SBI चे 2023 मधील सर्वात चांगले क्रेडिट कार्ड | Best SBI Credit Cards in 2023
नमस्कार मित्रानो, आज आपण SBI चे 2023 मधील सर्वात चांगले क्रेडिट कार्ड कोण कोणते आहेत, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.
मित्रांनो, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी व लोकप्रिय बँक आहे. स्टेट बँकेच्या ग्राहकांची संख्या ही खूप प्रचंड आहे. एसबीआय ची सेव्हिंग अकाउंट असो, करंट अकाउंट असो किंवा इतर कोणत्याही सेवा असो स्टेट बँक लोकांची पहिली पसंती असते. त्यातल्या त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड बद्दल बोलायचे झाले तर ही बँक जवळपास 25 प्रकारचे क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देते. अश्या परिस्थितीत एसबीआय चे नेमके कोणते क्रेडिट कार्ड घ्यावे हे ठरवणे खूप कठीण आहे. मित्रांनो, क्रेडिट कार्ड निवडताना प्रत्येक व्यक्तीच्या गरज वेगवेगळ्या असतात. त्यानुसार कार्ड घेण्याचे कारण व निकष ही वेग वेगळे असू शकतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना तुम्ही तुमच्या गरजे नुसार म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्रेडिट कार्ड हवे आहे या वरून तुम्ही तुमच्या साठी एसबीआय चे बेस्ट क्रेडिट कार्ड निवडू शकता. आजच्या या लेखात ही आम्ही तुम्हाला एसबीआय चे काही असे क्रेडिट कार्ड सांगणार आहोत ज्यांना 2023 मध्ये खूप डिमांड राहणार आहे व या वर्षातील हे सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही जर एसबीआय च्या या बेस्ट क्रेडिट कार्ड्स बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा
एसबीआय चे सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड ची लिस्ट खालील प्रमाणे आहे
SBI Simply Save Credit Card
SBI सिम्पली सेव्ह क्रेडिट कार्ड
मित्रांनो, या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी आणि वार्षिक फी रू 499 इतकी आहे. ही फी पण तुम्ही माफ करून घेऊ शकता. जर तुम्ही कार्ड जारी झाल्यानंतरच्या पहिल्या 60 दिवसांत जर 2000 रुपये खर्च केले तर तुम्हाला 2000 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. ( 1 रिवॉर्ड पॉईंट = 0.25 पैसे). म्हणजे जवळपास 500 रुपये कॅशबॅक तुम्हाला मिळतो. म्हणजेच तुमची जॉइनिंग फी चे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात. तसेच जर तुम्ही एका वर्षात 1 लाख रुपये खर्च केले तर पुढील वर्षात तुम्हाला वार्षिक फी माफ होते. या शिवाय तुम्ही जर जास्त करून रेस्टॉरंट मध्ये जेवणावर, मूव्हीज, डिपार्टमेंटल स्टोअर किंवा ग्रोसरिझ वर जास्त खर्च करत असाल तर हे क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कारण जर तुम्ही या गोष्टींवर क्रेडिट कार्ड द्वारे खर्च केला तर प्रत्येक 150 रुपये खर्चावर तुम्हाला 10 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. आणि इतर ठिकाणी 100 रुपये खर्च केले तर तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळतो.
तसेच भारतातील कोणत्याही पेट्रोल पंप वर तुमच्या इंधन अधिभारावर 1% सूट मिळवू शकता. या क्रेडिट कार्ड चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर बँकेच्या क्रेडिट कार्ड वरील थकबाकीची रक्कम तुम्ही Simply SAVE SBI कार्ड वर अगदी कमी व्याजदरात हस्तांतरित करू शकता आणि त्याची EMI मध्ये परतफेड केली जाऊ शकते. तसेच तुमच्या कुटुंबातील 18 वर्षांवरील सदस्यासाठी ऍड ऑन कार्ड मिळवू शकता. तसेच एसबीआय चे हे Simply Save क्रेडिट कार्ड जगभरात 2.4 कोटी आउटलेट वर स्वीकारले जाते.
मित्रांनो, तुम्हाला जर एसबीआय चे Simply Save क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी बँकेला अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुम्ही ऑनलाईन म्हणजे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन किंवा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे बँकेच्या जवळच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन ही करू शकता. कर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील जसे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, तुमचा म्हणजे अर्जदाराचा फोटो, आणि बँकेचे स्टेटमेंट इत्यादी.
SBI Simply Click Credit Card
SBI सिम्पली क्लिक क्रेडिट कार्ड
मित्रांनो, एसबीआय ने Amazon, Lenskart, Apollo 24/7, Bookmyshow, Cleartrip, Eazydiner, आणि Netmeds अश्या काही पार्टनर ब्रँड सोबत टाय अप केले आहे. तुम्ही जर या पार्टनर ब्रँड वर काही खरेदी केली तर एसबीआय तुम्हाला जास्त कॅशबॅक देते. त्यामुळे तुम्ही जर या पार्टनर ब्रँड वरून काही खरेदी करत असाल तर Simply Click क्रेडिट कार्ड वापरणे तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन ठरेल. म्हणजेच त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल.
मित्रांनो, तुम्ही जर Cleartrip, Bookmyshow, Amazon, Eazydiner, Netmeds, Apollo 24/7 आणि Lenskart या पार्टनर स्टोअर मध्ये ऑनलाइन खरेदी वर जर 100 रू खर्च केले तर तुम्हाला या खरेदी साठी 10 रिवॉर्ड पॉइंट मिळतात. आणि इतर ठिकाणी ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही जर 100 रू खर्च केले तर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळतात. आणि जर तुम्ही ऑफलाईन 100 रू खर्च केले तर तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळतो. एसबीआय च्या Simply Click क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी व वार्षिक फी 499 रू इतकी आहे. यात ही तुम्ही जर एका वर्षात 1 लाख रू किंवा त्या पेक्षा जास्त खर्च केला तर तुमची वार्षिक फी माफ केली जाते. किंवा तुम्हाला 2000 रू चे Cleartrip कडून एक गिफ्ट वाउचर मिळते. मित्रांनो, Cleartrip ही एक कंपनी आहे ज्याच्या मार्फत तुम्ही हॉटेल बुकिंग, फ्लाइट बुकिंग करू शकता. तसेच वेककम बेनिफिट मध्ये ऍमेझॉन कडून 500 रू चा गिफ्ट वाउचर मिळते. ज्याचा तुम्ही 12 महिन्यात कधीही वापर करू शकाल.
मित्रांनो, या क्रेडिट कार्ड मध्ये ‘वेव्ह अँड पे’ टेक्नॉलॉजी आहे जी केवळ काही किरकोळ टर्मिनल्स वर संपर्क रहित पेमेंट करू देते. तसेच हे क्रेडिट कार्ड जागतिक स्तरावर 2.4 कोटी आउटलेट वर वापरली जाऊ शकतात. SBI Simply Click क्रेडिट कार्ड ऍड -ऑन क्रेडिट कार्डचा देखील पर्याय देते. फक्त त्यासाठी सदस्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवे. या शिवाय कमीत कमी व्याजदराने EMI परत करण्यासाठी तुम्ही इतर बँकेच्या क्रेडिट कार्ड वरील सर्व थकबाकी SBI च्या Simply Click क्रेडिट कार्ड वर हस्तांतरित करू शकता. आणि तुम्हाला भारत भरातील कोणत्याही पेट्रोल पंपावर रू 300 पर्यंत च्या प्रत्येक इंधन व्यवहारावर 1% इंधन शुल्क माफी देखील मिळते. इथे तुम्हाला जर कार्ड बदलायचे असेल तर तुम्हाला रू 100 ते रू 250 पर्यंत शुल्क आकारले जाईल.
तुम्हाला जर एसबीआय च्या Simply Click क्रेडिट कार्ड साठी अर्ज करायचा असेल तर त्या साठी काही आवश्यक कागदपत्रे लागतील. जसे की ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, तुमचा पासपोर्ट फोटो, उत्पन्नाचा पुरावा, आणि बँक स्टेटमेंट इत्यादी.
SBI ELITE Credit Card
SBI एलिट क्रेडिट कार्ड
मित्रांनो, एसबीआय चे Elite क्रेडिट कार्ड हे खास करून हाय प्रोफाइल लोकांसाठी आहे. विशेषत: जे लोक वारंवार देशभर आणि जगभर प्रवास करतात त्यांच्यासाठी हे क्रेडिट कार्ड उपयुक्त आहे. यात फ्लाइट, हॉटेल्स, चित्रपट, जेवण आणि इतर ही बऱ्याच काही गोष्टीं वर भरपूर ऑफर आहेत. हुश पपीज, बाटा, यात्रा डॉट कॉम, शॉपर्स स्टॉप आणि पँटालून या विविध ब्रँड मधून तुम्ही तुमच्या आवडीचा ब्रँड निवडून त्यात खरेदी केल्यास तुम्हाला वेलकम बेनिफिट म्हणून 5000 रु चे गिफ्ट वाउचर मिळतात.
या क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी व वार्षिक फी रू 4999 इतकी आहे. यात ही जर तुम्ही एका वर्षात 10 लाख रू खर्च केले तर तुमची वार्षिक फी माफ केली जाते. या क्रेडिट कार्ड नुसार एका वर्षात 4 लाख रू खर्च केल्यास तुम्हाला 10,000 बोनस रिवॉर्ड पॉईंट मिळतात. आणि जर तुम्ही एका वर्षात रू 5 लाख खर्च केले तर तुम्हाला 15,000 बोनस रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. आणि जर तुम्ही तुमचा वार्षिक खर्च 8 लाख रू पर्यंत झाला तर तुम्हाला अतिरिक्त 15,000 बोनस बक्षीसे मिळतात. तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येकी रू 100 खर्चासाठी दोन रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकता.
या क्रेडिट कार्डच्या आंतरराष्ट्रीय वापरासाठी परकीय चलन मार्क-अप शुल्क 1.99% आहे, जे इतर कोणत्याही SBI क्रेडिट कार्ड पेक्षा तुलनेने खूप कमी आहे. रेस्टॉरंट मध्ये जेवण, मूव्हीज, ट्रॅव्हल बुकिंग, हॉटेल बुकिंग यासाठी विशेष ऑफर्स ही मिळतात. तसेच दरवर्षी रू 6,000 किमतीची मोफत चित्रपट तिकिटे व दर तिमाहीत दोन डोमेस्टिक लाउंज भेट , प्रत्येक तिमाहीत जास्तीत जास्त दोन भेटीसह सहा आंतर राष्ट्रीय लाउंज भेटी मिळतात. तसेच सर्व पेट्रोल पंपांवर रू 500 ते रू 4,000 पर्यंतच्या इंधन खर्चाच्या व्यवहारावर 1% पर्यंत इंधन अधिभार माफ होतो.
मित्रांनो, तुम्हाला जर एसबीआय Elite क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमची काही पात्रता निकष पूर्ण असणे आवश्यक आहे. जसे की तुमचे वय हे 18 ते 65 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही पगारदार किंवा स्वयंरोजगार करणारे असावे. व तुमचे किमान उत्पन्न 60,000 रू असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, वरील पात्रता पूर्ण करणारा कोणीही व्यक्ती एसबीआय Elite क्रेडिट कार्ड मिळवू शकतो. परंतु हे एक प्रीमियम क्रेडिट कार्ड असल्याने, या क्रेडिट कार्डला मान्यता मिळण्यासाठी तुम्हाला उच्च वार्षिक उत्पन्न आणि तुमचा एक उत्कृष्ट क्रेडिट स्कोर असणे आवश्यक आहे. म्हणून, तुम्ही एसबीआय च्या Elite क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्या पूर्वी फक्त चांगला क्रेडिट स्कोर तयार करण्याचा प्रयत्न करा तसेच तुम्ही उत्पन्नाच्या आवश्यक त्या गरजाही पूर्ण करत आहात का याची खात्री नक्की करा.
मित्रांनो, एसबीआय Elite हे क्रेडिट कार्ड त्याच्या वापरकर्त्यांना बरेच प्रवास फायदे देते, म्हणून हे निश्चितच एक चांगले ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड आहे. तसेच हॉटेल रिवॉर्ड्स मध्ये कार्ड धारकांना ट्रायडेंट हॉटेल्स वर 2.50% रिवॉर्ड्स दर (10 पॉइंट्स प्रति रु. 100, 1 पॉइंट = रु. 0.25) वर 10% सूट देते. या व्यतिरिक्त, विस्तारा एअर लाइन्सची तिकिटे खरेदी करणारे जे कार्ड धारक आहेत त्यांच्या बुकिंग वर 2.25% रिवॉर्ड दर (9 पॉइंट्स प्रति रु. 100, 1 पॉइंट = रु. 0.25) मिळतील. त्यामुळे हे हॉटेल आणि फ्लाइट बुकिंग करणाऱ्या कार्ड धारकांना त्यांच्या सर्व प्रवासात उत्तम बक्षिसे मिळवून देतात.
SBI Cashback Credit Card
SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड
मित्रांनो, एसबीआय च्या या वर्षीच्या सर्वात बेस्ट क्रेडिट कार्डच्या लिस्ट मधील बेस्ट नाव म्हणजे SBI Cashback क्रेडिट कार्ड. मित्रांनो, हे एक असे क्रेडिट कार्ड आहे जे कोणत्याही मर्चंट रेस्ट्रिकशन शिवाय ऑनलाईन ट्रांझक्शन वर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देते. तसेच या क्रेडिट कार्ड द्वारे केलेल्या सर्व ऑफलाईन खर्च आणि युटिलिटी बिल पेमेंट वर तुम्हाला 1% कॅशबॅक मिळते. कोणत्याही ऑनलाईन खरेदी वर तुम्हाला कॅशबॅक मिळवता येते. फक्त रेंट पेमेंट, मर्चंट ईमआय, कॅश ऍडव्हान्स, बॅलन्स ट्रान्सफर, encash आणि flexipay , फ्युएल या ठिकाणी जर तुम्ही या क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केले तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॅशबॅक बेनिफिट मिळत नाही.
या क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी काहीच द्यावी लागत नाही. फक्त दुसऱ्यावर्षी पासून अन्युअल फी 999 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. पण तुमची ही फी पण माफ होऊ शकते जर तुम्ही एका वर्षात 2 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला फी माफ होते. याशिवाय कार्ड द्वारे तुम्हाला एका वर्षात चार मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज भेटी करता येतील. तसेच स्टेटमेंट तयार केल्या पासून दोन दिवसांच्या आत तुमच्या SBI कार्ड खात्यात कॅशबॅक ऑटो क्रेडिट केला जातो. मित्रांनो, कॅशबॅक SBI क्रेडिट कार्ड साठी 18 ते 60 वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. तसेच हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर ही चांगला म्हणजे 750 च्या आसपास असणे आवश्यक असते. पगारदार किंवा स्वयंरोजगार असणारी कोणतेही व्यक्ती हे क्रेडिट कार्ड घेऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत असाल तर कॅशबॅक एसबीआय क्रेडिट कार्ड तुमच्या साठी एक चांगला व उत्तम पर्याय ठरू शकते. त्यामुळे, मित्रांनो, जर तुम्ही स्टोअर मध्ये खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन खरेदीला जर प्राधान्य देत असाल, तर हे कार्ड तुमच्या साठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. शिवाय, मिळालेले कॅशबॅक ही थेट तुमच्या कार्ड खात्यात जमा केला जातो.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एसबीआय चे सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड्स कोणते आहेत हे जाणून घेतले. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच हा लेख महत्व पूर्ण वाटला असेन तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद।
FAQ
एसबीआय Simply Save क्रेडिट कार्ड भारता बाहेर स्वीकारले जाते का?
हो मित्रांनो, एसबीआय Simply Save क्रेडिट कार्ड भारताबाहेर म्हणजेच परदेशात ही स्वीकारले जाते. फक्त नेपाळ आणि भूतान मध्ये हे कार्ड स्वीकारले जात नाही.
एसबीआय Simply Save क्रेडिट कार्ड वरील रिवॉर्ड पॉइंट्स कसे रिडीम करायचे?
मित्रांनो, एसबीआय Simply Save क्रेडिट कार्ड वरील रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीं द्वारे सहजपणे रिडीम करू शकता. हे रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही SBI च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट ददेऊ शकता.
SBI Simply Save क्रेडिट कार्ड चे रिवॉर्ड पॉइंट्स कालबाह्य होतात का?
हो मित्रांनो, तुम्ही SBI Simply Save क्रेडिट कार्ड वर कमावलेले रिवॉर्ड पॉइंट जर वापरले नाहीत तर ते दोन वर्षांनी कालबाह्य होतात.
जर हरवलेले क्रेडिट कार्ड परत सापडल्यास काय करावे?
मित्रांनो, तुमचे क्रेडिट कार्ड जर हरवले तर सर्वात पहिले ते ब्लॉक करावे. तसेच जर तुम्हाला तुमचे हरवलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्या नंतर सापडल्यास, ते वापरू नका. ते कार्ड कापून व्यवस्थित नष्ट केल्याची खात्री करा.