ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बद्दल माहिती, प्रकार व फरक | ATM vs. Debit vs. Credit Cards

नमस्कार मित्रांनो, आज आपण एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व प्रीपेड कार्ड बद्दल माहिती बघणार आहोत. तसेच यांच्यामध्ये काय फरक आहे त्याबद्दल ही जाणून घेणार आहोत.

ATM Debit Credit Cards information in Marathi

मित्रांनो, आजकाल अनेक लोक ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरतात. पण काही ठिकाणी कार्ड स्वीकारले जात नाही तेव्हा कॅशची गरज भासते, मग आपण लगेच एटीएम शोधून एटीएम कार्ड द्वारे पैसे काढतो. पण या सर्व प्रकारच्या कार्डांमध्ये नेमका काय फरक आहे? चला तर मग जाणून घेऊ या. एक एक करून आपण सर्व कार्ड बद्दल जाणून घेऊ या.



एटीएम कार्ड (ATM Card)

सर्वात पहिले एटीएम (ATM) कार्ड बद्दल जाणून घेऊ या

मित्रांनो, एटीएम (ATM) ला ऑटोमेटेड टेलर मशीन असे म्हटले जाते. हे एटीएम कार्ड बँके मार्फत खाते धारकांना पुरवले जाते. या कार्डच्या सहाय्याने खाते धारक त्याच्या बँक खात्यातील रक्कम/बॅलन्स तपासण्यासाठी, पैसे काढण्यासाठी तसेच खात्यात पैसे टाकण्यासाठी म्हणजेच जमा करण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ही या एटीएम कार्ड चा उपयोग होतो. थोडक्यात काय तर तुमचे एटीएम कार्ड वापरून तुम्ही कोणत्याही एटीएम मशीन मधून पैसे काढू शकता.

डेबिट कार्ड (Debit Card)

मित्रांनो, डेबिट कार्ड हे सुद्धा एटीएम कार्ड सारखेच दिसते. पण या कार्डच्या वरच्या बाजूला मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, किंवा रूपे कार्ड असा लोगो असतो. जो एटीएम कार्ड वर कुठेही नसतो. तसेच डेबिट कार्ड चा वापर करून आपण एटीएम मशीन मधून पैसे काढू शकतो. तसेच डेबिट कार्ड चा वापर करून आपण कुठलेही ऑनलाईन पेमेंट करू शकतो. ही सुविधा आपल्याला एटीएम कार्ड मध्ये भेटत नाही. तसेच डेबिट कार्ड द्वारे आपण वीज बिल भरू शकतो किंवा मोबाईलचा रिचार्ज सुद्धा करू शकतो. याशिवाय डेबिट कार्ड द्वारे आपण आपल्या देशात ऑनलाईन ट्रांझक्शनचा कुठलाही व्यवहार करू शकतो.



तसेच डेबिट कार्डसाठी बँक आपल्या कडून जो सर्विस चार्ज घेते तो क्रेडिट कार्ड पेक्षा खूप कमी असतो. आणि डेबिट कार्डचा वापर करून आपण नेटबँकिंग सुद्धा करू शकतो.

क्रेडिट कार्ड (Credit Card)

मित्रांनो, कधी कधी अशी वेळ येते की आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते आणि त्यावेळी आपल्या बँकेच्या खात्यात तेवढे पैसे नसतात. अश्या वेळी आपल्याला क्रेडिट कार्ड कामी येते. क्रेडिट कार्डचा वापर करून आपण कर्ज म्हणून पैसे घेऊ शकतो व हवी ती वस्तू खरेदी करू शकतो. तसेच हे घेतलेले पैसे आपल्याला बँकेला परत करायचे असतात. त्यासाठी बँक आपल्याला काही कालावधी देते साधारणतः 30 ते 45 दिवस. जर तुम्ही या कालावधीत पैसे जमा केले तर तुम्हाला व्याज भरावे लागत नाही. पण दिलेल्या या कालावधी नंतर तुम्हाला त्यांना व्याजा सह क्रेडिट कार्ड बिलाच्या रुपात बँकेला पैसे परत करावे लागतात.

मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असायला हवे. कारण जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तेव्हा क्रेडिट कार्ड ने पेमेंट करायचा ऑप्शन आपल्याला दिला जातो. असे केल्यास तुम्हाला खरेदी वर काही टक्के सूट मिळते. तसेच काही आंतरराष्ट्रीय वेबसाईट वर पेमेंट करण्यासाठी तुमच्या कडे क्रेडिट कार्ड असायला हवे. क्रेडिट कार्ड तुम्ही सरकारी किंवा खाजगी बँके कडून ही घेऊ शकता. सरकारी बँके कडून क्रेडिट कार्ड घेणे थोडे अवघड असते कारण सरकारी बँका तुमची सर्व माहिती विचारात घेते अगदी तुमच्या नोकरी पासून ते तुमच्या पगार पर्यंत अशी सर्व माहिती सरकारी बँक घेते. तर खाजगी बँके कडून क्रेडिट कार्ड घेणे थोडे सोपे जाते.

प्रीपेड कार्ड (Prepaid Card)

मित्रांनो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व्यतिरिक्त ही अजून एक कार्ड आहे, प्रीपेड कार्ड. नावाप्रमाणेच या कार्ड वर पैसे प्रीपेड करावे लागतात. म्हणजे हे कार्ड वापरण्यासाठी आपल्याला आधी पैसे द्यावे लागतात जसे आपण मोबाइलचा रिचार्जे आधी करतो आणि नंतर तो वापरतो तसेच. ज्याप्रमाणे डेबिट कार्ड वापरण्यासाठी खात्यात पैसे असायला हवे तसेच प्रीपेड कार्ड वापरण्यासाठी कार्डमध्ये आधी पासूनच पैसे असावे लागतात. तसे सर्व व्यवसायिक बँका प्रीपेड कार्ड जारी करतात. प्रीपेड कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले नसतात. तुम्ही प्रीपेड कार्ड वापरता म्हणजे तुमची आधी कार्ड वर लोड केलेले पैसे खर्च करता. तसेच प्रीपेड कार्ड वर लोड केलेल्या पैश्यांपेक्षा जास्त पैसे तुम्ही खर्च करू शकत नाही.

तसेच प्रीपेड कार्ड वापरल्याने तुमच्या क्रेडिट स्कोर वर ही कुठलाच चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही. तुमचे क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्ही प्रीपेड कार्ड वापरू शकता. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा प्रीपेड कार्ड वापरू शकता. त्यातील पैसे संपल्यावर पालक त्याकार्ड वर पैसे परत रिलोड करू शकता.

मित्रांनो एटीएम कार्ड , डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड यांमधील फरक थोडक्यात सांगायचा झाला तर, एटीएम कार्ड ने तुम्ही फक्त तुमच्या खात्यातील पैसे काढू शकता. तर डेबिट कार्ड ने तुम्ही पैसे काढू ही शकता आणि शिवाय कुठलेही ऑनलाईन पेमेंट करू शकता जसे की एखादे ऑनलाईन, ऑफलाईन ट्रांझक्श करू शकता, रिचार्ज करू शकता, नेटबँकिंग करू शकता. जी एटीएम कार्ड द्वारे आपण करू शकत नाही. तर क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे नसताना ही बँकेकडून पैसे घेऊन खरेदी करू शकता व ते पैसे नंतर परत करु शकता.

विविध कार्डचे फायदे तोटे

ATM Debit Credit Cards Pros and Cons

एटीएम कार्डचे फायदे

  • मित्रांनो, या मधून तुम्ही कधीही व केव्हाही पैसे काढू शकता.
  • एटीएम द्वारे देण्यात येणारी सेवा ही अतिशय वेगवान व जलद गतीने होते.
  • एटीएम कार्ड द्वारे आपल्या खात्यामधील शिल्लक व जमा रक्कम आपल्याला त्वरित पाहता येते. त्यासाठी बँकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज पडत नाही.
  • एटीएम ची सुविधा सर्वत्र म्हणजे रस्ते रेल्वे, बस स्टँड अश्या विविध ठिकाणी उपलब्ध असल्याने आपल्याला कधीही पैसे काढणे सोयीचे ठरते.

एटीएम कार्डचे तोटे

  • मित्रांनो, एटीएम कार्ड चा तोटा म्हणजे त्याचा पासवर्ड जर तुम्ही विसरलात तर अडचण येऊ शकते.
  • एटीएम कार्ड मध्ये ठरवून दिलेल्या एका विशिष्ट मर्यादेतच दिवसाला रक्कम काढता येते. त्यामुळे अडचणीच्या वेळी बँक खात्यात पैसे असूनही काढता येत नाही.
  • एटीएम मशीन वापरून झाल्यावर नीट बंद केले नाही तर इतर दुसरी व्यक्ती आपल्या खात्यातून पैसे काढू शकते, कारण आपल्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याची अनेक उदाहरणे आढळून येतात.
  • अंध अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी ही सुविधा वापरणे शक्य नसते. त्यामुळे सगळ्यांनाच या एटीएम कार्डच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही.

डेबिट कार्डचे फायदे

  • डेबिट कार्ड द्वारे तुम्ही कधीही व केव्हाही तुमच्या खात्यातील रक्कम कशु शकता.
  • कॅश नसताना डेबिट कार्डच्या सहाय्याने ऑनलाईन तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. म्हणजेच जवळ रोकड ठेवण्याची आवश्यकता भासत नाही.
  • रेल्वे तिकीट किंवा विमान तिकीट किंवा ट्रॅव्हल्स तिकीट तुम्ही डेबिट कार्डच्या सहाय्याने काढू शकता.
  • गरज भासल्यास तुम्ही शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम खात्यातून उचलू शकता. फक्त बँक त्यावर एका विशिष्ट दराने व्याज आकारले.

डेबिट कार्ड चे तोटे

  • डेबिट कार्ड हरवल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
  • काही अशिक्षित व अंध व्यक्ती या सुविधे पासून वंचित राहू शकतात.
  • एक ठराविक रक्कमच तुम्ही डेबिट कार्ड च्या मदतीने काढू शकता.

क्रेडिट कार्ड चे फायदे

  • क्रेडीट कार्डच्या सहाय्याने एखादी व्यक्ती त्याच्या खात्यातील असलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची खरेदी करू शकते.
  • जर तुम्ही क्रेडिट कार्डची बिलं वेळेवर भरली तर तुमचं बँकचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट चांगले राहते व त्यामुळे बँके कडून पुढच्या वेळेस त्वरित कर्ज मिळण्याची शक्यता सुद्धा वाढते.
  • क्रेडिट कार्डच्या सहाय्याने जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला हा त्यावर रिवॉर्ड पॉइंट किंवा कॅश बॅक सुद्धा मिळतो
  • क्रेडीट कार्डच्या सहाय्याने तुम्ही कोणतीही वस्तू हप्त्यांवर घेऊ शकता या हफत्याची म्हणजेच ईमआई (EMI) ची रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जाते.
  • ठराविक क्रेडिट कार्डवर तुम्हाला दरवर्षी कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही.
  • क्रेडिट कार्डच्या सहाय्याने जर आपण एखादी खरेदी केली तर ते पैसे परत करण्यासाठी बँक आपल्याला काही दिवसांची मुदत देते. दिलेल्या मुदती मध्ये जर आपण आपल्या क्रेडिट कार्डचे बिल भरले तर त्यावर आपल्याला कुठलेही व्याज भरावे लागत नाही.

क्रेडिट कार्ड चे तोटे

  • क्रेडिट कार्ड वर अनेक प्रकारचे छुपे (हीडन) चार्जेस लावलेली असतात जे आपल्याला माहित नसतात.
  • मित्रांनो जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळे वर म्हणजेच दिलेल्या मुदतीत भरले नाही तर बँक तुमच्या कडून व्याजा व्यतिरिक्त आणखी शुल्क आकारू शकते.
  • अंतरराष्ट्रीय वेबसाईट वरुन खरेदी केल्यास किंवा पेमेंट केल्यास बँक त्याची कुठलीही माहिती ठेवत नाही. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय वेबसाइट वरून क्रेडिट कार्ड मध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.

विविध कार्डचे प्रकार

एटीएम कार्ड चे प्रकार

मित्रांनो विविध उद्देश्यांसाठी एटीएम चे विविध प्रकार पडतात. या एटीएम चे साधारणपणे दोन प्रकार असतात.

  1. Location Based ATM Card (लोकेशन बेस्ड एटीएम कार्ड)
  2. Operation bases ATM Card (ऑपरेशन बेस्ड एटीएम कार्ड)

मित्रांनो, लोकेशन बेस्ड एटीएम टाइप्स मध्ये अजून चार उपप्रकार असतात

  1. On site ATM (ऑन साईट एटीएम)
  2. Off Site ATM (ऑफ साईट एटीएम)
  3. Work site ATM (वर्क साईट एटीएम) आणि
  4. Mobile ATM (मोबाईल एटीएम)

मित्रांनो, ऑपरेशन बेस्ड एटीएम टाइप्स मध्ये सात उपप्रकार असतात

  1. White Label ATM – मित्रांनो, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी द्वारे दिले जाणारे एटीएम हे व्हाइट लेबल एटीएम म्हणून ओळखले जाते.
  2. Green label ATM – मित्रांनो, कृषी व्यवहार करण्यासाठी ग्रीन लेबल एटीएम वापरले जाते.
  3. Orange label ATM – मित्रांनो, शेअर ट्रांझाक्शनसाठी ऑरेंज लेबल एटीएम वापरले जाते.
  4. Yellow label ATM – इ कॉमर्ससाठी यलो लेबल एटीएम वापरले जाते.
  5. Pink label ATM – मित्रांनो, हे एटीएम फक्त महिला बँकिंगसाठी वापरले जाते.
  6. Brown label ATM – मित्रांनो, हे एटीएम सर्व्हिस प्रोवाईडर च्या मालकीची असतात. परंतु कॅश मॅनेजमेंट आणि बँकिंग नेटवर्क शी कनेक्टिव्हिटी ही प्रायोजक बॅंकेद्वारे प्रदान केली जाते.
  7. Cash dispenser – या द्वारे कॅश काढणे, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्कवायरी असे कामे केले जातात.

डेबिट कार्ड चे प्रकार

मित्रांनो, भारतात सामान्यतः पाच प्रकारचे डेबिट कार्ड वापरले जातात.

Visa डेबिट कार्ड – मित्रांनो, Visa Inc कंपनीच्या सहकार्याने बँका Visa डेबिट कार्ड जारी करतात. Visa Inc ही एक अमेरिकन मल्टिनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस कंपनी आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन इलेक्ट्रॉनिक पेमेंट ट्रांझाक्शन करण्यासाठी ही कंपनी अग्रेसर आहे. तसेच Visa डेबिट कार्ड हे क्लासिक, गोल्ड आणि प्लॅटिनम अश्या प्रकारांत येतात जी बँक खात्याच्या प्रकार नुसार सेवा देतात.

MasterCard डेबिट कार्ड – मित्रांनो, Cisa सारखेच , मास्टरकार्ड डेबिट कार्ड ही एक लोकप्रिय अमेरिकन पेमेंट कंपनी आहे. काही फॉरेन रेटेलर मार्फत ही कार्डे स्वीकारली जातात. ही कंपनी तिच्या फास्ट आणि सुरक्षित पेमेंट गेटवेसाठी ओळखली जाते. मास्टरकार्ड हे विविध बेनेफिट आणि रेवॉर्ड प्रोग्राम सह येतात.

RuPay डेबिट कार्ड – मित्रांनो, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने देशात ओपन आणि मल्टिलॅटरल पेमेंट सिस्टीम असावी या उद्देशाने भारतात RuPay ची सुरुवात केली. ही सिस्टीम भारतात आणि परदेशात काही ठिकाणी म्हणजे ज्यांचा RuPay सोबत टाय अप आहे, अश्या मार्फत स्वीकारली जाते. भारतात अनेक खाजगी, सहकारी, सार्वजनिक आणि ग्रामीण बँका त्यांच्या ग्राहकांना RuPay कार्ड जारी करतात.

Contactless डेबिट कार्ड – मित्रांनो, या प्रकारची डेबिट कार्डे ही रेडिओ फ्रेक्वेन्सी मॉड्युल सह येतात जे तुम्हाला कार्ड मशीन वर टच करून पेमेंट करण्याची परवानगी देतात. या प्रकारचे डेबिट कार्ड खूप सुरक्षित असतात.SBI आणि HDFC सारख्या मोठ्या बँका कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड जारी करतात.

Maestro डेबिट कार्ड – मित्रांनो, या प्रकारचे डेबिट कार्ड त्याच्या सुरक्षित पेमेंट सिस्टीमसाठी ओळखली जातात. हे कार्ड जगभरातील एटीएम मध्ये आणि ऑनलाईन खरेदी करताना पेमेंट करण्यासाठी वापरले जाते.

क्रेडिट कार्ड चे प्रकार

मित्रांनो, क्रेडिट कार्ड अनेक ठिकाणी वापरले जाते, जसे की रेल्वे तिकीट बुकिंग साठी, विमान तिकीट, कॅब बुकिंग वगैरे . अश्या वेग-वेगळ्या ठिकाणी हे कार्ड वापरले जात असल्याने त्याचे काही प्रकार पडतात…

Travel क्रेडिट कार्ड – मित्रांनो, ज्या लोकांना विविध ठिकाणी फिरायला जायला आवडते अश्या लोकांसाठी हे कार्ड उपयोगी ठरते. रेल्वे बुकिंग, विमान बुकिंग, बस बुकिंग अश्या तिकीट बुकिंगसाठी जर तुम्ही ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केले तर तुम्हाला त्यावर काही प्रमाणात डिस्काउंट किंवा कॅशबॅक मिळतो.

Fuel क्रेडिट कार्ड – मित्रांनो, जर तुमचा वाहतुकीचा व्यवसाय असेल तर हे कार्ड तुमच्या खूप फायद्याचे आहे. या कार्ड चा वापर करून जर तुम्ही तुमच्या गाडीत इंधन भरले तर तुम्हाला त्यावर डिस्काउंट किंवा कॅशबॅक मिळतो. तसेच अनेक पेट्रोल पंप च्या ठिकाणी क्रेडिट कार्ड धारकांसाठी विविध ऑफर्स लावलेल्या असतात, त्याचा ही फायदा तुम्हाला या क्रेडिट कार्ड द्वारे होऊ शकतो.

Shopping क्रेडिट कार्ड – मित्रांनो, शॉपिंग करण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडे हे क्रेडिट कार्ड असायला हवे. या प्रकारच्या क्रेडिट कार्ड ने जर तुम्ही तुमच्या शॉपिंग बिल चे पेमेंट केले तर त्यावर तुम्हाला कॅशबॅक किंवा डिस्काउंट मिळतो. सोबतच काही वाउचर्स सुद्धा भेटतात ज्याचा उपयोग तुम्ही नंतर करू शकता.

Secured क्रेडिट कार्ड – मित्रांनो, ज्यांचा क्रेडिट स्कोर खराब आहे ,अश्या लोकांना हे कार्ड वापरण्याचा सल्ला दिला जातो. या कार्डच्या सहाय्याने तुमचा क्रेडिट स्कोर कमी होत नाही.

Balance Transfer क्रेडिट कार्ड – मित्रांनो, तुम्हाला जर तुमचे क्रेडिट ट्रान्सफर करायचे असेल तर हे कार्ड तुम्हाला मदत करते. तुम्हाला क्रेडिट ची परत फेड करण्यासाठी सहा ते एकवीस महिन्याची वेळ दिली जाते. त्यामुळे या कार्डवर कुठलेही व्याज किंवा पेनल्टी लागत नाही. फक्त तुम्हाला वन टाइम बॅलन्स ट्रान्सफर फी द्यावी लागते जी ट्रान्सफर करायच्या रकमेच्या 5 टक्के पर्यंत असू शकते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एटीएम कार्ड, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड बद्दल सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगात पडेल. तसेच ही माहिती महत्व पूर्ण वाटली असल्यास तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।