क्रेडिट कार्ड वापरताना ‘या’ चुका अजिबात करु नका | Don’t Make These 10 Mistakes with Your Credit Cardनमस्कार मित्रांनो, आज आपण क्रेडिट कार्ड कसे वापरायचे व क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या चूका करू नये, याबद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजकाल अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. याच कारण म्हणजे क्रेडिट कार्ड अनेक फायद्यांसह येते. ज्यामुळे आपले आर्थिक जीवन सोपे होऊन जाते. तुमची एखादी इच्छा पूर्ण करणे असो किंवा एखादी आर्थिक अडचण असो, प्रत्येक वेळी आपले क्रेडिट कार्ड आपल्या बरोबर असते. त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. शिवाय मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे क्रेडिट कार्ड तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्याचा एक खूप चांगला उत्तम मार्ग आहे. पण क्रेडिट कार्ड योग्य रीतीने वापरले तरच त्याचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरता आले पाहिजे तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. पण बहुतेक लोकांना क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे कसे वापरायचे हे माहीत नसते. आणि जे लोक नुकतेच क्रेडिट कार्ड वापरायला लागलेत त्यांना पूर्ण माहिती नसल्याने ती लोक चुकीच्या पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरतात. व स्वतःचे नुकसान करून घेतात. पण आता काळजी करू नका. कारण आजच्या या लेखात क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे कसे वापरायचे या बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डच्या बाबतीत तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजे या बद्दल ही आज आपण चर्चा करणार आहोत. तसेच तुम्ही जर पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण यात तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या चूका करू नये या बद्दल माहिती मिळणार आहे.चला तर मग तुमच्या क्रेडिट कार्ड बाबतीत कोण कोणत्या चूका टाळाव्यात त्या बद्दल जाणून घेऊ या.

Credit Card Vapartana Ya Mistakes Karu Naka

तुम्ही क्रेडिट लिमिट वाढवत नसाल तर

मित्रांनो, दुसरी चूक अनेक लोक करतात ती म्हणजे क्रेडिट लिमिट न वाढवणे. पण ही गोष्ट फक्त अश्याच व्यक्तींसाठी लागू होते ज्यांना आपल्या क्रेडिट कार्ड द्वारे त्यांचा खर्च नियंत्रित ठेवता येतो. पण जर तुमचे तुमच्या क्रेडिट कार्ड च्या खर्चावर नियंत्रण नसेल तर मात्र ही गोष्ट तुम्हाला लागू होत नाही. मित्रांनो, तुम्ही तुमची क्रेडिट लिमिट वाढवली पाहिजे. हे ऐकून तुम्हाला खरंतर जरा विचित्र वाटेल. पण जर तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिट वर नियंत्रण ठेवणार असाल तर मात्र तुमच्या क्रेडिट लिमिट वाढवण्याचा तुम्हाला जास्त फरक पडणार नाही. कारण तुम्ही तूमचे पैसे अनावश्यक ठिकाणी वापरणार नाहीत. आणि प्रत्येक वेळी पैसे खर्च करताना काळजीपूर्वक विचार कराल.

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. समजा दरमहा तुम्ही 20 हजार रुपये खर्च करत असाल आणि तुमची क्रेडिट लिमिट 50 हजार रुपये इतकी आहे. तर 20 हजार साठी तुमचा युटीलायझेशन रेट हा 40 टक्के होईल. पण जर तुम्ही क्रेडिट लिमिट 5 लाख केली तर तुमचा युटीलायझेशन रेट हा फक्त 4 टक्के होईल. या गोष्टीचा नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या क्रेडिट स्कोरसाठी 4 टक्के युटीलायझेशन रेट खूप चांगला आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमची क्रेडिट लिमिट वाढवता तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर ही वाढण्यास मदत होते.तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद करणे

मित्रांनो, सहावी चूक म्हणजे तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद करणे. जेव्हा तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड मिळते तेव्हा बरेच लोक त्यांचे जुने क्रेडिट कार्ड बंद करून टाकतात. परंतु असे करणे शहाणपणाची गोष्ट नाही. तर ही एक चूक आहे जी अनेक लोक करतात. मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोर ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचा क्रेडिट इतिहास (Credit History) असतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट इतिहास जितका मोठा असेल तितका तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल. त्यामुळे नवीन क्रेडिट कार्ड मिळाल्यास तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका. त्या ऐवजी तुम्ही ते लाईफ टाइम फ्री कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता. जेणे करून तुम्ही ते कायम फ्री मध्ये चालू ठेवू शकता. तुमचा क्रेडिट स्कोर ठरवण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद होणार नाही याची काळजी घ्या.

June Credit Card Band Karu Naka

क्रेडिट कार्डासाठी वारंवार अर्ज करणे

मित्रांनो, नवीन क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांकडून ही एक खूप मोठी चूक होते की ते क्रेडिट कार्डांसाठी वारंवार अर्ज करतात. तुम्ही एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्डांसाठी अर्ज केला तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती तुमच्या नियंत्रणात नाही असा आभास निर्माण होतो आणि तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिलही भरण्यास सक्षम नाही अशी शक्यता असते. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता तेव्हा तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर एक नवीन इन्कवायरी दिसून येते. आणि कमी वेळेत जितकी जास्त इन्कवायरी दिसेल तेवढाच जास्त तुम्हाला तोटा होऊ शकतो.

या गोष्टी मुळे तुमच्या क्रेडिट कार्ड स्कोर वर परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्ही तुमची कार्डे वारंवार बदलू नये असा सल्ला दिला जातो. तर असे न करता यावर एक उपाय म्हणजे तुमच्या गरजे नुसार चांगले कार्ड शोधा, मग ते किमान दोन ते तीन वर्षे वापरा आणि मग तुमचे कार्ड अपग्रेड करा. तसेच तुम्हाला जर नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर तुम्ही पूर्व पात्रता चा फॉर्म ही भरू शकता. जे तुमच्या क्रेडिटला हानी न पोहचवता तुम्ही कार्डसाठी पात्र आहात की नाही जाणून घेण्याची परवानगी देतात. हा फॉर्म त्या त्या बँकेच्या वेबसाइट वर भेटून जाईल.

Reward Poin Redeem Kara

तुमचे रिवॉर्ड पॉईंट न वापरणे

मित्रांनो, असे बरेच लोक आहेत जे त्यांना मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्स चा वापर करत नाहीत. जवळजवळ चाळीस टक्के लोक त्यांचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम ही करत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल पण हे रिवॉर्ड पॉइंट्स बरेच फायदे देतात. परंतु जर तुम्ही तुमचे रिवॉर्ड पॉइंट रिडीम केले नाहीत किंवा वापरले नाहीत तर मात्र तुम्ही क्रेडिट कार्ड ऑफर करत असलेले बरेच फायदे गमावू शकता. कारण या रिवॉर्ड पॉइंट्सची एक्सपायरी डेट असते. बहुतेक वेळा हे रिवॉर्ड पॉइंट्स सहसा दोन ते तीन वर्षांच्या कालावधी नंतर कालबाह्य होतात.

त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळवाल तेव्हा तुम्ही त्यांची कालबाह्यता तारीख तपासून घ्या आणि त्या नुसार त्यांचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्स चा तुम्ही पूर्ण वापर करून घ्यायला हवा.

तुमच्या क्रेडिट कार्ड चे पेमेंट चुकवणे

मित्रांनो, अजून एक मोठी चूक जी लोक करतात ती म्हणजे क्रेडिट कार्ड चे पेमेंट चुकवणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड चे पेमेंट चुकवता तेव्हा त्याचा परिणाम हा सरळ तुमच्या क्रेडिट स्कोर वर होतो. जर तुम्ही तीस दिवसंचे पेमेंट चुकवले तर तुमचा क्रेडिट स्कोर हा डायरेक्ट 17 ते 80 पॉईंट ने खाली येतो. आणि जर तुम्ही 90 दिवसांचा पेमेंट चुकवला तर तुमचा क्रेडिट स्कोर हा जवळपास 133 पॉईंट ने कमी होतो. आणि जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर या प्रकारे कमी होतो तेव्हा तुमची एक वाईट प्रतिष्ठा निर्माण होते व कुठलेही कर्ज घेताना तुम्हाला या गोष्टी मुळे अडचण येऊ शकते. एवढेच नाही तर या शिवाय तुमच्या कडून अतिरिक्त दंडाची रक्कम ही घेतली जाते. म्हणजे तुम्हाला अतिरिक्त अनावश्यक पैसे द्यावे लागतील. पण या वर उपाय म्हणजे तुम्ही ऑटो पे सेट करू शकता जे तुम्हाला वेळोवेळी पेमेंट करण्यात मदत करेल.

किमान बिल (Minimum Due Amount) भरणे

मित्रांनो, बरेच लोक पाचवी चूक करतात ती म्हणजे क्रेडिट कार्ड चे किमान बिल भरणे. मित्रांनो, तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातात. पहिला पर्याय म्हणजे किमान बिल (Minimum Due Amount) भरणे आणि दुसरा पर्याय म्हणजे संपूर्ण बिल (Total Due Amount) भरणे. बरेच लोक किमान बिल पर्याय निवडतात. त्या मागील कारण म्हणजे किमान बिलाची रक्कम संपूर्ण बिलाच्या रकमे पेक्षा नेहमीच कमी असते. तुम्हाला हे तुमच्या सोयीचे वाटू शकते पण तुम्हाला माहीत असेल की उर्वरित रकमेवर व्याजदर आकारला जातो. आणि असे असल्याने किमान बिल भरणे हा पर्याय निवडणे हा योग्य निर्णय नाही.

किमान बिल या पर्याया द्वारे तुमचे बिल भरणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण या राहिलेल्या प्रलंबित रकमेवर आकारला जाणारा व्याजदर हा खूप जास्त असतो आणि जो साधारणपणे तीस ते चाळीस टक्के इतका असतो. आणि एवढा व्याजदर खरोखर खूप मोठा आहे. यात तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील. त्या शिवाय तुम्हाला अतिरिक्त दंडाची रक्कम देखील आकारली जाते. त्यामुळे शक्यतो तुमचे संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.

क्रेडिट कार्ड मर्यादा जास्त वापरणे किंवा कमी वापरणे

मित्रांनो, अनेक वेळा लोकांकडून एक चूक होते, ती म्हणजे त्यांची क्रेडिट कार्ड मर्यादा जास्त वापरणे किंवा कमी वापरणे. मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की तुमचे क्रेडिट कार्ड त्याच्या मर्यादेच्या सुमारे एक ते तीस टक्के इतके वापरावे. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चा वापर एक टक्क्यां पेक्षा कमी किंवा तीस टक्क्यांहून अधिक केला तरीही हे वाईट ठरते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड ची मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे. आणि तुम्ही लहान खर्च करता आणि तुमची देयके वेळेवर भरता याची काळजी घ्यावी.

एक-दोन वर्षानंतर प्रीमियम क्रेडिट कार्ड अपग्रेड न करणे

मित्रांनो, प्रीमियम क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त असल्याने नवीन ग्राहकांना प्रीमियम क्रेडिट कार्ड दिले जात नाही. पण जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड एक ते दोन वर्षे वापरता व तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वेळेवर न चुकता भरता तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड जारी कर्त्यांचा विश्वास जिंकता. व त्यानंतर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्यास सांगू शकता. बहुतेक वेळा तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे व कार्ड हाताळण्याची योग्य जबाबदारी पाहून कार्ड जारीकर्ते तुमचे क्रेडिट कार्ड लगेच अपग्रेड करून देतात. त्यामुळे तुम्ही जर एक ते दोन वर्षा पासून क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही त्याला अपग्रेड जरूर करून घ्यावे.

Bank Customer Care Shi Na Bolta annual fees Bharne

कस्टमर केअर शी चर्चा न करता वार्षिक शुल्क भरणे

मित्रांनो, अनेक लोकांना क्रेडिट कार्ड च्या वार्षिक शुल्क च्या बाबत नेगोशिएट करता येत म्हणजे वार्षिक शुल्क कमी करता येते या बद्दल माहिती नसते. हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चे वार्षिक शुल्क काढून टाकण्या बाबत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह शी बोलू शकता. असे केल्यास तुमचे बरेचशे पैसे वाचू शकतील. आणि बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड चे वार्षिक शुल्क काढून टाकण्याची तुमची मागणी स्वीकारली जाते. कारण कार्ड देणारी बँक किंवा कंपनी आपला कस्टमर टिकून राहावा यासाठी तुमची मागणी मान्य करू शकते. पण प्रत्येक वेळेस तुमची मागणी मान्य होईलच असे नाही. कधी कधी तुमचे क्रेडिट कार्ड चे वार्षिक शुल्क काढून टाकण्याच्या तुमच्या मागणीला नकार ही मिळू शकतो. पण असे असले तरीही तुम्ही एकदा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह शी बोलणे गरजेचे आहे.

Credit Card Bill Na Tapasne

बिलिंग स्टेटमेंट ची तपासणी न करता बिल भरणे

मित्रांनो, तुमच्या बिलिंग स्टेटमेंटची तपासणी किंवा पुनरावलोकन न करणे ही सुद्धा एक चूक आहे. तुमचे बिलिंग स्टेटमेंट तपासणे खूप महत्वाचे आहे. कारण त्यात तुमच्या सर्व व्यवहारांची तपशीलवार माहिती दिलेली असते. तसेच जर तुम्हाला कोणताही संशयास्पद व्यवहार दिसला तर तुमची त्याची तक्रार करू शकता. कारण ही फसवी क्रिया असू शकते. तसेच तुम्ही शुल्काचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि जर काही त्रुटी असतील तर तुम्ही त्याचे लवकरात लवकर निराकरण करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमचे बिलिंग स्टेटमेंट योग्य रित्या आणि वेळोवेळी नियमित पणे तपासले पाहिजे आणि त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे.

तर मित्रांनो अशाप्रकारे क्रेडिट कार्डच्या या सामान्य चुका टाळून तुम्ही आर्थिक अडचणीं व ताणापासून दूर राहता येईल. तुम्ही जर आधीच खूप कर्ज घेऊन बसला असाल तर तुम्ही जास्त क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नये. शिवाय तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोर हेल्दी/चांगला ठेवायचा असेल किंवा सुधारायची असेल तर तुम्हाला तुमचा युटीलायझेशन रेट 30 टक्के पेक्षा कमी ठेवणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरायचे हे एकदा कळले की तुम्हाला वर सांगितलेल्या या चूका टाळता येईल. तसेच जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा त्या सोबत आलेले नियम व अटी व्यवस्थित समजून घ्या.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आज आपण क्रेडिट कार्ड बद्दल कोणकोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल जाणून घेतले. तसेच तुम्हाला जर हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद

FAQ

क्रेडिट कार्ड वापरणे धोक्याचे आहे का?

मित्रांनो, तसे पाहिले तर क्रेडिट कार्ड वापरणे धोक्याचे आहे पण आणि नाही पण. कारण क्रेडिट कार्ड चे मूल्य ते तुम्ही कसे वापरता यावर अवलंबून असते. तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड जबाबदारी ने वापरले तर तुम्हाला त्याचा फायदा च होतो जसे की विविध सुविधा, फसवणुकी पासून सुरक्षितता, रिवॉर्ड पॉईंट्स वगैरे. पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड बेजबाबदार पणे वापरले तर क्रेडिट कार्ड चे कर्ज तुमच्या आर्थिक जीवनावर प्रचंड भार टाकू शकते.

मेडिकल बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे का?

मित्रांनो, तुम्ही जर महिन्याच्या शेवटी तुमचे वैद्यकीय बिल भरू शकणार असाल तर क्रेडिट कार्ड हे पेमेंट साठी योग्य पर्याय आहे. पण जर तुम्ही बिले वेळेवर भरण्यास सक्षम नसाल तर वैद्यकीय बिलावरील व्याज तुम्हाला दडपून टाकू शकते. यावर उपाय म्हणजे तुम्ही मेडिकल प्रोव्हायडर सोबत नेगोशिएट करू शकता व तुमचा पेमेंट प्लॅन तयार करून घेऊ शकता.

जुने क्रेडिट कार्ड बंद करू शकतो का?

मित्रांनो, तुम्ही तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद करू शकता, पण शक्यतो तसे करू नये. कारण त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर होतो. म्हणजे तुमचे क्रेडिट कार्ड जेवढे जुने असेल तेवढा तुमचा स्कोर चांगला असतो. तसेच जुने क्रेडिट कार्ड असणे म्हणजे तुम्ही एक जबाबदार वापरकर्ता आहात असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद करू नये.

रिवॉर्ड पॉईंट वापरल्याने फायदा होतो का?

होय मित्रांनो. क्रेडिट कार्ड ऑफर करत असलेले रिवॉर्ड पॉईंयस बरेच फायदे मिळवून देतात. जसे की कॅशबॅक, सूट, कुपन वगैरे वापरून आपला फायदा करून घेता येतो. त्यामुळे रिवॉर्ड पॉईंट्स वापर अवश्य करा.