बेस्ट लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड 2023 सविस्तर माहिती | Best Lifetime Free Credit Cards

नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वात बेस्ट लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड कोणते आहेत, तसेच हे कार्ड मिळवण्यासाठी अटी नियम, आणि विविध ऑफर्स बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्ही जर असेच कोणतेही क्रेडिट कार्ड घ्यायला गेलात तर तुम्हाला क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी, वार्षिक फी आणि नूतनिकरण फी ही भरावीच लागते. आणि तुमच्या मागील महिन्याच्या बिलिंग सायकल मध्ये बँक आपोआप नूतनीकरण शुल्क जोडुन देते. दुसरीकडे, काही क्रेडिट कार्ड मध्ये ही फी माफ करण्याचे निकष सुद्धा आहेत. पण त्यासाठी तुम्ही क्रेडिट व्यवहाराची एक विशिष्ट मर्यादा गाठली तरच तुमचे नूतनीकरण किंवा वार्षिक शुल्क माफ केले जाते. परंतु, मित्रांनो, तुमच्यासाठी तिसरा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला जॉइनिंग फी, वार्षिक किंवा नूतनीकरण फी साठी एक पैसाही भरावा लागणार नाही. तो पर्याय म्हणजे, तुम्ही आजीवन मोफत क्रेडिट कार्डे (Lifetime free credit cards) पाहिली पाहिजे कारण या कार्डांना कोणत्याही प्रकारचे जॉइनिंग फी, वार्षिक फी किंवा नूतनीकरण फी भरावी लागत नाही. असे क्रेडिट कार्ड्स विनामूल्य ऑफर केले जातात आणि शिवाय त्यांच्याकडे भरपूर ऑफर आणि फायदे सुद्धा असतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना आजीवन फ्री क्रेडिट कार्ड्स कोण कोणते आहेत त्याची माहिती तुम्हाला असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही आजचा हा लेख तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखात आपण सर्वात चांगले लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर दीर्घकाळासाठी क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल व तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर वाढवायचा असेल तर लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स चा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तर मग या फ्री क्रेडिट कार्ड बद्दल जाणून घेण्यासाठी हा महत्वाचा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…सर्वात पहिले लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ या:-

लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स म्हणजे काय?

मित्रांनो, लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड हे नावाप्रमाणेच, आजीवन पूर्णपणे मोफत क्रेडिट कार्ड आहे. यात तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डच्या देखभालीसाठी कोणत्याही प्रकारची जॉइनिंग फी किंवा वार्षिक फी भरावी लागत नाही. तसेच बर्‍याच व्यक्ती फ्री क्रेडिट कार्ड वापरून त्यांचा क्रेडिट प्रवास सुरू करतात कारण हे त्यांच्यासाठी सर्वात जास्त परवडणारे आणि जोखीम मुक्त असते. शिवाय, फ्री जॉइनिंग व वार्षिक फी असलेले क्रेडिट कार्ड तुम्हाला तुमचा खर्च कमी करण्यात ही मदत करतात. तथापि, इतर क्रेडिट कार्डांच्या तुलनेत या लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्डां मध्ये सामान्यतः कमी वैशिष्ट्ये आणि फायदे असतात. परंतु असे असले तरीही तुम्हाला निश्चितपणे काही फायदे मिळतात, जसे की रिवॉर्ड पॉइंट किंवा कॅश बॅक, इंधन अधिभार माफी, झिरो लियाबिलिटी प्रोटेक्शन इ. काही कार्ड जारीकर्ते त्यांच्या लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्डसह विमानतळ लाउंज प्रवेश देखील देतात आणि अशी क्रेडिट कार्डे तुमच्यासाठी सर्वोत्तम निवड ठरू शकतात. त्यामुळे दरवर्षी तुमचे वार्षिक शुल्क कापले जाण्याची चिंता न करता तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चा जास्तीत जास्त वापर जरून घेऊ शकता.

मित्रांनो, आता आपण बेस्ट लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स कोण कोणते आहेत या बद्दल जाणून घेऊ या:-मित्रांनो, आता बाजारात लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड भरपूर असल्याने त्यापैकी कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे ते ठरवणे तुमच्यासाठी गोंधळाचे काम असू शकते. त्यामुळे योग्य क्रेडिट कार्ड निवडण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही भारतातील सर्वोत्तम लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्डांची लिस्ट घेऊन आलो आहोत. या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डांची तुलना करून तुम्ही तुमच्या गरजांसाठी योग्य असलेल्या क्रेडिट कार्ड सोबत जाऊ शकता. चला तर मग काही लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड्स ची वैशिष्ट्य व फायदे जाणून घेऊ या.

One Card Credit Card

वन कार्ड Credit Card (One Card)

मित्रांनो, या क्रेडिट कार्ड ची खासियत म्हणजे हे एक सिक्युअर क्रेडिट कार्ड आहे, यात तुमच्या FD वर 100 ते 110% पर्यंत तुम्हाला क्रेडिट लिमिट मिळते. जे इतर क्रेडिट कार्डच्या तुलनेत जास्त आहे. हे कार्ड वापरल्यास तुम्हाला 0.20% रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. आणि या रिवॉर्ड पॉईंट्स ची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. तसेच इ कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म वर तुम्हाला अनेक ऑफर्स बघायला मिळतात. मित्रांनो, ज्या लोकांची क्रेडिट हिस्ट्री नाहीये अश्या लोकांनी क्रेडिट हिस्ट्री बिल्ड करण्यासाठी वन कार्ड क्रेडिट कार्ड वापरणे फायदेशीर ठरते. या कार्ड चा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वाढवू शकता.

मित्रांनो, या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. तसेच पगारदार किंवा स्वयंरोजगार करणारी कोणतीही व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकते. फक्त त्यासाठी तुमचे उत्पन्न निश्चित असावे लागते. या कार्डसाठी अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्रे देखील सादर करावे लागतात जसे की ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इत्यादी. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी देखील तुम्ही या क्रेडिट कार्ड साठी FD च्या आधारावर अर्ज करू शकता. तसेच या क्रेडिट कार्ड वर earn even while you spend ची सुविधा देखील मिळते. जिथे तुम्हाला तुमच्या एफडी वर म्हणजेच मुदत ठेवीवर 6.5% व्याज देखील दिले जाते.

Amazon Pay ICICI Credit Card

ऍमेझॉन पे ICICI Bank Credit Card (Amazon Pay)

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुमचा पगार हा कमीत कमी 25000 ते 30000 प्रति महिना असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा क्रेडिट स्कोर ही 750 व त्यापेक्षा जास्त असायला हवा. जर तुम्ही प्राइम मेम्बर आहात तर ऍमेझॉन वर शॉपिंग करण्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळतो. आणि जर तुम्ही नॉन प्राइम मेम्बर आहात तर तुम्हाला ऍमेझॉन वर 3% कॅशबॅक मिळतो.

तसेच जर तुम्ही हे क्रेडिट कार्ड नॉन ऍमेझॉन प्लॅटफॉर्म वर वापरले तर 1 ते 2% चा अनलिमिटेड कॅशबॅक मिळतो. त्यामुळे तुम्ही जर तुमची शॉपिंग नेहमी ऍमेझॉन वरून करत असाल तर मात्र हे क्रेडिट कार्ड तुम्हाला जरूर घेतले पाहिजे. याशिवाय या क्रेडिट कार्ड सह तुम्ही तुमच्या इंधनावर 1% पर्यंत इंधन अधिभार सूट मिळवू शकता. तसेच रेस्टॉरंट मध्ये तुमच्या जेवणावर 15% पर्यंत सूट मिळवू शकता. मित्रांनो, या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच बँक हे कार्ड जारी करण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर किमान 700 असणे आवश्यक आहे. ही पात्रता पूर्ण केल्यावर तुम्हाला काही कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतील जसे की ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा म्हणजेच पत्त्याचा पुरावा, तुमची पगाराची स्लिप, बँक स्टेटमेंट इत्यादी.

Axis My Zone Credit Card

ऍक्सिस माय झोन Credit Card (Axis My Zone)

मित्रांनो, तसे पाहिले तर हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला 500 रुपये भरावे लागतात. पण सध्या टेम्पररी हे क्रेडिट कार्ड लाइफटाइम फ्री आहे. त्यामुळे जो पर्यंत ही ऑफर चालू आहे तो पर्यंत तुम्ही हे क्रेडिट कार्ड घेऊ शकता. या कार्ड चा फायदा असा आहे की या कार्ड द्वारे तुम्हाला Sony liv’s चे वर्षाचे सबस्क्रिप्शन अगदी फ्री मध्ये भेटते. तसेच हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुमचा पगार हा कमीत कमी रू 15000 ते 20000 पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच या क्रेडिट कार्ड द्वारे पेटीएम अँप मधून तुम्हाला महिन्यातून एकदा बाय वन गेट वन ऑफर मध्ये मुव्ही तिकीट मिळते. याशिवाय स्वीगी वर तुम्हाला 40% पर्यंतचा डिस्काउंट ही मिळू शकतो. या क्रेडिट कार्ड ची अजून एक खासियत म्हणजे या कार्ड वर तुम्हाला दर चार महिन्यातून एकदा एक कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस ही मिळते.

तसेच या क्रेडिट कार्ड द्वारे प्रत्येक रु 200 खर्च केल्यावर 4 EDGE रिवॉर्ड पॉइंट तुम्हाला मिळतात. याशिवाय इंधन अधिभारावर 1% सूट ही मिळते. आणि डायनिंग डिलाइट्स या अंतर्गत भारतातील पार्टनर रेस्टॉरंट मध्ये 20% पर्यंत सूट मिळते. मित्रांनो, या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा पगारदार किंवा स्वयंरोजगार करणारा असावा. व त्याचे उत्पन्न हे निश्चित असावे. तसेच वरील पात्रता पूर्ण केल्यास काही कागदपत्रे सादर करावे लागतात जसे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी.

IDFC First Select Credit Card

IDFC फर्स्ट सिलेक्ट Credit Card (First Select)

मित्रांनो, तसे पाहिले तर IDFC चे इतर ही अनेक लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड्स आहेत, जसे की IDFC millennia, IDFC WOW वगैरे. पण त्यातल्या त्यात IDFC First Select क्रेडिट कार्ड हे इतरांपेक्षा खूप चांगले आहे. या क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही जर कार्ड घेतल्या नंतर पहिल्या 90 दिवसांत 15,000 रुपये खर्च केल्यास तुम्हाला 500 रुपयांचे फ्री वाउचर मिळते. तसेच तुम्हाला पेटीएम अँप मधून तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर मध्ये मुव्ही तिकीट ही मिळते. ज्यात दर महिन्याला तुम्हाला 250 रुपयांचा बेनिफिट मिळतो. या क्रेडिट कार्ड ची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या क्रेडिट कार्ड वर तुम्हाला एका क्वार्टर (तिमाही) मध्ये चार कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस व चार IRCTC लाऊंज ऍक्सेस मिळतात. तसेच तुमच्या कार साठी तुम्हाला 1400 रुपयांचे फ्री रोड साइड असिस्टन्स ही मिळते.

शिवाय पार्टनर रेस्टॉरंट मध्ये जेवणावर तुम्हाला 20% पर्यंत सूट मिळते. या क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या नॉर्मल खर्चावर तुम्हाला 0.6 % ते 2% पर्यंत रिवॉर्ड रेट मिळतो. मित्रांनो, आयडीएफसी फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक विमा लाभ ही देते. जसे की Travel Insurance Cover, Air Accident Cover, Personal Accident Cover वगैरे… तसेच भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर तुमच्या इंधनाच्या व्यवहारां वर 1% अधिभार सूट ही मिळेल. यात तुम्हाला 300 रुपये पर्यंत सूट मिळू शकते. मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा पगारदार किंवा स्वयंरोजगार करणारा असावा व त्याचे उत्पन्न हे निश्चित असावे. आणि अर्जदाराचा क्रेडिट स्कोर ही चांगला असावा. वरील पात्रता पूर्ण केल्यास अर्जदाराला काही कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतार जसे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पगाराची स्लिप किंवा बँकेचे स्टेटमेंट इत्यादी.

PNB RuPay Platinum Credit Card

PNB रुपये प्लॅटिनम Credit Card (Rupay Platinum)

मित्रांनो, या क्रेडिट कार्डला लाइफ टाइम फ्री ठेवण्यासाठी एका क्वार्टर (तिमाही) मध्ये एकदाच याचा वापर करायचा आहे. यात तुम्ही कितीही अमाउंट खर्च करू शकता. हे एक Rupay कार्ड असल्याने याचा इथे समावेश करण्यात आला आहे. कारण Rupay कार्ड ला भविष्यात खूप बेनिफिट्स मिळू शकतात. या क्रेडिट कार्ड ची खासियत म्हणजे यात तुम्हाला कॉम्प्लिमेंट्री इंटरनॅशनल लाऊंज ऍक्सेस मिळते. तसेच यात तुम्हाला 0.50% चा रिवॉर्ड रेट मिळतो. हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचा वार्षिक पगार हा 4 ते 5 लाख पर्यंत असणे गरजेचे आहे. तसेच भारतातील सर्व पेट्रोल पंपावर तुमच्या इंधनाच्या व्यवहारांवर 1% इंधन अधिभार सूट मिळते.

तुम्ही जर प्रथमच हे कार्ड वापरत असाल तर तुम्ही 300 पेक्षा जास्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकता. तसेच या क्रेडिट कार्ड सह तुम्हाला अनेक विमा संरक्षण देखील मिळते. या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. व तो भारताचा नागरिक असावा. तसेच अर्जदाराचा उत्पन्नचा स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे. वरील पात्रता पूर्ण केल्यास अर्जदाराला त्याचा ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, व उत्पन्नाचा पुरावा म्हणजे पगाराची स्लिप किंवा बँकेचे स्टेटमेंट असे कागदपत्रे सादर करावी लागतील.

HSBC Visa Platinum Card

HSBC व्हिसा प्लॅटिनम Credit Card (Visa Platinum)

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचा वार्षिक पगार हा 3.5 ते 4 लाख पर्यंत असणे आवश्यक आहे. हे क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही जर 30 दिवसात 1000 रुपयांचा खर्च केला तर तुम्हाला 2500 पर्यंत चे बेनिफिट्स मिळतात. याशिवाय या क्रेडिट कार्ड मध्ये तुम्हाला 500 रुपयांचे ऍमेझॉन गिफ्ट वाउचर मिळते, 250 रुपयांचे स्वीगी वाउचर मिळते, तसेच 3 कॉम्प्लिमेंट्री एअरपोर्ट लाऊंज ऍक्सेस, 3 meal वाउचर (फॉर एअरपोर्ट रेस्टॉरंट इन इंडिया) मिळतात. याशिवाय गुगल पे वर पहिल्या 100 रुपये ट्रांझक्शन वर 50% डिस्काउंट मिळतो व 2000 रुपये वर 10 % कॅशबॅक मिळतो. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे क्रेडिट कार्ड कमीत कमी 5 वेळा युझ करावे लागेल. आणि कार्ड इश्यू झाल्यानंतर 60 दिवसात 10,000 रुपये खर्च केल्यास याच तुम्हाला लाभ घेता येईल.

या क्रेडिट कार्ड वर तुम्हाला 1.3% चा रिवॉर्ड रेट मिळतो. तसेच बुक माय शो वर तुम्हाला वन प्लस वन ची शनिवारी ऑफर ही मिळते ज्यात तुम्ही 250 रुपये चा बेनिफिट मिळवू शकता. तसेच भारतातील सर्व पेट्रोल पंपावर तुमच्या इंधनाच्या व्यवहारांवर 1% इंधन अधिभार सूट मिळू शकतो. मित्रांनो हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे18 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचा उत्पन्नाचा स्थिर स्तोत्र असणे गरजेचे आहे. कोणतीही पगारदार व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकते. आणि स्वयंरोजगार असलेले लोक HSBC मध्ये बचत किंवा चालू खाते असेल तरच या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे क्रेडिट कार्ड भारतातील काही शहरांतच उपलब्ध होते. वरील पात्रता पूर्ण केल्यास अर्जदाराला काही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते जसे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा म्हणून पगाराची स्लिप किंवा बँकेचे स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण सर्वात चांगले लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड कोण कोणते आहेत ते जाणून घेतले. या क्रेडिट कार्ड्स बद्दल दिलेल्या माहितीची तुलना करून तुमच्या आवश्यकते नुसते तुम्ही कोणतेही फ्री क्रेडिट कार्ड घेऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो की आमचा आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत ही नक्की शेअर करा.
धन्यवाद

FAQ

लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड खरोखर फ्री आहेत का?

हो मित्रांनो, लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी व वार्षिक फी तुम्हाला भरावी लागत नाही. त्यामुळे ही क्रेडिट कार्डे खरोखर फ्री असतात. पण असे असले तरी देखील तुम्हाला इतर फी मात्र भरावी लागते. जसे की रोख पैसे काढण्याचे शुल्क, व्याजदर, परदेशी मार्क अप शुल्क, लेट पेमेंट शुल्क वगैरे.

एटीएम मधून पैसे काढण्यासाठी लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड चा वापर केला जाऊ शकतो का?

हो मित्रांनो, तुम्ही एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमचे लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड वापरू शकता.

मी परदेशात लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड चा वापर करू शकतो का?

हो मित्रांनो, तुम्ही परदेशातही तुमचे लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड वापरू शकता. पण काही बँका यासाठी अतिरिक्त शुल्क आकारू शकता.

जर मी माझे लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड वापरल्या नंतर वेळेवर बिल पेमेंट करू शकलो नाही तर काय होईल?

मित्रांनो, तुम्ही तुमच्या फ्री क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट वेळेत भरले नाही तर बँक तुमच्या कडून लेट पेमेंट फी वसूल करेल. याशिवाय तुम्ही तुमचे बिल पेमेंट करण्यात असमर्थ ठरलात तर बँक तुमचे लाइफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड निष्क्रिय करेल. आणि याचा वाईट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर देखील होऊ शकतो.