No Cost EMI म्हणजे काय | नो कॉस्ट ईएमआय खरंच फायदेशीर आहे का ?
No Cost EMI म्हणजे काय | नो कॉस्ट (NO Cost EMI) चा अर्थ काय असतो | नो कॉस्ट ईएमआय कसे काम करते | नो कॉस्ट ईएमआय खरंच फायदेशीर आहे का ? अशा सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये बघणार आहोत. नो कॉस्टची पूर्ण संकल्पना समजण्यासाठी हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या मोठ्या ईकॉमर्स कंपनींनी आपली ऑनलाइन खरेदी पूर्ण पणे सुखकर करून ठेवली आहे, फक्त एक बटन वर क्लिक करून आपण एक रुपयांपासून ते एक लाख पर्यंतच्या वस्तू खाली सेकंड मध्ये खरेदी करू लागलो आहे. ऑनलाइन शॉपिंग करणे फायदेशीर वाटत असले तरी काही गोष्टींकडे नीट लक्ष दिले नाही तर तुमचा तोटा हि होऊ शकतो. जसे तुम्हाला एखादी महागडी वस्तू खरेदी करायची आहे पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत किंवा तुम्ही एकसाथ एवढे पैसे खर्च करू शकत नाही अशा वेळी तुम्ही आपसूक ईएमआय ऑपशन वर जाता. इथे तुम्हाला त्यावस्तूचे पेमेंट काही ठराविक भागात करण्याची मुभा भेटते.
उदा. 1 लाखाची वस्तू EMI वर घेतल्यावर तुम्हाला पुढचे 5 महिने 20,000 चे पेमेंट करणे आहे नाकी एकसाथ 1 लाख खर्च करणे आहे. पण हाच EMI घेताना ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट वर वेगवेगळ्या बँकेचे EMI ऑपशन पाहायला मिळतात, त्यामध्ये काही बँकेंना नो कॉस्ट (NO Cost EMI) पर्याय हि असतात. आत्ता या नो कॉस्ट EMI चा नक्की अर्थ काय आणि जसे नावावरून समजते तसे या EMI साठी कोणतेही चार्जेस लागत नाही का ? अशा प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या भागात पाहू.
नो कॉस्ट ईएमआई (NO Cost EMI) म्हणजे काय?
समजा एका व्यक्तीला १ लाखाची वस्तू खरेदी करायची आहे पण त्याकडे पुरेसे पैसे नाही तेव्हा तो व्यक्ती १ लाखाचे पेमेंट बँकेला ५ भागात देण्याचे ठरवतो आणि त्यासोबत बँक आपले काही अधिकचे प्रोसससिंग चार्जेस/व्याज लावते अशा तर्हेने त्या व्यक्तीला १ लाख अधिक बँकेचे चार्जेस अशी रक्कम पुढच्या ५ महिन्यात भरायची आहे. तर प्रत्येक महिन्याला भरावी लागणाऱ्या रकमेलाच ईएमआय (EMI) म्हणतात. आत्ता आपण जेव्हा एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करतो तेव्हा तिथे आपल्याला काही बँका नो कॉस्ट (NO Cost EMI) सुविधा देताना दिसतात, याचा अर्थ असा कि तुम्हाला दर महा फक्त २०,००० भरायचे आहेत या मध्ये बँक कोणतेही अधिकचे/extra चार्जेस आणि व्याज लावत नाही.हे पोस्ट आमच्या भागीदारांनी प्रायोजित केले आहे Wigs
थोडक्यात नो कॉस्ट (NO Cost EMI) मध्ये बँक तुमच्याकडून फक्त तुम्ही खरेदी केलेल्या वास्तूच्या किमतीची मूळ रक्कम घेते त्याशिवाय कोणतेही अधिकचे/extra चार्जेस किंवा व्याज घेत नाही. फ्लिपकार्ट किंवा ऐमेज़ॉन वर तुम्ही या नो कॉस्ट EMI चा लाभ घेऊ शकता.
पण हे लक्षात ठेवा – जेव्हा तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करता तेव्हा, त्या वस्तूची पूर्ण रक्कम भरून घेतल्यावरची किंमत (विविध डिस्काउंट आणि कूपन जोडून) आणि EMI वर घेतल्यावरची किंमत (विविध डिस्काउंट आणि कूपन जोडून) यातील फरक नक्की तपासा. कधी कधी नो कॉस्ट EMI जरी लिहिले असेल तरी ईकॉमर्स कंपनी मूळ वस्तूची किंमत वाढवून ती ग्राहकाला दाखवतात, त्यामुळे ग्राहकाची फसवणूक होते.
नो कॉस्ट EMI चे फायदे
- नो कॉस्ट EMI मूळे ग्राहकांचा फायदा होतो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी वस्तूची किंमत आहे तीच किंमत हप्ते भरून ग्राहक खरेदी करू शकतो. या मध्ये ग्राहकाला कोणतेही अधिकचे चार्जेस आणि व्याज भरावे लागत नाही.
- नो कॉस्ट EMI मूळे साधारण महाग आणि ट्रेण्डिंग वस्तूंवर ऑनलाईन कंपन्या देतात.
- नो कॉस्ट EMI ऑनलाईन घेणे फायदेशीर ठरते, आणि ऑफलाईन घेतल्यास अधिकचे चार्जेस लागू शकतात. जसे एजन्टचे कमिशन इत्यादी…
- साधारण नो कॉस्ट EMI चे हप्ते दर महा बँकेतून ऑटोमॅटिक वजा केले जातात, आणि ग्राहकाला फक्त बँक बॅलन्स अकाउंट राखून ठेवायचा असतो.
- तुम्ही नो कॉस्ट EMI हप्ते नियमित भरले तर तुमची क्रेडिट हिस्टरी सुधारू शकते.
नो कॉस्ट EMI चे तोटे
- नो कॉस्ट EMI महाग आणि ट्रेण्डिंग वस्तूंवर दिले जाते, त्यामुळे गरज नसतानाही त्या वस्तू खरेदी केल्या जातात. जसे कि एखाद्या कंपनीचा नवीन मोबाइल लाँच झाला कि हमखास नो कॉस्ट EMI त्या मोबाइलच्या खरेदीवर असतो, शिवाय जुन्या मोबाइलवर एक्सचेंज ऑफर दिले जाते त्यामुळे ग्राहक आपसूक EMI ऑपशन कडे वळतो.
- पूर्ण पेमेंट देऊन वस्तू खरेदी केली तर ती वस्तू नो कॉस्ट EMI च्या तुलनेत स्वस्त मिळते.
- जर तुम्ही नियमित EMI चे पेमेंट केले नाही तर तुम्हाला १००० ते ५००० पर्यंतचा फाईन बसू शकतो.
- तसेच EMI चे पेमेंट चुकल्यावर तुमच्या क्रेडिट हिस्टरी वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
अशा तर्हेने आज आपण नो कॉस्ट EMI म्हणजे काय त्याचे फायदे, तोटे काय असतात ते सोप्या सरळ भाषेत बघितले. जर तुम्हाला NO Cost EMI संबंधित काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद