ॲमेझॉन पे च्या मदतीने घरगुती गॅस सिलेंडर बुक कसा करायचा? | How to Book Gas Cylinder through Amazon Pay?

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण ॲमेझॉन पे वरून गॅस बुकिंग कसे करायचे या बद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो, कोरोना महामारीच्या काळात सर्व काही बंद होते. तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऑनलाइन मिळायला लागल्या. आपणही बरीचशी खरेदी ही ऑनलाईनच करत होतो. तसेच कंपन्यांकडून ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रॉडक्ट वर वेगवेगळ्या ऑफर्सही दिल्या जात होत्या. त्यातल्या त्यात गॅस सिलेंडर ऑनलाईन उपलब्ध व्हावे म्हणून बऱ्याच गॅस कंपन्या ऑनलाईन गॅस बुकिंगची सुविधा द्यायला लागल्या.

मित्रांनो, गॅस आता ॲमेझॉन वर सुद्धा उपलब्ध होत आहे. म्हणजेच आपण आता गॅस ॲमेझॉन वरून बुक करू शकतो. ते कसे करायचे ते जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख पूर्ण वाचा.



मित्रांनो, घरगुती गॅसची वाढती किंमत बघून प्रत्येक माणूस खूप चिंतेत आहे. एकाच वर्षात किती तरी वेळा गॅस सिलिंडर चे भाव वाढलेले आहेत. पण जर तुम्हाला या वाढत्या गॅस किमती पासून थोडी सुटका करायची असेल तर तुम्हाला थोडस समजुतीने गॅस बुकिंग आणि त्याचे पेमेंट करायचे आहे. समजुतीने म्हणजेच मित्रांनो तुम्ही ऑनलाईन गॅस बुक करायचा आहे ते ही अमेझॉन या ॲप वरून कारण त्यावर तुम्हाला काही सुट ही देण्यात येणार आहे,

हो मित्रांनो, अमेझॉन ॲप वरून आता आपण गॅस बुक करू शकतो. शिवाय त्यावर आपल्याला कॅश बॅक सुद्धा मिळणार आहे.

जर तुमच्या स्वयंपाक घरात तुम्ही गॅस सिलेंडर वापरत आहात तर आता तुम्ही अमेझॉन वरून गॅस सिलेंडर बुक जरून त्याचे पेमेंट सुद्धा करू शकता. अमेझॉन ने आता महाराष्ट्रातील सर्व गॅसला पण आपल्या सोबत जोडून घेतले आहे.



चला तर आता अमेझॉन वरून गॅस बुकिंग व पेमेंट कसा करायचा ते बघू या…

स्टेप 1: सर्वात पहिले ॲमेझॉन अँप इंस्टॉल करायचे आहे. त्यानंतर ते ओपन करायचे आहे. अँप ओपन झाल्यावर तुमच्यासमोर अँपचे होम पेज ओपन होईल.

स्टेप 2: ॲमेझॉनच्या होम पेज वर तुम्हाला खाली Amazon Pay चा ऑपशन दिसेल. किंवा डाव्या बाजूला तीन लाईन्स वर क्लिक केल्यावर मेनू ओपन होईल, तिथे तुम्हाला Amazon Pay चा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 2

स्टेप 3: त्यापेज वर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Bill Payments च्या ऑपशन मध्ये Gas Cylinder या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 3

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर गॅस सिलेंडर वर पहिले गॅस बुकिंग वर 50 रुपयांची कॅश बॅक ऑफर दाखवली जाईल, आणि ती ऑफर कधी पर्यंत चालू आहे त्याची तारीख पण दाखवली जाईल. आता खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा Operator (तुमच्या सिलेंडर कंपनीचे नाव) सिलेक्ट करायचा आहे.

इथे सगळ्या गॅस ऑपरेटर ची लिस्ट ओपन होईल. जसे की Bharat Gas, HP गॅस वगैरे… इथे यापैकी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीवर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 4

स्टेप 5: आता यानंतर तुम्हाला तुमचा LPG ID किंवा तुमचा Registered Mobile Number विचारला जाईल. या पैकी एक माहिती टाकून नंतर खाली दिलेल्या Get Booking Details या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील. त्यात Consumer Name, Dealer Name, आणि Bill Payment दिसतील. ते एकदा चेक करून घ्यायचे आहे, आणि नंतर Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 6

स्टेप 7: आता पुढे तुमच्यासमोर Payment Method चा ऑपशन ओपन होईल. इथे तुम्हाला सगळे पेमेंट ऑपशन ची लिस्ट दिसेल. तुम्ही इथे Net Banking, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ॲमेझॉन पे UPI वगैरे ऑपशन मधून कोणताही एक ऑपशन सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही डेबिट कार्ड ने पेमेंट करणार असाल तर त्यावर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला कार्ड धारकाचे नाव, 16 अंकी कार्ड नंबर आणि कार्डची Expiry Month व Year सिलेक्ट करायचे आहे व खाली CVV नंबर टाकायचा आहे. व खाली दिलेल्या Add your Card या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 7

स्टेप 8: त्यानंतर तुमचे कार्ड ऍड होऊन जाईल. व पुन्हा एकदा कार्ड CVV नंबर टाकायचा आहे. व खाली दिलेल्या Place Order and Pay या बटन वर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 8

स्टेप 9: नंतर तुमचा ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे. किंवा इथे तुम्ही New Address सुद्धा टाकू शकता.
त्यानंतर तुमच्या ऑर्डर चे सगळे डीटेल्स दाखवले जातील. ते एकदा चेक करून खाली दिलेल्या Place Your Order and Pay या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 9

स्टेप 10: आता नंतर तुमच्या बँक अकाउंट ला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी नंबर येईल. तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर प्रोसेसिंग सुरू होऊन जाईल. व तुमची गॅस सिलेंडर बुकिंग होऊन जाईल.

तसेच तुम्ही खाली दिलेल्या Check Order Details वर क्लिक करून तुम्ही तुमची ऑर्डर चे स्टेटस चेक करू शकता.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 10

तसेच खाली तुम्हाला डिस्ट्रिब्युटर चे नाव व कॉन्टॅक्ट डिटेल दिसतील. जर तुमचे गॅस सिलेंडर एक आठवड्या च्या आत नाही आले तर तुम्ही तिथे दिलेल्या डिस्ट्रिब्युटरच्या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच तुम्हाला Show Receipt या ऑपशन मधून तुमची ऑर्डर रेसिट पण दाखवली जाते. त्यात सगळ्या डिटेल्स दिसतील. तसेच तुमच्या मोबाईल वर पण गॅस बुकिंग चा SMS येईल.

How to Book Gas Cylinder through Amazon Pay Step 10 Receipt Details

त्यानंतर तुम्ही Amazon Pay Balance या ऑपशन वर गेल्या वर तुम्हाला 50 रुपयांचा कॅश बॅक मिळेल. ज्याचा उपयोग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी म्हणजे Recharge किंवा बिल पेमेंटसाठी करू शकता. त्या नंतर 7 दिवसात गॅस सिलेंडर तुमच्या घरात येईल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही ॲमेझॉन अँप वरून गॅस बुकिंग व पेमेंट करू शकता. आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच महत्वपूर्ण वाटलं असेल. तर हा महत्वाचा लेख तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहचवा किंवा शेअर करा.