ॲमेझॉन रिटन आणि रिप्लेसमेंट पॉलिसीची माहिती | Amazon Return and Replacement Policy

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण अमेझॉन रिटर्न व रिप्लेसमेंट पॉलिसीबद्दल माहिती पाहणार आहोत. अमेझॉन कंपनी ही एक इ-कॉमर्स कंपनी आहे. या कंपनीची amazons.in ही भारतातील अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कपडे, विविध ॲक्सेसरीज, इत्यादी अनेक गोष्टी ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर करू शकतो.

जर आपण अमेझॉन वरून एखादी वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू आपल्याला आवडली नाही, कॉलिटी चांगली नसेल किंवा प्रॉडक्ट खराब असेल तर ती वस्तू आपण रिटर्न किंवा रिप्लेस करू शकतो. तर या लेखात आपण याच्याबद्दल माहिती घेणार आहे.सर्वात आधी आपण रिटर्न (Return) आणि रिप्लेसमेंट (Replacement) मधला फरक माहिती करून घेऊयात.

आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा आपल्याला माहिती असायला हवं की त्या वस्तूची रिटर्न किंवा रिप्लेसमेंट पॉलिसी काय आहे. रिटर्न आणि रिप्लेसमेंट या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. रिटर्न ला आपण Refund पण म्हणू शकता. म्हणजेच एखादी वस्तू तर आवडली नाही किंवा कॉलिटी चांगली नाही तर आपण ती वस्तू रिटर्न करून रिफंड म्हणजेच त्या वस्तूचे पैसे परत मिळवू शकतो. आणि सात दिवसात आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात.

पण जर तुम्ही घेतलेल्या वस्तूला काही प्रॉब्लेम आला असेल, किंवा ती चालत नसेल, किंवा खराब असेल तेव्हा त्या वस्तूची रिप्लेसमेंट आपल्याला भेटते. यात आपल्याला आपण विकत घेतलेली वस्तू परत घेतली जाते आणि सेम् पीस म्हणजेच नवीन वस्तू आपल्याला मिळते. यालाच आपण रिप्लेसमेंट असे म्हणूया. • थोडक्यात रिटर्न (Return) म्हणजे वस्तू अमेझॉनला माघारी पाठवणे.
 • रिप्लेसमेंट (Replacement) म्हणजे तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूच्या बदल्यात त्या सारखी वस्तू भेटणे.
 • रिफंड (Refund) म्हणजे ऑर्डर केलेली वस्तू रिटर्न करून पैसे स्वतःच्या बँक खात्यात जमा करणे.

अमेझॉन वर रिटन/रिप्लेसमेंट कसे करायचे

आता आपण पाहू या कोणत्या वस्तूला अमेझॉन वर रिटन/रिप्लेसमेंट कसे करायचे.

स्टेप 1: सगळ्यात पहिले अमेझॉन एप्लीकेशन ओपन करा. त्यात सगळ्यात खाली आपल्याला तीन लाईन म्हणजे रेषा दिसतील. त्यावर क्लिक इथे.

Amazon Return and Replacement Policy Step 1

स्टेप 2: तिथे आपल्याला ऑर्डर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन नीट सर्च करा. खाली, वरती, डाव्या,किंवा उजव्या बाजूला दिसेल. कारण अमेझॉन ॲपलिकेशन अपडेट होत असतं.

Amazon Return and Replacement Policy Step 2

स्टेप 3: ऑर्डर ऑप्शन मध्ये आपल्याला आपण ज्या काही वस्तू मागवल्या असतील त्या सगळ्यांची लिस्ट इथे दिसते. आता तुम्हाला जी वस्तू रिटन करायची असेल, त्या वस्तूच्या खाली असलेल्या Return or replace items वर क्लिक कर.

Amazon Return and Replacement Policy Step 3

स्टेप 4: खाली ती वस्तू तुम्ही का परत करणार आहे त्याची काही कारण असतील. त्यातील योग्य ते कारण निवडा आणि Continue बटन वर क्लिक करा. बटनाच्या खाली वस्तू रिटन/रिप्लेसमेंट करण्याची तारीख असते.

Amazon Return and Replacement Policy Step 4

स्टेप 5: आता तुम्हाला थोडे तपशीलत कारण विचारले जाईल. योग्य ते कारण निवडा आणि Continue बटन वर क्लिक करा.

Amazon Return and Replacement Policy Step 5

स्टेप 6: आता तुम्हाला जर डिटेल मध्ये कारण लिहून पाठवायचं असेल तर Comments बॉक्स मध्ये टाईप करून Continue बटन वर क्लिक करा.

Amazon Return and Replacement Policy Step 6

स्टेप 7: आता तुम्हाला I agree to return items with the MRP tag… या ऑप्शनवर टिक करून Continue बटन वर क्लिक करा.

Amazon Return and Replacement Policy Step 7

स्टेप 8: आता नवीन पेज वर तुम्हाला वस्तू रिटर्न कारण्यासंबंधी माहिती दिसेल. जसे कि Pickup Date म्हणजे कुरियर वाला कधी येईल आणि तुमची वस्तू घेऊन जाईल. आणि शेवटी Confirm Your Return बटन वर क्लिक करा.

तुम्हाला वस्तू रिटन/रिप्लेसमेंट करताना फक्त ती वस्तू कुरियर वाल्याला द्यायची आहे दुसरे कोणत्याच गोष्टीची गरज नाही.

Amazon Return and Replacement Policy Step 8

स्टेप 9: आता शेवटी तुमची रिटन/रिप्लेसमेंट ची विनंती अमेझॉन नी स्वीकारल्याचे मेसेज दिसेल. आणि कुरियर बॉय एक ते दोन दिवसात येऊन ती वस्तू घेऊन परत जाईल. तसेच सात ते दहा दिवसात रिटर्न अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल.

Amazon Return and Replacement Policy Step 9

वेगवेगळ्या वस्तूंच्या रिफंड किंवा रिप्लेसमेंट पॉलिसी

आता आपण पाहूया रिफंड किंवा रिप्लेसमेंट पॉलिसीबद्दल. यात काही कॅटेगरीज असतात. ज्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसी बनवल्या जातात. जसे की

 • काही ॲक्सेसरीज घेतो त्याची दहा दिवसात रिफंड पोलिसी असते.
 • याशिवाय येथे अमेझॉन प्राईम मेम्बर्स चे टीव्ही किंवा मूव्ही शो विकत घेतो तर या गोष्टीस रिटर्न घेतल्या जात नाही,
 • या शिवाय तिथे म्युझिक ची प्रॉडक्ट घेतो, तेव्हा दहा दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसी मिळते.
 • या शिवाय व्हिडिओ गेम मध्ये रिफंड पोलिसी मिळत तसेच, लक्षात ठेवा. व्हिडिओ गेम मध्ये सात दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसी मिळून जाते.
 • याशिवाय आपल्या पुस्तकात दहा दिवसात रिप्लेसमेंट पॉलिसी मिळते.
 • याशिवाय जर आपण मोबाइल फोन विकत घेतला तर तुम्हाला येथे सात दिवसांची रिप्लेसमेंट पोलिसी मिळते. या जागेवर तुम्हाला नवीन प्रोडक्ट मिळतो.
 • याशिवाय पावर बँक मध्ये रिप्लेसमेंट पॉलिसी मिळते.
 • Tabs मध्ये दहा दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी मिळते.
 • लॅपटॉप मध्ये पण रिप्लेसमेंट पॉलिसी पाहायला मिळते.
 • जर तुम्ही कपडे, बूट, इत्यादी वस्तू घेतात तेव्हा त्या वस्तू तुम्ही रिटन करू शकता, म्हणजेच त्याचे पैसे तुम्हाला रिटर्न भेटतात आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट घेतात तर ते रिटन करू शकत नाही त्या बदल्यात आपल्याला त्या प्रोडक्टची रिप्लेसमेंट भेटते म्हणजे दुसरं सेम प्रॉडक्ट आपल्याला मिळते.

तर अशाप्रकारे आपण ॲमेझॉन वरती विकत घेतलेली वस्तू रिटर्न किंवा रिफंड करू शकतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपला मित्रांमध्ये नक्की शेअर करा.