल स्वरूपात दिसतात तसेच हे गोल्ड बॉण्ड तुम्हाला डिजिटल स्वरूपात किंवा पेपर सर्टिफिकेट द्वारा तुम्ही बघू आणि जतन करू शकता.
यासोबतच सॉवरेन गोल्ड बॉण्ड ची आणखी ही बरेच फायदे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड चे फायदे:-
- मित्रांनो या सॉवरेन गोल्ड बॉण्ड चा महत्वाचा फायदा म्हणजे फिझिकल गोल्ड प्रमाणे यात तुम्हाला डिझाइन व मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाही.
- सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये स्टोरेज ची रिस्क नसते. तुम्ही केलेली गुंतवणूक सुरक्षित असते.
- यात मिळणारे गोल्ड हे 24 कॅरेट चे असते. म्हणजेच इथे तुम्हाला एकदम प्युअर सोने दिले जाते.
- भारत सरकारची सुरक्षा असल्याने या योजनेत सेफ्टी रिस्क नसते.
- सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे तुम्हाला जीएसटी द्यावी लागत नाही.
- तसेच या योजनेत capital gain tax द्यावा लागत नाही. Capital gain tax म्हणजे जर तुम्ही इतर कोणतीही इन्व्हेस्टमेंट 3 वर्षाच्या आत विकली तर तुम्हाला short term capital gain टॅक्स पे करावा लागतो. आणि जर तीन वर्षे नंतर इन्व्हेस्टमेंट विकली तर तुम्हाला long term capital gain टॅक्स लागतो. त्यामुळे इतर इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला capital gain टॅक्स भरावा लागतो. पण सॉवरेन गोल्ड बॉण्ड तुम्ही 5 वर्षानंतर विकला तर या मध्ये तुम्हाला हा capital gain टॅक्स पे करावा लागत नाही. हा या स्कीम चा फायदा आहे. (सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये इतर कुठला टॅक्स नसला तर तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक इंटरेस्ट वर टॅक्स लागू आहे. )
- सॉवरेन गोल्ड बॉण्ड चा अजून एक फायदा म्हणजे फिझिकल गोल्ड प्रमाणे तुम्ही या योजनेत बॉण्ड अगेंस्ट लोन घेऊ शकता.
- सॉवरेन गोल्ड बॉण्डला तुम्ही Demat Form मध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये ही ठेवू शकता. जसे की फिझिकल सर्टिफिकेट ची हरवण्याची शक्यता असते. तसे डिमॅट फॉर्म मध्ये होत नाही. त्यामुळे सॉवरेन गोल्ड बॉण्ड ला तुम्ही डिमॅट फॉर्म मध्ये ठेवू शकता.
- याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्ही या बॉण्ड ला शेअर सारखे स्टॉक मार्केट मध्ये ट्रेड करू शकता.
- या स्कीमच्या अंतर्गत सोन्यात इन्व्हेस्ट केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड चे तोटे
- याचा मॅच्युरिटी कालावधी जास्त म्हणजे 8 वर्षांचा आहे.
- जर 5 वर्षांच्या आधी तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्ड ची केलेली गुंतवणूक विकली तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागतो.
- इतर स्कीम प्रमाणे यात SIP करण्याचा ऑप्शन नसतो.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे पर्याय
मित्रांनो, सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये तुम्ही चार पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकता.
- बँके द्वारे
- पोस्ट ऑफिस द्वारे
- SHCIL द्वारे (stock holding cooperation India limited)
- स्टॉक ब्रोकर द्वारे
मित्रांनो, यापैकी बँक आणि पोस्ट ऑफिस द्वारे जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर ही एक ऑफलाईन प्रोसेस असेल. यात पूर्ण प्रोसेस व्हायला खूप वेळ जातो. कारण यात तुम्हाला आधी फॉर्म भरावा लागेल नंतर तुमची KYC पूर्ण करावी लागेल, तसेच मिळालेले इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट ही फिझिकल फॉर्म मध्ये असेल जे सांभाळणे थोडे अवघड जाते आणि जर तुम्हाला ते 5 वर्षां आधी विकायचे असेल तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यापेक्षा जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट डिमॅट फॉर्म मध्ये कराल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट सांभाळण्याची ही गरज पडणार नाही आणि ते स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड करता येते त्यामुळे तुम्ही ते कधीही विकू शकता. तसेच तुमचे जर आधीच डिमॅट अकाउंट असेल तर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट ही एखादया स्टॉक ब्रोकर कडूनच करून घ्या.
आता, सॉवरेन गोल्ड बॉण्ड इन्व्हेस्टमेंट zerodha द्वारे कशी करायची ते आपण जाणून घेऊ या. या पद्धतीमध्ये सरकार जेव्हा बॉण्ड जरी करण्याची घोषणा करते तेव्हा तुम्हाला गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट करता येईल. आणि जर तुम्हाला या तारखा सोडून बॉण्ड विकत घ्यायचे असतील तर तर तुम्हाला ते सेकंडरी मार्केट मधून घ्यावे लागतील याची माहिती खाली आहे.
Zerodha वरून गोल्ड बॉण्ड इन्व्हेस्टमेंट कशी करायची
आता, सॉवरेन गोल्ड बॉण्ड इन्व्हेस्टमेंट zerodha द्वारे कशी करायची ते आपण जाणून घेऊ या. या पद्धतीमध्ये सरकार जेव्हा बॉण्ड जारी करण्याची घोषणा करते तेव्हा तुम्हाला गोल्ड बॉण्ड मध्ये इन्व्हेस्ट करता येईल. आणि जर तुम्हाला या तारखा सोडून बॉण्ड विकत घ्यायचे असतील तर तर तुम्हाला ते सेकंडरी मार्केट मधून घ्यावे लागतील याची माहिती खाली आहे.
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला coin.zerodha.com वेबसाइट वर जायचे आहे. नंतर लॉगिन बटन वर क्लिक करायचे आहे.
तुमचे zerodha वर अकाउंट नसे तर इथे क्लिक करून उघडा => zerodha अकाउंट उघडण्यासाठी
स्टेप 2: आत्ता तुम्हाला तुमच्या zerodha अकाउंट चे युझर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे.
स्टेप 3: लॉगिन झाल्यावर Dashboard शेजारी असलेल्या तीन लीने वर क्लिक करायचे आहे. नंतर ETF & SGB ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: आत्ता तुम्हाला गोल्ड बॉण्ड कधी जारी करणार आहेत त्याची लिस्ट दिसेल. जवळच्या तारखेखाली असलेल्या Place Order बटन वर क्लिक करा.
नोट: इथे जर तुम्हाला कोणतीही लिस्ट दिसत नसेल तर साध्य सरकार कोणतेही बॉण्ड जारी करत नाही. तुम्हाला जर तरीही बॉण्ड घ्यायचे असेल तर सेकंडरी मार्केट मधून घ्यावे लागेल. त्याची माहिती खाली आहे.
स्टेप 5: आता तुम्हाला Quantity मध्ये तुम्हाला किती ग्रॅम चे गोल्ड बॉण्ड पाहिजेत ते टाकायचे आहे. इथे कमीत कमी 1 ग्रॅम टाकू शकता. व त्यानुसार तुम्हाला Price दाखवली जाईल जी तुम्हाला पे करावी लागेल. व नंतर Confirm या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
मित्रांनो, तुम्हाला जर गोल्ड बॉण्ड ला सेकंडरी मार्केट मध्ये परचेस करायचे असेल तर तुम्ही ते तुमच्या डिमॅट अकाउंट वरून करू शकता.
गोल्ड बॉण्डला सेकंडरी मार्केट मधून विकत कसे घ्यायचे
आता तुम्ही झिरोधा मध्ये Watchlist मध्ये जाऊन SGB सर्च केले तर तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल. त्यात वेग वेगळ्या मॅच्युरिटी पिरेड चे ऑप्शन दिसतील. तर त्यापैकी तुम्हाला जर परवडेल आणि आत्ताच्या सोनाच्या भावाला मिळताजुळता असेल तो गोल्ड बॉण्ड तुम्ही Buy करू शकता. आणि जसे तुम्ही स्टॉक खरेदी करता तसच इथे करायचे आहे. म्हणजे तुम्ही इथे गोल्ड बॉण्ड खरेदी करताना लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर पण लावू शकता. लिमिट ऑर्डर मध्ये तुम्ही तुमची Price Fix करू शकता.( म्हणजे तुम्हाला बॉण्ड कितील खरेदी करायचा आहे त्याची किंमत). आणि नंतर जर तुम्हाला एखादा सेलर भेटला तर तुमची ऑर्डर एक्झिक्युट होते.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेसाठी पात्रता काय आहे?
- मित्रांनो, जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असाल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना केवळ भारतीय नागरिकां साठी खुली आहे.
- एखादी व्यक्ती किंवा समूह, संघटना, ट्रस्ट, HUF, इत्यादी सर्व भारतीय रहिवासी असल्यास या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.
- हा बाँड पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या वतीने देखील खरेदी करू शकता.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये किती गुंतवणूक करू शकतो
मित्रांनो, सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या अंतर्गत एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात 4 किलो पर्यंत गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकतो. तसेच कमीत कमी 1 ग्रॅम ची गुंतवणूक असणे आवश्यक आहे. तर इतर संस्था किंवा ट्रस्ट 20 किलो पर्यंतचे गोल्ड बॉण्ड घेऊ शकता.
FAQ
अल्पवयीन व्यक्ती SGB मध्ये गुंतवणूक करू शकतो का?
हो मित्रांनो, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक अर्ज करू शकता.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये वर्षाला किती व्याज मिळते?
मित्रांनो, सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये वर्षाला 2.50 टक्के व्याज मिळते.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड मध्ये ऑनलाईन पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकतो का?
हो मित्रांनो तुम्ही साधारण गोल्ड बॉंड मध्ये ऑनलाईन पद्धतीने इन्वेस्ट करू शकता. तसेच ऑनलाइन इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांना इशू किंमतीत 50 रुपयांची सवलत दिली जाते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तसेच जर हा लेख तुम्हाला महत्वपुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।