तुमचा फोन चोरीला गेल्यानंतर हे काम आधी करा | How To Block Stolen Phone using IMEI Number

आज-काल प्रत्येक जणाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातच मोबाईल पासून होत असते. आत्ताशी अनेक काम मोबाईलच्या माध्यमातून पटकन होतात. मोबाईल फोन मुळे आपल्याला अनेक गोष्टी सोयीस्कर झालेले आहेत. तसेच अनेक प्रकारची हानी देखील या मोबाईल मुळे होत आहे. डिजिटल युगात आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी एटीएम पिन नंबर, बँक अकाउंट नंबर, पासपोर्ट अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मोबाईल मध्ये सेव्ह केलेले असतात. पण जर कधी आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला, तर आपला जीव जातो. काय करावं सुचत नाही. तर अशा वेळेस काय करावं हे, या लेखात सांगितले आहे ते काळजीपूर्वक वाचा.

How To Block Stolen Phone using IMEI Number in Marathi

मित्रांनो कधी जर तुमचा मोबाईल फोन चोरीला गेला किंवा हरवला, तर सर्वप्रथम त्यामध्ये असलेले सिम कार्ड बंद करायचे. सिम कार्ड बंद केल्यानंतर एक पोलिस कंप्लेंट करा. पोलिस कंप्लेंट केल्यानंतर त्या कंप्लेंट च्या आधारे जे मोबाईल मध्ये सिम कार्ड होते, त्याच नंबर चे नवीन सिमकार्ड विकत घ्या. नंतर नवीन चालू करा.



आता या आधारे तुम्हाला तुमचं चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक करायचा आहे. तर तो मोबाईल फोन कसा ब्लॉक करायचा आणि जर कदाचित तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन परत कसा चालू करायचा, हे आपण पाहू या.

हरवलेला फोन ब्लॉक करणे

How To Block Stolen Phone Online

मित्रांनो सर्वप्रथम क्रोम ब्राउजर वर यायचा आहे, त्यात www.ceir.gov.in ही लिंक शोधा. या साईटच्या माध्यमातून आपण आपला हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन ब्लॉक कसा करायचा किंवा ब्लॉक केलेला मोबाईल फोन चालू कसा करायचा हे पाहू शकतो. आता या पोर्टल वर आल्यावर तुम्हाला
तीन ऑप्शन दिसतील.



  • Block stolen / Lost Mobile
  • Un-block Found Mobile
  • Check Request Status

तर आपल्याला आपल्या चोरीला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करायचा आहे. यासाठी पहिला ऑप्शन Block stolen / Lost Mobile

How To Block Stolen Phone using IMEI Number in Marathi Step 1

या ऑप्शन वर क्लिक करा. ऑप्शन वर क्लिक केल्यावर नवीन पेज चालू होईल. त्यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, जो की तुम्ही त्या मोबाईल मध्ये वापरत होता. दोन सिम कार्ड वापरत असाल, तर दोन्ही मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आय एम ई आय नंबर टाका. जर आय एम ई आय नंबर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. ज्या ठिकाणी * (star) केलेले आहे, ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरावी लागेल. त्यानंतर कोणत्या कंपनीचा मोबाईल होता ते डिवाइस ब्रँड मध्ये टाका. नंतर डिवाइस मॉडेल टाका.

How To Block Stolen Phone using IMEI Number in Marathi Step 2

तुमच्याकडे मोबाईल विकत घेतलेले बिल असेल तर ते अपलोड करा. आता ही माहिती भरल्यानंतर मोबाईल कुठे हरवला, ही माहिती Lost Information यामध्ये भरायचे आहे. नंतर Lost Place, Lost Date, State, District, ज्या भागात मोबाईल हरवला ते पोलीस स्टेशन निवडा, नंतर मोबाईल कंप्लेंट नंबर टाका, आणि पोलीस कंप्लेंट केल्याची पावती अपलोड करायची आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर अजून काही माहिती द्यायची असेल तर Add More Complaint या ऑप्शनवर क्लिक करून अपलोड करू शकता.

How To Block Stolen Phone using IMEI Number in Marathi Step 3

आता ही माहिती भरल्यानंतर ज्याच्या नावावर मोबाईल होता, त्या व्यक्तीची माहिती भरायची आहे. नाव, पत्ता, ओळख पत्र अपलोड करायचा आहे ( Pan Card, Voter Id, Adhara Card, Driving License ) जे ओळखपत्र अपलोड केलं, त्याचा नंबर पुढच्या बॉक्समध्ये नंबर भरायचा आहे. नंतर तो मोबाईल नंबर वरती टाकला आहे, तो नंबर आपोआप येईल. नंतर Get OTP या ऑप्शन वर क्लिक करा. नंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. OTP या बॉक्स मध्ये टाकून Verify ऑप्शन वर क्लिक करा. नंतर सर्व माहिती परत एकदा चेक करा. माहिती चेक करून झाल्यानंतर डिक्लेरेशन ऑप्शन वर टिक करून सबमिट बटन वर क्लिक करा. आता तुमचा मोबाईल 24 तासाच्या आत ब्लॉक होऊन जाईल.

How To Block Stolen Phone using IMEI Number in Marathi Step 4

चोरीला गेलेल्या फोनचा स्टेटस चेक करणे

Stolen Phone Status Check on ceir.gov

यानंतर तुम्ही जी माहिती सबमिट केली आहे. त्याची एक रिक्वेस्ट आयडी तुम्हाला मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला इथे तीन नंबर चे ऑप्शन Check Lost / Stolen Mobile क्लिक करून Request Status वर क्लिक करायचा आहे. खाली रिक्वेस्ट आयडी टाकून सबमिट ऑप्शन वर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचे सर्व माहिती मिळून जाईल.

चोरीला गेलेल्या फोन Unblock करणे

पण आता जर तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल सापडला असेल, तर तुम्ही ब्लॉक केला आहे तर तो परत unblock करण्यासाठी दोन नंबर चा ऑप्शन वर क्लिक करा. ( Request for understanding blocking recovered / Found mobile)

आता या मध्ये परत तुम्हाला रिक्वेस्ट आयडी टाका. नंतर ज्यावेळी मोबाईल ब्लॉक केला, त्यावेळचा मोबाईल नंबर टाका. तर तुम्हाला तुम्ही का unblock करत आहात त्याचे कारण (recovered by police / found by self / blocked by mistake) या पैकी एक कारण निवडा. नंतर मोबाईल नंबर टाकून गेट ओटीपी ऑप्शन वर क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर ओ टी पी टाकून ओटीपी व्हेरिफाय करा. आणि सबमिट ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल परत unblock होऊन जाईल.

तर अशाप्रकारे हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल block किंवा unblock करू शकता.