Airtel Xstream Fiber बद्दल सविस्तर माहिती: Plans, Speed, New Connection, Charges, OTT Subscription
आपल्या रोजच्या आयुष्यात इंटरनेटचा प्रचंड मोठा वापर होतो आहे. अनेक कंपन्या इंटरनेट सुविधा म्हणजे ब्रॉडबँड नेटवर्क देतात. जर तुमच्या इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर अनेक संधी आपल्या हातून निसटू शकतात. अनेक कंपन्या आपलं नेटवर्क फास्टेस्ट असल्याचा दावा करतात. ऑप्टिकल फायबर क्षेत्रातील प्रचंड प्रगतीमुळे त्यांना फास्टेस्ट नेटवर्क देणे शक्य आहे. बऱ्याच टेलिकॉम कंपन्या ही सुविधा देत आहेत. आज आपण या लेखात Airtel Xtreme Fibre या भारती एअरटेलच्या सुविधेबद्दल माहिती पाहू.
Airtel Xtreme Fibre काय आहे?
Airtel Xtreme Fibre हे ब्रॉड बँड नेटवर्क सुविधा देते. ब्रॉड बँड नेटवर्क म्हणजे तुमच्या घरी, ऑफिस मध्ये ऑप्टिकल फायबर केबलच्या मदतीने जास्तीच्या स्पीड मध्ये इंटरनेट सुविधा देणे. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या रोजच्या आयुष्यात इंटरनेटचा वापर खूप जास्त वाढला आहे. मनोरंजनापासून बँकिंगपर्यंत अनेक गोष्टी आपण ऑनलाइन करतो. बऱ्याचदा इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने आपल्याला काही अडचणी येतात. जसे वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करायचे आहे पण नेट स्लो असेल तर अक्षरशः काही सेकंदात शेकडोंनी वेटींग लिस्ट लागते. अशावेळी इंटरनेटचा स्पीड जास्त असणे किती गरजेचे आहे ते लक्षात येते.
Airtel Xtreme Fibre उत्तम WIFI नेटवर्क देतं. याचा वेग साधारण 1GB पर सेकंद इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Airtel Xtreme Fibre चे प्लॅन्स
ग्राहकांसाठी Airtel Xtreme fibre चे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे फायदे, मिळणारा डेटा आणि किंमत निरनिराळी आहे. काही लोकप्रिय प्लॅन्सची माहिती खाली दिली आहे.तुम्ही सुपरक्लोन Replica Rolex साठी बाजारात असल्यास, सुपर क्लोन रोलेक्स हे जाण्याचे ठिकाण आहे! ऑनलाइन बनावट रोलेक्स घड्याळांचा सर्वात मोठा संग्रह!
499 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
हा Airtel Xtreme fibre चा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 499 रुपये प्रति महिना अशी आहे. यात 40Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. त्याचबरोबर Wynk म्युझिक, अनलिमिटेड कॉलिंग, Airtel Xtreme Premium ॲप चे सबस्क्रिप्शन मिळते ज्यावर अनेक वेबसिरीज आणि चित्रपट विनामूल्य पाहता येतात.
699 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
या प्लॅनची किंमत 699 रुपये प्रति महिना आहे. यात 40Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील मिळतात. याशिवाय, तुम्हाला Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन, Airtel Xstream Premium ॲप चे सबस्क्रिप्शन मिळते, Wynk म्युझिक आणि बरेच काही मिळते.
799 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
या प्लॅनची किंमत 799 रुपये प्रति महिना आहे. यात 100Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, Wynk आणि Airtel Xstream Premium चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. तसेच Shaw Academy ॲपचाही फ्री access मिळतो.
999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
जवळपास हजार रुपये प्रति माह शुल्क असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 100Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा पुरवला जातो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा access मिळतो. त्याच बरोबर अनेक लोकप्रिय चित्रपट, सिरीजही पाहता येतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हा प्लॅन अनलिमिटेड मनोरंजनासाठी बनवला गेला आहे असं आपण म्हणू शकतो.
1099 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
हा प्लॅन 999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन सारखाच आहे फक्त फरक असा आहे कि यामध्ये तुम्हाला DTH set-top बॉक्स सोबत एकत्र असा बंडल (bundled) मिळेल. या बंडल मध्ये 350+ टीव्ही चॅनेल मिळतात. तसेच यात 200Mbps या वेगाने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा access मिळतो.
1498 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
हा Airtel Xtreme चा VIP प्लॅन समजला जातो.1499Mbps मासिक शुल्क असलेल्या या प्लॅनमध्ये डेटा स्पीड अजून चांगला मिळतो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग सारख्या नेहमीच्या सुविधांबरोबरच Disney+ Hotstar, एका वर्षासाठी Netflix Basic, Amazon Prime आणि आणखी 10 लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मचा आनंद तुम्ही घेवू शकता. तुमचा इंटरनेट वापर खूप जास्त असेल तर हा प्लॅन घेण्याचा जरूर विचार करा.
3999 एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन
भल्या मोठ्या किमतीचा हा प्लॅन सुद्धा VIP प्लॅन मानला जातो. या प्लॅनमध्ये सुध्दा 1Gbps इतक्या वेगाने डेटा मिळतो. हा प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना वर दिलेल्या सर्व सुविधा तर प्राप्त होतातच. शिवाय त्यांना Airtel 4K Xstream TV Box मोफत दिला जातो. Airtel 4K Xstream TV Box हा सेट टॉप बॉक्स आहे. ज्यावर तुम्ही HD टीव्ही चॅनल्सचा आनंद घेवू शकता. या प्लॅन मध्ये Netflix Premium सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळते.
मित्रहो, इथे एक गोष्ट विशेष नमूद केली पाहिजे ती म्हणजे वर दिलेल्या प्लॅन व्यतिरिक्त खास तुमच्या शहरासाठी एखादा विशेष प्लॅन एअरटेलतर्फे जाहीर केलेला असू शकतो. त्याची माहिती तुम्हाला airtel Thanks ॲपमध्ये मिळू शकते.
Airtel Xstream Fiber: Speed, OTT Subscription
Airtel Xstream प्लॅन्स | इंटरनेट स्पीड | OTT अँप | अनलिमिटेड कॉल |
---|---|---|---|
499 | 40 Mbps | Airtel Xstream, Wynk Music | आहे |
699 | 40 Mbps | Airtel Xstream, Wynk Music, free Airtel Xstream TV box | आहे |
799 | 100 Mbps | Airtel Xstream, Wynk Music, and Shaw Academy | आहे |
999 | 200 Mbps | Disney+ Hotstar, Airtel Xstream, Wynk Music, Zee5 Premium, and Amazon Prime | आहे |
1099 | 200 Mbps | Disney+ Hotstar, Airtel Xstream, Wynk Music, free Airtel Xstream TV box, and Amazon Prime | आहे |
1,498 | 300 Mbps | Disney+ Hotstar, Airtel Xstream, Wynk Music, Netflix Basic, and Amazon Prime | आहे |
1,599 | 300 Mbps | Disney+ Hotstar, Airtel Xstream, Wynk Music, Netflix Basic, and Amazon Prime, free Airtel Xstream TV box | आहे |
3,999 | 1 Gbps | Disney+ Hotstar, Airtel Xstream, Wynk Music, Netflix Premium, and Amazon Prime | आहे |
Airtel Xtreme Fibre चे इंस्टॉलेशन चार्जेस
वर म्हटल्याप्रमाणे फॉर्म भरून सबमिट केला की तुम्हाला Installation चार्जेस भरावे लागतात. Airtel Xtreme Fibre चे सध्याचे इंस्टॉलेशन चार्जेस एक हजार रुपये (₹1000) इतके आहेत. त्याचबरोबर तुम्हाला Airtel Xstream 4K Android Box पाहिजे असेल तर, त्यासाठी 1,500 रुपये सुरक्षा ठेव (security deposit) म्हणून भरावे लागतील, जेव्हा तुम्ही कनेक्शन बंद करताल तेव्हा हि रक्कम तुम्हाला परत दिली जाईल.
Airtel Xtreme Fibre चे कनेक्शन कसे घ्यायचे?
- तुम्ही घरबसल्या Airtel Xtreme fibre चे कनेक्शन घेवू शकता. त्यासाठी फक्त खाली दिलेल्या पायऱ्या पहा.
- Airtel Thanks ॲप किंवा Airtel वेबसाइट वर जा.
- अनेक ऑप्शनपैकी Broadband हा ऑप्शन निवडा.
- तुम्हाला काही प्लॅन्स दिसतील. त्यांपैकी तुमच्यासाठी योग्य तो प्लॅन निवडा.
- एक फॉर्म उघडला जाईल ज्यात तुमचा फोन नंबर वगैरे तसेच जिथे कनेक्शन हवे आहे तिथला पत्ता अशी माहिती भरावी लागेल.
- फॉर्म भरून सबमिट केला की तुमच्याशी संपर्क साधून एअरटेलतर्फे पुढील प्रोसिजर पार पाडली जाते.
Airtel Xtreme Fibre कुठे उपलब्ध आहे?
सध्या तरी ही सुविधा महाराष्ट्रामध्ये काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. पण येणाऱ्या काही महिन्यांत हिचा मोठा विस्तार होणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. तुमच्या शहरात airtel Xtreme fibre उपलब्ध आहे का ते पाहण्यासाठी airtel Thanks ॲपमध्ये आपला pincode टाकून तुम्ही तपासू शकता.
FAQ (अधिकचे प्रश्न)
Airtel Xtreme Fibre वर Netflix फ्री मिळते का ?
हो मिळते, एअरटेलच्या काही ब्रॉडबँड प्लॅन मध्ये Netflix फ्री मध्ये मिळते. 1498 आणि 1599 रुपयांच्या प्लॅन मध्ये Netflix Basic चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते, तर 3999 रुपयांचा प्लॅन मध्ये Netflix Premium चे सबस्क्रिप्शन मिळते.
Airtel Xtreme Fibre ब्रॉडबँडमध्ये FUP लिमिट किती आहे?
FUP लिमिट म्हणजे एक ठराविक वापरानंतर इंटरनेट चे स्पीड कमी होते. इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या (ISP), प्लॅन मध्ये दिलेल्या सुविधांचा गैरवापर थांबवण्यासाठी, Fair Usage Policy (FUP) पोलिसी इंतर्गत इंटरनेटच्या ठराविक वापरानंतर तुमच्या इंटरनेट स्पीड वर काही प्रमाणात बंधने आणतात. तर Airtel Xtreme Fibre चा FUP लिमिट 3333 GB आहे. यानंतर पुढील बिलिंग तारखेपर्यंत इंटरनेटचे स्पीड 1mbps ने कमी केले जाते.
Xstream Box आणि Airtel DTH Settop Box मधील फरक काय ?
Xstream Box तुमच्या टीव्हीला अँड्रॉइड टीव्हीमध्ये अपग्रेड करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर हा बॉक्स तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट करतो, हा बॉक्स लावल्यावर तुम्ही तुमच्या टीव्ही वर वेगवेगळे OTT अँप इन्स्टॉल करू शकता. तसेच Youtube हि चालवू शकता. इंटरनेट सर्फ करू शकता तुमचा मोबाइल टीव्ही ला कनेक्ट करू शकता. अशा बऱ्याच सुविधा या बॉक्स च्या माध्यमातून तुम्ही करू शकता.
Airtel DTH Settop बॉक्स वर तुम्ही सैटलाइटच्या माध्यमातून वेगवेगळे टीव्ही चॅनेल बघू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घरावर डिश लावावी लागते.
वरील लेखात airtel Xtreme fibre बद्दलची शक्य ती सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आशा आहे की ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल.