भारत पे (Bharat pe) माहिती

नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपण भारत पे अँप कसे कार्य करते ? भारत पे कोण आणि कसे वापरायचे ? त्याचे फायदे काय आहेत ? इत्यादी संबंधी माहिती घेणार आहोत.

Bharat pe Information Marathi

नोट बंदीनंतर भारतात डिजिटल क्रांतीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याच डिजिटल क्रांतीमध्ये भारत सरकारचे UPI सिस्टिमचा खुप मोठा वाटा आहे. आणि याच UPI प्रणालीमुळे आज आपल्याला माहित असलेल्या (गुगल पे, फोने पे, पेटीएम ) पेमेंट अँप चा जन्म झाला.



तर भारत पे (Bharat pe) हे हि एक पेमेंट अँप आणि फिनटेक कंपनी आहे पण ते खास करून व्यापाऱ्यांना डिजिटल करण्यास मदत करते. तसेच सध्या RBI कडून भारत पे ला बँकांचे लायसन हि भेटले आहे, त्यामुळे भारत पे काही दिवसात आपल्याला बँकेच्या सुविधा देतानाही दिसेल.

भारत पे ची सुरुवात कशी झाली ?

नोट बंदीनंतर बाजारात विविध UPI पेमेंट अँप आले, लोक त्यांचा वापर करून एकमेकांनां काही सेकंदामध्ये पैसे पाठवू लागले, तसेच या UPI प्रणालीचा वापर व्यपारीही मोठ्या प्रमाणात करू लागले. प्रत्येक UPI अँपने स्वतःचा QR कोडे व्यपाऱ्यांना देण्यास सुरुवात केली. पण या QR कोड मुळे एक अडचण निर्माण झाली, ग्राहक पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे UPI अँप वापरू लागले त्यामुळे व्यपाऱ्याला हि त्या प्रत्येक अँप चा QR कोड आपल्या दुकानांमध्ये लावावा लागायचा. या समस्या ओळखून भारत पे नी बाजारात एक उपाय घेऊन आला.

उपाय असा होता कि, भारत पे ने एक असा QR कोड तयार केला जो ग्राहकाच्या कोणत्याही UPI अँप चे पेमेंट स्वीकारू शकत होता. यामुळे व्यपारीला सगळ्या पेमेंट अँप चे QR कोड न लावता आत्ता फक्त भारत पे च्या एकाच QR कोड ने काम होणार होते. अशा प्रकारे भारत पे ने बाजारात असलेली समस्या ओळखून त्यावर आपले नवे उत्पादन तयार केले.



भारत पे अँप पैसे कसे कमावते ?

भारत पे कडे व्यपाऱ्यांचा पूर्ण डेटा आहे. म्हणजे QR कोड वर होणाऱ्या दिवसभरतील पूर्ण जमा खर्चाची माहिती. याचा अभ्यास करून भारत पे व्यपाऱ्यांना लोन देते.

तसेच भारत पे चे पेमेंटसाठी लागणारे POS (point-of-sale) मशीन हि आहेत. या मशीन मध्ये होणाऱ्या व्यवहारात भारत पे कमिशन कमावते.

जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला भारत पे ची आणखी तपशील मध्ये माहिती पाहिजे असेल तरी कमेंट मध्ये सांगा.

धन्यवाद…