क्रेडिट कार्ड अँप्लिकेशन रिजेक्टची 7 मुख्य कारणे | Credit Card Rejection Reasons

नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला/रिजेक्ट का जातो ?’ व क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्या मागची 7 कारणे कोणती आहेत? या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. तसेच क्रेडिट कार्ड अर्ज मान्य/अँप्रोव्हड व्हावा यासाठी काही टिप्स पण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Credit Card Application Rejectchi Karne

मित्रांनो, असे अनेक लोक आहेत ज्यांचा क्रेडिट कार्ड अर्ज रिजेक्ट केला जातो. आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना अनेक वेळा या समस्येचा सामना करावा लागतो. काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे आधीचे क्रेडिट कार्ड आहे पण जेव्हा ते नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतात तेव्हा त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जातो. काही अशीही लोकं आहेत ज्यांचा क्रेडिट स्कोर 750 च्या वर आहे पण असे असताना देखील त्यांचा क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज रिजेक्ट केला जातो. तुम्ही पण जर अश्या लोकांपैकी एक आहात? तुमच्या सोबत पण असे झाले आहे का? तर मग तुमचा क्रेडिट स्कोर रिजेक्टच्या मागचे कारणे काय आहेत याचा शोध घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. आणि कारण शोधल्या नंतर तशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचा क्रेडिट कार्डसाठी केलेला अर्ज का रिजेक्ट केला जातो या मागची कारणे जाणून घेण्यासाठी व समजून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…



क्रेडिट कार्ड बद्दल थोडी माहिती

सर्वात आधी क्रेडिट कार्ड बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:-

मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे बँके कडून किंवा एखादया वित्तीय सेवा कंपनी कडून जारी करून दिले जाते. तुम्हाला एका ठराविक वेळेसाठी बँके मार्फत कर्ज किंवा उधार पैसे उपलब्ध करून दिले जातात. तसेच हे उधारी वर घेतलेले किंवा वापरलेले पैसे ठरलेल्या मुदतीत भरावे लागतात अन्यथा दंड भरावा लागतो. क्रेडिट कार्ड द्वारे उधारीवर दिलेल्या हा पैश्यांतुन तुम्ही तुमची ऑनलाईन व ऑफलाईन अशी दोन्ही कामे करू शकता. त्यात दुकानातून खरेदीत करणे असो, शॉपिंग करणे, एखादे बिल भरणे अशी बरेचशे पेमेंट करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. तसेच तुम्ही महिनाभर वापरलेल्या क्रेडिटचे देय रक्कम महिन्याच्या शेवटी भरावी लागते. त्यासाठी तुम्हाला काही वेळ (साधारण 45 दिवस ) दिला जातो. पण जर तुम्ही क्रेडिट कार्डचे देय भरण्यास उशीर केला तर मात्र काही ठराविक दरात व्याज आकारले जाते.

आता तुमच्या क्रेडिट कार्ड अर्ज का रिजेक्ट केला जातो त्या मागील 7 कारणे जाणून घेऊ या:-



1. तुम्ही पगारदार नसाल तर

You are not Salaried

मित्रांनो, तुमचा क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज रिजेक्ट करण्यामागचे सर्वात पहिले आणि बेसिक कारण म्हणजे तुम्ही पगारदार नाही. ज्या लोकांकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसतो त्यांच्यासाठी ही गोष्ट लागू होते. तसेच ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते, तसेच जर तुम्ही फ्रीलान्सर असाल आणि उत्पन्नाचा चांगला स्रोत असेल तरी ही तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज या कारणामुळे नाकारला जाऊ शकतो.

कारण कार्ड जारी कर्त्यांना तुमच्या बँक खात्यात नियमितपणे कोणतेही निश्चित उत्पन्न दिसत नाही. कारण बहुसंख्य बँका आणि कार्ड जारी कर्त्यांचा हा एक निकष आहे की कार्ड घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्नाचे स्त्रोत निश्चित असले पाहिजे, जेणेकरून बँकेला विश्वास बसेल की तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड बिले वेळोवेळी भरू शकता. त्यामुळे जर तुम्ही पगारदार नसाल तर तुमचे क्रेडिट कार्ड अर्ज नाकारले जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण बँका सहसा कोणत्याही प्रकारची जोखीम घेत नाहीत.

2. तुम्ही पगारदार आहात पण तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर

You are Salaried but your Credit Score is Low

मित्रांनो, आपल्या सर्वांना चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे महत्त्व काय आहे हे तर माहितच आहे. त्यामुळे जरी तुम्ही तुमचा पहिला निकष पूर्ण केलात की तुम्ही पगारदार आहात आणि तुमच्या उत्पन्नाचा निश्चित स्रोत आहे पण तुमचा क्रेडिट स्कोर जर कमी असेल तर नवीन क्रेडिट कार्डसाठी तुमचा अर्ज लगेचच रिजेक्ट केला जाईल.

मित्रांनो, चांगला क्रेडिट स्कोर तुमची क्रेडिट योग्यता सिद्ध करत असतो. चांगला क्रेडिट स्कोर हा 750 च्या वर मानला जातो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर जर 750 च्या खाली असेल तर तो खूप वाईट प्रभाव निर्माण करू शकतो. बँका किंवा कार्ड जारीकर्त्यांना असे वाटू शकते की तुमची देयके चुकतील किंवा तुमचा क्रेडिट स्कोर कमी असल्याने तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरू शकणार नाही. तसेच तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत नाही आणि तुम्ही पैसे हाताळण्यासाठी पुरेसे जबाबदार नाही. असाही समज होऊ शकतो. त्यामुळे बँका आणि इतर कार्ड जारीकर्ते कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला क्रेडिट कार्ड देण्याचा धोका पत्करत नाहीत.

हे हि वाचा: Credit Score कसा वाढवावा? काही खास टिप्स

त्यामुळे जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 च्या खाली असेल तर तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. अश्या परिस्थितीत एकमेव उपाय म्हणजे उच्च क्रेडिट स्कोर किंवा क्रेडिट स्कोर किमान 750 च्या वर ठेवणे. हे तुम्ही कोणतेही पेमेंट न चुकवता आणि वेळोवेळी नियमित पणे तुमची बिले भरून करू शकता. त्यामुळे जर तुमचे क्रेडिट कार्ड नाकारण्याचे कारण कमी क्रेडिट स्कोर असेल तर पुन्हा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर हा 750 च्या वर ठेवणे आवश्यक आहे.

3. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे पण तुमचा पगार कमी असेल तर

Your Credit Score is Good but your Salary is low

मित्रांनो, तुमचा क्रेडिट स्कोर चांगला म्हणजे 750 च्या वर आहे. पण जर तुमचा पगार कमी असेल तर तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज रिजेक्ट करण्यामागचे हे तिसरे कारण असू शकते. कारण कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करताना पगार हा सर्वात महत्त्वाचा निर्धारक घटक मानला जातो. खरंतर पगार हा तुमच्या क्रेडिट स्कोर पेक्षा जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की जिथे लोकांचा सरासरी क्रेडिट स्कोर होता परंतु त्यांचा पगार जास्त होता. त्यामुळे त्यांच्या उच्च पगाराच्या आधारे त्यांचा क्रेडिट कार्डचा अर्ज स्पष्टपणे मंजूर झाला.

पण चांगली पगाराची रक्कम म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तसेच चांगला पगार कसा ठरवला जातो आणि कोणत्या आधारावर? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की असा कोणताही पगार ब्रॅकेट नाही जो चांगला पगार मानला जातो. हा पगार ब्रॅकेट प्रत्येक बँकेत बदलत असतो. त्यामुळे चांगला पगार मानला जाणारा कोणताही विशिष्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. हे विविध घटकांवर अवलंबून असते आणि त्यापैकी एक म्हणजे तुम्ही ज्या शहरात राहता ते शहर आणि इतर घटक म्हणजे तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन चांगले करत असाल आणि तुम्ही बँक खात्यातील शिल्लक राखण्यास सक्षम असाल तर. हे घटक ही तुमची क्रेडिट योग्यता ठरवतात.

कधी कधी अशी परिस्थिती असू शकते जेव्हा तुमचा पगार खूप असतो पण तुम्ही इतका खर्च करता की तुमच्या खात्यातील शिल्लक खूपच कमी असते. त्यामुळे हे सर्वस्वी बँका किंवा कार्ड जारी करणाऱ्यां कंपन्या वर अवलंबून आहे. जर त्यांना वाटत असेल की तुमचा पगार किमान पगाराचा निकष पूर्ण करत नाही आणि तुलनेने कमी आहे तर तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जाऊ शकतो.

4. तुम्ही या पूर्वी कधीही कर्ज घेतले नसेल तर

You have never taken a Loan before

मित्रांनो, तुम्ही जर या आधी कधीच कोणते कर्ज घेतले नसेल जसे की शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, वगैरे … तर तुम्ही क्रेडिट कार्डसाठी केलेला अर्ज नाकारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात चांगली पुरेशी शिल्लक ठेवत नसाल तर त्याचा ही तुमच्या क्रेडिट कार्ड अर्जावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे बँकांचा असा समज होऊ शकतो की तूम्ही एक जबाबदार व्यक्ती नाही आहात तुम्हला तुमचे आर्थिक नियोजन करता येत नाही.

तसेच तुम्ही तुमचे पेमेंट वेळेवर करता असा कोणता पुरावा ही दिसत नाही. अश्या व्यक्तींना बँका किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या क्रेडिट कार्ड देण्याची किंवा कर्ज देण्याची जोखीम घेत नाही. ज्याने या आधी कधीच कर्ज घेतले नाही अशी व्यक्ती क्रेडिट कार्ड चे बिल वेळेवर भरेल की नाही याची शाश्वती नसते. म्हणून मग बँक तुमचा क्रेडिट कार्ड चा अर्ज नाकारते.

5. तुम्ही आधी पासून खूप सारे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर

Too many Credit Cards already in Use

मित्रांनो, तुम्ही जर आधी पासूनच खूप सारे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचा क्रेडिट कार्ड साठीचा अर्ज नाकारण्या मागे हे एक कारण असू शकते. तुम्ही जरी पगारदार असाल, तुमचे उत्पन्न ही निश्चित असेल, तुमचा क्रेडिट स्कोर ही 750 च्या वर असेल, आणि तुमचा पगार ही जास्त असेल तरी देखील तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जातो याचे मुख्य कारण असे देखील असू शकते की तुम्ही खूप सारे क्रेडिट कार्ड आधीच वापरत आहात. अनेक क्रेडिट कार्ड असल्यामुळे असा समज होऊ शकतो की क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन केले नव्हते. ही गोष्ट आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या…

मित्रांनो, समजा तुम्हला 50,000 पगार आहे. आणि तुमच्याकडे प्रत्येकी 60,000 मर्यादा असलेली तीन क्रेडिट कार्डे आहेत. त्यामुळे तुमची क्रेडिट मर्यादा नंतर 1,80,000 होईल. आता जर 30% दरा नुसार तुमचा क्रेडिट वापर दर (Credit Utilization Ratio) काढला तर तुमची रक्कम 54,000 होईल. इथे ही रक्कम तुमच्या पगारापेक्षा जास्त होते. आणि ही तुमच्यासाठी एक धोकादायक परिस्थिती ठरू शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर आधीच खूप सारे क्रेडिट कार्डे असतील तर बँक किंवा इतर कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या तुमचा क्रेडिट कार्ड साठीचा अर्ज नाकारू शकतात.

6. तुम्ही खूप क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल तर

You have applied for Too Many Credit Cards

मित्रांनो, तुम्ही खूपसारे क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास तुमची एक वाईट छाप क्रेडिट रिपोर्ट वर निर्माण होते. आणि हेच तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्याचे कारण ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला माहीत नसेल पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा कार्ड जारीकर्ते तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर ‘हार्ड सर्च ‘ असे चिन्ह लावतात. आणि जेव्हा तुम्ही परत क्रेडिट कार्ड अर्ज करता तेव्हा इतर कार्ड जारी कर्त्यांना हे चिन्ह दिसते व तुम्ही कार्डसाठी खूप संघर्ष करत आहात आणि तुमचे आर्थिक नियोजन व्यवस्थित नाही असे दिसून येते.

तसेच जेव्हा आपण कधी क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा ती इन्कवायरी आपल्या क्रेडिट स्कोर मध्ये दिसायला लागते. आणि जर आपण कमी वेळेत बऱ्याच बँकांमध्ये क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतो तेव्हा या सर्व इन्कवायरीझ क्रेडिट रिपोर्ट वर अपडेट होतात. आणि या सर्व इन्कवायरी बघून बँक क्रेडिट कार्ड साठीचा अर्ज रिजेक्ट करते. त्यामुळे कमी वेळेत जास्त बँकांमध्ये क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नये.

7. तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमी क्रेडिट हिस्टरी असलेल्या एखादया व्यक्तिशी जोडलेले असाल तर

You are Financially Connected & Linked to someone with a Low Credit History

मित्रांनो, तुमचे क्रेडिट कार्ड साठीचे अर्ज नाकारण्या मागचे सातवे कारण म्हणजे जर तुम्ही अतिशय कमी आणि खराब क्रेडिट स्कोर असलेल्या एखाद्या व्यक्तीशी जोडलेले आहात. म्हणजे जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ज्याने खराब क्रेडिट स्कोर असलेल्या एखाद्या व्यक्ती सोबत कधी कर्ज घेतले असेल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट अहवाला वर त्या व्यक्तीशी आर्थिक दृष्ट्या जोडले जातात. यामुळे तुमची एक वाईट प्रतिष्ठा निर्माण होते. त्यामुळे जरी तुम्ही तुमच्या नावावर क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असला तरी ही बँका किंवा कार्ड जारीकर्ते जेव्हा तुमची इन्कवायरी करतील तेव्हा ही गोष्ट त्यांना दिसेल व त्या क्रेडिट इतिहासाचा तुमच्या अर्जावर वाईट परिणाम होऊ शकतो. आणि यामुळे तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जाऊ शकतो.

मित्रांनो, वरील 7 कारणांमुळे तुमचा क्रेडिट स्कोर साठीचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. अन्य ही काही कारणे आहेत ज्यामुळे तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला जाऊ शकतो. जसे की तुम्ही उशिरा पेमेंट करत असाल तर, तसेच तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत जर तुमच्या वर जास्त कर्जे असतील तरी देखील तुमच्या क्रेडिट कार्ड मिळण्याच्या शक्यता कमी होतात. याशिवाय जर तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरताना तो जर चुकीचा भरला गेला असेल तरी देखील तुमच्या क्रेडिट कार्ड अर्जाला रिजेक्ट केले जाऊ शकते.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण क्रेडिट स्कोर अर्ज नाकारण्या मागचे काय काय कारणे असू शकतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा लेख महत्व पुर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्या नवं नवीन व महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. धन्यवाद।

FAQ

क्रेडिट कार्ड अर्ज रिजेक्ट झाल्यावर काय करावे?

मित्रांनो, तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला त्या रिजेक्टचे कारण शोधावे लागेल. त्यासाठी जोपर्यंत तुमच्या मेल वर प्रतिकूल कारवाई चे पत्र (Adverse Action letter) येत नाही तो पर्यंत दुसऱ्या कार्ड साठी अर्ज करू नये. आणि कारण समजल्या वर त्याचे निराकरण करण्यासाठी योग्य ते पावले उचला. जसे की तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करा, क्रेडिट कार्ड शिल्लक असेल तर ती भरून टाकावी, मागील देय पेमेंट भरून टाकावी किंवा तुमचा क्रेडिट अहवाल अनफ्रिज करावा लागेल.

जर क्रेडिट कार्ड अर्ज खूप जास्त क्रेडिट कार्ड्स असल्यामुळे नाकारला गेला तर काय करावे?

मित्रांनो, तुमच्या कडे जर आधीच खूप जास्त क्रेडिट कार्ड्स असतील तर तुम्हला नवीन कार्ड साठी अर्ज करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला जास्त क्रेडिट हवे असेल तर बँके कडे तुमच्या चालू क्रेडिट कार्डच्या क्रेडिट मर्यादेत वाढ करण्याची विनंती करणे योग्य राहील. तसेच तुमच्या सर्व क्रेडिट कार्डचा वापर 30% पेक्षा कमी ठेवावा, जेणेकरून भविष्यात तुमच्या क्रेडिट कार्डचा अर्ज लवकर अँप्रोव्ह होईल.

क्रेडिट कार्डचा प्रोसेसिंग टाइम किती असतो?

मित्रांनो, तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर बँक तुमची क्रेडिट पार्श्वभूमी पडताळून बघते. आणि त्यासाठी 7 ते 15 कामकाजाचे दिवस लागू शकतात.

क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला गेला आहे, हे कसे कळेल?

मित्रांनो, तुमचा क्रेडिट कार्ड अर्ज नाकारला गेल्यास तुम्हाला तुमच्या बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कडून Adverse Action letter मिळते. यात तुमचा अर्ज नाकारण्या मागचे कारणे दिलेली असतात. त्यामुळे हे पत्र तुम्ही काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड अर्ज का नाकारले गेले या मागील कारणांची स्पष्ट माहिती मिळेल.

एकदा क्रेडिट कार्ड नाकारल्या नंतर पुन्हा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी किती वेळ प्रतीक्षा करावी?

मित्रांनो, क्रेडिट कार्ड साठी पून्हा अर्ज करण्यापूर्वी कमीत कमी सहा महिने प्रतीक्षा केने योग्य आहे. पण इथे महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पुन्हा अर्ज करण्या पूर्वी तुमची क्रेडिट योग्यता सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मगच क्रेडिट कार्ड साठी अर्ज करावा.

Tags: Credit Card Reject Karne, Credit Card Reject Ka Hote, Credit Card Nakarle Ka Jate, Credit Card Arj Reject, SBI Credit Card Reject Karne, HDFC Credit Card Reject Karne, ICICI Credit Card Reject Karne, Credit Card Application Reject Karne, Credit Card Reject Zale Ahe Kay Karave, Credit Card Reject Ka Hotat, Credit Card Reject Hou Naye Mhanun Kay Karave, Maze Credit Card Application Reject Zale Ahe Kay Karave