BookmyShow वरती ऑनलाइन मूव्हीचे तिकीट कसे बुक करायचे | BookmyShow Ticket Booking Process Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण BookmyShow वरती ऑनलाइन मूव्हीचे तिकीट कसे बुक करायचे हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, मूव्ही बघायला कुणाला नाही आवडत, प्रत्येकाला मूव्ही बघायला आवडत. काही जण मोबाईल वर मूव्ही बघतात तर काही जण टीव्ही वर पण मूव्ही बघण्याची सर्वात जास्त मज्जा तर थेटर किंवा सिनेमा हॉल मध्ये जाऊन बघण्यात आहे. थेटर मध्ये मुवी बघायचा म्हणजे त्यासाठी तिकीट काढावे लागते. आणि तिकीट काढण्यासाठी लांब अश्या लाइन मध्ये उभे रहावे लागते जे सर्वात कंटाळवाणे काम असते.
पण मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका या कंटाळवाण्या कामातुन आज मी तुमची सुटका करणार आहे. ती कशी ? तर ते अगदी सोपं आहे, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून ऑनलाइन मूव्ही चे तिकीट बुक करू शकता. ते कसे करायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.
तुम्हालाही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, पण त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत पूर्ण वाचायचा आहे.
चला तर मग जाणून घेऊ की मूव्ही चे तिकीट ऑनलाइन कसे बुक करायचे…
मित्रांनो, एक वेळ होता जेव्हा आपल्याला मूव्ही बघायचा असेल तर खूप मोठ्या आणि लांब रांगेत उभं राहावं लागायचं. पण आता तो काळ बदलला आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा घरी बसून तुमच मूव्हीचं तिकीट बुक करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये BookmyShow या नावाचे एप्लीकेशन डाउनलोड किंवा इंस्टॉल करावे लागेल. अजून एक पर्याय म्हणजे तुम्ही bookmyshow.com या वेबसाइट वर लॉग इन करून सुद्धा पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या मूव्ही चे तिकीट बुक करू शकता.लेख प्रायोजित आमच्या रंगीबेरंगी, चमकदार आणि स्टायलिश सॉक्सच्या संग्रहात प्रत्येकासाठी काहीतरी शोधा. तुमच्या sock ड्रॉवरमध्ये रंग जोडण्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा बंडलमध्ये खरेदी करा!
BookmyShow मूव्ही तिकीट बुक करणे
चला तर मग BookmyShow या अप्लिकेशन मधून मूव्ही तिकीट कसे बुक करायचे त्याच्या स्टेप्स बघू….
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जाऊन Bookmyshow हे ॲप इंस्टॉल करायच आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे काही परमिशन्स विचारल्या जातील. ज्या परमिशन मागितल्या जातील त्या तुम्हाला Allow करायच्या आहेत. तसेच तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाइल नंबर टाकून, फेसबुक (Facebook) अकाऊंट द्वारे, किंवा जीमेल (G-mail) अकाउंट द्वारे रजिस्टर करू शकता.
स्टेप 2: आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे.
स्टेप 3: आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाईप करून Continue या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: नंतर होम पेज वर असलेल्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला ज्या शहरातुन तिकीट बुक करायच आहे त्या शहराचं नाव टाकायचे. शहराचं नाव टाकल्या वर तुमच्या शहरात जेवढे थेटर असतील आणि जे मूव्ही असतील ते तुम्हाला दिसतील.
स्टेप 5: आता त्यापैकी जो मूव्ही तुम्हाला बघायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या वरती डाव्या साईडला तुम्हाला Movies असा ऑप्शन देखील दिला जातो. तिथे क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो मूव्ही तुम्ही सिलेक्ट करू शकता.
स्टेप 6: मूव्ही सीलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला Book Tickets या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: आता तुम्हाला मूव्ही कधी बघायचा आहे त्याची तारीख सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला जो वेळ पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे.
स्टेप 8: आता तुम्हाला कोणते तिकीट पाहिजे ते विचारले जाईल. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम हे चार ऑप्शन दिले जातील. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता.
स्टेप 9: नंतर तुम्हाला पाहिजे तेवढे तिकीट सिलेक्ट करून Select Seats या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पिक्चर हॉल मध्ये सिटची व्यवस्था (Arrangement) कशी आहे ते दाखवले जातील तुम्हाला पाहिजे ते सिट सिलेक्ट करायचे आहे.
स्टेप 10: सिट सिलेक्ट केल्या नंतर Pay ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्या समोर दूसर पेज येईल त्यावर तुम्हाला बर्गर, पॉप कॉर्न असे काही पदार्थ पाहिजे असतील तर ते सिलेक्ट करायचं आहे किंवा नसेल पाहिजे तर Skip या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 11: तुम्हाला आता पेमेंट ऑप्शन दिले जाईल. इथे तुम्हाला कॅश बॅक आणि ऑफर देखील दिले जातील. ऑफर साठी तुम्हाला Unolck offers Apply promocode यावर क्लिक करायचे आहे. आणि जी ऑफर असेल त्यानुसार तुम्हाला डिस्काउंट दिले जाईल. तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे पेमेंट करू शकता. तसेच तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर ज्या पण काही ऑफर असतील ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल.
स्टेप 12: सर्वात शेवटी तुम्हाला PAY या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला विचारल जाईल तुम्हाला तुमचे तिकिट स्टेटस व्हाट्सअप वर बघायचं असेल तर Yes ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 13: पेमेंट वगैरे झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये मूव्ही तिकीट नंबर, बुकिंग आयडी, बार कोड इत्यादी माहिती लिहिलेली असते. या माहितीचा स्क्रीन शॉट काढून घ्यायचा. याच स्क्रीन शॉटच्या आधारे तुम्हाला सिनेमा हॉल मध्ये एन्ट्री मिळू शकते.
तर मित्रांनो, ऑनलाइन मूव्ही तिकीट बुकिंग करण्याची ही प्रक्रिया खूपच चांगली व सोपी आहे ज्यामुळे तुम्हाला रांगेत उभे राहावे लागणार नाही तसेच बुकिंग फुल होण्या आधी तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता.व first day first show बघू शकता.
तर मित्रांनो, कसली वाट बघता,आत्ताच तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप इंस्टॉल करा. आणि आजच तुमची आवडती मूव्ही चे तिकीट बुक करा (मराठी चित्रपटाला थोडे जास्त प्राधान्य द्या).
धन्यवाद!