झोमॅटो अँप वर जेवण कसे ऑर्डर करायचे | How To Order Food From Zomato App

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात नवीन तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, आपण कोणतीही वस्तू अगदी घरबसल्या मिळवू शकतो. मग ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, फर्निचर असो, कपडे असो किंवा ज्वेलरी असो, कोणत्याही प्रकारची वस्तू आपण ऑनलाइन खरेदी करू शकतो. एवढेच नाही तर तुम्ही घरी बसून जेवण सुद्धा ऑर्डर करू शकता.हो, अगदी खरं आहे की, तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या आवडीचे जेवण करू शकता. त्यासाठी तुम्हाला झोमॅटो अँप (Zomato App) मदत करेल. हो मित्रांनो, Zomato app वरून तुम्ही तुमच्या आवडीचे जेवण ऑर्डर करू शकता व त्याचा मनमुरादपणे आस्वाद घेऊ शकता.

ऑनलाइन जेवण मागवल्याने तुमचा वेळ वाचतो शिवाय तुम्हाला कोणतेही कष्ट न करता तुमच्या आवडीची जेवण थेट तुमच्या घरापर्यंत पोहचते. अश्या भरपूर कंपन्या आहेत जे ऑनलाइन फूड मागवण्याची सुविधा देतात. पण आज आपण Zomato बद्दल जाणून घेणार आहोत.पण मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल की हे Zomato App कसे वापरायचे, त्यावरून जेवण कसे ऑर्डर करायचे तर हा आजचा लेख खास तुमच्या साठी आहे. चला तर मग जाणून घेऊया की झोमॅटो वरून ऑर्डर कशी करायची. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा . यात तुम्हाला त्या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

झोमॅटो (Zomato) म्हणजे काय

मित्रांनो, झोमॅटो वर ऑर्डर करण्याआधी झोमॅटो म्हणजे नक्की आहे तरी काय हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

तर मित्रांनो, Zomato ही एक भारतीय फूड डिलिव्हरी कंपनी आहे जी ऑर्डर केलेले फूड तुमच्या घरा पर्यंत जलद आणि सुरक्षित रित्या पोहोचवते. झोमॅटो ची सुरवात 2008 साली झाली व त्याचे मुख्यालय हे गुरुग्राम , हरियाणा येथे आहे. झोमॅटो चे पूर्ण भारत भर खूप ब्रांचेस आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या एरिया पर्यंत झोमॅटो त्याची सेवा पुरवत असते, त्यामुळे लोकांना हे झोमॅटो अँप खूप आवडते. याशिवाय या झोमॅटो अँप मधून फूड ऑर्डर केल्या वर तुम्हाला भरपूर कॅश बॅक सुद्धा मिळतो. जेणेकरून ऑर्डर केलेले फूड तुम्हाला योग्य त्या दरात मिळते. म्हणजेच तुम्हाला जास्त खर्च करावा लागत नाही.झोमॅटो (Zomato) वरून जेवण ऑर्डर कसे करायचे

मित्रांनो, झोमॅटो अँप वरून जेवण मागवण्यासाठी, तुम्हाला खलील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील…

स्टेप 1: Zomato वरून जेवण ऑर्डर करण्यासाठी, सर्वात पहिले तुम्हाला Google Play Store वरून Zomato app डाउनलोड करावे लागेल.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 1

स्टेप 2: झोमॅटो अँप डाउनलोड केल्यानंतर, ते ओपन करायचे आहे. व साइन अप (Sign Up) करायचे आहे, म्हणजेच तुमचे अकाउंट अँप मध्ये तयार करायचे आहे. साइन अप करण्यासाठी चार पर्याय दिलेले असतील.

 • फोन नंबर (Phone Number)
 • फेसबुक (Facebook)
 • गूगल (Google)
 • जीमेल (G- mail)
How To Order Food From Zomato App in Marathi Step 2

या चार पैकी कोणत्याही एका पर्याय निवडून तुम्ही Zomato वर तुमचे खाते ओपन करू शकता. तुम्ही जर मोबाईल नंबरने तुमचे खाते ओपन करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या बॉक्स मध्ये टाकावा लागेल, व त्यानंतर तुमचे Zomato खाते ओपन होईल.

स्टेप 3: खाते तयार केल्यानंतर, तुम्हाला तुमचे वर्तमान स्थान म्हणजे Current Location निवडायचे आहे. तुम्ही जेव्हा Current Location बटन वर क्लिक करता तेव्हा अँप ऑटोमॅटिक तुमची लोकेशन निवडते. जर तुम्हाला तुमची लोकेशन स्वतः निवडायची असेल तर Select your location Manually बटन वर क्लिक करा.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 3

स्टेप 4: यानंतर आता तुम्ही झोमॅटो च्या होम पेज वर पोहचाल. इथे आल्या वर तुम्ही Search बटन वर क्लिक करून तुमचे आवडते रेस्टॉरंट व आवडता पदार्थ शोधू शकता.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 4

स्टेप 5: समजा तुम्हाला पाव भाजी ऑर्डर करायची आहे. तर पाव भाजी नाव टाका. त्यानंतर पाव भाजी चे अनेक व्हरायटिझ दिसतील जसे की पाव भाजी, बटर पाव भाजी, चीझ पाव भाजी वगैरे… त्यापैकी तुम्हाला हवं ते निवडा. व Add+ वर क्लिक करा. किंवा तुम्हाला तुमच्या जवळच्या एखाद्या प्रसिद्ध हॉटेल मधून जेवण मागवायचं असेल तर त्या हॉटेल च नाव Search करून त्या हॉटेल मधले जेवण मागवू शकता.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 5

स्टेप 6: आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला जे एक्सट्रा पाव मागवायचे असतील तर त्यावर एक्सट्रा किती पाव पाहिजे ते निवडा त्यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागतील व पुन्हा Add to Cart बटन वर क्लिक करा. तुमचा मेनू ,कार्ट मध्ये ऍड होऊन जाईल.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 6

स्टेप 7: आता View Cart वर क्लिक केल्या वर तुम्हाला निवडलेल्या पदार्था वर किती डिस्काउंट (Discount) मिळाला आहे, तुमचे डिलीव्हरी चार्जेस किती आहे, व तुमची टोटल अमाउंट (Total amount) किती झाली हे दिसेल.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 7

तुम्हाला त्या मध्ये View offers म्हणून ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक केल्या वर तुम्हाला प्रोमो कोड दिसेल. तुमच्या पदार्थ नुसार जर तो प्रोमो कोड Apply होत असेल तर त्याचा वापर करावा.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 7 Part 2

स्टेप 8: आता तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स (Personal Details) टाकावे लागतील. त्यासाठी त्या बटण वर क्लिक करा. नंतर व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तो टाकल्या वर तुम्हाला एक OTP येईल. दिलेल्या बॉक्स मध्ये तो OTP टाका.

स्टेप 9: आता तुम्हाला तुमचे करंट लोकेशन (current location) टाकायचे आहे. करंट लोकेशन वर ऑर्डर पॉसिबल असेल तर तुम्हाला कन्फर्म (confirm) बटण वर क्लिक करायचे आहे. नाहीतर तुम्हाला ते लोकेशन चेंज करावे लागेल.

स्टेप 10: लोकेशन दिल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता (full address details) टाकायचा आहे.
यामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ऍड्रेस म्हणजे घराचे पूर्ण नाव, तुम्ही जर बिल्डिंग मध्ये राहत असाल तर बिल्डिंग चे पूर्ण नाव, कोणत्या फ्लोर ला राहता तो नंबर, फ्लॅट चा नंबर, तसेच तुमचे जवळचे ल्यांड मार्क (land mark), किंवा area चे नाव व स्ट्रीट नेम टाकायचे आहे.

स्टेप 11: या नंतर तुम्हाला payment method सिलेक्ट करायची आहे. इथे तुम्ही ऑनलाइन pay करू शकता. किंवा कॅश ऑन डिलीव्हरी सुद्धा सिलेक्ट करू शकता. या नंतर तुम्हाला तुमची ऑर्डर प्लेस (order place) करायची आहे.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 11

या नंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होऊन जाईल. व तुमची ऑर्डर कोणाकडे गेली आहे, तसेच डिलीव्हरी बॉय चे नाव व लोकेशन तुम्हाला दिसेल. तसेच मॅप वर तुम्ही डिलीव्हरी बॉय ला बघू शकता.

How To Order Food From Zomato App in Marathi Step 11 Part 2

झोमॅटो काम कसे करते

मित्रांनो, झोमॅटो म्हणजे काय, झोमॅटो वरून फूड कसे ऑर्डर करायचे हे आपण बघितले. आता हे झोमॅटो काम कसे करते ते बघूया…

मित्रांनो, झोमॅटो चे ऑफिस सगळी कडे आहे व त्यांचे डिलीव्हरी बॉईज सुद्धा असतात. जेव्हा एखादी व्यक्ती झोमॅटो वरून फूड ऑर्डर करते तेव्हा झोमॅटो ला माहीत असते की ऑर्डर कोणी केली, के केली, कोणत्या रेस्टॉरंट मधून केली, ऑर्डर कुठे पोहचवायची आहे ही सगळी माहिती झोमॅटो जवळ असते.

आता झोमॅटो ही सगळी माहिती जवळच्या एका डिलीव्हरी बॉय ला रेफर करतो. हा डिलीव्हरी बॉय ऑर्डर मिळाल्या वर त्या रेस्टॉरंट पर्यंत जाऊन तुमची ऑर्डर तयार करण्यास सांगतो व तुमच्या लोकेशन पर्यंत म्हणजेच तुमच्या घरा पर्यंत आणून देतो. जर त्या डिलीव्हरी बॉय ला तुमचे लोकेशन शोधण्यास अडचण येत असेल तर तो तुम्हाला कॉल करतो व तुमची मदत घेतो. आणि तुमची ऑर्डर तुम्हाला देतो.

झोमॅटो वरून फूड ऑर्डर करण्याचे फायदे

 • मित्रांनो, झोमॅटो वरून ऑर्डर केल्यास तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेत तर कधी कधी वेळेच्या आधी सुद्धा मिळते. म्हणजेच झोमॅटो ची डिलिव्हरी खूप फास्ट आहे.
 • झोमॅटो वर डिलीव्हरी चार्जेस कमी लागतात.
 • झोमॅटो वर कमी किंमतीत जेवण मिळते.
 • झोमॅटो वरील कूपन चा वापर करून तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळतो ज्यामुळे तुमचे काही पैसे वाचतात.
 • झोमॅटो छोट्यातल्या छोट्या एरिया पर्यंत आपली सर्व्हिस पोचवतो.
 • झोमॅटो वर कॅश ऑन डिलीव्हरी ची सुद्धा सुविधा आहे.
 • झोमॅटो ची सेवा 24 तास उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही कधीही , केव्हाही ऑर्डर करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण झोमॅटो म्हणजे काय, झोमॅटो वरुन ऑर्डर कसे करायचे, झोमॅटो काम कसे करते, झोमॅटो वापरण्याचे फायदे अश्या सगळ्या गोष्टीं बद्दल माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला आजचा लेख आवडला असेल. तर मग वाट कसली बघता आजच झोमॅटो अँप डाउनलोड करा व तुमचे आवडते फूड ऑर्डर करा व घर बसल्या त्याचा आस्वाद घ्या.
धन्यवाद!