2023 मधील सर्वात चांगले क्रेडिट कार्ड | Best Credit Card in 2023

नमस्कार मित्रानो, आज आपण 2023 मधील सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड कोण कोणते आहेत, या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आत्ताच्या डिजिटल काळात सर्वच जण कॅश ऐवजी क्रेडिट कार्ड वापरताना दिसतात. या क्रेडिट कार्डचा सर्वात जास्त वापर हा ऑनलाईन व ऑफलाईन शॉपिंग करण्यासाठी केला जातो. पूर्वी आपण जेव्हा काही खरेदी करायला जायचो तेव्हा कॅश घेऊन जात होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता लोकं खरेदी करण्यासाठी कॅश न घेता क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरले जातात. व आपली सर्व बिलं पे करतात. एवढेच नाही तर तुम्हाला कधी वैयक्तिक कर्ज घेण्याची गरज पडली तरी देखील तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. यात तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी मर्यादा असेल तेवढे तुम्हाला कर्ज मिळू शकते. याशिवाय क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही ईमआय सुद्धा भरू शकता.मित्रांनो, क्रेडिट कार्डचे असे अनेक फायदे आहेत. पण सध्या आपल्या भारतात इतके सारे क्रेडिट कार्ड्स उपलब्ध आहेत की कोणते क्रेडिट कार्ड सर्वात चांगले आहे, हे ठरवणे थोडे अवघड झाले आहे. तसेच एकच क्रेडिट कार्ड प्रत्येकासाठी योग्य असेल असे नाही. तर प्रत्येक क्रेडिट कार्ड हे वेगवेगळे असते व प्रत्येकाचे विविध प्रकारचे फायदे असतात. त्यामुळे आपल्यासाठी कोणते क्रेडिट कार्ड योग्य आहे हे ठरवणे वाटते तितके सोपे नाही. पण मित्रांनो, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड कोण कोणते आहेत याबद्दल माहिती सांगणार आहोत. हा लेख वाचून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणते असेल हे ठरविण्यात नक्कीच मदत होईल. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

आता 2023 मधील सर्वात बेस्ट क्रेडिट कार्ड कोण कोणते आहेत त्याची माहिती पुढील प्रमाणे:-

SBI Cashback Credit Card

SBI Cashback Credit Card

मित्रांनो, या वर्षीचे सर्वात बेस्ट क्रेडिट कार्डच्या लिस्ट मधील पहिले नाव म्हणजे SBI Cashback क्रेडिट कार्ड. हे क्रेडिट कार्ड SBI ने 2022 मध्ये लाँच केले होत. मित्रांनो, हे एक असे क्रेडिट कार्ड आहे जे कोणत्याही मर्चंट रेस्ट्रिकशन शिवाय ऑनलाईन ट्रांझक्शन वर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक देते. तसेच या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या सर्व ऑफलाईन खर्च आणि युटिलिटी बिल पेमेंट वर तुम्हाला 1% कॅशबॅक मिळते. कोणत्याही ऑनलाईन खरेदी वर तुम्हाला कॅशबॅक मिळवता येते. फक्त रेंट पेमेंट, मर्चंट ईमआय, कॅश ऍडव्हान्स, बॅलन्स ट्रान्सफर, कॅश आणि flexipay, पेट्रोल पंप या ठिकाणी जर तुम्ही या क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केले तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कॅशबॅक बेनिफिट मिळत नाही.या क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी काहीच द्यावी लागत नाही. फक्त दुसऱ्यावर्षी पासून अन्युअल फी 999 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. याशिवाय कार्ड द्वारे तुम्हाला एका वर्षात चार मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज भेटी करता येतील. तसेच स्टेटमेंट तयार केल्या पासून दोन दिवसांच्या आत तुमच्या SBI कार्ड खात्यात कॅशबॅक ऑटो क्रेडिट केला जातो.

मित्रांनो, कॅशबॅक SBI क्रेडिट कार्डसाठी 18 ते 60 वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत. तसेच हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर ही चांगला म्हणजे 750 च्या आसपास असणे आवश्यक असते. पगारदार किंवा स्वयंरोजगार असणारी कोणतेही व्यक्ती हे क्रेडिट कार्ड घेऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन खरेदी ला प्राधान्य देत असाल तर कॅशबॅक एसबीआय क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी एक चांगला व उत्तम पर्याय ठरू शकते.

AXIS ACE Credit Card

AXIS ACE Credit Card

मित्रांनो, भारतातील सर्वोत्तम कॅशबॅक क्रेडिट कार्ड पैकी एक म्हणजे ऍक्सिस ACE क्रेडिट कार्ड. जे लोक चांगले कॅशबॅक क्रेडिट कार्ड शोधत आहेत त्यांच्यासाठी ऍक्सिस चे हे क्रेडिट कार्ड एक योग्य पर्याय आहे. या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी ही 499 रुपये इतकी आहे. यात पण जर कार्ड इश्यू झाल्यावर तुम्ही 45 दिवसांच्या आत 10,000 रुपये खर्च केले तर तुमची जॉइनिंग फी रिव्हर्स होते. तसेच या कार्डची renewal फी ही 499 रुपये असून यात ही जर तुम्ही एका वर्षाच्या आत 2 लाख रुपये खर्च केले तर तुमची वार्षिक फी माफ केली जाते.

मित्रांनो, या क्रेडिट कार्डचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे बिल पेमेंट, DTH रिचार्ज, मोबाईल रिचार्ज या वर तुम्हाला अनलिमिटेड 5% कॅशबॅक मिळतो. याशिवाय स्वीगी, ओला, झोमॅटो वर तुम्हाला 4% कॅशबॅक मिळतो. आणि इतर सर्व खर्चांवर 2% कॅशबॅक मिळतो.

याशिवाय या ACE क्रेडिट कार्ड सह तुम्हाला एका वर्षात चार मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज भेटी करता येतील. तसेच जेवणावर 20 टक्के पर्यंत सूट देते. मित्रांनो, ऍक्सिस ACE क्रेडिट कार्ड द्वारे बिल पे करून मिळवलेला कॅशबॅक हा आपोआप कार्ड धारकांच्या अकाउंटला जमा होतो. तसेच देशातील सर्व इंधन केंद्रांवर इंधन व्यवहारांसाठी 1% इंधन अधिभार माफ करण्यात येतो. इंधन खर्च, वॉलेट रीलोड, सोन्याच्या वस्तूंची खरेदी, ईएमआयमध्ये रूपांतरित केलेली खरेदी, रोख पैसे काढणे, कार्डची थकबाकी भरणे, कार्ड फी आणि इतर कार्ड शुल्क भरणे या सारख्या काही खर्चावर कॅशबॅक मिळत नाही.

हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच ACE क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा व उत्पन्नाचा पुरावा अशी काही कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच बँक क्रेडिट कार्ड देताना तुमचा क्रेडिट स्कोर ही तपासून ही बघते त्यामुळे तो चांगला असायला हवा.

IDFC First Wow Credit Card

IDFC First Wow Credit Card

मित्रांनो, IDFC First Wow क्रेडिट कार्ड हे IDFC बँकेद्वारे जारी केले जाते. या कार्ड चे अनेक फायदे आणि वैशिष्ट्ये आहेत. हे एक आजीवन (Lifetime) मोफत क्रेडिट कार्ड आहे, कारण ते कुठल्याही प्रकारचे वार्षिक फी किंवा जॉइनिंग फी घेत नाही. हे क्रेडिट कार्ड तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट वर 6.25% वार्षिक व्याजदर देते. तसेच भारतातील रेस्टॉरंट मध्ये जेवणावर तुम्हाला 20% पर्यंत सूट मिळू शकते व हेल्थ व वेलनेसच्या आउटलेट मध्ये जाऊन खरेदी केल्यास तुम्हाला 15% पर्यंत सूट मिळू शकते. तसेच तुम्ही एका वर्षात चार वेळा रुपये 1399 चे रोडसाइड असिस्टन्स मिळवू शकता. शिवाय 2 लाख पर्यंत वैयक्तिक अपघात संरक्षण देखील मिळते.

या कार्ड ची अजून एक खासियत म्हणजे कार्डधारक त्याचे 2500 रुपये पेक्षा जास्त व्यवहार समान मासिक हफत्यांमध्ये रूपांतरित करू शकतात. कार्ड ऍक्टिव्हेशन च्या 90 दिवसांच्या आत पहिल्या ईमआय व्यवहाराच्या 1000 रुपये खरेदी वर तुम्हाला 5% कॅशबॅक ही मिळू शकतो. तसेच भारतातील सर्व इंधन केंद्रावर 1% इंधन अधिभार माफ मिळतो.

याशिवाय प्रत्येक खर्च वर तुम्हाला 4 रिवॉर्ड पॉईंट मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे रिवॉर्ड पॉईंट्स कधीही कालबाह्य होत नाहीत. तसेच तुम्ही तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स वापरून ऑनलाईन स्टोअर किंवा रिटेल स्टोअर मधून खरेदी करू शकता. इतर क्रेडिट कार्ड च्या तुलनेत हे क्रेडिट कार्ड सर्वात कमी व्याजदर आकारते.

मित्रांनो, वर सांगितल्या प्रमाणे IDFC च्या या क्रेडिट कार्डसाठी वार्षिक फी व जॉइनिंग फी तसेच फॉरेक्स मार्क अप फी ही शून्य आहे. म्हनजे आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मित्रांनो, या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असायला हवे व तो भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराच्या नावावर IDFC बँकेत किमान रुपये 5000 ची एफडी खाते असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्ही जर एखादे कोणतेही शुल्क न घेणारे व अनेक फायद्यांसह येणारे एक सुरक्षित क्रेडिट कार्ड शोधत असाल तर IDFC First Wow क्रेडिट कार्ड तुमच्या साठी आकर्षक, फायदेशीर व सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

Airtel Axis Credit Card

Airtel Axis Credit Card

मित्रांनो, Airtel च्या बहुतांश सेवा वापरणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करून हे क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले आहे. या क्रेडिट कार्ड वर तुम्हाला रुपये 500 चे वेलकम गिफ्ट वाउचर मिळते. तसेच airtel थँक्स अँप द्वारे केलेल्या खर्चावर 25% पर्यंत कॅशबॅक मिळतो. म्हणजेच airtel मोबाईल, ब्रॉडबँड, वायफाय, डिटीएच रिचार्ज वर 25% कॅशबॅक मिळतो. युटिलिटी बिल पेमेंट वर 10% कॅशबॅक आणि या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या इतर खर्चांवर 1% कॅशबॅक मिळतो. तसेच दरवर्षी मोफत डोमेस्टिक लाऊंज प्रवेश देखील मिळतो. या कार्डसाठी जॉइनिंग फी 500 रुपये आहे. ही फी भरल्यानंतर तुम्हाला ऍमेझॉन गिफ्ट वाउचर मिळते. या क्रेडिट कार्ड ची अन्युअल फी ही 500 रुपये असून जर मागील वर्षी तुम्ही 2 लाख रुपये पर्यंत खर्च केला तर तुम्हाला वार्षिक फी माफ केली जाते.

परंतु इंधन खरेदी, EMI चा व्यवहार, रोख पैसे काढणे, भाडे भरणे, वॉलेट रीलोड, क्रेडिट कार्ड फी आणि शुल्क भरणे इत्यादी वर तुम्हाला कोणताही कॅशबॅक मिळत नाही. याशिवाय ऍक्सिस बँकच्या डायनिंग डिलाइट प्रोग्रॅम अंतर्गत भारत देशातील अनेक रेस्टॉरंट मध्ये जेवणावर 20% सूट मिळू शकते.

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणं गरजेचं आहे. तसेच तो भारताचा रहिवासी असावा व त्याच्या उत्पन्नाचा एक निश्चित स्रोत असणे आवश्यक आहे. याशिवाय कागदपत्रे सादर करण्यासाठी तुमच्या कडे ओळखपत्र, निवासी पुरावा, उत्पन्नाचा पुरावा व अर्जदाराचा फोटो असावा. तर मित्रांनो, तुम्ही जर airtel चे नियमित ग्राहक असाल व तुम्हाला तुमच्या कार्ड वर 25 टक्के कॅशबॅक देणारे आश्चर्यकारक वैशिष्ट्य हवे असेल तर तुम्ही airtel axis बँक क्रेडिट कार्ड चा नक्कीच विचार करू शकता.

SBI Simply Save and SBI Simply Click Credit Card

SBI Simply Save & SBI Simply Click Credit Card

मित्रांनो, SBI Simply Save क्रेडिट कार्ड आणि SBI Simply Click क्रेडिट कार्ड ही दोन्ही कार्डे SBI द्वारे जारी केलेले दोन सर्वात जास्त परवडणारे आणि अत्यंत महत्त्वाचे असे क्रेडिट कार्डस आहेत. यात SBI Simply Save कार्डधारकांचा दैनंदिन ऑफलाईन खर्च करण्यास मदत करते. तर SBI Simply Click ऑनलाईन खर्च करण्यासज मदत करते. त्यामुळे तुम्हाला जर ऑनलाईन खरेदी करायला आवडत असेल आणि रिवार्ड्स ही मिळवायचे असतील तर तुम्ही एसबीआय च्या सिम्पली क्लीक क्रेडिट कार्ड घेतले पाहिजे. आणि जर तुम्ही ऑफलाईन खरेदी करण्यावर भर देत असाल तर तुम्ही एसबीआय चे सिम्पलय सेव्ह ऑप्शन ला सिलेक्ट करायचे आहे.

मित्रांनो, SBI सिम्पली सेव्ह क्रेडिट कार्ड ची वार्षिक फी ही रुपये 499 इतकी असून मागील वर्षात 90 हजारच्या खर्चांवर ही फी रिव्हर्स केली जाते. तर SBI च्या सिम्पली क्लीक क्रेडिट कार्ड ची वार्षिक फी रुपये 499 असून मागील वर्षी 1 लाख रुपयेच्या खर्चावर ही फी रिव्हर्स केली जाते. एसबीआय सिम्पली सेव्ह मध्ये तुम्हाला वेलकम ऑफर दिली जाते यात कार्ड मिळाल्या पासून पहिल्या 30 दिवसांत तुमच्या पहिल्या एटीएम मधून पैसे काढल्यास रुपये 100 कॅशबॅक मिळवता येतो. तर एसबीआय सिम्पली क्लीक मध्ये एक्सकल्युझिव्ह पार्टनर सह ऑनलाईन खर्चांवर 10x रिवॉर्ड पॉईंट्स मिळवता येतात. आणि इतर सर्व ऑनलाईन खर्चांवर 5x रिवॉर्ड पॉईंट्स मिळवता येतील.

एसबीआय सिम्पली सेव्ह व सिम्पली क्लीक दोन्ही कार्ड मध्ये निवडक रेस्टॉरंट मध्ये जेवणावर 15% सूट मिळवता येते. तसेच भारतातील कोणत्याही पेट्रोल पंप वर रुपये 500 ते 3000 च्या दरम्यान केलेल्या व्यवहारावर 1% इंधन अधिभार माफ होते. याशिवाय एसबीआय सिम्पली सेव्ह क्रेडिट कार्ड मध्ये जेवण, सिनेमा, डिपार्टमेंटल स्टोअर, किराणा मालावर खर्च केलेल्या प्रति रुपये 100 वर तुम्हाला 10 रिवॉर्ड पॉईंट्स मिळवता येतात.

मित्रांनो, एसबीआय सिम्पली सेव्ह क्रेडिट कार्ड द्वारे तुम्हाला 4 लाख वार्षिक खर्चावर रुपये 11441 पर्यंत बचत करता येते. तर एसबीआय सिम्पली क्लीक क्रेडिट कार्ड द्वारे तुम्हाला 4 लाख वार्षिक खर्चावर रुपये 14541 पर्यंत बचत करता येते.

BPCL SBI Octane Credit Card

BPCL SBI Octane Credit Card

मित्रांनो, तुम्ही जर इंधनावर जास्त खर्च करत असाल तर तुमच्याकडे हे क्रेडिट कार्ड असले पाहिजे. या क्रेडिट कार्ड मुळे पेट्रोल आणि डिझेलसाठी कार्ड ने पेमेंट करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होतो. या क्रेडिट कार्ड मुळे इंधन, मॅक लुब्रिकन्ट्स, भारत गॅस म्हणजेच LPG यांसारख्या सुविधासाठी भारत पेट्रोलियमच्या संकेतस्थळ किंवा अँपच्या माध्यमातून खर्च केल्यास तुम्हाला 25 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. तसेच BPCL च्या पेट्रोल पंप वर इंधन किंवा ल्युब्रिकन्ट्ससाठी खर्च केल्यावर 7.25 टक्के कॅशबॅक मिळतो व भारत गॅसच्या सुविधेसाठी खर्च केल्यास तुम्ही 6.25 टक्के कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय डिपार्टमेंटल स्टोअर, किराणा माल दुकान या सारख्या ठिकाणी हे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला सूट मिळू शकते.

या क्रेडिट कार्ड ची जॉइनिंग फी ही रुपये 1499 इतकी आहे. व वार्षिक शुल्क ही 1499 रुपये आहे. यात ही वार्षिक 2 लाख रुपये खर्च केल्यास या फी मध्ये सूट मिळू शकते. तसेच दर वर्षी चार मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज भेटी देखील मिळतात. या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी भरल्यानंतर तुम्हाला रुपये 1500 किंमतीचे 6000 बोनस रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. हे रिवॉर्ड पॉईंट्स जॉइनिंग फी भरल्याच्या 30 दिवसांच्या आत जमा केले जातात. मित्रांनो, याशिवाय जेवणावर, सिनेमा तिकिटांवर, किराणा माल या ठिकाणी प्रत्येक खर्चावर 100 रुपये साठी 10 रिवॉर्ड पॉईंट मिळतात. तसेच तीन लाख रुपयांच्या किमान वार्षिक खर्चासह, कार्ड वापरकर्ते आदित्य बिर्ला फॅशन, यात्रा, अर्बन लॅडर, हुश पपीज, बाटा कडून 2,000 रुपयांचे ई-गिफ्ट व्हाउचर मिळवू शकतात. हे क्रेडिट कार्ड तुम्ही वीज बिल, टेलिफोन- मोबाईल बिल, तसेच इतर युटिलिटी बिल पेमेंट करण्यासाठी देखील वापरता येते. या क्रेडिट कार्ड ची चांगली गोष्ट म्हणजे हे कार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील स्वीकारले जाते.

मित्रांनो, 18 ते 60 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती हे क्रेडिट कार्ड घेऊ शकते. तसेच या क्रेडिट कार्ड साठी अर्ज करताना काही योग्य कागदपत्रे देखील सादर करावी लागतात जसे की ओळखीचा पुरावा, पत्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, इत्यादी कागदपत्रे लागतात.

Amazon Pay ICICI Credit Card

Amazon Pay ICICI Credit Card

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड भारतातील सर्वात लोकप्रिय कॅशबॅक क्रेडिट कार्ड पैकी एक आहे. तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट कार्ड चे वार्षिक शुल्क भरायचे नसेल आणि भरपूर कॅशबॅक हवा असेल तर तुमच्याकडे ऍमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड हे असायलाच पाहिजे. मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड तुम्ही आयुष्यभर मोफत वापरू शकता. म्हणजे या क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला कोणतीही वार्षिक फी किंवा जॉइनिंग फी द्यावी लागत नाही. हे क्रेडिट कार्ड सर्व व्यवहारांवर कॅशबॅक देते. यात ऍमेझॉन प्राइम मेंबर ने ऍमेझॉन वर केलेल्या खरेदी वर 5 टक्के कॅशबॅक मिळतो. तर ऍमेझॉन नॉन प्राइम मेम्बर्स साठी केलेल्या खरेदी वर 3% कॅशबॅक मिळतो. तर ऍमेझॉन पे भागीदार व्यापाऱ्यांकडून खरेदी, गिफ्ट कार्ड, फ्लाइट बुकिंग, मोबाईल व डिटीएच रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी केलेल्या व्यवहारांवर 2 टक्के कॅशबॅक तर इतर खर्चांवर 1% कॅशबॅक मिळतो.

या कार्ड द्वारे सोने खरेदी, ईमआय मध्ये ऍमेझॉन वर खरेदी आणि इंधन खरेदीवर कोणत्याही प्रकारचा कॅशबॅक दिला जात नाही. तसेच पार्टनर रेस्टॉरंट मध्ये तुमच्या जेवणाच्या बिलावर तुम्हाला 15 टक्के सूट मिळते. याशिवाय भारतातील सर्व पेट्रोल पंप वर इंधन अधिभारावर 1 टक्के सूट मिळते. तसेच ऍमेझॉन वर रुपये 3000 पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या व्यक्तीला नो कॉस्ट ईमआय ऑफर केली जाते. आणि ही ऑफर केवळ तीन ते सहा महिन्यांसाठी असते.

मित्रांनो, या कार्डसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय हे 18 ते 60 वर्षे वयोगटातील असायला हवे. तसेच रोजगार असलेले व स्वयंरोजगार असणारे कोणीही या कार्ड साठी अर्ज करू शकतात. याशिवाय आयसीआयसीआय ग्राहकांसाठी किमान आवश्यक उत्पन्न 25,000 व इतर अर्जदारांची किमान आवश्यक उत्पन्न 35,000 असणे आवश्यक आहे. तसेच अर्जा सोबत काही कागदपत्रे देखील सादर करावी लागतात जसे की ओळखीचा पुरावा, पत्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा.

Flipkart Axis Bank Credit Card

Flipkart Axis Bank Credit Card

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड एक को- ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे जे फ्लिपकार्ट आणि ऍक्सिस बँक ने जुलै 2019 मध्ये लाँच केले. ज्यांना फ्लिपकार्ट व Myntra वर शॉपिंग किंवा खरेदी करायला आवडते त्यांच्यासाठी हे कार्ड खूप फायदेशीर आहे. या कार्ड ची जॉइनिंग फी ही 500 रुपये आहे. व वार्षिक फी 500 रुपये असून तुम्ही जर मागील वर्षी 2 लाख वार्षिक खर्च केल्यास ही फी माफ केली जाते. तसेच यात तुम्हाला कार्ड जारी केल्यावर 1100 रुपयांच्या वेलकम गिफ्ट्स मिळतात. याकार्ड द्वारे तुम्ही जर फ्लिपकार्ट व Myntra वर खरेदी केली तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळतो. तर स्वीग्गी, उबेर, PVR, आणि Cure.Fit यां सारख्या विशिष्ट व्यापारांवर 4 टक्के कॅशबॅक मिळतो. व इतर खर्चांवर 1.5 टक्के कॅशबॅक मिळतो.

याशिवाय तुम्हाला दरवर्षी चार मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंज भेटी देखील मिळतात. पार्टनर रेस्टॉरंट मध्ये जेवणावर तुम्हाला 20 टक्के पर्यंत सूट मिळते व PVR सिनेमा वर त्वरित 4% कॅशबॅक मिळतो. याशिवाय रुपये 400 ते 4000 दरम्यान च्या इंधन खरेदीवर 1 टक्के इंधन अधिभार तुम्ही टाळू शकता.

मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन खरेदीची आवड असेल तर आणि जर तुम्हाला हे क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर तुमचे किमान वय हे 18 वर्षे पूर्ण असायला हवे. आणि तुमच्याकडे ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा व उत्पन्नाचा पुरावा सादर करणारे कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तसेच तुमचे किमान उत्पन्न हे 15 हजार ते 30 हजार इतके असणे गरजेचे आहे. तसेच या क्रेडिट कार्डची मर्यादा ही 25 हजारे ते 5 लाख पर्यंत असू शकते. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर ऑफलाईन शॉपिंग किंवा खरेदी करायला आवडत असेल तर फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी योग्य पर्याय नाही. कारण ऑफलाईन खरेदी वर तुम्हाला फक्त 1.5 टक्के कॅशबॅक मिळतो. तसेच हे क्रेडिट कार्ड कोणतेही विमा फायदे देत नाही.

या उलट तुम्ही जर ऑनलाईन खरेदी करणारे असाल व ऍमेझॉन वर खरेदी करण्यापेक्षा फ्लिपकार्ट ला प्राधान्य देत असाल तर तुम्ही या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तसेच तुम्ही जर जेवण ऑर्डर करण्यासाठी स्वीगी वापरत असाल, किंवा टॅक्सी कॅब साठी उबेर वापरत असाल तर हे कार्ड तुमच्या कडे असायलाच पाहिजे.

ICICI Platinum Chip Credit Card

ICICI Platinum Chip Credit Card

मित्रांनो, हे एक आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे. आणि जे क्रेडिट कार्डसाठी नवीन आहेत किंवा ज्यांना आपला क्रेडिट स्कोर सुधारायचा आहे अश्या लोकांनी हे क्रेडिट कार्ड वापरावे. या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी व वार्षिक फी ही शून्य आहे म्हणूनच हे एक आजीवन मोफत क्रेडिट कार्ड आहे. या कार्ड चे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे 100 रू खरेदी वर तुम्हाला 2 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. व प्रति रू 100 युटिलिटी व इन्शुरन्स वर खर्च केल्यास 1 रिवॉर्ड पॉईंट मिळतो. या रिवॉर्ड पॉईंट्स वर तुम्ही सिनेमा व ट्रॅव्हल वाउचर, जीवनावश्यक उत्पादने, आणि इतर व्यापारी माल घेऊ शकता. तसेच हे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही तुमच्या जेवणाच्या बिलावर 15 टक्के पर्यंत बचत करू शकता. तसेच 4000 रुपये पर्यंतच्या इंधन व्यवहारांवर तुम्ही 1 टक्के इंधन अधिभार माफी मिळवू शकता.

तसेच या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 23 ते 60 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच कोणीही पगारदार व स्वयंरोजगार करणारी व्यक्ती या कार्डसाठी अर्ज करू शकता.

HDFC Infinia Credit Card

HDFC Infinia Credit Card

मित्रांनो, या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी 12500 रुपये असून ही फी भरल्यावर तुम्हाला 12500 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. आणि या कार्डची वार्षिक फी सुद्धा 12500 रुपये प्लस जीएसटी आहे. जर तुम्ही मागील वर्षी 10 लाख रुपये खर्च केले असतील तर तुम्हाला वार्षिक फी माफ होऊ शकते. किरकोळ खर्चांवर दर 150 रुपये खर्च केल्यावर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. तसेच Smartbuy द्वारे प्रवास आणि खरेदी वर 10x रिवॉर्ड पॉईंट्स व स्टँड-अलोन रेस्टॉरंट मध्ये जेवणाच्या बिलावर 2x रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. याशिवाय या क्रेडिट कार्ड द्वारे 3000 हुन अधिक पार्टनर रेस्टॉरंट मध्ये जेवणावर विशेष ऑफर सह 15 टक्के पर्यंत सूट मिळू शकते. तर मॅरियट हॉटेल्स मध्ये अन्न आणि पेय बिलावर तुम्हाला 20 टक्के पर्यंत सवलत मिळू शकते. तसेच या कार्ड द्वारे इंधन व्यवहार केल्यास 1 टक्के सुविधा शुल्क माफ केले जाते. या कार्ड ची महत्वाची गोष्ट म्हणजे कार्ड मिळाल्यानंतर 50 दिवस पर्यंत तुम्ही व्याजमुक्त कालावधी चा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो, या कार्डची खासियत म्हणजे यात तुम्हाला मोफत डोमेस्टिक तसेच आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाऊंज भेटी करता येतात. या कार्डची अजून एक चांगले वैशिष्ट्य म्हणजे या कार्डद्वारे तुम्हाला अपघाती विमा संरक्षण तसेच इतर ही विमा लाभ मिळतात. मित्रांनो, या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुमचे वय हे 18 ते 60 वर्षे वयोगटातील असायला हवे. तसेच कार्ड धारक भारताचा निवासी किंवा अनिवासी ही असू शकतो. आणि ऍड ऑन कार्ड धारकाचे वय किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या कडे ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, उत्पन्नाचा पुरावा व तुमचा फोटो इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

Diners Club Black Credit Card

Diners Club Black Credit Card

मित्रांनो, या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी 10000 रुपये (प्लस GST) इतकी आहे तर वार्षिक फी 10000 रू ( GST लागू) असून तुम्ही जर मागील वर्षी 5 लाख पर्यंत खर्च केल्यास तुम्हाला ही फी माफ केली जाते. तसेच या क्रेडिट कार्डचा व्याजदर हा 1.99 % प्रति महिना किंवा 23.88% वार्षिक इतका आहे. रू 400 ते 1000 दरम्यान केलेल्या इंधन व्यवहारांवर 1% इंधन अधिभार माफ केला जातो. तसेच ऍमेझॉन प्राइम, मॅरियट क्लब, फोर्ब्स, झोमॅटो गोल्ड, MMT DOUBLE BLACK क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या पहिल्या 90 दिवसांच्या आत किंवा जॉइनिंग फी वसूल झाल्यावर 1.5 लाख खर्च केल्यास तुम्हाला मोफत वार्षिक सदस्यत्व मिळते. तसेच या कार्ड सह विकेंडच्या जेवणावर तुम्हाला 2x रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या क्रेडिट कार्ड चा फायदा म्हणजे तुम्हाला डोमेस्टिक व आंतरराष्ट्रीय लाऊंज मध्ये मोफत व अमर्यादित प्रवेश मिळतो. तसेच या क्रेडिट कार्ड द्वारे तुम्हाला अपघाती विमा संरक्षण जवळपास 2 कोटी व वैद्यकीय कव्हर सुद्धा मिळते. जे जवळपास 50 लाख रुपये पर्यंत असते.

या शिवाय प्रत्येक किरकोळ खरेदी वर 150 रुपये खर्च केल्यास 5 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. Smartbuy पोर्टल वर 10x रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात व विकेंडच्या जेवणावर 2x रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतात आणि या रिवॉर्ड पॉईंट्स ची वैधता कालावधी तीन वर्षे असते. तसेच हे रिवॉर्ड पॉईंट्स तुम्ही Smartbuy पोर्टल वर हॉटेल किंवा फ्लाइट बुकिंगसाठी रिडीम करू शकता किंवा इंटर माइल्स, सिंगापूर एअर लाइन्स आणि क्लब विस्तारा किंवा इतर AirMiles प्रोग्राम मध्ये सुद्धा हस्तांतरित करू शकता.

मित्रांनो, तुम्हाला जर या क्रेडिट कार्डचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील जसे की कार्ड अर्जदाराचे वय हे 21 ते 65 वर्षे वयोगटातील असावे, ती व्यक्ती पगारदार किंवा स्वयंरोजगार करणारी असावी. तसेच ओळखीचा पुरावा, निवासी पुरावा, उत्पन्नाचा पुरावा ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, या क्रेडिट कार्ड चे वरील सर्व फायदे असले तरीही याची वार्षिक फी जास्त असल्याने कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला ते परवडेल का याचा विचार नक्की करा. पण तुम्ही जर वारंवार देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर मात्र हे क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

HDFC Millennia Credit Card

HDFC Millennia Credit Card

मित्रांनो, या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी 1000 रुपये ( GST लागू) आहे. ही फी भरल्यानंतर वेलकम बेनिफिट म्हणून तुम्हाला 1000 कॅशपॉइंट्स मिळतात. तसेच वार्षिक फी 1000 रुपये द्यावी लागेल. यात ही तुम्ही जर मागील वर्षी 1 लाख रुपये खर्च केले तर तुम्हाला ही फी माफ केली जाईल. शिवाय या कार्डसह देशांतर्गत विमानतळावर दरवर्षी 8 मोफत लाऊंज भेटी मिळू शकतात. तसेच या क्रेडिट कार्ड वर 3.6% प्रति महिना किंवा 43.2 % वार्षिक व्याजदर आकारले जाते.

याशिवाय प्रत्येक तिमाहीत तुम्ही 1 लाख आणि त्याहून अधिक खर्च केल्यास रू 1000 किंमतीचे गिफ्ट वाउचर मिळवू शकता. मित्रांनो, या कार्ड सह ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, Myntra, उबेर, झोमॅटो वर खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळतो. व इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक मिळतो. या क्रेडिट कार्डमध्ये मिळालेले कॅश पॉइंट्स जर तुम्ही रिडीम नाही केले तर ते दोन वर्षांनी कालबाह्य होतात. या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय हे 21 ते 40 वर्षे वयोगटातील असावे लागते. तसेच पगारदार व स्वयंरोजगार करणारी कोणतीही व्यक्ती या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकते. मित्रांनो, या क्रेडिट कार्ड चा एक चांगला फायदा म्हणजे तुमच्या ईमआय व्यवहार व वॉलेट रीलोड वर 1% कॅशबॅक देखील मिळतो.

BOB Eterna Credit Card

BOB Eterna Credit Card

मित्रांनो, या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी आणि वार्षिक फी रू 2499 (GST लागू) इतकी आहे. यात तुम्ही जर कार्ड जारी झाल्यानंतर पहिल्या 60 दिवसात जर 25000 रू खर्च केले तर तुमची जॉइनिंग फी माफ केली जाते. तसेच मागील वर्षी जर तुम्ही 2.5 लाख खर्च केले तर तुम्हाला वार्षिक फी माफ होते. या क्रेडिट कार्ड वर 3.25 दरमहा किंवा वार्षिक 39% व्याजदर आकारला जातो. या कार्ड सह इंधन खरेदी वर 1% इंधन अधिभार माफ केला जातो. या कार्ड द्वारे वेलकम गिफ्ट म्हणून तुम्हाला 6 महिन्यांची fitPass pro सदस्यत्व मिळते. तसेच 5 लाख वार्षिक खर्चावर तुम्हाला 20,000 बोनस रिवॉर्ड पॉईंट मिळतात. तर कार्ड जारी केल्यानंतर 60 दिवसांच्या आत 50,000 रू खर्च केले तर 10,000 रू खर्चाचे पॉईंट्स तुम्हाला मिळतात.

याशिवाय या क्रेडिट कार्ड सह तुम्हाला अपघाती विमा संरक्षण देखील मिळते. ज्यात विमान अपघातासाठी 1 कोटी व इतर अपघातांसाठी 10 लाख रू विमा संरक्षण मिळते. प्रवास संबंधित प्रति 100 रू खर्चावर 15 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात व देशांतर्गत विमानतळां वर अमर्यादित मोफत लाउंज प्रवेश मिळतो. जेवण आणि सिनेमा खर्चावर तुम्हाला त्वरित 15 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.

मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही काही पात्रता निकष पूर्ण केले पाहिजे जसे की तुमचे वय 21 ते 65 वर्षे वयोगटातील असावे लागते. व ऍड ऑन कार्ड धारकाचे वय 18 वर्षे पूर्ण असावे लागते. तसेच अर्जदार हा भारताचा रहिवासी असायला हवा. पगारदार व स्वयंरोजगार करणारे या कार्डसाठी अर्ज करू शकता परंतु त्याचे वार्षिक उत्पन्न 12 लाख पेक्षा जास्त असले पाहिजे. मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावे लागतील जसे की ओळखीचा पुरावा, निवासी पुरवा, व उत्पन्नाचा पुरावा. अजून एक सांगायचे म्हणजे या कार्ड द्वारे मिळालेले रिवॉर्ड पॉइंट्स जमा झाल्याच्या तारखे पासून 2 वर्षांसाठी वैध असतात आणि त्या नंतर ते कालबाह्य होतात.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण 2023 मधील चांगले क्रेडिट कार्ड्स कोण कोणते आहेत या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तसेच आमचा आजचा लेख तुम्हाला महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

FAQ

क्रेडिट कार्डसाठी क्रेडिट स्कोर असणे आवश्यक आहे का?

मित्रांनो, तुमचा क्रेडिट कार्ड साठीचा अर्ज पडताळून बघताना तुमचा क्रेफीत स्कोर ही लक्षात घेतला जातो. पण तुमच्या कडे जर प्री अप्रुव्ह कार्ड ऑफर असल्यास तुमचे कार्ड मंजूर करताना तुमचा क्रेडिट स्कोर बघत नाहीत. तसेच काही एंट्री लेव्हल कार्ड असतात ज्यांना अर्जासाठी क्रेडिट स्कोरची आवश्यकता नसते, व त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा कमी असला तरी देखील तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते.

रिवॉर्ड पॉईंट्स ची वैधता किती असते ?

मित्रांनो, काही कार्ड्स असे असतात की ज्यांची रिवॉर्ड पॉईंट्स आजीवन वैध असतात. तर बहुतेक क्रेडिट कार्ड्स एक्सपायरी डेट सह येतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना या गोष्टी काळजी पूर्वक बघून घ्याव्या.

सर्वोत्तम क्रेडिट कार्डची निवड कशी करायची ?

मित्रांनो क्रेडिट कार्ड निवडताना वेग-वेगळ्या व्यक्तीसाठी त्यांच्या गरजा, उत्पन्न, खर्चाची सवयी (ऑनलाईन/ऑफलाईन) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्डसाठी अर्ज करण्याचे कारण यांचे निकष वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कार्ड निवडताना तुम्ही फक्त कार्ड देत असलेले फायदे आणि वैशिष्ट्ये न पाहता त्यांचे वार्षिक शुल्क, व्याजदर, फी माफीची अट आणि इतर कोणतेही छुपे शुल्क आहे का ते देखील पहावे. अशा प्रकारे तुम्ही सर्वोत्तम क्रेडिट कार्डांची तुलना करून स्वतःसाठी एक योग्य क्रेडिट कार्ड निवडू शकता