स्पीड पोस्ट म्हणजे काय ते कसे करता ? | What is Speed Post in Marathi
स्पीड पोस्ट ही इंडिया पोस्ट द्वारे प्रदान केलेली टपाल सेवा आहे. भारतीय टपाल विभागाने 1986 मध्ये इएमएस स्पीड पोस्ट या नावाने ही सेवा सुरू केली. या सेवेमुळे भारताच्या एका भागातून भारताचा दुसऱ्या भागात कोणतेही पोस्ट पाठवणे शक्य झाले आहे.
आज आपण स्पीड पोस्ट बद्दल माहिती बघणार आहोत. स्पीड पोस्ट म्हणजे काय ? ते कसे करायचे ? आणि स्पीड पोस्ट किती दिवसात पोहोचते ? स्पीड पोस्टला किती पैसे लागतात ? ही सर्व माहिती बघूया.
स्पीड पोस्ट ही भारतीय पोस्ट ची सर्वात वेगवान टपाल सेवा आहे. हे खाजगी पोस्ट पेक्षा जलद आणि सुरक्षित आहे. स्पीड पोस्ट मुळे तुम्ही तुमचे पार्सल सुरक्षितपणे भारतात कोठेही कमी दरात आणि कमी वेळात पाठवू शकता. भारतातील सामान्य लोकांना स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घेता यावा यासाठी हि वन इंडिया वन रेट योजना अत्यंत कमी पैशात फक्त 25 रुपये रकमेसह सुरू करण्यात आली आहे. स्पीड पोस्ट च्या नेटवर्क मध्ये भारतातील 1200 हुन अधिक शहरे समाविष्ट आहे, 290 स्पीड पोस्ट केंद्रे राष्ट्रीय नेटवर्कशी जोडलेले आहेत आणि 1000 स्पीड पोस्ट केंद्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत. आता लोकांना बँक दस्तावेज, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, न्यायालयाच्या अधिकृत सूचना या पोस्टानेच मिळतात.या लेखात म्हटल्याप्रमाणे, तुम्ही स्मार्टफोन्स आणि टॉप ब्रँड्सवरील तुमच्या उपलब्ध डीलची निवड ब्राउझ करू शकता आणि cell phone सेवा योजना एक्सप्लोर करू शकता. सर्वोत्तम आपल्या गरजा भागविण्यासाठी.
स्पीड पोस्ट कसे करता ते पुढीलप्रमाणे
How to do Speed Post in Marathi
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला जे पार्सल पाठवायच आहे, तेवढा लिफाफा घ्या. आणि लिफाफा घेताना टपाल मार्गदर्शक आणि सांगितलेल्या आकाराचा असावा. त्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मधूनच लिफापा विकत घ्यावा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
स्टेप 2: यानंतर तुम्हाला लिफाफा च्या वरच्या बाजूस फ्रॉम ऍड्रेस आणि टू एड्रेस टाकावा लागेल. लिफाफा च्या वरच्या बाजूला स्पीड पोस्ट असे लिहावे. जर तुम्ही बाहेरून लिफाफा घेत असाल तर तुम्हाला To आणि From पत्ता काळजीपूर्वक भरावा लागेल.
स्टेप 3: नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यामुळे तुमच पार्सल योग्य ठिकाणी पोहोचेल.
स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला लिफाफा पोस्टमध्ये जे कर्मचारी यांच्याकडे द्यायचा आहे, ते त्या पार्सल चे वजन करून त्याचे पैसे तुमच्या कडून घेतले जातील आणि तेथील कर्मचारी तुमचे शिपिंग लेबल प्रिंट त्याला लावतील.
स्टेप 5: तुम्हाला एक पावती मिळेल त्यामधे तुमच्या पार्सल चा कन्साईंमेंट नंबर (Consignment Number) लिहिलेला असेल. या कन्साईंमेंट नंबर मुळे तुम्ही तुमच्या पार्सल वर लक्ष ठेवू शकता आणि पार्सल ट्रेकिंग पण करू शकता म्हणून ही पावती सांभाळून ठेवावी.
आपण स्पीड पोस्ट मुळे भारतभर कमी वेळेत पस्तीस किलोपर्यंत पत्रे आणि पार्सल पाठवू शकतो. ही एक परवडणारी सेवा आहे. जी संपूर्ण भारतात 50 ग्रॅम पर्यंतच्या मालाची 15 रुपयांमध्ये वितरण करते.
स्पीड पोस्ट मध्ये किती वजन असल्यास किती पैसे लागतात ते बघूया:-
स्थानिक
- 50 ग्रॅम पर्यंत 15 रू.
- 51 ग्रॅम ते 200 ग्रॅम 30 रू.
- 201 ग्रॅम ते 500 ग्रॅम 30 रू.
- अतिरिक्त 500 ग्रॅम किंवा त्याचा काही भाग 10 रू.
200 कीमी पर्यंत
- 50 ग्रॅम पर्यंत 35 रू.
- 51 ग्रॅम ते 200 ग्रॅम 35 रू
- 201 ते 500 ग्रॅम 50 रू.
- अतिरिक्त 500 ग्रॅम किंवा त्याचा काही भाग 15 रू.
स्पीड पोस्ट ही विश्वासातील सेवा आहे. तुमच्या काही वस्तूंचे नुकसान किंवा चोरी झाली तर दंडाच्या स्वरूपात पैसे ग्राहकांना दिले जाता. यामध्ये तुम्हाला स्पीड पोस्ट ट्रॅकिंग आणि सेफ्टी इन्शुरन्स देखील दिला जातो. स्थानिक शहरात एक ते दोन दिवस वेळ लागतो. मेट्रो शहरात एक ते तीन दिवस लागतात. एका राज्याच्या राजधानीतून दुसऱ्या राज्याच्या राजधानीपर्यंत एक ते चार दिवस लागतात.
स्पीड पोस्ट ट्रॅक कसे करायचे ते पुढीलप्रमाणे
How to track Speed Post in Marathi
जर तुम्हाला तुमचे पार्सल ट्रेक करायचे असेल तर स्पीड पोस्टवर तुम्हाला एक ट्रेकिंग नंबर मिळेल त्याद्वारे तुम्ही तुमचं पार्सल कुठे आहे ते बघू शकता.
स्टेप 1: गुगल क्रोम मध्ये Speed Post Tracking हे टाकायचे आहे.
स्टेप 2: नंतर तुम्हाला Track Consignment वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: आता तुम्हाला जो ट्रेकिंग नंबर दिलेला आहे तो ट्रेकिंग नंबर तेथे टाकायचा आहे. व नंतर कॅपचा टाकून सर्च ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
अशाप्रकारे तुम्ही स्पीड पोस्ट करू शकता.