HDFC होम लोन संपूर्ण माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, विविध योजना | HDFC Home Loan

नमस्कार मित्रानो, आज आपण एचडीएफसी गृह कर्जे (HDFC Home Loan) घेण्यासाठी नियम व अटी काय असतात, त्याचबरोबर HDFC होम लोनसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि त्याचा व्यजदार काय असतो, अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीसाठी स्वप्नातील घर खरेदी करणे ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. परंतु आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे वाटते तितके सोपे काम नाही. देशातील वाढत्या मालमत्तेच्या दरांमुळे, आवश्यक तेवढया पैश्यांची व्यवस्था करणे अवघड असते. पण या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या साठी योग्य गृहकर्ज म्हणजेच होम लोन निवडण्याचा विचार करू शकता. त्यासाठी तुम्ही एखादे स्वस्त आणि परवडणाऱ्या गृहकर्जाचा म्हणजेच HDFC होम लोन चा नक्कीच विचार करू शकता.मित्रांनो, एचडीएफसी बँकेच्या सर्वात जास्त प्रमाणात मागणी असलेल्या उत्पादनां पैकी एक म्हणजे एचडीएफसी बँकेचे होम लोन (HDFC Home Loan ). आपल्या ही नावावर एक घर असावे असे तुम्हाला ही वाटतंच असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण करण्यास hdfc बँक नक्कीच मदत करेल. होम लोन साठी बँक तुम्हाला अनेक गोष्टी ऑफर करते, त्यात आकर्षक व्याजदर व जलद प्रक्रिया हे hdfc होम लोन चे खास वैशिष्ट्य आहे. एचडीएफसी होम लोन ची कर्ज घेण्याची प्रक्रिया अगदी त्रास मुक्त व ग्राहकांच्या अनुकूल असते. त्यामुळे च होम लोन घेताना एचडीएफसी बँक ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. याच hdfc होम लोन चे आणखी कोण कोणती वैशिष्ट्ये आहेत, hdfc होम लोन घेण्याचे फायदे, hdfc होम लोन चे व्याजदर, त्याची पात्रता यांबद्दल आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही जर या बद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

HDFC Home Loan Information in Marathi

HDFC होम लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)8.60% पासून पुढे
लोन रक्कम मर्यादा1 लाख ते 10 कोटी पर्यंत
कार्यकाळ12 महिने – 30 वर्ष
प्रोसेस चार्जेसपगारदार/स्वयंरोजगार: रकमेच्या 0.50% पर्यंत / रु 3,000, यापैकी जे जास्त असेल ते
स्वयंरोजगार नसलेल्या: रकमेच्या 1.50% पर्यंत / रु 4,500, यापैकी जे जास्त असेल ते

Features of HDFC Home Loan

SBI होम लोन ची वैशिष्ट्ये

 1. मित्रांनो, Hdfc होम लोन चे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे hdfc बँक कृषी, दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, वगैरे क्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या वावसायिकांनाही होम लोन उपलब्ध करून देते.
 2. Hdfc होम लोन चे व्याज दर हे वार्षिक 6.7 टक्क्यां पासून सुरू होते.
 3. तसेच एचडीएफसी गृह कर्ज परतफेड करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी 30 वर्षे इतका दिला जातो.
 4. याशिवाय एचडीएफसी बँक 30 लाख रुपयां पर्यंतच्या होम लोन साठी मालमत्तेच्या किमतीच्या 90 टक्क्यां पर्यंत निधी पुरवते.
 5. तसेच hdfc होम लोन साठी प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा 3,000 रुपये किंवा यापैकी जे जास्त असेल ते कर वगळून आकारले जाते.
 1. Hdfc बँकेतुन कर्जदार 1 लाख ते 10 कोटी रुपयां पर्यंतचे होम लोन घेऊ शकतात.
 2. Hdfc ची होम लोन प्रक्रिया डिजिटल आहे.
 3. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक व्याजदरांसाठी अ‍ॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) आणि ट्रूफिक्स्ड लोन प्लॅन यापैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.
 4. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY साठी पात्र असलेले ग्राहक क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम म्हणजेच CLSS चा ही लाभ घेऊ शकतात.
 5. याशिवाय बँकेने रु 25,000 ते रु 1.25 लाख दरम्यान च्या रकमेसाठी ओव्हर ड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध केली आहे.
 6. या व्यतिरिक्त फ्लोटिंग व्याजदरांवर घेतलेल्या होम लोन वर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क बँक आकारत नाही. आणि निश्चित व्याजदरावर घेतलेल्या होम लोन वर 2% प्री पेमेंट शुल्क अधिक जीएसटी लागू आहे.
 7. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक महिलां अर्जदार साठी व्याजदरावर 0.05 टक्के सवलत देत आहे.
 1. तसेच अर्जदार मालमत्ता निवडण्या पूर्वीच hdfc होम लोन मंजूर करू शकतो.
 2. केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी यांच्या साठी बँक अतिरिक्त कर्ज सुविधा उपलब्ध करून देते.
 3. याशिवाय एजीआयएफ ( AGIF ) म्हणजेच आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड या द्वारे एक विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात लष्कर कर्मचारी अतिरिक्त कर्ज घेऊ शकतात.
 4. तसेच अर्जदार भारतातील कोणत्याही ठिकाणाहून मालमत्ता खरेदी करू शकतो.

HDFC Home Loan Interest RatesHDFC होम लोन चे व्याजदर

पगारदार आणि स्वयंरोजगार व्यावसायिक यांच्या साठी व्याजदर पुढील प्रमाणे:-

 • महिला (30 लाख पर्यंत):- 8.45% ते 9.45%
 • इतर व्यक्तींसाठी (30 लाख पर्यंत):- 9.00% ते 9.50%
 • महिला (30 ते 75 लाख):- 9.20% ते 9.70%
 • इतर व्यक्तींसाठी (30 ते 75 लाख पर्यंत):- 9.25% ते 9.75%
 • महिला (75 लाख आणि त्याहून अधिक रकमेसाठी):- 9.30% ते 9.80%
 • इतर व्यक्तींसाठी (75 लाख आणि त्याहून अधिक रकमेसाठी):- 9.35% ते 9.85%

स्वयंरोजगार नसलेल्या व्यावसायिकांसाठी होम लोन व्याजदर पुढील प्रमाणे:-

 • महिलांसाठी (30 लाख पर्यंत):- 9.05% ते 9.55%
 • इतर व्यक्तींसाठी (30 लाख पर्यंत):- 9.10% ते 9.60%
 • महिलांसाठी (30 लाख ते 75 लाख) :- 9.30% ते 9.80%
 • इतर व्यक्तींसाठी (30 लाख ते 75 लाख):- 9.35% ते 9.85%
 • महिलांसाठी (75 लाख आणि त्याहून अधिक रकमेसाठी):- 9.40% ते 9.90%
 • इतर व्यक्तींसाठी (75 लाख आणि त्याहून अधिक रकमेसाठी):- 9.45% ते 9.95%

HDFC Bank Home Loan Eligibility Criteria

HDFC होम लोनसाठी पात्रता निकष

मित्रांनो, hdfc होम लोन साठी ची पात्रता ही अर्जदाराचे वय, उत्पन्न, अर्जदाराचा क्रेडिट स्कोर, क्रेडिट हिस्ट्री, निवृत्ती चे वय या अश्या बऱ्याच गोष्टी नुसार बदलू शकते. तरी देखील एचडीएफसी होम लोन मिळवण्यासाठी तुम्ही म्हणजेच अर्जदाराने खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

 1. अर्जदाराचे वय हे 21 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.
 2. अर्जदार कडे उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असणे गरजेचे आहे.
 3. पगारदार व्यक्तीला किमान वेतन रू 10,000 प्रति महिना व व्यवसाय असेल तर रू 2 लाख वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
 4. अर्जदाराचा क्रेडिट स्कोर व क्रेडिट हिस्ट्री चांगली असावी.

Documents Required for HDFC Home Loan

HDFC होम लोनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 1. मित्रांनो, hdfc होम लोन घेण्यासाठी आईजदाराने योग्य रित्या भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज व त्यासोबत स्वतः साज पासपोर्ट आकाराचे फोटो सादर करणे आवश्यक आहे.
 2. त्या सोबतच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.
 3. पत्त्याचा पुरावा म्हणून लाइट बिल, फोन बिल, किंवा इतर कोणतेही युटिलिटी बिल दाखवणे आवश्यक आहे.
 4. उत्पन्नाचा पुरावा म्हणून गेल्या तीन महिन्याची पगाराची स्लिप, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, फॉर्म 16 व आयटी रिटर्न्स, आणि मागील तीन वर्षांपासून व्यवसाय चालू असल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे.
 1. व्यक्ती स्वयंरोजगार करणारी असेल तर शॉप अँड एस्टॅबलीशमेन्ट ऍक्ट नुसार कंपनी चे रेजिस्ट्रेशन लायसन्स, तसेच व्यवसायाचे उत्पन्न, नफा तोटा खात्याचा तपशील, ऑडिट रिपार्ट, बॅलन्स शीट,आणि व्यवसाय चालू असल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मालमत्तेची कागदपत्रे
  नवीन घरासाठी:-
 2. Allotment Letter किंवा खरेदी करार आणि
 3. डेव्हलपर ला केलेल्या पेमेंट ची पावती

बांधकाम करण्यासाठी:-

 1. प्लॉट चे टायटल डीड्स
 2. लोकल ऑथोरिटीझ ने अप्रुव्ह केलेल्या प्लॅनची कॉपी
 3. अर्चिटेक्ट किंवा सिविल इंजिनिअर कडून बांधकामचा तयार केलेल्या आराखडा ची कॉपी इत्यादी.

HDFC Home Loan Processing Fees and Charges

HDFC होम लोन वर प्रोसेसिंग फी

मित्रांनो, एचडीएफसी होम लोन साठी पगारदार आणि स्वयंरोजगार व्यावसायिकांसाठी प्रक्रिया शुल्क हे कर्जाच्या रकमेच्या 0.50% पर्यंत किंवा रू 3000 यापैकी जे जास्त असेल. आणि स्वयंरोजगार गैर व्यवसायिकासाठी कर्जाच्या रकमेच्या 0.50% किंवा रू 3000. तसेच फ्लोटिंग व्याजदरावर कोणतेही प्री पेमेंट शुल्क आकारले जात नाही. पण निश्चित व्याजदरा वर घेतलेल्या होम लोन वर 2% प्री पेमेंट शुल्क आकारले जाते.

Different Schemes of HDFC Home Loan

HDFC होम लोनचे प्रकार / विविध योजना

मित्रांनो, hdfc होम लोन पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी अनेक प्रकारचे स्कीम्स होम लोन ऑफर करते. ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्या कोण कोणत्या योजना आहेत, त्या बद्दल पुढे जाणून घेऊ या…

 1. HDFC होम लोन: मित्रांनो, या कर्ज योजनेचा उद्देश हा फ्लॅट, बंगले, रो हाऊस खरेदीसाठी तसेच म्हाडा, डीडीए इत्यादी विकास प्राधिकरणांकडून मालमत्ता खरेदी करणे, विकास प्राधिकरणाने दिलेल्या जागेवर बांधकाम करणे हा आहे.
 2. HDFC रिच होम लोन (HDFC Reach Home Loan): मित्रांनो, घर बांधकाम करण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, तसेच सूक्ष्म उद्योजकांना किंवा पगारदार व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान किंवा ऑफिस खरेदी करायचे असेल तर किंवा ज्यांच्या कडे उत्पन्नाची पूर्ण कागदपत्रे नाही अश्या व्यक्तींसाठी ही गृह कर्ज योजना आहे.
 3. गृह शिल्लक हस्तांतरण योजना (Home Balance Transfer Scheme): मित्रांनो, तुम्हाला जर इतर कोणत्याही बँक किंवा NBFC कडून एचडीएफसी बँकेत कर्ज ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
 4. एचडीएफसी ग्रामीण गृह निर्माण कर्ज योजना (HDFC Rural Housing Loan Scheme): मित्रांनो, ग्रामीण किंवा मेट्रोपॉलिटियन सिटीज मध्ये नवीन किंवा जुनी निवासी मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकरी, दुग्धउत्पादक, किंवा बागायतदार शेतकरी यांच्या साठी ही योजना आहे. ग्रामीण किंवा शहरी भागात फ्री होल्ड किंवा लीज होल्ड रेसिडेंशिअल प्लॉट वर तुम्ही तुमचे घर बांधू शकता. तसेच टायलिंग व फ्लोअरिंग, इंटेरिअर किंवा एक्सटेरिअर प्लास्टर किंवा पेंटिंग अश्या विविध प्रकारे तुम्ही तुमचे घर सजवू शकता.

याशिवाय या योजने अंतर्गत तुम्ही तुमच्या घरात जागा वाढवू शकता क8नवा अतिरिक्त खोल्या काढू शकता. या योजनेत महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना गृह निर्माण कर्ज मिळवण्यासाठी त्यांची शेतजमीन गहाण ठेवण्याची गरज नाही.

 1. घर नुतनीकरण कर्ज योजना (Home Renovation Loan Scheme): मित्रांनो, घराचे रिनोव्हेशन करणे थोडे महाग असते. प्रत्येकाला च त्याचा खर्च परवडण्या सारखा नसतो. अश्या वेळी तुम्ही होम रिनोव्हेशन लोन घेऊ शकता. व तुमच्या घराचे मेकओव्हर करू शकता. यात फुम्ही तुमच्या घराचे टायलिंग, फ्लोअरिंग, प्लास्टरिंग, पेंटिंग यांसारख्या अनेक गोष्टी सुधारून घेऊ शकता.
 2. एचडीएफसी प्लॉट लोन (HDFC Plot Loan): मित्रांनो, एचडीएफसी चे प्लॉट लोन तुम्हाला तुमच्या घरासाठी जमीन घेण्यास मदत करते. जेणे करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणू शकता. या योजने अंतर्गत तुम्ही प्लॉट ची खरेदी किंवा पुनर्विक्री करू शकता. पगारदार किंवा स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती या लोन साठी अर्ज करू शकता.
 3. गृह विस्तार कर्ज योजना (Home Extension Loan Scheme): मित्रांनो, तुमच्या आत्ताच्या घरात अधिक ची राहण्याची जागा वाढवण्यासाठी किंवा घरात काही बदल करायचे असल्यास तुम्ही गृह विस्तार कर्जाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही वैयक्तिक रित्या किंवा संयुक्तपणे बँकेत गृह विस्तार कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही जर आधीच गृहकर्ज घेतले असेल तर अतिरिक्त सुविधा म्हणून, तुमच्या कर्जदात्याकडून गृह विस्तार कर्ज घेऊ शकता. आणि महत्वाचे म्हणजे गृह कर्जापेक्षा गृह विस्तार कर्ज स्वस्त असते. आणि आधीच गृह कर्ज असल्याने वितरण प्रक्रियेसाठी खूप कमी कागदपत्रे लागतात आणि पूर्ण प्रक्रियेसाठी ही कमी वेळ लागतो.
 1. एचडीएफसी टॉप अप कर्ज योजना (HDFC Top Up Home Loan Scheme): मित्रांनो, एचडीएफसी टॉप अप लोन हे तुम्हाला तुमच्या सध्याच्या गृह निर्माण कर्जा वर दिले जाणारे अतिरिक्त कर्ज आहे. ग्राहक त्यांचा व्यवसाय किंवा वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता बांधण्यासाठी हे कर्ज घेऊ शकतात. या योजने अंतर्गत तुम्हाला कमाल कर्ज रक्कम रू 50 लाख पर्यंत कमीत कमी कागदपत्रात मिळू शकते.
 2. प्रधान मंत्री आवास योजना (PMAY): मित्रांनो, तुम्ही जर गृह कर्जासाठी पात्रता निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या HDFC बँक शाखेला भेट देऊन प्रधान मंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकता. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांसाठी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत जास्तीत जास्त रू 2.67 लाख अनुदान मिळवू शकता.
 3. अनिवासी भारतीयांसाठी गृह कर्ज (Home Loan for NRI’s): मित्रांनो, हे कर्ज केवळ अनिवासी भारतीयांसाठी म्हणजेच एनआरआय (NRI) व्यक्तींसाठी आहे. अश्या व्यक्तींना भारतात घर खरेदी करायचे असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Benefits of HDFC Home Loan

HDFC होम लोन घेण्याचे फायदे

 1. मित्रांनो, HDFC होम लोन कर्जदारांना त्यांच्या पात्रते नुसार जास्त कर्जाची रक्कम मिळवून देते.
 2. HDFC होम लोन चे व्याजदर ही सर्वात कमी आहेत.
 3. यासोबतच HDFC होम लोन दोन ते तीस वर्षां पर्यंतचे लवचिक परतफेड पर्याय ऑफर करते. यामुळे कर्जदारांना त्यांच्या नुसार कर्ज परतफेडीचा कालावधी निवडता येतो.
 4. तसेच एचडीएफसी होम लोन आपल्या ग्राहकांना त्वरित कर्ज मंजूर करते आणि वितरण ही त्वरित देते. ज्यांना लवकर पैशांची गरज आहे त्यांच्या साठी ही गोष्ट खूप फायदेशीर आहे.
 5. आयकर कायदा, 1961 च्या तरतुदी नुसार ग्राहक एचडीएफसी होम लोनची मूळ रक्कम, भरलेले व्याज आणि प्रक्रिया शुल्क यावर कर लाभ ही घेऊ शकतात.
 6. या शिवाय आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड या अंतर्गत एचडीएफसी बँक भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना विशेष कर्ज ऑफर करते.

HDFC होम लोन साठी अर्ज कसा करावा?

मित्रांनो, एचडीएफसी होम लोन साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, व्हाट्सअँप द्वारे किंचा एचडीएफसी च्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.

 1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही एचडीएफसी च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन होम लोन चा अर्ज भरायचा आहे. व आवश्यक ते तपशील भरणे आवश्यक आहे.
 2. व्हाट्सअँप द्वारे एचडीएफसी होम लोन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 9555103000 या नंबर वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. त्या नंतर तुमच्या व्हॉट्सअँप वर एक मेसेज येईल. व नंतर विचारलेले काही तपशील द्यायचे आहे. मित्रांनो, कर्जासाठी अर्ज करण्याची ही प्रक्रिया खूप सोपी आणि जलद आहे. त्यामुळे तुमचा वेळ ही वाचतो आणि तुम्ही कधीही कुठूनही कर्जासाठी अर्ज करू शकता.
 3. तसेच एचडीएफसी होम लोन साठी तुम्ही तुमच्या जवळच्या एचडीएफसी शाखेला भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. व बँकेने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करून होम लोन मिळवू शकता.

HDFC होम लोन साठी कर्ज परतफेड कशी करता येईल?

मित्रांनो, एचडीएफसी बँकेने कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्या ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्या नुसार कर्जदार कर्जाची परतफेड त्याच्या गरजे नुसार योग्य तो पर्याय निवडून करू शकतो. बँकेकडून उपलब्ध करून दिलेल्या परतफेड पद्धतींची यादी पुढील प्रमाणे आहे:

 1. Flexible Loan Instalments Plan (FLIP):- मित्रांनो, नावाप्रमाणेच ही कर्ज योजना फ्लेक्झिबल म्हणजेच लवचिक आहे. यात सुरुवातीच्या वर्षांमध्ये EMI जास्त असते आणि नंतर कर्जदाराच्या उत्पन्नाच्या प्रमाणात ते कमी होतात.
 2. Telescopic Repayment Option:- मित्रांनो, या योजनेचा वापर करून तुम्ही म्हणजेच कर्जदार त्याच्या परतफेडीचा कालावधी हा 30 वर्षां पर्यंत वाढवू शकतो. यामुळे EMI अधिक परवडणारा बनतो आणि कर्जाची पात्रता सुद्धा वाढते.तसेच क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
 3. Step Up Repayment Facility (SURF):- मित्रांनो, या कर्ज परतफेड योजनेत कर्जदाराला कमी EMI भरण्याचा आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याचा फायदा मिळतो. तसेच जर नंतर, कर्जदाराच्या उत्पन्नात वाढ झाली तर परतफेड ही त्या प्रमाणा नुसार वाढु शकते.
  4.Tranche Based EMI :- मित्रांनो, ट्रान्चे आधारित ईएमआय वापरुन, कर्जदार ताबडतोब मूळ रकमेची परतफेड करू शकतो. तसेच वितरण केलेल्या रकमेवर त्यानंतरचे ईएमआय देऊ शकतो.
 4. Accelerated Repayment Scheme:- या योजनेत कर्जदाराचे उत्पन्न वाढले तर कर्जदाराला दर वर्षी त्याचा ईएमआय वाढवता येतो. ज्यामुळे कर्जाची परतफेड लवकर करता येते.

FAQ

HDFC कडून गृहकर्ज का घ्यावे ?
मित्रांनो, एचडीएफसी कमी व्याजदर ऑफर करते आणि त्याचे परतफेड कालावधीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. म्हणूनच एचडीएफसी कडून गृहकर्ज घेणे योग्य ठरते.

HDFC होम लोन चा जास्तीत जास्त कालावधी किती आहे?
मित्रांनो, HDFC तुम्हाला जास्तीत जास्त 30 वर्षांच्या कालावधीसाठी होम लोन देते.

HDFC होम लोन मंजुर होण्यासाठी किती वेळ लागतो ?
मित्रांनो, एकदा तुम्ही कर्जासाठी अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट केली की एचडीएफसी च्या होम लोन ला मंजुर होण्यासाठी कामाचे तीन ते सात दिवस लागू शकतात.

HDFC होम लोन साठी क्रेडिट स्कोर किती असणे आवश्यक आहे?
मित्रांनो, एचडीएफसी होम लोन साठी क्रेडिट स्कोर किमान 700 ते 750 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

पेन्शन धारक व्यक्ती एचडीएफसी होम लोन घेऊ शकतो का?
हो मित्रांनो, पेन्शन धारक व्यक्ती सुद्धा एचडीएफसी चे होम लोन घेऊ शकतो.

एचडीएफसी होम लोन ची कमाल मर्यादा किती आहे?
मित्रांनो, एचडीएफसी होम लोन ची कमाल मर्यादा रू 10 कोटी पर्यंत आहे.

HDFC मध्ये होम लोन साठी अर्ज करण्यासाठी किमान पगार किती असणे आवश्यक आहे?
मित्रांनो, पगारदार कर्मचाऱ्यांसाठी HDFC बँकेत होम लोन साठी अर्ज करण्यासाठी किमान वेतन 10,000 रुपये प्रति महिना असावा. तर, पगार नसलेल्या कर्मचार्‍यांसाठी वार्षिक रुपये 2 लाख असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण एचडीएफसी होम लोन (HDFC Home Loan) बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की हा लेख व ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. व अश्याच नवनवीन लेख व माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा. धन्यवाद।

Tags: HDFC Home Loan info in Marathi, HDFC Home Loan in Marathi, HDFC Home Loan Mahit, HDFC Home Loan Vyaj Dar, HDFC Home Loan Kagadpatra, HDFC Home Loan Kase Gyayche, HDFC Home Loan Sathi Kay Karayche, HDFC Home Loan Milel Ka, HDFC Home Loan Kase Gyayche, HDFC Home Loan Konala Milte, HDFC Ghar Karj, HDFC Ghar Karz, HDFC Ghar Karj Kase Gyayche, HDFC Ghar Loan Vyajdar