पेमेंट गेटवे माहिती | Payment Gateway Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपण पेमेंट गेटवे म्हणजे काय ( What is Payment Gateway ) ते माहिती करून घेणार आहोत. त्याच बरोबर पेमेंट गेटवे (Payment Gateway) चे फायदे, तोटे, पेमेंट गेटवे कसे काम करते आणि मुळात बँक असताना पेमेंट गेटवे ची गरज का आहे ? ते या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

Payment Gateway Information in Marathi

पेमेंट गेटवे ही एक प्रकारची डिजिटल सेवा/यंत्रणा आहे ज्याद्वारे ग्राहक कोणत्याही ई-कॉमर्स (ऑनलाइन शॉपिंग) व्यवसायात क्रेडिट – डेबिट कार्ड, UPI किंवा मोबाइल वॉलेट चा वापर करून ऑनलाइन वेबसाईट/अँप वर पेमेंट करू शकतो. ज्यामध्ये ग्राहकाने केलेले ऑनलाइन पेमेंट थेट स्टोअर मालकाच्या बँक खात्यात पोहचते. पेमेंट गेटवे हा व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील तिसरा पक्ष आहे जो ग्राहकांकडून सुरक्षितपणे पैसे घेतो आणि व्यापाऱ्याच्या बँक खात्यात पाठवतो.



पेमेंट गेटवे कसे काम करते ते बघू

पेमेंट गेटवे हि सरळ, सोपी पद्धत आहे. या मध्ये तुम्ही ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट वर जाता, तुमच्या आवडत्या वस्तू कार्टमध्ये टाकता आणि नंतर पेमेंट पेज वर तुमच्या कार्ड किंवा UPI ची माहिती टाकून पेमेंट करता. या मध्ये पेमेंट गेटवे तुमच्याकडून पैसे घेऊन, स्वतःचे कमिशन वजा करून राहिलेले पैसे वेबसाईटच्या मालकाच्या खात्यामध्ये जमा करते.

खाली दिलेली इमेज नीट बघा तुमच्या लगेच लक्षात येईल पेमेंट गेटवे कसे काम करते.

पेमेंट गेटवे कसे काम करते

पेमेंट गेटवेचे फायदे

  • पेमेंट गेटवेमुळे ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आणि कमी वेळात होते.
  • पेमेंट गेटवे हे वेबसाईट सुरक्षित असेल तरच काम करते. म्हणजे वेबसाईट ला SSL सर्टिफिकेट असेल तरच पेमेंट गेटवे कंपनी त्या वेबसाईटला पेमेंट करण्याची सेवा देते.
  • पेमेंट गेटवे कंपनी ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती (जसे अकाउंट नंबर, बँकेचे नाव, शाखा इत्यादी) वेबसाईट/अँप मालकासोबत शेअर करत नाही.

पेमेंट गेटवेचे तोटे

पेमेंट गेटवे प्रणालीचे तोटे माहिती कारण हि प्रणाली ऑनलाइन पेमेंट करण्यास मदत करते, हि प्रणाली जर नसती तर आज आपण जी ऑनलाइन शॉपिंग करतो ते शक्य झाले नसते.



भारतातील सर्वोत्तम पेमेंट गेटवे कंपन्या

भारतातील सर्वोत्तम पेमेंट गेटवे कंपन्या – CCAvenue, PayTm Payment Gateway, PayUmoney Payment Gateway, Razorpay

अशा प्रकारे आपण आज पेमेंट गेटवे बद्दल माहिती बघितली, तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद