एक्सिस बँकेतील मोबाईल नंबर कसा बदलायचा ? 2 मिनिटात

एक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. एक्सिस बँक ग्राहकांना अनेक ऑनलाइन सेवा आणि सुविधा देते. या सेवा वापरून तुम्ही तुमचा बँकेला लिंक असलेला मोबाईल नंबर सहज बदलू/अपडेट करू शकता. या ब्लॉग मध्ये आपण एक्सिस बँकेतील मोबाईल नंबर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कसा बदलू शकतो ते बघणार आहोत.

सर्वात प्रथम आपण वेगवेगळ्या ऑनलाईन पद्धतीने एक्सिस बँकेतील मोबाईल नंबर कसा बदलायचा ते बघुयात. तर ऑनलाईन नंबर बदलण्यासाठी तुमच्याकडे एक्सिस बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा चालू लागते, जर नसेल तर काळजी करू नका खाली ATM मधून कसा नंबर चेंज करायचा ते दिलेले आहे.



इंटरनेट बँकिंग वापरून

How to change Mobile Number in Axis Bank using Net Banking

एक्सिस बँकेत तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईन बदलण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा –

स्टेप 1: सर्वात प्रथम Axis बँकच्या इंटरनेट बँकिंग लॉगिन पोर्टलवर जा – retail.axisbank.co.in



स्टेप 2: तुमची लॉगिन माहिती टाईप करा आणि तुमच्या इंटरनेट बँकिंग अकाउंट लॉग इन करा.

स्टेप 3: आता Personal Details या ऑपशन वर क्लिक करा.

How to change Mobile Number in Axis Bank using Net Banking

स्टेप 4: आता Contact Number ऑपशन वर क्लिक करा.

स्टेप 5: नवीन पेज वर तुमचा नवीन मोबाइल नंबर टाका. आणि Update बटन वर क्लिक करा.

स्टेप 6: आता नवीन मोबाइल नंबर वर OTP येईल. तो OTP खालच्या बॉक्स मध्ये टाका. आणि Update Mobile Number बटन वर क्लिक करा.

अशा तह्रेने तुम्ही Axis बँकेचा मोबाइल नंबर बदलू शकता. जर तुम्हाला मोबाइल नंबर बदलण्यामध्ये काही अडचण येत असेल तर खाली दिलेला दुसरा पर्याय वाचा.

ATM वापरून Axis Bank मधला मोबाईल नंबर कसा बदलायचा ?

आता तुम्ही कोणत्याही Axis बँकेच्या ATM वापरून तुमच्या Axis बँकेला लिंक असलेला मोबाइल नंबर बदलू/अपडेट करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप वाचा.

How to change Mobile Number in Axis Bank using ATM

स्टेप 1: तुमच्या जवळच्या Axis बँकेच्या ATM वर जा.

स्टेप 2: मशीन मध्ये कार्ड टाका आणि नंतर तुमचा चार अंकी पिन

स्टेप 3: आता तुमच्यासमोर भरपूर ऑपशन येतील, त्यातील Registration ऑपशन वर क्लिक करा.

स्टेप 4: आता Change Mobile Number ऑपशन वर क्लिक करा.

स्टेप 5: आता तुमच्यासमोर एक मेसेज येईल

A/C no. XXXXXXXX is registered with mobile 9999999999 do you want to update?

याचा अर्थ – XXXXXXXX या अकाउंट नंबरचा हा 9999999999 मोबाइल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे का?

स्टेप 6: आता Update ऑपशन निवडा

स्टेप 7: आता नवीन मोबाइल नंबर टाईप करा आणि Confirm ऑपशन वर क्लिक करा.

स्टेप 8: परत एकदा तुमचा नवीन मोबाइल नंबर टाईप करा आणि Update ऑपशन वर क्लिक करा.

एक्सिस बँक साधारण एका दिवसात तुमचा नवीन मोबाईल नंबर बदलते/अपडेट करते.

बँकेत जाऊन एक्सिस बँकेतील मोबाईल नंबर कसा बदलायचा?

वरच्या कोणत्याच पर्यायाने जर तुमचा मोबाइल नंबर बदलला नाही तर तुम्हाला तुमच्या जवळच्या एक्सिस बँकेत जाऊन तो बदलावा लागेल.

  1. तुमच्या एक्सिस बँकेच्या शाखेत जा. बँकेच्या मदतनीस कर्मचाऱ्याला भेटा.
  2. त्यांना तुमची समस्या सांगा. नंतर ते KYC अपडेट फॉर्म तुम्हाला देतील. किंवा मोबाइल नंबर चेंग करण्यासाठी एक अँप्लिकेशन लिहून द्यायला सांगतील.
  3. KYC फॉर्म मध्ये माहिती भरा आणि तुम्हाला नवीन मोबाईल टाकायला विसरू नका.
  4. आता तो फॉर्म बँकेच्या कर्मचाऱ्याला द्या.

अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक्सिस बँकेतील मोबाइल नंबर बदलू शकता. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा.