अमेझॉन प्राइम ( Amazon Prime ) बद्दल सर्व माहिती
नमस्कार मित्रांनो, आज आपण अमेझॉन प्राइम बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुम्हाला अमेझॉन बद्दल माहिती तर असेलच. अमेझॉन आता जगातील सर्वात प्रसिद्ध अशी एक शॉपिंग वेबसाईट आहे, ज्यात प्रोडक्ट ची विक्री व खरेदी केली जाते. करोडो रुपयांची उलाढाल अमेझॉन रोज करत असतो. त्यातच अमेझॉन प्राइम हे सुरू करण्यात आले त्यावर रोज नव नवीन ऑफर्स दिल्या जातात. पण आज ही अनेक जणांना अमेझॉन प्राइम बद्दल जास्त माहिती नाही. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अमेझॉन प्राइम काय आहे या बद्दल माहिती देणार आहोत.
अमेझॉन प्राइम म्हणजे काय?
What is Amazon Prime ?
अमेझॉन प्राइम म्हणजे नेमकं काय आहे हे सगळ्यात आधी जाणून घेऊ या
मित्रांनो, अमेझॉन प्राइम ही मुळात अमेरिकेची सर्विस आहे. याची सुरवात ही 2005 पासून झाली. आणि भारतात ही सर्विस 2016 पासून सुरू करण्यात आली. अमेझॉन प्राइम म्हणजे एक अमेझॉन ची एक नवीन प्रीमियम सर्विस आहे. ज्याच्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी शुल्क देऊन सबस्क्रिप्शन म्हणजेच मेम्बरशीप घ्यावी लागते. या प्राइम मेम्बरशीप मध्ये अमेझॉन तुम्हाला खूप सारे ऑफर्स देत असतो. अमेझॉन प्राइम चे सदस्य होण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागते. साधारणपणे 999 रुपये मध्ये एक वर्ष साठी तुम्ही प्राइम मेम्बरशीप घेऊ शकता किंवा 329 रुपये देऊन तीन महिन्यासाठी किंवा 199 रुपये मध्ये एक महिन्यासाठी तुम्ही मेम्बरशीप घेऊ शकता.
अमेझॉन प्राइम मध्ये युजर ला खूप चांगल्या सुविधा मिळतात. जसे की, अमेझॉन ची फास्ट डिलीव्हरी, अमेझॉन प्राइम विडिओ, त्या सोबतच अमेझॉन प्राइम मध्ये तुम्ही वेग-वेगळी पुस्तके सुद्धा वाचू किंवा ऐकू शकता. या शिवाय अमेझॉन प्राइम मध्ये तुम्हाला खूप साऱ्या सुविधा मिळतात. त्यातच फक्त शॉपिंग च नाही तर किराणा माला वर सुद्धा सूट मिळते.
अमेझॉन प्राइम सोबत कोण कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊ या
- अमेझॉन प्राइम व्हिडिओ – मित्रांनो, अमेझॉन प्राइम व्हिडिओ नावाचा एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे ज्यात जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले असेल तर तुम्हाला प्रीमियम कंटेंट मिळू शकतो तसेच वेब सिरीज, नवीन रिलीज झालेले पिक्चर्स व गाणे सुद्धा दिसतात.
- अमेझॉन प्राइम म्युझिक – मित्रांनो, अमेझॉन प्राइम म्युझिक एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही नवीन रिलीज झालेले गाणे बघू शकता. तसेच हवे ते भजन, कीर्तन ही बघू शकता.
- अमेझॉन प्राइम गेमिंग – मित्रानो, प्राइम गेमिंग मध्ये तुम्हाला खूप सारे नव नवीन गेम्स खेळायला भेटतात. शिवाय त्यात स्ट्रीमिंग सारखे ऑपशन पण तुम्हाला मिळतात.
- प्राइम रिडींग – मित्रांनो, तुम्हाला जर वाचनाची खुप आवड असेल तर अमेझॉन प्राइम रिडींग तुमच्या साठी बेस्ट आहे. यात तुम्हाला दोन ते तीन हजार पुस्तके तसेच मॅगझीन वाचायला व ऐकायला मिळतात.
- प्राइम नाऊ – मित्रांनो, प्राइम नाऊ ही अमेझॉन ची अशी सुविधा आहे ज्या द्वारे तुम्ही खरेदी केलेले सामान तुमच्या पर्यंत एक दिवसात पण पोहचवते. प्राइम नाऊ हे खूप फास्ट काम करते. तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी अमेझॉन प्राइम नाऊ तुमच्या पर्यंत एक दिवसात डिलीव्हरी पोहचवते.
- अमेझॉन प्राइम फोटोज – अमेझॉन प्राइम फोटोस मध्ये तुम्ही तुमचे फोटोज एकदम सुरक्षित ठेवू शकता. त्यात तुम्हाला पाच ते सहा जीबी चा स्पेस मिळतो. त्यात तुम्ही तुमचे फोटो सेव्ह करू शकता. तुमच्या कडे जर अमेझॉन प्राइम फोटोज असेल तर तुम्ही कितीही वेळा मोबाईल बदलला तरी तुम्ही बॅक अप द्वारे तुमचे फोटो बघू शकता. (हि सुविधा साध्य भारतामध्ये उपलब्ध नाही)
- अमेझॉन प्राइम ड्राईव्ह – तुमचे सगळी इन्फॉर्मेशन फोटोज हे सर्व प्राइम ड्राईव्ह मध्ये च सेव्ह असतात. तोच तुम्हाला 5 किंवा त्या पेक्षा जास्त जीबी चा स्पेस उपलब्ध करून दिला जातो. फक्त जास्त स्पेस हवा असेल तर त्यासाठी जास्त चार्जेस पडतात. (हि सुविधा साध्य भारतामध्ये उपलब्ध नाही)
जर तुम्हाला डिस्काउंट मध्ये अमेझॉन प्राइम विकत घ्यायचे असेल तर या ( -> Buy Amazon Prime <- ) लिंक वर क्लिक करून तुम्ही विकत घेऊ शकता.
अमेझॉन प्राइम चे फायदे
Amazon Prime Advantages
- मित्रांनो, अमेझॉन प्राइम चे खूप फायदे आहेत. त्यात तुम्हाला सर्वात प्रथम अमेझॉन प्राइम चे मेंबर व्हावे लागते. त्यानंतर तुम्हाला अमेझॉन प्राइम चे सगळे लाभ मिळतात. जसे की तुम्हाला मोफत डिलीव्हरी दिली जाते. सोबतच तुम्ही प्राइम म्युझिक आणि विडिओ चा आनंद घेऊ शकतात.
- तसेच डिलीव्हरी तुम्हाला वेळेच्या आधी किंवा 1 ते 2 तासात ही येऊ शकते.
- याशिवाय तुम्हाला अमेझॉन प्राइम चा early accesss चा पण लाभ घेता येतो.
- अमेझॉन मध्ये प्राइम विडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम रिडींग, प्राइम फोटो, टिव्ही शोझ, वेब सिरिझ या फिचर चा पण भरपूर लाभ मिळतो.
तर मित्रांनो, अश्या या अमेझॉन प्राइम चे अनेक लाखो करोडो मेंबर्स आहेत. आशा आहे की या अमेझॉन प्राइम च्या सुविधा बघून तुम्हाला ही याचे मेंबर बनायला नक्की आवडेल.
तर मित्रांनो, आज चा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो.
धन्यवाद !