एसबीआय चे क्रेडिट कार्ड कायमचे बंद कसे करायचे? | How to Close SBI Credit Card Permanently?

नमस्कार मित्रांनो, आज आपण एसबीआय चे क्रेडिट कार्ड कायमचे बंद कसे करायचे, तसेच SBI चे क्रेडिट बंद केले तर फायदे, तोटे काय असू शकतात. त्याच बरोबर क्रेडिट कार्ड बंद केले तर क्रेडिट स्कोर वर काय परिणाम होते. या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, क्रेडिट कार्ड आजकाल बरेच लोक वापरतात. याचे कारण म्हणजे त्यात मिळणारे अनेक फायदे. मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे जरी सर्वात उपयुक्त उत्पादनां पैकी एक असले तरी, कधीकधी, क्रेडिट कार्ड धारकांना त्यांची देखभाल करणे कठीण जाते. किंवा त्यांना विविध क्रेडिट कार्ड निवडण्याची किंवा घ्यायची इच्छा वाटू शकते. अशा परिस्थितीत, क्रेडिट कार्ड धारकांना नको असलेले क्रेडिट कार्ड वापरणे बंद करणे किंवा रद्द करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर तुम्हाला दरवर्षी विनाकारण त्याचे नुतनीकरण फी भरावी लागेल. त्यामुळे तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर ते बंद करणे कधीही शहाणपणाचा निर्णय आहे. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या प्रक्रिये मध्ये एक सोपी प्रक्रिया समाविष्ट आहे आणि कार्डधारकाला त्याचे अनावश्यक शुल्क ही भरावे लागणार नाही. जसे की तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने बंद करू शकता. त्यासाठी काय करावे हे जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.



SBI Credit Card Band Kase Karayche App Madhun

SBI क्रेडिट कार्ड बंद कसे करायचे

SBI कार्ड एप्लिकेशन द्वारे क्रेडिट कार्ड बंद कसे करायचे त्या बद्दल जाणून घेऊ या.

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये SBI Card ऍप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करायचे आहे.

स्टेप 2: आता अँपच्या होम पेज वरती तुम्हाला तीन लाइन्स दिसतील त्यावर क्लिक करायचे आहे. आता नंतर त्यात अजून काही ओपशन्स ओपन होतील त्यातील Service या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.



SBI Credit Card Band Kase Karayche App Madhun Step 1

स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर बरेच ऑप्शन आलेले दिसतील त्यातील Card Closure Request या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

SBI Credit Card Band Kase Karayche App Madhun Step 2

स्टेप 4: मित्रांनो, तुमच्याकडे जर दोन किंवा जास्त कार्ड असतील तर तुम्हाला जे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे ते सिलेक्ट करा.

स्टेप 5: आता तुम्हाला कार्ड बंद का करायचे आहे याचे Reason विचारले जाईल. तर तुम्हाला इथे कार्ड बंद करण्याचे रिझन टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये टिक करून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

SBI Credit Card Band Kase Karayche App Madhun Step 3

मित्रांनो, तुमच्याकार्ड चे जर काही Outstanding Due Amount असेल तर तुम्ही कार्ड बंद करू शकणार नाही. तुम्ही हि रक्कम पूर्ण भरून परत खालच्या स्टेप वाचा.

स्टेप 6: या नंतरचत प्रोसेस मध्ये तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून झाल्यावर तुमची कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट एसबीआय पर्यंत सुकसेसफुल्ली पोहचून जाईल. त्या नंतर 2 दिवसा नंतर तुम्हाला बँकेकडून कॉल येईल व कार्ड बंद करण्याचे रिझन विचारले जाईल. तुम्ही तुमचे कार्ड बंद करण्याचे कारण सांगायचे आहे. व काही दिवसातच तुमचे कार्ड बंद होऊन जाईल.

(मित्रांनो, तुमच्या कार्ड चे एखादे ड्यु अमाउंट बाकी असेल तर तुमचे कार्ड बंद होऊ शकत नाही. तुम्हाला ती ड्यु अमाउंट क्लीअर करावी लागेल मगच तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद करू शकता.)

SBI क्रेडिट कार्ड ऑनलाइन बंद करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या नेट बँकिंगच्या खात्या द्वारे SBI ऑनलाइन बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमची क्रेडेन्शियल्स वापरून तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्यात लॉग इन करावे लागेल आणि क्रेडिट कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट म्हणजेच विनंती पाठवावी लागेल. कार्ड बंद करण्याची विनंती पाठवल्या नंतर, तुम्हाला तुमच्या रेजिस्टर मोबाइल नंबर वर एक ओटीपी मिळेल आणि नंतर तुमचे SBI क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँक तुमच्याशी कॉल द्वारे संपर्क साधेल.

SBI क्रेडिट कार्ड ऑफलाईन बंद करण्याचे मार्ग

आता एसबीआय चे क्रेडिट कार्ड ऑफलाईन बंद करण्याचे कोण कोणते मार्ग आहेत ते जाणून घेऊ या:

1) कार्ड बंद करण्यासाठी कस्टमर केअर नंबर वर कॉल करणे:

मित्रांनो, क्रेडिट कार्ड रद्द करण्यासाठी तुम्ही एसबीआय च्या कस्टमर केअर नंबर वर म्हणजेच ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता. त्यासाठी बँकेकडे जो एक टोल-फ्री नंबर किंवा लँडलाइन नंबर आहे तो नंबर तुम्हाला क्रेडिट कार्ड रद्द करण्यासाठी स्थानिक STD कोड सह डायल करायचा आहे. आता ग्राहक सेवा विभागाला कॉल केल्या नंतर, ते तुम्हाला तुमचे नाव, कार्ड नंबर, संपर्क तपशील आणि पत्ता यासारखी आवश्यक माहिती विचारतील ही माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर कोणी तुमच्या कार्डचा CVV क्रमांक किंवा पिन विचारला तर तो कोणालाही कधीही देऊ नका. आता कार्ड रद्द करण्याची विनंती यशस्वीपणे सुरू केल्यानंतर, बँक तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुम्हाला कार्ड कॅन्सल करण्याचे सर्व डिटेल्स प्रदान करेल.

2) जवळच्या SBI ब्रांचला प्रत्यक्ष भेट देऊन:

मित्रांनो, तुम्ही तुमचे SBI क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुमच्या जवळच्या SBI बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. तसेच बँक अधिकाऱ्याला कार्ड बंद करण्यासाठी विनंती करू शकता. याशिवाय तुम्हाला बंद करायचे असलेले SBI क्रेडिट कार्ड सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जावे लागेल.

3) SBI ला कार्ड कॅन्सल करण्यासाठी विनंती पत्र लिहिणे:

मित्रांनो, बँकेच्या ग्राहक सेवा विभागाला कॉल करण्या व्यतिरिक्त, तुम्ही एसबीआय बँकेला कार्ड बंद करण्याचे विनंती पत्र ही लिहू शकता. हे पत्र लिहून तुम्ही ते SBI card, PO Bag 28, GPO, नवी दिल्ली 110001 वर पाठवू शकता. या रिक्वेस्ट लेटर मध्ये तुमचे नाव, कार्ड नंबर, पत्ता आणि संपर्कचे तपशील नमूद करणे आवश्यक आहे. इथेही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, पत्रात कार्ड चा पिन किंवा सीव्हीव्ही ( CVV) सारख्या गोपनीय माहितीचा उल्लेख चुकून ही करू नका. तुमचे खाते बंद झाल्या वर तुमचे कार्ड निष्क्रिय केले जाईल. तसेच, तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले आहे या बद्दल बँक तुम्हाला लेखी कन्फर्मेशन देईल. सावधगिरीचा शब्द, कार्ड बंद होई पर्यंत आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी ते तिरपे कापून टाका.

SBI क्रेडिट कार्ड बंद करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

मित्रांनो, एसबीआय चे क्रेडिट कार्ड बंद करताना तुम्हाला काही गोष्टी या लक्षात ठेवाव्या लागतील नाहीतर तुमचे कार्ड बंद होणार नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊ या….

  • तुमचे ड्यु पे करा: मित्रांनो, तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्या आधी बँकेच्या गाईड लाइन्स नुसार तुम्हाला तुमची सर्व थकबाकी म्हणजे Outstanding Dues आणि EMI क्लिअर करणे आवश्यक आहे. तसे तुम्हाला बँके कडून पत्राद्वारे त्या बद्दल सूचित केले जाते. आणि एकदा तुम्ही तुमची सर्व थकबाकी भरली की, तुमची क्रेडिट कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट बँके कडून सुरू केली जाईल.
  • तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करून घ्या: मित्रांनो, तुमची Outstanding Dues आणि ईएमआय क्लीअर केल्यानंतर, तुम्ही न वापरलेल्या रिवॉर्ड पॉइंटसाठी एकदा तुमचे क्रेडिट कार्ड चेक करून घ्या. आणि कार्ड रद्द केल्या नंतर ४५ दिवसांच्या कालावधीत हे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून घ्या आणि बँकेच्या कॅटलॉग मधून काही आकर्षक गिफ्ट्स आणि ऑफर मिळवू शकता.
  • क्रेडिट कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट टाकल्या नंतर कार्ड वापरू नका: मित्रांनो, कार्ड बंद करण्याची प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला क्रेडिट कार्ड न वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्ही जर क्रेडिट कार्ड चा वापर करून कोणतेही नवीन पेमेंट केले तर तुमची कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट SBI बँक द्वारे रद्द केली जाईल.
  • या शिवाय कोणत्याही फसवणुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून कार्ड बंद करण्या आधी क्रेडिट कार्ड चे लेटेस्ट स्टेटमेंट चेक करून घ्या.

SBI चे क्रेडिट कार्ड बंद करण्याचे परिणाम

मित्रांनो, क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमच्या आर्थिक स्थिती वर काही परिणाम होऊ शकतात. जसे की.

  • मित्रांनो, तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो आणि तुमची क्रेडिट मर्यादा देखील कमी होते. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की भारतात, क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 पर्यंत गणला जातो. आणि यात 900 हा सर्वात चांगला क्रेडिट स्कोर मानला जातो. हा क्रेडिट स्कोर अनेक प्रकारे मोजला जातो जसे की, तुमचा पेमेंट इतिहास, क्रेडिट मिक्स, क्रेडिट हिस्ट्री ची लांबी आणि नवीन क्रेडिट च्या आधारावर तो मोजला जातो. या शिवाय, जर तुमचा क्रेडिट स्कोर खूपच कमी दिसला तर तुम्हाला क्रेडिट स्कोर सुधारण्याचा सल्ला दिला जातो.
  • मित्रांनो, तुमची क्रेडिट हिस्ट्री ही तुमच्या कार्डचा वापर आणि परतफेडीच्या वेळापत्रकाच्या आधारे ठरवली जाते. अश्या वेळी जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले तर याचा अर्थ तुमची क्रेडिट हिस्ट्री देखील रिमूव्ह होऊन जाते. मित्रांनो, क्रेडिट ब्युरो तुमच्या क्रेडिट कार्डच्या हिस्ट्री चा विचार करूनच तुमच्या क्रेडिट स्कोरची गणना करतात. म्हणून, क्रेडिट कार्ड चे किंवा इतर ही अनेक फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर राखण्याचा सल्ला दिला जातो. आणि, जेव्हा तुम्ही तुमचे SBI क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही हा गोष्टींचा विचार केला पाहिजे.
  • मित्रांनो, क्रेडिट कार्ड बंद करण्या ऐवजी योग्य क्रेडिट स्कोर राखणे खूप महत्त्वाचे आहे. कारण क्रेडिट कार्ड फक्त खरेदी करण्यासाठी, मूव्ही तिकिटे बुक करण्यासाठी किंवा इतर गरजांसाठी च वापरले जात नाही. या शिवाय, कार्डचा वापर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी जसे की हॉस्पिटलायझेशन, औषधे खरेदी करणे आणि बरेच काही कारणासाठी देखील केला जाऊ शकतो.

SBI चे क्रेडिट कार्ड बंद करण्याचे फायदे

  • मित्रांनो, एसबीआय चे क्रेडिट कार्ड करण्याचा एक फायदा म्हणजे कार्ड शी संबंधित असलेले शुल्क तुम्ही टाळू शकता. तसेच तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड वापरत नसाल किंवा ट्रॅव्हल किंवा कॅशबॅक रिवॉर्ड प्रोग्राम मधून फायदे मिळवत नसाल, तर तुम्ही कार्ड बंद करून तुमचे पैसे म्हणजेच वार्षिक शुल्क वाचवू शकता.
  • क्रेडिट कार्ड खर्च करण्याचा अजून एक फायदा म्हणजे खर्च करण्याचा मोह कमी होतो. अनेक वेळा क्रेडिट कार्ड असल्याने आपण भरपूर पैसे खर्च करून बसतो, आणि मग हळूहळू कर्जाच्या दबावाखाली येतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वर खर्च करणे जरी सोपे वाटत असले तरी ही कर्जाची रक्कम परतफेड कशी करायची हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे मित्रांनो,
  • एकदा का तुम्ही क्रेडिट कार्डची शिल्लक भरल्यानंतर, जास्त खर्च होण्याची आणि कर्जात परत येण्याची शक्यता टाळण्यासाठी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद करू शकता.

क्रेडिट कार्ड बंद करण्याचे तोटे:

  • मित्रांनो, क्रेडिट कार्ड बंद करण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड बंद केले तर त्याचा सरळ परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोर वर होऊ शकतो. खास करून तुमचे कार्ड जर फार जुने असेल तर तुमच्या क्रेडिट स्कोर ला हानी पोहचू शकते.
  • या शिवाय तुमचे क्रेडिट कार्ड जर जुने असेल आणि तुम्ही जर ते बंद केले तर तुमच्या क्रेडिट युटीलायझेशन रेशो ला सुद्धा हानी पोहचू शकते.
  • क्रेडिट कार्ड बंद करण्याचा अजून एक तोटा म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डचे मिळणारे फायदे ही गमवू शकता. क्रेडिट कार्डच्या फायद्यां मध्ये एअरलाइन लाउंज प्रवेश, खरेदी संरक्षण, वगैरे ऑफर्स चा समावेश होतो. याने तुम्हाला फारसा फरक पडणार नसला तरी भविष्यात तुमची आर्थिक परिस्थिती बदलली तर तुम्हाला तुमच्या निर्णया बद्दल पश्चाताप होऊ शकतो.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एसबीआय चे क्रेडिट कार्ड्स कायमचे बंद कसे करायचे, कार्ड बंद करण्याकगे फायदे, तोटे या सर्व गोष्टी बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्व पूर्ण वाटला असेन तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

FAQ

क्रेडिट कार्ड बंद झाल्यावर ते बँकेत जमा करावे लागेल का?

मित्रांनो, हे ज्या त्या बँकेच्या अटी व शर्तींवर अवलंबून असते. काही बँकांना कार्ड बंद करण्याची विनंती सुरू करण्यासाठी कट क्रेडिट कार्ड बँके कडे पाठवणे आवश्यक असते. तर इतर बँका ग्राहकांना कार्ड बंद केल्या नंतर त्याचे तुकडे करण्याचा सल्ला देतात.

क्रेडिट कार्ड बंद केल्यावर, ऍड – ऑन कार्ड देखील रद्द केले जाते का?

हो मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद करता, तेव्हा मुख्य कार्डशी जोडलेली ऍड -ऑन क्रेडिट कार्डे सुद्धा बंद किंवा रद्द केली जातात.

मला न विचारता बँक माझे SBI क्रेडिट कार्ड खाते बंद करू शकते का?

मित्रांनो, कार्डची निष्क्रियता, तुमचा कार्ड बद्दल असणारा निष्काळजीपणा किंवा पेमेंट मध्ये अनेक चूका झाल्यास बँक चौकशी न करता तुमचे क्रेडिट कार्ड बंद करू शकते.

क्रेडिट कार्ड खाते SBI द्वारे केव्हा बंद मानले जाईल?

मित्रांनो, एकदा तुमचे SBI क्रेडिट कार्ड बंद झाल्यावर SBI बँके द्वारे तुम्हाला लेखी कन्फर्मेशन पाठवले जाईल. तसेच, तुमच्या क्रेडिट कार्डचा बंद तपशील तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये ही नमूद केला जाईल.

क्रेडिट कार्ड पूर्णपणे बंद होण्यास किती दिवस लागतात?

मित्रांनो, जर कार्ड धारकाने त्याचे सर्व देय रक्कम किंवा थकबाकी पूर्णपणे भरली असेल तर आरबीआय च्या सूचने नुसार, क्रेडिट कार्ड बंद करण्याची कोणतीही विनंती क्रेडिट कार्ड जारीकर्त्या द्वारे सात कामकाजाच्या दिवसांत मान्य केली जाईल. तसेच क्रेडिट कार्ड बंद झाल्यानंतर, कार्ड धारकाला ईमेल, एसएमएस इत्यादी द्वारे कार्ड बंद झाल्याबद्दल ताबडतोब सूचित केले जाईल.

क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी काही शुल्क आकारले जाते का?

नाही. कार्ड बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. तथापि, तुमची कार्ड बंद करण्याच्या विनंतीवर प्रक्रिया करण्याआधी तुम्हाला तुमची थकबाकी क्लीअर करणे आवश्यक आहे.

Tags: SBI Credit Card Band Kase Karayche, SBI Credit Card Close Kase Karayche, SBI Credit card close Mahiti, SBI Credit Card Close information in Marathi, SBI Credit Delete Kase Karayche