SBI होम लोन संपूर्ण माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, विविध योजना | SBI Home Loan



नमस्कार मित्रानो, आज आपण एसबीआय गृह कर्जे (SBI Home Loan) घेण्यासाठी नियम व अटी काय असतात, त्याचबरोबर SBI होम लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि त्याचा व्यजदार काय असतो, अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, प्रत्येकाला च असे वाटते की आपलं ही एक हक्काचं घर असावं. तुम्हाला ही अस वाटतंच असेल ना की आपलं स्वतः च एक घर असावं. पण त्यासाठी आपण आपल्या कमाईतून किती बचत करतो, खरंतर खूपच कमी. मग त्यामुळे घर खरेदी करताना किंवा घर बांधताना एक रकमी पैसे देणे किंवा एवढ्या जास्त पैशांची उभारणी करणे आपल्याला अवघड जाते. पण अश्या वेळेस तुम्ही होम लोन (Home Loan) किंवा गृह कर्ज घेऊन तुमची ही समस्या सोडवू शकता.



मित्रांनो, होम लोन म्हणजे अश्या प्रकारचे कर्ज असते जे बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकाला त्याच्या घर बांधणीसाठी, घर खरेदीसाठी, किंवा घर दुरुस्ती करण्यासाठी देते. आज मार्केट मध्ये जवळजवळ सगळ्याच बँका किंवा वित्तीय संस्था होम लोन ची सुविधा ग्राहकांना देत आहेत. पण त्यातल्या भारतातील सर्वात जुनी, मोठी व विश्वासार्ह बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक. मित्रांनो, एसबीआय बँक ही ग्राहकांना विविध प्रकारचे होम लोन ऑफर करते. आपले घर बांधू किंवा खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांना बँके द्वारे गृह कर्ज दिले जाते. या एसबीआय होम लोन चे फायदे काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत, बँकेद्वारे कोण कोणत्या प्रकारचे होम लोन दिले जातात, त्याची पात्रता, वगैरे अशी सर्व माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तुम्ही ही जर एसबीआय होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर एकदा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. तुम्हाला या माहितीचा निश्चित च फायदा होईल.

SBI Home Loan Information in Marathi

SBI होम लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)8.85% पासून पुढे
लोन रक्कम मर्यादा50,000 ते 50 लाख पर्यंत
कार्यकाळ12 महिने – 30 वर्ष
प्रोसेस चार्जेस0.35% कर्ज रक्कमेच्या + GST

Features of SBI Home Loan

SBI होम लोन ची वैशिष्ट्ये

  • मित्रांनो, एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना होम लोन च्या विविध योजना किंवा प्रकार उपलब्ध करून देते. जेणे करून प्रत्येक व्यक्ती त्याच्या गरजे नुसार होम लोन चा प्रकार निवडू शकतो.
  • एसबीआय होम लोन चे व्याजदर सर्वात कमी असतात.
  • तसेच एसबीआय होम लोन चे प्रक्रिया शुल्क म्हणजेच Processing Fee ही खूप कमी आहे.
  • कर्ज लवकर फेडण्यासाठी आगाऊ भरलेल्या रकमेवर म्हणजेच Prepayment वर बँके द्वारे कोणताही दंड आकारला जात नाही.
  • कर्ज परतफेड करण्यासाठी एसबीआय बँक तीस वर्षांपर्यंत ची मुदत देते.
  • या शिवाय स्त्री अर्जदारांसाठी एसबीआय होम लोन च्या व्याजदरात विशेष सवलत दिली जाते.
  • एसबीआय बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध करून देते.
  • तसेच व्हाट्सअँप वरून देखील एसबीआय होम लोन साठी अर्ज करन्याची सुविधा देण्यात येते.

SBI Home Loan Interest Rates



SBI होम लोन चे व्याजदर

मित्रांनो, पगारदार व स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तींसाठी एसबीआय होम लोन चे व्याजदर हे 8.85% ते 9.75% पर्यंत आकारले जाते. तर पगारदार व स्वयंरोजगार असणाऱ्या महिलांसाठी हे व्याजदर 8.80% ते 9.70% इतके आकारले जाते. एसबीआय होम लोन च्या कर्जाचा परतफेड कालावधी हा तीस वर्षांपर्यंत चा दिला जातो. हा कालावधी पुरुष व महिला दोघांसाठी सारखाच असतो. तसेच एसबीआय होम लोन महिला व पुरुषांसाठी प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 0.35% + GST, ​​किमान 2000/- + GST, आणि ​​कमाल 10000/- + GST, ​​याशिवाय वकील आणि मूल्य शुल्क, वास्तविक खर्च स्वतंत्र पणे वसूल केला जातो.

SBI Bank Home Loan Eligibility Criteria

SBI होम लोनसाठी पात्रता निकष

मित्रांनो, तुम्हाला जर एसबीआय होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असते. जसे की.

पगारदार व्यक्ती

पगारदार व्यक्ती ही 18 ते 70 वर्षे वयोगटातील असावी. व स्वयंरोजगार करणारी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती 21 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार हा भारताचा रहिवासी किंवा NRI असणे गरजेचे आहे. याशिवाय अर्जदाराचे किमान वार्षिक उत्पन्न 1,80,000 असणे आवश्यक आहे.

पगार नसलेल्या लोकांसाठी

पगार नसलेल्या लोकांसाठी एसबीआय होम लोन पात्रता निकष: मित्रांनो, पगार नसलेल्या लोकांसाठी एसबीआय होम लोनसाठी पुढील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • सर्वात पहिले म्हणजे अर्जदार भारतीय रहिवासी असावा.
  • तसेच अर्जदार जर प्रोप्रायटरशिप फर्मचा मालक असेल किंवा पार्टनरशीप फर्म मधील पार्टनर पैकी एक असेल किंवा कंपनीमधील संचालकांपैकी एक असेल तर किमान गेल्या 3 वर्षांपासून अर्जदार अस्तित्वात असावा. व गेल्या दोन वर्षांत नेट प्रॉफिट कमावलेले असावे. तसेच अर्जदाराने काही क्रेडिट सुविधा घेतल्या असतील तर त्या नियमित असाव्यात. कारण बँके कडून या संदर्भात ओपिनियन रिपोर्ट प्राप्त केला जातो.
  • याशिवाय जर घराची मालमत्ता प्रोप्रायटर आणि प्रोप्रायटरी फर्म यांच्या सोबत जॉईंट नावाने घेतली असेल, तर ती फर्म बँकेची विद्यमान कर्जदार किंवा कर्जमुक्त संस्था असावी. यासोबतच अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे पूर्ण असावे. अर्जदाराला
  • कर्जाचा कालावधी 30 वर्षांपर्यंत दिला जाईल व कर्जाची रक्कम किमान रू 50,000/- आणि कमाल 50 कोटी पर्यंत दिली जाऊ शकते.

Documents Required for SBI Home Loan

SBI होम लोनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो, एसबीआय होम लोन साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी ही व्यवसाय नुसार थोडी वेग वेगळी आहे.

  • सर्व अर्जदारांसाठी एसबीआय होम लोन साठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:
  • सर्वात पहिले अर्जदारकडे स्वतःचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • होम लोन साठी पूर्णपणे भरलेला अर्ज 3 पासपोर्ट साईझ फोटो सह द्यावा.
  • ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक द्यावे.
  • निवासी किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून अलीकडील टेलिफोन बिल, वीज बिल, पाणी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी कोणतीही एक प्रत सादर करावी.

SBI होम लोनसाठी मालमत्ता कागदपत्रे (प्रॉपर्टी पेपर्स)

  • मित्रांनो, एसबीआय होम लोन साठी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे ही सादर करणे गरजेचे आहे. जसे की
  • बांधकाम परवानगी घेतलेली असावी. (जेथे लागू असेल)
  • विक्रीसाठी रेजिस्टर ऍग्रिमेंट किंवा विक्रीसाठी स्टॅम्प ऍग्रिमेंट
  • प्रॉपर्टी हलवण्यास तयार असल्यास ओक्युपपन्सी सर्टिफिकेट
  • सोसायटी किंवा फ्लॅटसाठी शेअर सर्टिफिकेट, मेंटनन्स बिल, वीज बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसीट.
  • अप्रुव्ह प्लॅन कॉपी ची झेरॉक्स ब्लूप्रिंटआणि बिल्डरचा रेजिस्टर डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट, आणि नवीन प्रॉपर्टी साठी कन्व्हेयन्स डीड (Conveyance Deed).
  • बिल्डर/विक्रेत्याला दिलेली सर्व पेमेंट रिसीट (payment receipt) किंवा बँक अकाउंट चे स्टेटमेंट.

अकाउंट स्टेटमेंट (Account Statement) :

  • अर्जदार/च्या सर्व बँक खात्यांसाठी मागील 6 महिन्यांची बँक अकाउंट स्टेटमेंट.
  • इतर बँका किंवा कर्जदारां कडून पूर्वीचे कोणतेही कर्ज असल्यास, मागील 1 वर्षाचे लोन अकाउंट चे स्टेटमेंट.

SBI होम लोनसाठी उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे

पगारदार अर्जदारांसाठी SBI होम लोन साठी आवश्‍यक उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • पेमेंट स्लिप किंवा मागील 3 महिन्यांचे सॅलरी सर्टिफिकेट
  • तसेच मागील दोन वर्षांच्या फॉर्म 16 ची प्रत किंवा मागील दोन आर्थिक वर्षांच्या आयटी रिटर्न्सची प्रत.

पगारदार नसलेल्या अर्जदारांसाठी उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे

पगारदार नसलेल्या अर्जदारांसाठी एसबीआयच्या होम लोन साठी आवश्‍यक उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे पुढील प्रमाणे

  • बिझनेस अड्रेस प्रूफ
  • गेल्या तीन वर्षांपासून चे आयटी रिटर्न्स.
  • मागील तीन वर्षांचा बॅलन्स शीट आणि प्रॉफिट- लॉस अकाउंट
  • बिझनेस लायसन्स चे डिटेल्स
  • TDS सर्टिफिकेट (फॉर्म 16A, लागू असल्यास)
  • सीए, डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी क्वालिफिकेशन सर्टिफिकेट.

SBI Home Loan Processing Fees and Charges

SBI होम लोन वर प्रोसेसिंग फी

मित्रांनो, एसबीआय च्या सर्व प्रकारच्या होम लोन अर्जा वर प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी लागू आहे. सध्या बँक शून्य प्रक्रिया शुल्कात शिल्लक हस्तांतरण (बॅलन्स ट्रान्सफर) सुविधा देखील देत आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि संरक्षण कर्मचारी यांना एसबीआय शौर्य आणि एसबीआय विशेषाधिकार अंतर्गत प्रक्रिया शुल्क भरण्यास सूट देण्यात आली आहे.

SBI होम लोन अर्ज कसा करायचा

तुम्ही एसबीआय होम लोन (SBI Home Loan) साठी अर्ज कसा करायचा?

  • मित्रांनो, एसबीआय होम लोन साठी तुम्ही विविध प्रकारे अर्ज करू शकता. जसे की…
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • व्हॉट्सअँप द्वारे अर्ज करू शकता. किंवा
  • तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊन होम लोन साठी अर्ज करू शकता.

मित्रांनो, एसबीआय होम लोन साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एसबीआय च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देऊन तिथे होम लोन साठी असलेला फॉर्म योग्य प्रकारे भरायचा आहे. तसेच मागितलेले डिटेल्स ऍड करून लोन अर्ज करू शकता.

तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी आणि जन्मतारीख द्या, तसेच तुमचे मासिक उत्पन्न आणि निवास स्थानाचा उल्लेख देखील करायचा आहे. तुमच्या आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम टाकून प्रॉपर्टी चे मूल्य टाकायचे आहे. याशिवाय एसबीआय होम लोन साठी तुम्ही डायरेक्ट तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊ शकता. व लोनसाठी अर्ज करू शकता.

SBI होम लोन कोण-कोणत्या कारणांसाठी दिले जाते?

मित्रांनो, एसबीआय होम लोन हे पुढील कारणांसाठी दिले जाते:-

  • तुम्हाला नवीन घर खरेदी करायचे असेल तर,
  • नवीन घर बांधायचे असेल तर,
  • तुमच्या घराचे नूतनीकरण करण्यासाठी
  • घर दुरुस्ती करण्यासाठी
  • घर वाढवण्यासाठी तसेच
  • नवीन प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधायचे असेल तर तुम्ही एसबीआय होम लोन साठी अर्ज सादर करू शकता.

आता एसबीआय होम लोनचे विविध प्रकार कोणते आहेत ते जाणून घेऊ या

Different Schemes of SBI Home Loan

SBI होम लोनचे प्रकार

मित्रांनो, एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या गृहकर्ज म्हणजेच होम लोन योजना ऑफर करते. जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या आवश्यकते नुसार योजना निवडता येतील. या सर्व SBI होम लोन योजना सोप्या परतफेड आणि नॉमिनल फी आणि चार्जेस सह येतात. या सर्व प्रकारच्या होम लोन ची अधिक जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

विविध प्रकारचे एसबीआय होम लोन पुढीलप्रमाणे:-

  1. Regular Home loan (नियमित गृहकर्ज)
  2. Top Up Home Loan (टॉप अप होम लोन)
  3. Smart Home Top-Up Loan (स्मार्ट होम टॉप-अप कर्ज)
  4. Install Home Loan Top-up (इन्स्टा होम लोन टॉप-अप)
  5. Flexipay (फ्लेक्सिपाय)
  6. SBI Maxgain (एसबीआय मॅक्सगेन)
  7. NRI Home Loan (NRI गृहकर्ज)
  8. Realty (रियल्टी)
  9. SBI Pre-approved Home Loan (एसबीआय पूर्व-मंजूर गृहकर्ज )(PAL)
  10. Tribal Plus (आदिवासी प्लस)
  11. Provilege (विशेषाधिकार)
  12. Shaurya (शौर्य)
  13. Bridge Home Loan (ब्रिज होम लोन)
  14. SBI Corporate Home Loan (एसबीआय कॉर्पोरेट गृह कर्ज)

मित्रांनो, या सर्व प्रकारांबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या:-

  1. Regular home loan (नियमित गृह कर्ज):- मित्रांनो, होम लोन च्या या प्रकाराला सर्वात जास्त मागणी असते. भारताचा रहिवासी असलेला व नोकरी करणारा किंवा स्वयंरोजगार असणारा कोणीही व्यक्ती त्याचे नवीन घर बांधण्यासाठी, घर खरेदीसाठी किंवा घर दुरुस्तीसाठी हे कर्ज मिळवू शकते. या होम लोन मध्ये महिलांना व्याजदरात 0.05% इतकी सूट दिली जाते. या होम लोन साठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच या होम लोन साठी प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी ही 0.35 % अधिक सर्व्हीस टॅक्स ( कमीत कमी 2000 ते जास्तीत जास्त 10,000) इतका असतो. या कर्जाची परतफेड कालावधी तीस वर्ष पर्यंत दिला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगाऊ हप्ता भरण्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.
  1. SBI Top-Up Home Loan (एसबीआय टॉप अप होम लोन) :- मित्रांनो, ज्या ग्राहकांकडे आधीपासूनच SBI चे होम लोन आहे आणि त्यांना अजून जास्त पैश्यांची गरज आहे, ते एसबीआय टॉप- अप होम लोन घेऊ शकतात. हे पैसे तुम्ही घर नूतनीकरण करण्यासाठी, बांधकाम किंवा घराचा विस्तार करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी वापरू शकता. एसबीआय टॉप अप होम लोन तुम्ही कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी वापरू शकता. वैयक्तिक कर्जापेक्षा या गृह कर्जाचे व्याजदर खूपच कमी आहेत. या कर्जासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे.

तसेच तो भारताचा रहिवासी असावा. तसेच जास्तीत जास्त 30 वर्षां साठी तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. याशिवाय या होम लोन मध्ये प्री पेमेंट वर कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तसेच या होम लोन वर प्रोसेसिंग फी ही कर्जाच्या रकमेच्या 0.35% आहे म्हणजेच किमान रु 10,000 आणि कमाल रु 30,000 आणि GST आकारली जाते.

  1. SBI Smart Home Top Up loan (एसबीआय स्मार्ट होम टॉप अप लोन) :- मित्रांनो, एसबीआय होम लोन च्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी टॉप-अप होम लोन शिवाय, आणखी एक नवीन योजना आहे, ज्याचे नाव एसबीआय स्मार्ट होम टॉप-अप लोन योजना असे आहे. SBI द्वारे देण्यात येणारी ही सुविधा तुम्हाला कोणत्याही कागदपत्रा शिवाय टॉप-अप होम लोन मिळवण्याची संधी देते. हे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेच्या शाखेला भेट द्यायची आहे आणि या सुविधेचा लाभ घ्यावा लागेल. या योजनेसाठी अर्जदाराने काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. जसे की ही योजना फक्त निवासी भारतीय आणि अनिवासी भारतीयांसाठी म्हणजेच NRI व्यक्ती साठी उपलब्ध आहे.

तसेच अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असावे. याशिवाय जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. या कर्जाची कमाल रक्कम 5 लाख आहे. म्हणजे कर्ज म्हणून तुम्हाला 5 लाख पर्यंत रक्कम मिळू शकते. हे जर्ज घेण्यासाठी तुमचा सिबील स्कोर किमान 700 किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे इतर कोणतेही होम टॉप-अप किंवा इन्स्टा होम टॉप-अप कर्ज ऍक्टिव्ह नसावे.

  1. SBI Install Top Up home loan (एसबीआय इन्स्टा टॉप-अप होम लोन) :- मित्रांनो, हे लोन एसबीआय होम लोन च्या विद्यमान ग्राहकांना दिले जाते. ग्राहक एसबीआय च्या अधिकृत वेबसाइट द्वारे होम लोन टॉप- अप सुविधा ऑनलाइन मिळवू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन केली जाते. जसे की कर्ज प्रक्रिया, कर्जाचे वितरण ईमआय सेट करणे वगैरे सर्व गोष्टी सिस्टम द्वारे स्वयंचलित केले जातात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कोणत्याही व्यक्तिच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

मित्रांनो, तुम्ही जर हे लोन घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अर्जदाराने काही पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे की, 20 लाखांची किमान कर्ज मर्यादा असलेले विद्यमान गृहकर्ज ग्राहक 5 वर्षांच्या गृहकर्जाची किमान अवशिष्ट मुदत, तसेच अर्जदाराचा 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचा समाधानकारक ट्रॅक रेकॉर्ड असावा. तुम्ही किमान 1,00,000 आणि कमाल 5,00,000 पर्यंत कर्ज मिळवू शकता. तसेच तुमचा म्हणजेच अर्जदाराचा सिबील स्कोर किमान 550 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

  1. SBI Flexipay home loan (एसबीआय फ्लेक्सिपे होम लोन) :- मित्रांनो, एसबीआय होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या पगारदार आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी एसबीआय फ्लेक्सिपे होम लोन उपलब्ध करून देते. तसेच 21ते 45 वर्षे वयोगटातील असणारे व किमान 2 वर्षांचा अनुभव असलेले पगारदार व्यक्ती हे कर्ज घेण्यास पात्र असतात. हे कर्ज तुम्हाला 20 लाख किंवा त्याहून अधिक कर्जाच्या रकमेसह मिळू शकते व 25 ते 30 वर्षांच्या परतफेड कालावधीसह हे कर्ज उपलब्ध आहे. या कर्जाचा व्याजदर 7.40% पासून सुरू होतो. आणि या लोन चे प्रक्रिया शुल्क हे 0.35% अधिक service tax किमान 2000 ते कमाल 10,000 असते. आणि महत्वाचे म्हणजे या लोन प्रक्रिये मध्ये स्थगिती कालावधी मध्ये तुम्हाला मुख्य हप्ता भरावा लागत नाही तर फक्त व्याज भरावे लागते.
  1. SBI Maxgain home loan (एसबीआय मॅक्सगेन-होम लोन) :- मित्रांनो, तुम्ही या लोन अंतर्गत 20 लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम मिळवू शकता. तसेच या होम लोन अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा उपलब्ध नाही.
  1. SBI NRI Home Loan (एसबीआय एनआरआय होम लोन) :- मित्रांनो, एसबीआय ची ही होम लोन योजना अनिवासी भारतीयांसाठी म्हणजेच NRI व्यक्तींसाठी आहे. तसेच उत्पन्नाचा निश्चित स्रोत असलेल्या भारतीय व्यक्तींसाठी देखील उपलब्ध आहे. या होम लोन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराचा भारतात किंवा परदेशात किमान रोजगार कालावधी 2 वर्षांचा असणे आवश्यक आहे. हे लोन मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच या लोन वर व्याजदर हे वार्षिक 6.75% पासून सुरू होते. आणि या कर्जाचा परतफेड कालावधी 30 वर्षांपर्यंत दिला जातो.
  1. SBI Realty Home Loan (एसबीआय रियल्टी होम लोन) :- मित्रांनो, प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधकाम करण्यासाठी तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. या होम लोन अंतर्गत 15 वर्षांसाठी 10 कोटी पर्यंत कर्ज दिले जाते. एसबीआय रियल्टी कर्जाचा लाभ घेण्यासाठी एसबीआय चे बचत खाते असणे अनिवार्य आहे. जर बचत खाते नसेल तर व्याजदर बदलू शकतात. तसेच प्लॉट मिळाल्या नंतर पहिल्या पाच वर्षाच्या आत बांधकाम सुरु करणे आवश्यक असते. हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे गरजेचे आहे.
  1. SBI Pre Approved home loan (एसबीआय प्री अप्रुव्ह होम लोन) :- मित्रांनो, घर किंवा प्लॉट घेण्याआधीच तुम्हाला जर कर्ज मंजूर करायचे असेल तर तुम्ही एसबीआय च्या या होम लोन योजनेचा लाभ घेऊ शकता. परंतु या कर्ज मंजुरीची वैद्यता (validity) ही फक्त चार महिन्यापुरती असते. आणि यामध्ये दिलेले प्रक्रिया शुल्क परत केले जात नाही. हे कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 70 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच यात प्रक्रिया शुल्क 0.35% अधिक सर्व्हिस टॅक्स 25 ते 75 लाखांसाठी 6500 रुपये व 25 लाखाहून अधिक कर्ज रकमेसाठी 10,000 रुपये घेतला जाते. या कर्जाचा परतफेड कालावधी 30 वर्षांचा असतो.
  1. SBI Tribal Plus Home Loan (एसबीआय आदिवासी प्लस होम लोन) :- मित्रांनो, डोंगराळ किंवा आदिवासी भागात राहणारे लोक त्यांची जमीन गहाण न ठेवता घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एसबीआय च्या या होम लोन योजनेतून कर्ज घेऊ शकतात. यात 15 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी तुम्हाला मिळू शकणारी कर्जाची रक्कम की कमीत कमी रू 10 लाख इतकी आहे.
  1. SBI Privilege Home Loan (विशेषाधिकार होम लोन) :- मित्रांनो, PSBs, PSUs आणि पेन्शन सेवा असलेल्या व्यक्तीं सह केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी या होम लोन सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यात कर्ज परतफेड ची कमाल मुदत 30 वर्षे आहे आणि 75 वर्षे वयापर्यंत परतफेड केली जाऊ शकते. या होम लोन सुविधेत प्रक्रिया शुल्क पूर्ण पणे माफ केली जाते. आणि व्याजदर ही सवलतीचे दिले जाते.
  1. SBI Shaurya Home Loan (शौर्य गृह कर्ज) :- मित्रांनो, जे लोक लष्कर, नौदल आणि हवाई दलात संरक्षण कर्मचारी आहेत अशी लोकं एसबीआय च्या या होम लोन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या होम लोन योजने अंतर्गत, तुम्हाला प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केली जाते. आणि सवलती चे व्याजदर दिले जाते. हे होम लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 ते 75 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच यात कर्ज परतफेड कालावधी हा 30 वर्षे इतका दिला जातो.
  1. SBI Corporate Home Loan (एसबीआय कॉर्पोरेट गृह कर्ज) :- मित्रांनो, एसबीआय बँक आता कॉर्पोरेट संस्थांना म्हणजेच सार्वजनिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या त्यांच्या संचालक, आणि कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी कंपनी च्या नावावर निवासी युनिट्स चे बांधकाम करण्यासाठी हे होम लोन उपलब्ध करून देत आहे. या होम लोन चे व्याजदर हे वार्षिक 6.70% पासून सुरू होते. तसेच या होम लोन साठी प्रोसेसिंग फी हो 0.50% अधिक जीएसटी इतकी आकारली जाते. या होम लोन चे वैशिष्ट्य म्हणजे याचे व्याजदर खूप कमी आहेत व प्रोसेसिंग फी देखील कमी आहे.

या होम लोनसाठी अर्ज करताना अर्जदार हा एसबीआय बँकेचा ग्राहक असायला हवा. तसेच कर्जासाठी अर्ज करणारी कंपनी किंवा संस्था ही एक कर्जमुक्त संस्था असली पाहिजे. शिवाय कर्ज घेणाऱ्या त्या व्यक्ती किंवा संस्थाचा कमीत कमी तीन वर्षां पासून व्यवसाय कार्यरत असणे आवश्यक आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून निव्वळ प्रॉफिट कमावलेले असावे. कंपनी ची आधीची कर्ज खाती असतील तर ती नियमित आणि प्रमाणित असावी.

  1. SBI Bridge Home Loan (एसबीआय ब्रिज होम लोन) :- मित्रांनो, एसबीआय ब्रिज होम लोन ही एक अशी सुविधा आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही उर्वरित 20 टक्के कर्ज देखील मिळवू शकता. हे एक अल्प मुदतीचे कर्ज आहे ज्याच्या साठी कर्जदाराला कोणत्याही डाउन पेमेंटची चिंता न करता त्यांचे आवडते घर खरेदी करण्यास मदत करते.

SBI होम लोन च्या कर्जाची परतफेड कशी करता येईल?

मित्रांनो, एसबीआय गृह कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला बँक जास्तीत जास्त तीस वर्षांचा कालावधी देते. तसेच ग्राहक कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच मंथली ईमआय मध्ये करू शकतो. शिवाय अर्जदार व्यक्ती त्याच्या वयाच्या 70 ते 75 वर्षापर्यंत कर्जफेड करू शकतो. कर्ज मंजुर झाल्यावर दिलेल्या तारखेपासून कर्जाचे हप्ते फेडण्यास सुरुवात करावी लागते. एसबीआय होम लोन च्या काही योजनां मध्ये स्थगिती कालावधी देखील दिला जातो. त्या कालावधी मध्ये फक्त व्याज भरावा लागतो व स्थगिती कालावधी संपल्या नंतर पुन्हा मुख्य हप्ते सुरू होतात.

SBI मधून किती होम लोन मिळू शकते?

मित्रांनो, एसबीआय मधून तुम्हाला किती होम लोन मिळू शकते म्हणजेच जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा किती असेल हे बँक काही मुद्द्यांवरून ठरवते. जसे की.

  • अर्जदाराचे वय :- अर्जदाराचे वय जितके कमी असेल तितके कर्ज फेडण्यासाठी मिळणारा वेळ अधिक असतो. आणि म्हणूनच अर्जदाराचे वय जितके कमी असेल त्यानुसार कर्जाची मर्यादा जास्त असते.
  • अर्जदाराचे उत्पन्न:- मित्रांनो, तुमच्या मासिक उत्पन्न किती आहे, त्यावरून तुम्ही किती रक्कम मासिक हप्ता म्हणून भरू शकता हे ठरत असते. त्यामुळे अर्जदाराचे उत्पन्न जितके जास्त असेल तितकेच त्याला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ही जास्त असते.
  • रोजगार पद्धती :- मित्रांनो,तुम्हाला कर्जाची रक्कम किती मिळेल हे ठरवण्यासाठी अर्जदार नोकरी करीत आहे की स्वयंरोजगार करत आहे, यानुसार बँक कर्जाची रक्कम ठरवते.
  • अर्जदाराच्या संपत्तीचे किंवा मालमत्तेची किंमत :- मित्रांनो, अर्जदाराच्या संपत्तीची किंमत किती आहे व त्या संबंधीची सर्व जरुरी कागदपत्रे यावर त्या अर्जदाराला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.
  • सीबील स्कोर :- मित्रांनो, सीबील स्कोर हा तुमच्या मागील आर्थिक अहवालावर अवलंबून असतो. तुमचा सीबील स्कोर जितका जास्त असेल तितकी तुम्हाला मिळू शकणाऱ्या कर्जाची मर्यादा जास्त असते. त्यामुळे कुठलेही कर्ज घेण्यासाठी तुमचा सीबील स्कोर चांगला ठेवणे महत्वाचे आहे.

FAQ

एसबीआय चे होम लोन मंजुर होण्यासाठी किती वेळ लागतो?

मित्रांनो, एकदा का तुम्ही गृह कर्जासाठी अर्ज सबमिट केला की एसबीआय चे होम लोन मंजूर होण्यासाठी कामकाजचे 4 ते 7 दिवस लागू शकतात.

एसबीआय होम लोन परतफेड कालावधी जास्तीत जास्त किती असतो?

मित्रांनो, एसबीआय होम लोन परतफेड कालावधी हा जास्तीत जास्त 30 वर्षे पर्यंत असतो.

एसबीआय होम लोन मध्ये कमीत कमी किती रक्कम कर्ज म्हणून दिली जाते?

मित्रांनो, एसबीआय मध्ये होम लोन ची किमान रक्कम ही रू 50,000 इतकी आहे.

पेन्शन धारक व्यक्तीला एसबीआय होम लोन मिळू शकते का?

हो मित्रांनो, एसबीआय बँक पेन्शन लोन सुद्धा ऑफर करते. ज्याचा उपयोग पेन्शन धारक व्यक्ती घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी करू शकतो.

एसबीआय होम लोन चे व्याजदर कमी कसे करता येईल?

मित्रांनो, तुम्हाला जर होम लोन चे व्याजदर कमी करायचे असेल तर तुम्ही कर्जाचा कालावधी कमी ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा तुमचे कर्ज प्रीपे किंवा अंशतः भरत जा. किंवा डाउन पेमेंट म्हणून अधिक पैसे देण्याचा प्रयत्न करा. किंवा तुमचा ईमआय वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवा.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एसबीआय च्या होम लोन सुविधे बद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।

Tags: SBI Home Loan info in Marathi, SBI Home Loan in Marathi, SBI Home Loan Mahit, SBI Home Loan Vyaj Dar, SBI Home Loan Kagadpatra, SBI Home Loan Kase Gyayche, SBI Home Loan Sathi Kay Karayche, SBI Home Loan Milel Ka, SBI Home Loan Kase Gyayche, SBI Home Loan Konala Milte, SBI Ghar Karj, SBI Ghar Karz, SBI Ghar Karj Kase Gyayche, SBI Ghar Loan Vyajdar