SBI बँकेचा CIF नंबर म्हणजे काय ? तो कसा मिळवायचा/ शोधायचा

आज आपण SBI CIF नंबर म्हणजे काय ? SBI CIF नंबर ऑनलाइन आणि ऑफलाइन कसा शोधायचा ते बघणार आहोत.

SBI ही भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे. SBI आपल्या ग्राहकांना अनेक ऑनलाइन, ऑफलाइन सेवा आणि सुविधा देते. SBI बँकेच्या काही खास सेवांचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या खात्याचा CIF नंबर माहित असणे आवश्यक आहे. हा नंबर प्रत्येक ग्राहकासाठी युनिक असतो आणि बँकेतील सर्व खात्यांसाठी दिलेला असतो.



CIF नंबर म्हणजे काय ? SBI बँकेत CIF नंबरचा पूर्ण फॉर्म काय ?

CIF म्हणजे ग्राहक माहिती फाइल (Customer Information File) नंबर. हा नंबर SBI प्रत्येक ग्राहकाला देते आणि तो युनिक असतो. CIF नंबर SBI बँकेच्या डेटाबेसमध्ये तुमची सर्व वैयक्तिक आणि खात्या संबंधित माहिती संग्रहित (साठवून) ठेवतो. हा नंबर तुमचे खाते ओळखण्यात आणि बँकेच्या सर्व व्यवहारांचा मागोवा घेण्यास मदत करतो. साधारणपणे, हा CIF नंबर ग्राहकांच्या कामी येत नाही, परंतु काही वेळेस बँकेतील व्यवहार करण्यासाठी त्याची गरज लागते.

CIF नंबरची गरज कुठे लागते ?

जर तुम्ही SBI बँकेच्या एक शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते ट्रान्सफर करत असाल, त्या वेळेस CIF नंबरची गरज असते. तर आता तुमचा SBI CIF नंबर ऑनलाइन आणि ऑफलाइन कसा मिळवायचा/ शोधायचा ते बघू.

SBI बँकेचा CIF नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे यातील एक माहिती लागेल – 1) पासबुक 2) इंटरनेट बँकिंग



How to get SBI CIF number Online and Offline

SBI CIF नंबर पासबुक वर शोधा

  1. पासबुक चे पहिले पण उघडा.
  2. आता अकाउंट नंबर च्या वरती तुम्हाला तुमचा CIF नंबर भेटून जाईल.
Find CIF Number of SBI Passbook

जर तुमच्याकडचे पासबुक फाटले किंवा खराब झाले असेल तर बँकेत जाऊन तुम्ही CIF नंबर विचरू शकता.

इंटरनेट बँकिंगमधून SBI चा CIF नंबर कसा मिळवायचा/ शोधायचा

  1. सर्वात प्रथम तुम्हाला SBI च्या नेट बँकिंग वेबसाईट वर जायचे आहे – www.onlinesbi.com
  2. नंतर तुमचा नेट बँकिंग युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  3. आता डाव्याबाजूच्या मेनू वर क्लिक करा. आणि Account Statement ऑपशन वर क्लिक करा.
SBI Account Statement Option
  1. खाते क्रमांक निवडा आणि अकाउंट स्टेटमेंट कालावधी निवडा. आणि नंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
  2. आता तुमच्यासमोर अकाउंट स्टेटमेंटचा टेबल उघडेल. त्यामध्ये बॅलन्स नंतर तुम्हाला CIF No. भेटून जाईल.
Find CIF number on SBI Account Statement

हेही वाचा – SBI बँक खाते बॅलन्स कसा चेक करायचा | Check SBI Bank Account Balance in Marathi

SBI कस्टमर केअर हेल्पलाइन नंबरवरून

जर बँक बंद असेल किंवा तुम्ही बँकेपर्यंत पोहचू शकत नसाल तर, SBI कस्टमर केअर हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तुम्ही तुमचा CIF नंबर विचारू शकता.

SBI Customer Care Number – 1800112211 / 18004253800

अशा प्रकारे आज आपण SBI बँकेच्या CIF Number विषयी माहिती घेतली. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धान्यवाद