Meesho / मिशो अँप वरून ऑनलाइन शॉपिंग कशी करायची | How to Order in Meesho

नमस्कार मित्रांनो, शॉपिंग म्हटलं की कोणाला नाही आवडत, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळी पर्यंत सगळ्यांनाच शॉपिंग करायला आवडते. पण दुकानात जाऊन शॉपिंग करण्या पेक्षा अधिक सोपा आणि परवडण्या सारखा मार्ग म्हणजे ऑनलाइन शॉपिंग करणे होय.

आज काल जास्त करून सगळेच ऑनलाइन शॉपिंग करतात. कारण तिथे खूप साऱ्या व्हरायटिझ बघायला मिळतात, आणि एखादे प्रॉडक्ट न आवडल्यास परत रिटर्न सुध्दा करता येते. म्हणूनच जास्तीत जास्त लोक ऑनलाइन शॉपिंग करताना दिसतात. असेच एक अँप आहे मिशो अँप (Meesho App) जे खूप चांगली सर्विस देते. तसेच मिशो चे कमी दरात चांगले प्रॉडक्ट मिळतात म्हणून लोकांचा याकडे कल जास्त असतो. तसेच मिशो वरून शॉपिंग करणे लोक अधिक पसंत करतात.



पण हे मिशो meesho app नक्की आहे तरी काय व त्यावरून शॉपिंग किंवा ऑर्डर कशी करायची हे आपण जाणून घेऊया…

मिशो अँप म्हणजे काय, हे अँप के काम करते

मित्रांनो, मिशो हे एक रिसेलिंग (Reselling) अँप आहे ज्यात सर्व प्रकारच्या छोट्या व मोठ्या होलसेल कंपन्यांचे प्रॉडक्ट्स विकले जातात. मिशो ची स्थापना 2015 साली करण्यात आली असून त्याचे हेड ऑफिस बेंगलोर येथे आहे. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारखेच हे सुद्धा एक शॉपिंग अँप आहे जे तुम्हाला ऑनलाइन खरेदी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात.

मिशो अँप वरून ऑनलाइन शॉपिंग कशी करायची

मित्रांनो, मीशो वरून ऑनलाइन शॉपिंग (खरेदी) करण्याआधी तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन सर्च बटन वर क्लिक करून मिशो (Meesho) नाव टाइप करा. व तिथे तुम्हाला मिशो ऑनलाइन शॉपिंग अँप असे येईल व नंतर त्यावर क्लिक करून इन्स्टॉल बटणा वर क्लिक करून हे अँप डाउनलोड करून घ्या.



How to Order in Meesho Marathi Step 1

नंतर अँप ओपन होईल व सर्वात पहिले तुम्हाला तुमचे लिंग (Gender) सिलेक्ट करायचे आहे.

How to Order in Meesho Marathi Step 2

आता मिशो चे होम पेज ओपन होईल. कोणतीही शॉपिंग करण्याआधी तुम्हाला तुमचे मिशो अकाऊंट तयार करावे लागेल. त्यासाठी उजवी कडे खाली दिलेल्या अकाऊंट या ऑपशन वर क्लिक करा.

How to Order in Meesho Marathi Step 3

आता तुम्हाला साइन अप (Sign Up) करायचे आहे.

How to Order in Meesho Marathi Step 5

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व Send OTP वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या मोबाइलला नंबर वर एक OTP येईल तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाका. आता Meesho App वर तुमचे अकाउंट तयार झाले आहे.

How to Order in Meesho Marathi Step 4

आता तुम्ही Meesho App वरून ऑनलाइन शॉपिंग करू शकता.

मिशो अँप वरून शॉपिंग करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मिशोच्या होम स्क्रीन वर तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट्स दिसतील, जसे की साडी, कुर्ती, ड्रेस मटेरियल, शर्ट पॅनट्स, जीन्स वगैरे.. या items वर क्लिक करून तुम्ही त्यात अनेक व्हरायटिझ बघू शकता किंवा सर्च बटण वर क्लिक करून तुम्हाला हवं ते प्रॉडक्ट सर्च करू शकता.

How to Order in Meesho Step 1

स्टेप 2: समजा तुम्ही कुर्ती सिलेक्ट केली आहे. सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला अनेक प्रकार च्या कुर्तीझ बघायला मिळतील. त्यातून तुम्हाला आवडेल तो आयटम सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे तुम्हाला त्या कुर्तीची किंमत (Price) दिसेल.

तसेच थोडं खाली आल्या वर तुम्हाला साईझ सिलेक्ट करायची आहे. जसे की S ,M, XL, XXL, etc..यापैकी तुमची साईझ सिलेक्ट करून ऍड टू कार्ट (Add to Cart) वर क्लिक करायचे आहे. व Continue वर क्लिक करायचे आहे.

How to Order in Meesho Step 2

स्टेप 3: यानंतर तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स (Contact Details) द्यायचे आहेत. त्यात तुमचं नाव, मोबाईल नंबर, ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस मध्ये तुमचे घराचे किंवा बिल्डिंगचे पूर्ण नाव व नंबर त्यासोबतच जवळचा एखादा ल्यांड मार्क (land mark) व एरियाचे नाव व स्ट्रीट नेम, पिन कोड, सिटी नेम व स्टेट नेम ही सर्व माहिती टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर save address and continue वर क्लिक करायचे आहे.

How to Order in Meesho Step 5

स्टेप 4: नंतरच्या पेज वर तुम्हाला पेमेंट मेथड (Payment Method) सिलेक्ट करायची आहे. यात ऑनलाइन पेमेंट मध्ये तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता. किंवा कॅश व डिलीव्हरी मध्ये प्रॉडक्ट तुम्हाला डिलीव्हर झाल्या वर पैसे देऊ शकता.

How to Order in Meesho Step 4

तुमची जर ही फर्स्ट ऑर्डर असेल तर तुम्हाला 100 रुपयांचा डिस्काउंट मिळतो.

स्टेप 5: तर पेमेंट मेथड सिलेक्ट केल्या वर Continue वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे व नंतर तुम्हाला ऑर्डर कन्फर्म असा मेसेज येईल. तेव्हा तुमची ऑर्डर कन्फर्म झाली असे समजा.

मित्रांनो, तुम्हाला तर तुमची ऑर्डर ट्रेस (Trace) करायची असेल तर मिशो च्या होम स्क्रीन वर येऊन खाली ऑर्डर ऑपशन वर क्लिक करा. तुमची केलेली ऑर्डर दिसेल त्यावर क्लिक करा व तिथुन तुमची ऑर्डर तुम्हाला ट्रेस करता येईल म्हणजे तुमची ऑर्डर कुठं पर्यंत आली आहे हे समजेल.

याशिवाय जर तुम्हाला तुमची ऑर्डर कॅन्सल ( Cancel ) करायची असेल तर Cancel या ऑपशन वर क्लिक करून ऑर्डर कॅन्सल करण्याचे कारण तिथे मेंशन करा व तुमची ऑर्डर कॅन्सल होऊन जाईल. जर तुम्ही पेमेंट केले असेल तर सात दिवसांच्या आत तुमचे पैसे तुमच्या अकाउंट ला रिफंड होऊन जातील.

तर मित्रांनो, असे हे मिशो अँप (Meesho App) सर्वांचे पसंतीचे ऑनलाइन शॉपिंग अँप आहे जिथे कोणतीही वस्तू अगदी स्वस्त व होलसेल च्या दरात मिळते.

आशा आहे की तुम्हाला आजचा हा लेख नक्कीच आवडला असेल व तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद!